पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -२

Submitted by रूनी पॉटर on 10 March, 2011 - 17:20

या अगोदरचा पाककृती हवी आहे. माहिती आहे का? -१ धागा.
पाककृती हवी आहे? इथे विचारा. पण त्या अगोदर
या ठिकाणी, या ठिकाणी आणि या ठिकाणी अगोदरच आहे का हे पाहिलत तर आपल्या सगळ्यांचा वेळ वाचू शकेल.
बर्‍याचदा पोळी-चपाती-फुलके-पराठे याबद्दल प्रश्न येतात, त्यासाठी आता इथे वेगळा धागा आहे.
तसेच वेगवेगळ्या पदार्थांच्या घटकांच्या नावाबद्दल वगैरे प्रश्न इथे विचारता येईल

इथे फक्त पाककृतींबद्द्ल प्रश्न विचारणे अपेक्षित आहे. नवीन पाककृती इथे लिहू नयेत. त्या लिहिण्यासाठी "नवीन पाककृती" हा लेखनाचा धागा वापरावा. असे केल्याने पाककृतींचे योग्य वर्गीकरण होईल, सगळी माहिती एका ठिकाणी संकलित होईल व भविष्यात ती पाककृती शोधणार्‍यास सोपे पडेल.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साक्षी मग साधे दुध कमी घालायचे. यासाठि अगदी थोडा आधी करुन पहायचा. करताना सगळे प्रमाण नीट नोंद करायचे. आणी पुढ्च्च्या बॅचला बदल करायचा. ( ही माझी नेहमीची पद्धत ) मी २५० मिलीलिटारचे ४-५ पाकिटे आणाते. मिळतात तेव्हा. आणी याच पद्धतीने करते

धन्स वर्षा . पहिल्यांदाच करणार आहे. नेहमी सा.बा. किंवा आई करते. करून नक्कि सांगेन कसा झाला ते.

कुकर मध्ये ठेवताना खाली काहीतरी भांडे ठेवून मग ते खरवसाचे पातेले ठेवावे नाहीतर कधी कधी कुकर मधले पाणी त्यात जाउन पाणचट होउ शकते. झाकण असले तरी स्टीम जाते. मस्त खरवस झाला की एक वडी द्या इकडे. कितीतरी वर्षे झाली खाउन.

कोंबडी वडे मधला कोंबडीचा रस्सा कसा करतात त्याची मला एकदम स्टेप बाय स्टेप कृती हवीय. कांदा, खोबरं किती लागेल, ते कसं भाजायचं, चिकनच्या तुकड्यांना काही मॅरिनेशन करायचं असतं का, इत्यादी अगदी तपशीलवार कोणी सांगेल का

लोकहो, खरवसाची कृती दिलीत तर चीक कुठे मिळेल (पुण्यात) ते पण सांगुन टाका. वरची चर्चा आणि पाकृ वाचुन तरसले मी खायला.

झाकण असले तरी स्टीम जाते. >> हो हो... मी तर आपला नेहमीचा स्टिअल्चा डबाच वापरते घट्ट झाकणाचा.

अश्विनीमामी नक्की पाठवते.
मनीमाऊ पुण्यात तर ऩक्की मिळत असेल, नाहीतर माझ्याकडे या खायला. या आठवड्यात चिक मिळणार आहे. कधि कल्याणला आलात तर सकाळी दुधनाक्यावर मिळतो, पण लवकर जावे लागते.

थँक्स साक्षी. पुण्यातच शोधाशोध करते आता. वर्षाने पण सुचवले आहे, बघते शोधुन.

नाही तर तुझं invitation मी reserve करुन ठेवतेच आहे. Wink

@मनिमाऊ> माझ्याकडे एक जण मधुन मधुन चीक घेउन येतो (पुण्यात. कोथरूड ला). आता परत आला की फोन नं. घेऊन तुला कळवते.

जनसेवात जा, तयार खरवस खा Happy आधी लक्ष्मी रोडवर शॉपिंग करा, म्हणजे जनसेवात जायला चांगला बहाणाही मिळेल Proud

चीक ओळखीच्या माणसाकडून/ गवळ्याकडूनच सहसा मिळतो. दुकानात चीक विकायला ठेवलेला पाहिला नाहीये मी कधी. कोणाला माहित असेल, तर जरूर सांगा.

थँक्स, रावी. खरंच सांग मला नंबर. मी कॅम्पजवळ रहाते गं. इथे दुर दुरपर्यंत हा पदार्थ माहित असण्याची शक्याता ही नाही.

