बदल इतिहासः -
सदर लेखाचे मूळ नाव : - "तनू वेड्स मनू!!!"
समाजकंटकांनी केलेल्या नुकसानापोटी : "तनू वेड्स मनू : घुमजाव!!!"
समाजकंटकांनी पुनःपुन्हा चालुच ठेवलेल्या नुकसानापोटी : " बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो"
मूळ लेख पुढिलप्रमाणे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते.
"HITCH" चित्रपटात 'विल स्मिथच्या' तोंडी एक वाक्य आहे, जे थोडंसं बदलून इथे वापरता येईल कदाचित.
"प्रेक्षक चित्रपटगृहात आला आहे, म्हणजे दिग्दर्शक/प्रोड्युसर लोकांचं निम्मं काम झालं आहे! आता त्यांना फक्त एवढंच करायचं आहे, की त्यांनी काहीतरी फालतुगिरी दाखवुन त्यांना तिथुन उठून जायला भाग पाडू नये!"
ह्या चित्रपटात अगदी शेवटपर्यंत हे 'तत्व' पाळलं गेलं आहे. आता शेवट जरा... असो.
बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार सुंदर दिसते.
हा एक कॉलेज ग्रुपने जाण्यासारखा चित्रपट आहे, फॅमिलीपट नाही. मसालापट आहे, पण उगाच मारामार्या नाहीत. थोडा पाठलाग वगैरेही आहे, पण थ्रिलर नाही. राणावत बाई अपेयपान, अफुंकफुंकन करताना आढळतात... मधेमधे काही डायलॉग्सन 'बीप' द्याव्या लागल्यात, यावरुन संवादांची तीव्रता समजून घ्यावी.
आणि हो.. "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार जास्त सुंदर दिसते.
चित्रपट चालू झाल्यापासून संपेपर्यंत लग्नच लग्न आहेत. ओघाने येणारी गाणी, अर्थात 'संगीत' आहेच!
पण कुठेही 'सुरज बडजात्यागिरी' नाही. उगाचच हसणारा आलोक नाथ नाही. ह्याऽ वयात लाजणारी .. जाऊदे..
चित्रपटभर रंगांची उधळण आहे, पण संजय ली. भ. साहेबांसारखा कुठेही त्याचा 'अट्टाहास' नाही.
अजीर्ण होत नाही कशाचंही.
टीपीकल उत्तर भारतीय लग्नातले प्रसंग मजेशीर पद्धतीने दाखवले गेले आहेत. मिश्राजींच्या (आर माधवन) मित्राचे डायलॉग्स, टायमिंग, भारी! 'जय मातादी!!!' सुरेख एकदम! सरदार मित्र आणि त्याची बायकोही अॅडोरेबल वगैरे. प्रति शाहरूख अर्थात जिमी शेरगिलही बरा आहे.
बाकी बॅकग्राऊंड स्कोअर सुंदर आहे, कुठेही बोर वाटत नाही.. गाणीही मस्तच! मधे एकदोन गाण्यात कंगना राणावतने फार छान नृत्य केलं आहे.
बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फारच सुंदर दिसते.
मागच्या वर्षी कांदा आणि कपडे महाग झाले होते. त्या काळात आपण कांदा कमी खात असु. हा चित्रपट त्या काळातला असल्याने कंगना राणावतचे कपडे कमी असणं ओघाने आलंच... असो.
काही काही सीन मधे आर माधवनने केवळ डोळ्यातून फार छान अभिनय केला आहे. एकूण फार डायलॉग्सच कमी आहेत सर्वांना चित्रपटात. छान दिसला आहे माधवन चित्रपटभर.
कंगना, 'मिश्राजींच्या' प्रेमात पडल्यावर, बरोब्बर वेळेवर पडलेला 'पाऊस' निव्वळ अप्रतिम घेतला आहे, तो असा: -
चित्रपटात इष्टसमयी तिला जाणीव होते, की आता ९९ % तरी, 'माधवनाऽ, तूचि माझा नाथ!'
आता बोलायला तर पाहिजे!?
आणि म्हणून ती सगळं सोडून त्याला भेटायला जाते. भेटून बोलणं झाल्यावर दोघेजण बाहेर पडतात.
पांढर्या कपड्यातली कंगना आणि बरोबर 'मिश्राजी!' अचानक जोरात पाऊस येतो, आणि त्या पावसात दोघेही चिंब चिंब नखशिखांत भिजतात.
