अडई

Submitted by मिनी on 13 March, 2011 - 21:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

१ कप तांदुळ (उकडा असेल तर उत्तम, पण नसेल तर घरात जो असेल तो चालू शकेल.)
१/२ कप चणा डाळ
१/२ कप तूर डाळ
१ चमचा उडिद डाळ
५ लाल मिरच्या (तुमच्या चवी प्रमाणे कमी जास्त करु शकता)
हिंग
बारिक चिरलेली कोथिंबिर
कढीपत्याची पानं
मीठ चवीप्रमाणे

क्रमवार पाककृती: 

१. तांदूळ आणि बाकीच्या सगळ्या डाळी स्वच्छ धुवुन एका भांड्यात साधारणपणे ४-५ तास भिजत घाला. त्याच भांड्यात मिरच्यापण भिजत घाला.
2. ४-५ तासांनी भिजत घालेल्या डाळी + तांदुळ + लाल मिरच्या ह्यांचं मिश्रण ग्रांईंडर मध्ये वाटुन घ्या. वाटतांना त्यात हिंग, कढीपत्त्याची पानं आणि मिठ घाला. खूप बारीक वाटू नका, थोडसं जाडसर ठेवा.
३. वाटलेल्या पीठात बारिक चिरलेली कोथिंबिर घाला. आणि तव्यावर डोसे घालतो त्यापेक्षा थोडं जाडसर अडई घाला.

हा फोटो:

Adaai.JPG

वाढणी/प्रमाण: 
वर दिलेल्या प्रमाणामध्ये ह्या फोटोतल्या साईज सारखे साधारण ११-२२ होतात.
अधिक टिपा: 

१. तव्यावर मिश्रण टाकल्यावर कडेने थोडं तेल सोडलं की क्रिस्पी होतात अडई.
२. http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/116302.html?1200915323 इथे जुन्या मायबोलीवरच्या रिसिपीज आहेत. पण प्रमाण वेगवेगळं आहे.
३. नारळाच्या चटणी बरोबर एकदम मस्त लागतात.
४. मुळच्या रेसिपीमध्ये मेथीचे दाणे नव्हते, पण मी १ चहाचा चमचा मेथीचे दाणे पण वापरले.
५. ह्यात फरमेंट करायची गरज नाही. भिजवुन वाटुन लगेच करता येतं.
६. अश्याप्रकारच्या आणि अगदी ह्याच प्रमाणातली रेसिपी अंतरजालावर उपलब्ध असेल तर मला माहित नाही, आज सकाळी माझ्या मित्राने मला ही रेसिपी दिली आणि मी लगेच करुन पाहिलं. आवडली म्हणुन इथे शेअर केली.

माहितीचा स्रोत: 
तेलगु मित्र.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिनी झकास झाली अडई.. नाश्त्यासाठी नविन आणि डोक्याला ताप न देणारा पदार्थ मिळाला, धन्यवाद Happy

मी काल केली. Happy चण्याऐवजी मुगाची डाळ. एक भोपळ्याचा कॅन होता त्यातला थोडा पल्प घातला.
सर्वांचे फोटो छान आलेत.

आठवड्यातून मी एकदा तरी करते हे मुलांसाठी.. सोबत चटणी देते आणि नॉन स्टिक वर करतना तेल थोडं जास्त टाकते किवा झाल्यावर बटर लावते.. मला खायचे नसतात त्यामुळे नो प्रोब्स..
मुलं मजेत खातात. Happy

सर्वात भारी काय आहे, की वर फोटो दिला आहे, अगदी तसेच 'अडई' होतात Happy त्यामुळे कृतीच्या मध्येच पॅनिकी वातावरण होत नाही Proud प्रमाणही, अंदाज अगदी पर्फेक्ट आहे. परत एकदा, धन्स मिनी Happy

मस्त प्रकार आहे हा! काल अडई + नारळाची चटणी असा बेत केला होता. सगळ्यांनी आवडीने खाल्ला.
धन्स मिनी.
(अजुन एकदा धन्स ईथेच देते. तुझ्या पद्धतीने आज चिकन केले. मस्त झाले होते.)

अरे वा!! इतक्या लोकांनी करुन पाहिली. मित्राच्या आईला सांगितलं तर काकु जाम खुष झाल्यात. Proud सगळ्यांना परत धन्यवाद.

मिनि
मिपण आज सकाळिच करायला घेतलि, पण तव्यावरुन वर उठायलाच तयार नव्हति, पिठ फ्रिज मध्ये कोंबुन आलेय
(चुरा चविला छान लागला, पिलुने व.व १, आवडिने खल्ला)

आता त्यात रवा/तांदुळ पिठ मिसळु का?