पोर्णिमा, कालपासुन तर मला अशी strong urge आली आहे ना कि आता जनसेवाला भेट द्यावीच लागेल शनिवारी. मला फार दुर आहे लक्ष्मी रोड. म्हणजे ऑफिसच्या दिवशी जायला. तो पर्यंत कंट्रोल.

मनीमाऊ , मला ना जाळीदार खरवस खायला आवडतो, त्यामुळे मी मधल्या वड्या सगळ्यांना देते व डब्याच्या कडेच्या वड्या माझ्यासाठी राखीव असतात. Wink

वर्षा आणि साक्षी, मला फक्त खरवस आवडतो. साखरेचा, गुळाचा, गार, गरम, जाळीचा, घट्ट, फसलेला अथवा उत्तम, कसाही. त्यामुळे तुमचा खाउन झाला कि मला दिलात तरी चालेल, पण उरवा डब्यात माझ्यासाठी म्हणजे झालं.

आणि आता खरवस विषय आवरता घेते मी. कारण बराच वेळ झाला पाकृचा धागा माझ्यामुळे गप्पांचा झाला आहे. किंवा मग एक नविन खरवस स्पे. धागा चालु करावा म्हणते. Happy

चंद्रकांत दुग्धालय ( दुर्गा कॉफी माहित आहे का तुला MIT कॉलेज जवळचं त्याच्या समोरच्या बाजूला आहे)
मस्त होतो खरवस त्या चिकाचा ...

चिवा & रागरागेश्री, थँक्स. या शनिवार्/रविवारी धाड घालते यापैकी एका ठिकाणावर. Happy

या आठवड्यात मी खरवस खाउनच रहाणार. इतके दिवस रेसिपी माहित नव्हती आणि चीक मिळत नव्हता. दोन्हीची सोय झाली. थँक्यु गं सख्यांनो.

मला स्टार्टर्स बरोबर असते ती (पनीर टिक्का / असॉर्टेड प्लॅटर वै), बर्‍यापैकी ब्लांड फिकट हिरवी चटणी ची रेसिपी हवी आहे. कोणाकडे असेल तर देणार का ? धन्यवाद.

मवा,

मी केली होती अशी चटणी - तेव्हा लसुण, मिरची ( १/४ फक्त), कोथिंबिर, पुदिना हे सगळं अगदी बारीक वाटुन घेतलं. मग त्यात दही, मिरीपुड, rock salt, किंचित चाट मसाला (optional) टाकुन परत बारीक वाटलं. अगदी fine paste होइपर्यंत. चटणी सारखं थोडं भरड नाही ठेवायचं. दही जर आंबट नसेल तर किंचित लिंबु पण पिळतात यामधे.

या चटणीत ब्रेडचा स्लाईस/स्लईसेस कडा काढुन घालायचा. म्हणजे चटणीला पाणी सुटत नाही आणि चांगली मिळुन पण येते. हिरवा गर्द रंग येण्यासाठी थोडी(च) पालकाची पाने घालायची. मी थोडं आलं पण घालते चटणीत.

रावी, त्याला ब्राऊन किंवा रॉ शुगर लावुन मस्त ग्रिल कर.. कॅरॅमलाईज्ड पायनॅप्पल रिंग्ज सह्ही लागतात. सोबत व्हॅनिला आइस्क्रिम... यम्म्म्म्म्म...
नाहीतर छोटे तुकडे करुन पाकात मुरव आणि पायनॅप्पल मार्मलेड म्हणुन ब्रेड बरोबर खा Happy

रावी, पायनापल रसम, नाहीतर सीकेपी लोकांचे पायनापल सांबारे असते ते करतायेइल. पा. कमी पाण्यात शिजविणे, मग त्यात मंद आचेवर नारळाचे दूध एक स्प्लिट मिरची घालणे, हवे असल्यास तूप जिरे फोड्णी गार करून. ( मी हे फक्त टीवी वर पाहिले आहे) कृती चेक करावी. चिकन सलाड पण करता येइल. मायो घालून. लै मस्त लागते.

दहिवड्यासाठि दोन वाट्या सफेद मुगाची डाळ भिजत घातली होती, पण काहि कारणाने करायला वेळ नाहि मिळाला. तशीच फ्रिज मधे पडुन आहे चार दिवसांपासुन. काय करु ? उद्याचा सुट्टिचा दिवस सार्थकी लागेल. Happy

रावी,
अननसाचे छोटे तुकडे करून कुकरमधून २ शिट्ट्या करून वाफवून घ्यायचा आणि पाकात मुरवायचा. लेकाचं आवडतं तोंडीलावणं आहे हे!
नंतर थोड्या केशराच्या काड्या घातल्या तर अजून सुंदर केशरी रंग येतो.

~साक्षी

Pages