लहान मुलांचे आजार

Submitted by admin on 1 July, 2008 - 05:31

डॉक्टराना विचारा! २२ दिवसाच बाळ म्हणजे खुप लहान आहे काहीही असु शकत किवा नसुहि शकत पण त्यावर इथे कुणि कस सल्ला देवु शकेल , तुम्हाला नाराज करायच नाही पण शक्यतो ह्या शन्का एक्स्पर्ट कडुनच सॉल्व्ह करुन घेणे उत्तम !

धन्यवाद प्राजक्ता
डॉ शी कन्फर्म केलेय.त्यांचे म्हणणे आहे कदाचित माझ्या जेवणामधून काहीतरी त्याला न पचणारा घटक जात असावा
पण नॉर्मल आहे बाकी

मला खरच हा प्रश्न पडतो की खरोखर असे असू शकते का?

तुम्ही काय ज्यास्त फायबर वगैरे खाता काय? बाळाच्या शीला फेस येणे हे सहसा पोट बिघडल्याचे लक्षण असु शकते किंवा आईच्या खाण्यात असे काही आहे जे बाळाला पचन नाहीये. तो रडत नसला तरी त्याचे पोट शी करताना ताठ लागते किंवा कुंथत शी करतो का बघा.

आणि इतकं तान्ह बाळ आहे तर , डॉक्टरकडे नक्कीच घेवून जा.... इथले उपाय नुसते करेपर्यंत.

अच्छा| तुम्ही आलात का डॉक कडे जावून? तुमची नंतरची पोस्ट आता वाचली. पण तुम्ही स्वतः गॅसी पदार्थ बघा काय खाता का काय ते..

माझ्या अनुभवानुअसार,
मी पालक खाल्ला होता एकदा डिलीवरी नंतर , तो माझ्या मुलीला अजिबातच चालत न्हवता... तिची इतकी फेसाळ हिरवी पॉटी बघून मी घाबरलेले ते आठवले. तसेच मी मेथीचे लाडू , मेथीचे वरण असला मारा एकदा केला ( म्हणजे मी खात होते दिवसभर आईने दिले म्हणून) की ते पण मुलीला जराही झेपत न्हवते.
मला इतके ते मेथीचे लाडू आवडायचे पण कसच काय... बरीच डोके फोड केल्यावर समजले की हे ज्यास्त फायबर आणि गॅसी प्रकरण होतय मुलीला. गॅसी पातळ किंवा चिकट विचित्र वास असेल शी ला तर नक्कीच अपचन.

आज तेच मेथीचे लाडू माझी मुलगी आवडीने खाते. आम्ही करतोच ते थंडीत... पण तेव्हा खूप त्रास झालेला विचार करून की काय कारण आहे म्हणून.

धन्यवाद् झंपी
वास येत नाही फक्त फेसळ आणि चिकट् आहे
मायबोली वर असा धागा आहे का प्रसुती नंतरच्या आहाराबाबत
असेल तर कृपया लिंक दया
@सानू११
मुलांना बिस्किट जेवढे उशिरा देता येईल तेवढे बरे असे मला वाटते .मायबोलीवर सर्च मारा बाळांचा आहार म्हणून खूप खुप पौष्टिक रेसिपी आहेत.दिनेशजीच्या खुप छान आणि सोप्या आहेत

प्रसुति नंतर आहार
सर्व पचायला सोपे पदार्थ, मुगाचं वरण, भात, पोळ्या/भाकर्‍या.ह डाळ, वांगी, भोपळी मिरची, मटकी, दा कु थोडक्यात आयुर्वेदाने वात किंवा पित्त म्हणून
डिफाईन केलेले पदार्थ, मैदा, तिखट, मसालेदार टाळणे.
काहि महिने झाले, बाळाची इम्युनिटि आणि पचन शक्ती वाढली की हळूहळू अ‍ॅड करता येतील.

मी पहिल्या प्रसूतीनंतर सगळी पथ्यं पाळली. तरी बाळ भरपूर रडायचं. रात्री नीट झोपायचा नाही. त्याला सलग २० -२५ दिवस हिरवी शी झाली. मी काळजीत. डॉ म्हणाल्या काही बिघडत नाही. आजेसासवा म्हणाल्या हिरवी झाडं बघून बाळं हिरवी शी करतात. Lol नंतर आपोआप थांबली.
दुसऱ्या वेळी एकूण हलका आहार ठेवला, पण कडक पथ्य पाळले नाही. बाळ एकदम मजेत.

