मासे २५) हलवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 April, 2011 - 05:05
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रश्यासाठी:
हलव्याच्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
वाटण : ओले खोबरे पाव वाटी, आले, लसुण, मिरची कोथिंबीर
तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
मिठ
चिंचेचा कोळ

तळण्यासाठी :
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
हवे असल्यास आल, लसुण वाटण किंवा लसणाच्या ५-६ ठेचलेल्या पाकळ्या.

क्रमवार पाककृती: 

हलवा कापुन हलव्याच्या डोक्याचा व शेपटाचा भाग रश्यासाठी वापरा व मधला भाग तळण्यासाठी वापरा.
कालवण :
हलव्याच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या. भांड्यात तेल तापवुन त्यावर लसुण पाकळ्यांची खमंग फोडणी द्या. लगेच त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन वाटण, चिंचेचा कोळ टाका. मग कालवणासाठी च्या तुकड्या त्यात टाका. मिठ टाका. उकळी आल्यावर कालवण ७-८ मिनीटांत तय्यार.

तळण्यासाठी :
साहित्यातले जिन्नस एकत्र तुकड्यांना लावा. तवा चांगला तापल्यावर तेल टाकुन हवे असल्यास लसुण टाकुन त्यावर तुकड्या मस्त मिडीयम गॅसवर खरपुस तळा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी.
अधिक टिपा: 

हलवा पापलेट सारखाच दिसतो पण त्याची खवले काळपट असतात. तर पापलेटला खवलेच नसतात.
हलवा हा चवदार असतो. पण उष्ण असल्याने तो ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना देत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आहे हलव्याची जोडी.
halava masa1.JPG

ह्या तुकड्या कालवणासाठी आणि तळण्यासाठी.
Halava masa.JPG

तयार झालेले पदार्थाचे फोटो काढण्याआधी पदार्थ गायब झालेले. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करते.
पुन्हा केल्यावर फोटो नक्की टाकते.

तयार झालेले पदार्थाचे फोटो काढण्याआधी पदार्थ गायब झालेले. त्यामुळे दिलगिरी व्यक्त करते>>>> Happy खुप दिवसात हलवा नाही खाल्ला , बघू आज आणते .

मस्त.. गावी गेलेले तेव्हा चापला चांगलाच याला.....

इतर माशांच्या तुलनेत हलव्याची चामडी खुपच जाड असते. मला अजिबात आवडत नाही ती खायला. खाताना मी तिला चक्क काढुन टाकते. कधी कधी मासे साफ करताना चामडी काढता आली तर तेव्हाच काढुन टाकते. (डोक्याच्या आसपासची येते अशी काढता. इतरत्रची नाही येत काढता)

तयार झालेले पदार्थाचे फोटो काढण्याआधी पदार्थ गायब झालेले.>>जागुतै, हरकत नाही. पण त्या तुकड्या सुद्धा काही कमी "लोभस" नाहीय...पाहुन tongue0022.gif

हिंग? माशाला? मला नव्हतं माहीत.. आणि माशांच्या स्वयंपाकात हिंग वापरलेलाही पाहिला नाही कधी..

जागु,
मला कच्च्या पदार्थांच्या फोटो पेक्षा तयार पदार्थांच्या फोटोचे कुतुहल जास्त असते...
मीठ मसाला लावलेले तुकडे पण ठेवले नाहीत का? Uhoh ते फोटो मला फार आवडतात.. Happy
त्यामुळे तुझ्या या बीबीला सरासरी मार्क.. जास्त नाही.. Happy

पुढच्या वेळी पदार्थ तयार झाला की नैवेद्य दाखवल्याशिवाय कोणालाही मिळणार नाही अशी ताकिद आधीच देऊन ठेव.. Proud

तयार झालेले पदार्थाचे फोटो काढण्याआधी पदार्थ गायब झालेले. >>>. जेवायच्या आधी अपेटायझर म्हणून हे फोटो पहायला आलो.. तर कच्चच पहायला मिळालं.. !! आता जुनेच फोटो बघतो जाऊन.. Happy

जागु , मला एक प्रश्न नेहमी पडतो, मासे खाणारे माश्याचं डोक पण खातात काय ? म्हणजे बनवताना त्याचं काय करतात?
मी व्हेज आहे म्ह्णुन हा मला पडलेला प्रश्न. Happy

माश्याच्या डोक्याला 'बोडीक' अस म्हणतात गोव्याला. तर हे बोडीक साफ करुन मग ते कालवणात वा तळुन खातात. बोडीक साफ करताना माश्याचे तोंड कापुन फेकुन द्यायच. आतल सगळ साफ करायच.

रचु डोक्याचा भाग कालवणासाठी वापरतात. कारण त्यात मांस कमी आणि कडक भाग जास्त असतो.

साधना हो ग मी पण काढते ती कातडी.

चातक, बागुलबुवा, किरू, पराग, अनिलभाई Happy

शैलजा आम्ही हिंग वापरतोच. मसाल्यातही हिंगाचा खडा असतोच. हिंगामुळे अपचन होत नाही.

दक्षे ह्यापुढे मी आधी मासे करताना तुला मनोमन चिंतुन माश्यांचे फोटो काढेन आणि मग इथे तुला नेवैद्य दाखवेन.

विजय वरच्या फोटोतली तारिख पहा. पण थोड्या प्रमाणात खाल्यावर नाही त्रास होत. पण ज्यांना उष्णतेचा त्रास असेल त्यांनी उन्हाळ्यात हा हलवा मासा टाळावा.

जागु , मला एक प्रश्न नेहमी पडतो, मासे खाणारे माश्याचं डोक पण खातात काय

हे कालवणात घालायचे आणि मग भाताबरोबर कालवण घेताना वाढुन घ्यायचे आणि निवांत एकेक भाग चवीचवीने खायचा. हलव्यासारख्या मध्यम आकाराच्या माशांची डोकी खुप चविष्ट असतात.

पापलेट आणि हलव्यात माझी पसंती तळलेल्या हलव्यालाच.

बोडीक साफ करताना माश्याचे तोंड कापुन फेकुन द्यायच. आतल सगळ साफ करायच.
>>> मग उरलं काय? डोळे पण काढून फेकायचे असतील ना?

डोकं खायच तर रावसाचं.

आयुष्यात एकदाच फक्त रावसाचं डोकं खाल्लय. स्वर्ग. म्हणुनच देवाने हा प्रथमावतार निवडला Happy

घोळीच डोक पण चांगल लागत. काही लोक खास डोकच घेतात घोळीच.
घोळीचा काटाही छान लागतो. त्याचे कालवण करतात.

>आम्ही हिंग वापरतोच >> अच्छा. असेल. मी कधीच नाही पाहिलं. तिरफळं घालतात ते ठाऊक आहे. प्रत्येकाच्या वेगळ्या पद्धती म्हणा.

जागू, बांगडे बनवतानाच असं नाही, इतरही माशांमध्ये घालतात. आणि मालवणीच असं नव्हे तर गोवा, कारवार ह्या भागांत बनवतात ना, त्यातही घालतात तिरफळं.

Pages