प्लिज रिप्लाय

आज नाष्ट्याला अडई. मस्त मस्त Happy मी अर्धी वाटी मुगाची डाळ पण घातली. तिन्ही डाळींचे डबे शेजारी आहेत. एकामागून एक घालत गेले. मग आठवलं मिनी म्हणालेली की हव्या त्या डाळी घाला Wink

एक शंका, तुरीची डाळ असल्यामुळे की काय पीठ तव्यावर पसरलं की वरण जळाल्याचा वास येत होता. तुम्हाला कुणाला नाही आला का असा वास ?

आज नाष्ट्याला अडई. मस्त मस्त स्मित मी अर्धी वाटी मुगाची डाळ पण घातली. तिन्ही डाळींचे डबे शेजारी आहेत. एकामागून एक घालत गेले. मग आठवलं मिनी म्हणालेली की हव्या त्या डाळी घाला

एक शंका, तुरीची डाळ असल्यामुळे की काय पीठ तव्यावर पसरलं की वरण जळाल्याचा वास येत होता. तुम्हाला कुणाला नाही आला का असा वास ?

<< बाप रे सिंडे, किती सेम पिंच करु ??
ऑलमोस्ट वर्ड टु वर्ड सेम लिहायला आले होते मी Proud
माझ्याकडेही ब्रे फा ला अडई आणि मी पण मुगाची डाळ सुध्द्दा घातली आणि मला पण वरण जळल्याचा वास आला. (चुकुन बर्नर वर डाळ पडलीये का ते पण चेक केलं).. अगदी सेम , तेच विचारायला आले होते !!
पण चव सही झाली, मिनी :).

तुमच्या दोघींच्या डाळी जास्त झाल्या का तांदुळाच्या मानाने? तांदुळाच्या निम्म्या डाळी असल्या की नाही येत वरणाचा वास.
मी बहिणीला ही पाकृ सांगितली तर तिने मला अजून एक भन्नाट प्रमाण दिलं अडईचं - प्रत्येकी एक भाग मूगडाळ, तूरडाळ, चणाडाळ, उडिदडाळ, मसूरडाळ आणि दहा भाग तांदूळ Happy

मी मिनीने दिलय तेच प्रमाण फक्त कपच्या ऐवजी वाटीने घेतलं. पण खाताना चव नाही लागली जळकी.

मंजू, मसूर डाळीबद्दल बहिणीला सेम पिंच. मी आजच डाळ घेऊन आले. पुढल्या वेळी घालायला Happy

नाही, प्रमाण अगदी मिनीने दिलेलच घेतलं, खाताना नाही आला पण डोसा झाल्यावर वरण जळल्याचा वास आला खरच..

vibha1204 >>> तुम्ही कुठल्या तव्यावर केलं ? नॉन स्टीकवर अजिबात नाही चिटकत. शिवाय, डोसा, थालिपीठ ह्यासारखे प्रकार करतांना जर तवा नीट तापला नसेल तर हमखास पीठ तव्याला चिटकुन राहतं. कदाचित तांदळाचं पीठ घालुन ट्राय करता येईल.

सिंडी/ डिजे वरच्या प्रमाणात मी करुन पाहिलं, मला नाही आला जळका वास. Uhoh

सिंडे, तू मुगाची डाळ 'पण' घातलीस म्हणालीस तर मला वाटलं डाळ तांदुळाचं प्रमाण एकास एकाऐवजी दिडास एक झाल्यामुळे वरणासारखा वास आला असेल असं मला वाटलं. असो.
तुम्ही दोघींनी क्रिस्प वरणभात खाल्लात असं समजा Wink

मंजु,
अगं उलट क्रिस्प होउ दिलं नाही मी वरण जळल्यासारखा वास आला म्हणून, उलट अजुन क्रिस्प्/खरपूस हवं होतं या फोटो सारखं दिसण्यासाठी , नेक्स्ट टाइम तूर डाळ थोडी कमी टाकून पाहीन.

मुलींनो तुम्ही एका वेळेला इतक्या डाळी का घालताय?? हव्या त्या डाळी घ्या म्हणजे तुर-मूग, तुर-चना, मुग-चना असे काँबिनेशन्स घ्या. बरोबर ना मिनी?

हव्या त्या डाळी घ्यायच्या पण एकूण तांदूळ : डाळ हे प्रमाण सेम ठेवायचे. तुम्ही ४-५ डाळी अर्धी अर्धी वाटी घेतल्यात का? Happy

मला नाही वाटत प्रमाण चुकवलं असेल पण काही वेळेला तुरीच्या डाळीला वेगळा वास असतो .. त्यामुळे असू शकेल .. एकदा मी आणलेल्या डाळीला इतका विचित्र वास यायचा कुकर मध्ये ठेवल्यावर की मी ते अख्खं पाकीट फेकुन दिलं ..

हायला इतक्या पोष्टी पाहुन मला वाटलं इथे पण पेटलं की काय? Wink
मैत्रेयी/ मंजुडी म्हणताय ते कारण असु शकेल. डाळी आणि तांदूळ यांचं प्रमाण सेम राहिलं पहिजे.
किंवा मग युवती म्हणते तसं बेसिकमेच राडा होगा Proud

Pages