मिरच्यांचे लोणचे - फेसलेली मोहरी घालून

Submitted by स्वाती_आंबोळे on 14 March, 2011 - 16:02
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पाव किलो हिरव्या मिरच्या
अर्धी वाटी लाल मोहरी
एक टीस्पून हळद
दोन टीस्पून कच्चा हिंग
तीन ते चार टीस्पून मीठ
अर्धा टीस्पून मेथीदाणे
पाच-सहा लिंबांचा रस
एक टीस्पून तेल

क्रमवार पाककृती: 

मिरच्यांचे बारीक तुकडे करावेत. त्यात मीठ, हळद व एक टीस्पून हिंग घालावा. हे मिश्रण नीट एकत्र करून ठेवावे.
एक चमचा तेलात मेथीदाणे तळून घ्यावेत. हे तळलेले मेथीदाणे मिक्सरवर बारीक वाटून घ्यावेत. थोडा लिंबाचा रस घालून लाल मोहरी बारीक वाटून घ्यावी. मेथ्या आणि फेसलेल्या मोहरीची पूड मिश्रणात मिसळावी.
उरलेल्या तेलात एक टीस्पून हिंग तळून घ्यावा व तोही मिसळावा. वरून उरलेला लिंबांचा रस घालावा.
हे सर्व मिश्रण पुन्हा नीट एकत्र करून बाटलीत भरून ठेवावे.
वरून (हवी असल्यास) फोडणी थंड करून घालावी.

अधिक टिपा: 

काळी मोहरी वापरल्यास 'ती' चव येणार नाही. कडू व्हायची शक्यता जास्त. Happy
लाल मोहरी घेतांनाच एखादा दाणा चावून बघावा. तो तिखट लागला तर ती मोहरी वाटल्यावर चांगली चढते. (सुट्टी मोहरी मिळत नसेल तिथे हे जमणार नाही. पण भारतात जमेल.)
चवीनुसार लिंबू,मीठ याचे प्रमाण बदलावे.
लिंबूरसाऐवजी कैरीचा कीसही चांगला लागतो.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फेसलेलि मोहरी म्ह णजे काय please explain>>>
सुयोग, मोहोरी आधी मिक्सरमध्ये कोरडीच बारीक करायची मग त्यात तो कूट भिजेल एव्हढा लिंबाचा रस घालायचा आणि पुन्हा हे मिश्रण मिक्सरात वाटायचं. त्याचा रंग बदलतो - फिका पिवळा रंग येतो, झणकाही जाणवतो. हेच ते मोहोरी फेसणं.

प्रभा, मी साधारण जॅमची (बहुधा ४०० ग्रॅम ची) बाटली भर केलं होतं (वर दिलेल्या प्रमाणात तेव्हढं झालं). ते महिना दीड महिना; खरंतर जरा जास्तच गेलं. फोडणी वगैरे घातली होती. फार स्ट्राँग होतं हे लोणचं. पाणी अजिबात वापरलेलं नसल्यानी भरपूर टिकेल खरंतर

Pages