मी कुठेतरी वाचलं होतं की आईच्या दुधातल्या घटकांचं प्रमाण बदलत असतं. ते बाळाच्या पचनशक्तीशी मॅच होता होता थोडा वेळ जाऊ शकतो.

बाळाला ट्रिपल चा पहिला डोस दिल्यावर ताप येणे कम्पल्सरी आहे का
माझ्या मुलाला ताप आला नाही .पुन्हा डॉ कड़े न्यावे का?

माझा मुलगा आता ५ महिन्याचा आहे. तो दिड महिन्याचा असताना एकदा त्याच्या नाकातून दूध येऊ लागले आणि त्याचा श्वास अडकलेला. पहाटेची वेळ असल्यामुळे लगेचच दवाखान्यात पोहोचलो. पण त्या दरम्यान काय करावे हे समजत नव्हते. बाप्पाच्या कृपेने बाळाला शिंक आली आणि तो थोडा नाॕर्मल झाला. हाॕस्पिटलमध्ये पोहचल्यावर नर्सने ट्युबने उरलेले दूध काढून नाकात नेसल ड्राॕप घातला. आणि पुन्हा असे झाल्यास बाळाला उपडे पोटावर झोपवून पाठीवर थोपटायला सांगितले. तसेच नाकात नेसल ड्राॕप टाकण्यास सांगितले.
आज मी बाळाला सूप भरविताना पुन्हा त्याच्या नाकातून सूप बाहेर आले. डाॕक्टरांनी सांगितलेले तसे मी केले पण बाळ एव्हढा रडत होता की क्षणभर काही सुचतचं नव्हतं. अजूनही लिहताना माझे हात थरथरत आहेत.
हे असं नाकातून लिक्विड कशामुळे बाहेर येते? बाळाला अंगावर दूध पाजताना किंवा काही भरविताना काय खबरदारी घ्यावी. पुन्हा असे झाल्यास ताबडतोब कोणता उपाय करावा?

हे त्याच्या डॉक्टरांना विचारा. इथे मायबोलीवर टाइमपास करायला आलेल्या लोकांना इतक्या गंभीर शंका का विचारता? तुम्हीच नाही तर एकुणच इथे येउन वैद्यकीय सल्ले मागण्याची फार सवय आहे लोकांना. लहान बाळांच्या बाबतीत तर अजिबात हयगय न करता तज्ञ डॉक्टरचाच सल्ला घ्या. घरातील वडिलधार्‍यांचा सुद्धा नको.

सिंडरेला, मी आधीही डाॕकला विचारले आहे ज्याबद्दल वर लिहिले आहे आणि आताही विचारलेच. पण इथे विचारले कारण माझा माबोचा माझा पुर्वानुभव खुपच चांगला आहे. आणि इथे जर कोणाला सेम अनुभव असेल तर शेअर करतील
मान्य आहे इथे लोक टाईमपास करायला येतात पण काही ठिकाणी जास्तकरुन गंभीर धाग्यावर बरेचजण योग्य सल्लाच देतात.
तुमचा सल्लाही योग्यच आहे कारण कोणी डाॕक्टरला न विचारता इथले उपाय /उपचार करू नये ही त्यामागची कळकळ पोहचली.

सहमत आहे निल्सन
मी सुद्धा इथे आपण घरी वडिलधाऱ्या ना सल्ला विचारतो त्या अर्थीच विचारला होता बाळाच्या बाबत
आणि अर्थातच डॉक् ला विचारलेच होते पण त्यापेक्षा मला इथल्या सल्ल्यांमुळे जास्त मानसिक आधार मिळाला होता

डॉ नी सांगितलेले उपाय कराच, पण खबरदारी म्हणून अंगावर पाजताना किंवा काही भरवताना नाक हे तोंडाच्या पातळीच्यापेक्षा उंचावर असू द्या. बाळ बसून खायला लागले की आपोआप तसंच होईल, पण आडवे असताना डोक्याखाली हात किंवा उशी ठेवून डोके थोडे उभे करा. म्हणजे तोंडातलं दूध नाकात जाणार नाही.

