बदल इतिहासः -
सदर लेखाचे मूळ नाव : - "तनू वेड्स मनू!!!"
समाजकंटकांनी केलेल्या नुकसानापोटी : "तनू वेड्स मनू : घुमजाव!!!"
समाजकंटकांनी पुनःपुन्हा चालुच ठेवलेल्या नुकसानापोटी : " बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो"
मूळ लेख पुढिलप्रमाणे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते.
"HITCH" चित्रपटात 'विल स्मिथच्या' तोंडी एक वाक्य आहे, जे थोडंसं बदलून इथे वापरता येईल कदाचित.
"प्रेक्षक चित्रपटगृहात आला आहे, म्हणजे दिग्दर्शक/प्रोड्युसर लोकांचं निम्मं काम झालं आहे! आता त्यांना फक्त एवढंच करायचं आहे, की त्यांनी काहीतरी फालतुगिरी दाखवुन त्यांना तिथुन उठून जायला भाग पाडू नये!"
ह्या चित्रपटात अगदी शेवटपर्यंत हे 'तत्व' पाळलं गेलं आहे. आता शेवट जरा... असो.
बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार सुंदर दिसते.
हा एक कॉलेज ग्रुपने जाण्यासारखा चित्रपट आहे, फॅमिलीपट नाही. मसालापट आहे, पण उगाच मारामार्या नाहीत. थोडा पाठलाग वगैरेही आहे, पण थ्रिलर नाही. राणावत बाई अपेयपान, अफुंकफुंकन करताना आढळतात... मधेमधे काही डायलॉग्सन 'बीप' द्याव्या लागल्यात, यावरुन संवादांची तीव्रता समजून घ्यावी.
आणि हो.. "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार जास्त सुंदर दिसते.
चित्रपट चालू झाल्यापासून संपेपर्यंत लग्नच लग्न आहेत. ओघाने येणारी गाणी, अर्थात 'संगीत' आहेच!
पण कुठेही 'सुरज बडजात्यागिरी' नाही. उगाचच हसणारा आलोक नाथ नाही. ह्याऽ वयात लाजणारी .. जाऊदे..
चित्रपटभर रंगांची उधळण आहे, पण संजय ली. भ. साहेबांसारखा कुठेही त्याचा 'अट्टाहास' नाही.
अजीर्ण होत नाही कशाचंही.
टीपीकल उत्तर भारतीय लग्नातले प्रसंग मजेशीर पद्धतीने दाखवले गेले आहेत. मिश्राजींच्या (आर माधवन) मित्राचे डायलॉग्स, टायमिंग, भारी! 'जय मातादी!!!' सुरेख एकदम! सरदार मित्र आणि त्याची बायकोही अॅडोरेबल वगैरे. प्रति शाहरूख अर्थात जिमी शेरगिलही बरा आहे.
बाकी बॅकग्राऊंड स्कोअर सुंदर आहे, कुठेही बोर वाटत नाही.. गाणीही मस्तच! मधे एकदोन गाण्यात कंगना राणावतने फार छान नृत्य केलं आहे.
बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फारच सुंदर दिसते.
मागच्या वर्षी कांदा आणि कपडे महाग झाले होते. त्या काळात आपण कांदा कमी खात असु. हा चित्रपट त्या काळातला असल्याने कंगना राणावतचे कपडे कमी असणं ओघाने आलंच... असो.
काही काही सीन मधे आर माधवनने केवळ डोळ्यातून फार छान अभिनय केला आहे. एकूण फार डायलॉग्सच कमी आहेत सर्वांना चित्रपटात. छान दिसला आहे माधवन चित्रपटभर.
कंगना, 'मिश्राजींच्या' प्रेमात पडल्यावर, बरोब्बर वेळेवर पडलेला 'पाऊस' निव्वळ अप्रतिम घेतला आहे, तो असा: -
चित्रपटात इष्टसमयी तिला जाणीव होते, की आता ९९ % तरी, 'माधवनाऽ, तूचि माझा नाथ!'
आता बोलायला तर पाहिजे!?
आणि म्हणून ती सगळं सोडून त्याला भेटायला जाते. भेटून बोलणं झाल्यावर दोघेजण बाहेर पडतात.
पांढर्या कपड्यातली कंगना आणि बरोबर 'मिश्राजी!' अचानक जोरात पाऊस येतो, आणि त्या पावसात दोघेही चिंब चिंब नखशिखांत भिजतात.
पावसातून चालता चालता कंगना डोळे मिटते. एकदोन सेकंदांनी डोळे उघडते आणि...
हे सगळं चित्रपटगृहातच जरूर जरूर बघा!
जाता जाता एवढच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार म्हणजे फारच सुंदर दिसते.
(No subject)
ऋयामा... मला करीना चालेल तु
ऋयामा... मला करीना चालेल तु कटरीना घे (फॅक्ल बनवायला)
कहर आहे.
कहर आहे.
अरे अरे अरे..... आठवडाभर काय
अरे अरे अरे.....
आठवडाभर काय नव्हतो तर इथे वाटण्या पण झाल्या.......
कटरीना ऋयामला
करीना रामला.....
कोणी रीना उरलिय का आता.....
(फॅक्ल बनवायला हो....
तुमचं आपलं काहीतरीच
) 
भुंगा, रिना ती एकच होती
भुंगा, रिना ती एकच होती (पाकिस्तान रिटर्न ) तिची बहिण बरखा (काय्बोलायचेक्काम्नाय्) आता त्यांची कुणीच नसलेली पण तशीच दिसणारी, सोनाक्षी उरलीय !
फुल्या फुल्या... माधवन पेक्षा
फुल्या फुल्या... माधवन पेक्षा कंगनाचच कौतुक जास्त आहे. मग टायटल ला माधवनच नाव कशाला ?
नितीनचंद्र गुड ऑब्जर्वेशन :
नितीनचंद्र गुड ऑब्जर्वेशन : )
-साभारी.
सध्या त्या मम्मी~~~~~~~~ आपकी
सध्या त्या मम्मी~~~~~~~~ आपकी त्वचासे आपकी उम्रका मधे माधवनने केसांचे टारले करुन विचित्र दिसण्याचा प्रयत्न खरच यशस्वी केला आहे हं. कसला फडतुस दिसतो त्यात.
रिटर्नसमधे जास्त सुंदर दिसतेय
रिटर्नसमधे जास्त सुंदर दिसतेय रे.
'क्वीन' (आणि आता पुन्हा '..रिटर्न्स'नंतर) हे सारं पुन्हा वाचल्यावर सौंदर्यवादावर झालेल्या इतरत्र आणि कैक वर्षांपासूनच्या लाखो चर्चांचे संदर्भ आठवले. आपण पामरं व्याख्या करत बसतो, आणि त्यांना जागत बसतो. व्याख्याच बदलून टाकण्याची ताकद काहीकाही चिर्कुट वाटणार्या गोष्टींत असते हे खरंच.
रिटर्नसमधे जास्त सुंदर दिसतेय
रिटर्नसमधे जास्त सुंदर दिसतेय रे >>> +१
माधवन म्हणजे तो टकल्या
माधवन म्हणजे तो टकल्या ?त्टकल्या कसा काय हीरो असू शकतो ?
ऋयाम एकदम मस्त लिहीलयस...
ऋयाम एकदम मस्त लिहीलयस...
ऋयामभौ, तुम्हारे प्रत्येक मत
ऋयामभौ, तुम्हारे प्रत्येक मत को हमारी तहे दिलसे सहमती हय !
Pages