मासे २५) हलवा

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 20 April, 2011 - 05:05
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

रश्यासाठी:
हलव्याच्या तुकड्या
हिंग, हळद
मसाला
वाटण : ओले खोबरे पाव वाटी, आले, लसुण, मिरची कोथिंबीर
तेल
४-५ लसुण पाकळ्या ठेचुन
मिठ
चिंचेचा कोळ

तळण्यासाठी :
हिंग, हळद, मसाला, मिठ, तेल
हवे असल्यास आल, लसुण वाटण किंवा लसणाच्या ५-६ ठेचलेल्या पाकळ्या.

क्रमवार पाककृती: 

हलवा कापुन हलव्याच्या डोक्याचा व शेपटाचा भाग रश्यासाठी वापरा व मधला भाग तळण्यासाठी वापरा.
कालवण :
हलव्याच्या तुकड्या स्वच्छ धुवुन घ्या. भांड्यात तेल तापवुन त्यावर लसुण पाकळ्यांची खमंग फोडणी द्या. लगेच त्यावर हिंग, हळद, मसाला टाकुन वाटण, चिंचेचा कोळ टाका. मग कालवणासाठी च्या तुकड्या त्यात टाका. मिठ टाका. उकळी आल्यावर कालवण ७-८ मिनीटांत तय्यार.

तळण्यासाठी :
साहित्यातले जिन्नस एकत्र तुकड्यांना लावा. तवा चांगला तापल्यावर तेल टाकुन हवे असल्यास लसुण टाकुन त्यावर तुकड्या मस्त मिडीयम गॅसवर खरपुस तळा.

वाढणी/प्रमाण: 
५-६ जणांसाठी.
अधिक टिपा: 

हलवा पापलेट सारखाच दिसतो पण त्याची खवले काळपट असतात. तर पापलेटला खवलेच नसतात.
हलवा हा चवदार असतो. पण उष्ण असल्याने तो ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना देत नाहीत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागु, पहिल्या फोटुबद्दल धन्स कारण याला मी काळा पापलेट म्हणायचे, हाच हलवा हे आत्ता कळाले. या विकांताला करेनच! क्रुति जवळपास सारखीच आहे तुझी इतर मासळ्यांसारखी! तों.पा.सू

मी जागुच्या रेसिप्या बघणार नाही Angry

मी जागुच्या रेसिप्या बघणार नाही Angry

मी जागुच्या रेसिप्या बघणार नाही Angry

मी जागुच्या रेसिप्या बघणार नाही Angry

मी जागुच्या रेसिप्या बघणार नाही Angry

मी जागुच्या रेसिप्या बघणार नाही Angry

(हे मी स्वतःला बजावत आहे)

स्लर्प!!! जागू ,तुझ्या रेसिपीज एकदम साध्या आणी मस्त असतात.. फार कॉम्प्लिकेटेड असल्या कि करायचा कंटाळा येतो (मला!! Happy )
दक्षी.. तुला बरी जागुतै नी सवय लावलीया माश्यांचे फोटू पाहायची.. आता कमीत कमी आम्ही तुझ्या समोर 'गजाली', तृष्णा मधे बसून मिटक्या मारून खाऊ तरी शकतो नै ??

दक्षीणा, दिनेशदा आणि अश्विनी ह्या व्यक्ती व्हेजी असुनही माश्यांच्या रेसिपिज बघायला न चुकता येतात. त्यांचे खरच मन:पुर्वक धन्यवाद. अजुन कोणाचे नाव राहिले असेल तर सांगा.

जागू, मी तुझ्याकडे महिनाभर रहायलाच येते, काय? त्या तुकड्या कसल्या ताज्या दिस्तायत. एकदम मस्त गुलाबी गुलाबी.

दिनेशदा, मी पण दक्षिणासारखा केवळ अकॅडेमिक इंटरेस्टनी हे सगळे बघत असतो. >>>>> Biggrin

जागू, मला तुझी रेसिपी नाही दिसली तर तू मला तुझ्या रेसिपीजवर बोलावून घेतेस आणि मी निव्वळ एक गम्मत म्हणून जे काही लिहिते ते साफ मनाने गम्मत म्हणूनच मानतेस याबद्दल तुझे देखिल आभार गं Happy

मामी वाट पाहतेय ग तुझी.
अश्वे मला सत्कार समारंभ चालु झाल्यासारखा वाटतोय. भेट म्हणुन फुलांच्या ऐवजी सुक्या बोंबलाचे पॅकॅट्स दिसतायत डोळ्यसमोर.

>>> मग उरलं काय? डोळे पण काढून फेकायचे असतील ना?>>>
डोळे फार चविष्ठ असतात Happy असं मी ऐकलय Wink

डॉ. हे सुके बोंबिल तुमच्या क्लिनिक मध्ये आले होते का तपासुन घ्यायला ? त्यांची पट्टीने उंची पाहून त्यांचे वजन किती असावे हा सल्ला देत होतात का ?

शैलजा, माझ्या सासरी माश्यात हिंग वापरतात. तिरफळं नाही.
जागू,
नुकताच नवर्‍याने साबा स्पेशल रेसिपीने कैरीचे तुकडे घालून केलं होतं एकदा पापलेट आणि बोयटं तर एकदा मांदेली बहुतेक (मला काहीच फरक कळत नाही!). पण कैरीचे तुकडे आणि मासा असं प्रकरण खायला(म्हणजे हे असं उलीससं चमचाभर.. यापलिकडे अजून माझी मजल जात नाहीये) मस्त लागलं. आणि चक्क खाल्ल्यावर माश्याचा आफ्टरस्मेल नाही.
नवरा सांगत होता की अश्या प्रकारे केलेला मासा जनरली कुठल्या हाटेलात मिळत नाही. खास जयगड भाग स्पेशल आहे. नवर्‍याकडून रेसिपी विचारून घेईन आणि टाकेन. त्याने परत केलं कधी तर फोटोही टाकेन.

Biggrin

नीधप अग कैर्‍यांचा सिझन आला की मी सगळ्या कालवणांमध्ये आमट्यांमध्ये चिंच, कोकम ऐवजी कैरीच घालते. मस्त लातगे. काल माझ्या मुलीनेही आमटीतली कैरी भाताबरोबर आवडीने खाल्ली.

<< डोळे फार चविष्ठ असतात असं मी ऐकलय >>
काय की, मी फक्त "तुमचे डोळे सुंदर आहेत" एव्हढीच कॉम्प्लिमेन्ट वाचली होती माबोवर Wink

नीधप, टाक गं लवकर तुझी रेसिपी.. तु खायला धजावलीस म्हणजे काहीतरी ग्रेट प्रकरण असणार हे नक्की. आणि तु मासे खायला सुरवात कर गं बिन्दास.. इतका सुंदर प्रकार निसर्गाने आपल्यासाठी निर्माण केला असताना केवळ आजपर्यंत खाल्ले गेले नाही म्हणुन आताही खाता न येणे याचे मला खुप वाईट वाटते. मासे खुप छान लागतात, शिवाय पचायलाही हलके. तु चिकनपर्यंत मजल नको मारुस, पण मासे नक्की खा.

(हलवा हा चवदार असतो. पण उष्ण असल्याने तो ऑपरेशन झालेल्या व्यक्तिंना देत नाहीत.)

- माझे पोटाचे आपरेशन होऊन ३ वरिस झले आता चालेल काय खाल्लातर ?

Pages