आजार नाही पण माझा ३.६ वर्षांचा मुलगा रात्री अजुनही झोपेत शु करतो... अगदी झोपण्यापुर्वी नेऊन आणलं तरी.... ही सवय कशी मोडावी ???

सहा महिन्यांच्या बाळाला भाताचे पाणी पाजले होते,पण त्याच्या पोटात दुखायला लागले आहे. इतर काही खाऊ घातले नाही अजून पहिल्यांदा चार दिले आहे . गॅस झाला आहे.काय करावे

पहिल्यांदा चार दिले>>> ४ चमचे का? ते असो.
हिंगाच्या पाण्याचा (हिंग पाण्यात कालवून) लेप बेंबी आणि भोवताली लावा.पेडीकडे न्या.

<<< पेडीकडे न्या. >>>
वाट्टेल ते शॉर्टफॉर्म वापरू नका हो. सरळ paediatrician किंवा डॉक्टर म्हणा.
पेडी (pedi) हा पायाशी संबंधित आहे किंवा "पेडोफाइल"ला पण तसे म्हणतात. तुम्ही तुमच्या बाळाला तिकडे न्याल का?

pedi ha shortform sarras aikala ahe.
Mom groups var tar agadi common..
Ajun kuni?

Maza 9 month cha mulga ahe, tyala ata shi cha problem suru zalay, tyala shi
ghatta ani kadak hote, Dr boltat tyala jad khayla dya, tari hi tyala shi Hot
nahi, goli lavavi lagte, kahi tari upay suchva

त्याला पाणी पाजत असालच, थोडं जास्त पाजून पहा. भाज्या शिजवून mash करून देत असाल तर त्याचं प्रमाण वाढवा. फायबरचं प्रमाण वाढलं की सुरळीत होईल कदाचित.

भरपूर फायबर्स खायला घाला - म्हणजे भाज्या.
दिवसातून २ वेळा भाज्या , सूप वगैरे द्या. टोमॅटो, पालक सारक आहे.
फळं द्या, पपईने पोट साफ होते, ती पण रेग्युलरली द्या.
पोट गरम पाण्याच्या पिशवीने किंवा ओव्याच्या पुरचुंडीने शेका.
सकाळ- संध्याकाळ पोटाला बेंबीवर आणि त्याभोवती एरंडेल तेल लावा.
(तेल लावल्यावर त्यावर शेकू नका)
साबुदाणा खीर किंवा इतर कशात देत असाल तर सध्या थांबवा.
पाणी जातंय का पोटात भरपूर? दिवसातून १०-१२ वेळा शू व्हायला पाहिजे. अधून मधून गरम पाणी द्या. पाण्यात एक छोटा चमचा साजूक तूप घालून द्या, किंवा नुसतंच चमचाभर तूप द्या.
त्याच्या जेवणात/ सुपात थोडी ओव्याची पूड टाका.
आयर्नचं औषध सुरू असेल तर त्यानेही असा त्रास होतो. डॉक्टरांना कुठल्या औषधामुळे तर होत नाहीये ते विचारून घ्या.

अन्न बदलून पहा, कुठल्या पदार्थामुळे त्रास होतोय का ते पहा.
अन्नाचे भरपूर प्रकार बदलून द्या.
हलकं अन्न द्या. त्याला वरण भात, मूग खिचडीचा कंटाळा आला असेल तर पोहे १५ मिनिटे पाण्यात भिजवून तुपात फोडणी घालून द्या. मी फोडणीत कांदा पण किसून घालायचे.
बिन तिखटाचा, तुपाच्या फोडणीचा पातळ उपमा द्या.

पॉटी झाली नाही की पोट फुगते, अन्न जात नाही आणि अन्न नाही म्हणून पॉटी होत नाही असं चक्र सुरू होतं. दर दोन- अडीच तासांनी थोडंस अन्न त्याच्या कलाने द्या. सध्या पोटाचं चक्र नीट होईपर्यंत शक्यतो प्रत्येक वेळी वेगवेगळे पदार्थ द्या , अगदीच जमत नसेल तर प्रत्येक वेळी पदार्थ गरम गरम खायला घाला.

Pages