पावसातून चालता चालता कंगना डोळे मिटते. एकदोन सेकंदांनी डोळे उघडते आणि...
हे सगळं चित्रपटगृहातच जरूर जरूर बघा!
जाता जाता एवढच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार म्हणजे फारच सुंदर दिसते.
रुयाम भावना पोचल्या त्याच्या
रुयाम भावना पोचल्या
त्याच्या घरी कुणीतरी कळवा रे , पोरगं सैरभैर झालयं.
उदयोन तुमच्याकडं तिचा फोन नं. कसा ? दररोज ट्राय करता वाटतं
>> PHONE NUMBER HAVA KA
>> PHONE NUMBER HAVA KA TICHA....?
दुरची बहीण असावी.
मला आधी (म्हणजे
मला आधी (म्हणजे वाचण्यापूर्वी) वाटलेलं की "तनू वेडस मनू" चं परिक्षण असेल म्हणून
मला पण आता (प)निरीक्षण
मला पण आता (प)निरीक्षण करावेच लागणार...!
काय होतास तू, काय झालास तू
काय होतास तू, काय झालास तू
परिक्षण चांगलं केलंयस.
ऋयाम बाजिंदा पहीली दोन
ऋयाम

बाजिंदा पहीली दोन वाक्य>> अगदी अगदी
ऋयामा- आवर आवर भावणांना
ऋयामा- आवर आवर भावणांना
तिथे 'तनू वेड्स मनू', आणि इथे
तिथे 'तनू वेड्स मनू', आणि इथे 'ऋयाम वेडा फॉर कंगना'
(No subject)
त्याच्या घरी कुणीतरी कळवा रे
त्याच्या घरी कुणीतरी कळवा रे , पोरगं सैरभैर झालयं >>>
(No subject)
बरं बाबा, सुंदर दिसते! ओके?
पेन्डसे गुरुजी म्हणतात कंगना
पेन्डसे गुरुजी म्हणतात कंगना रानावत नेहमीच ड्रग अॅडिक्ट दिसते...
पण कंगना, तनू कि मनू ????
पण कंगना, तनू कि मनू ????
बरं बाबा, सुंदर दिसते! ओके?
बरं बाबा, सुंदर दिसते! ओके? >>>
पण कंगना, तनू कि मनू ???? तनु
पण कंगना, तनू कि मनू ????
तनु ही नाही नि मनु ही नाही. ती सुंदर आहे
मागच्या वर्षी कांदा आणि कपडे
मागच्या वर्षी कांदा आणि कपडे महाग झाले होते. त्या काळात आपण कांदा कमी खात असु. हा चित्रपट त्या
काळातला असल्याने कंगना राणावतचे कपडे कमी असणं ओघाने आलंच.>>>>
खरंच कळवा मुलाच्या घरी
>पेन्डसे गुरुजी म्हणतात कंगना
>पेन्डसे गुरुजी म्हणतात कंगना रानावत नेहमीच ड्रग अॅडिक्ट दिसते...
पेंगुना एक विचाराल का हो?
ह्याऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽऽ वयात देवाची वंदना कराची सोडून रानावतांची कंगना काय पहाता? म्हणाव...
अॅडमिन साहेब चिडले वाट्टं. गप्पांचं पान बनवलं धाग्याचं
अॅडमिनना कंगना आवडतच नसेल
अॅडमिनना कंगना आवडतच नसेल किंवा ह्या पिक्चरमध्ये आवडली नसेल. दर दोन वाक्यांमागे तुझा ' "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार सुंदर दिसते' हा जप ऐकून वैतागले असतील न काय.
आमच्याही गुरुजींनी न्हानपनी
आमच्याही गुरुजींनी न्हानपनी सांगिटलं आहे, नेहेमी खरे बोलावे.
कोणाच्या न्हानपणी सांगितलेलं?
कोणाच्या न्हानपणी सांगितलेलं? तुमच्या का त्यांच्या? (तुमचं अजून संपलेलं दिसत नाही..
) 
हे वाचल्याने बघणार आता या आठवड्यात (साखुमा ऐवजी
गुर्जी झाले मोठे कवाच. आम्चं
गुर्जी झाले मोठे कवाच. आम्चं अजून चालूच आहे...
बघा बघा. खोटं बोलतोय का सांगा आणि मग.. लोकं उगीचच घरी सांगायला निघालीत..
सांभाळ रे स्वतःला
सांभाळ रे स्वतःला
number hava ki nahi....?
number hava ki nahi....?
ऋयाम, माधवन "मिश्राजीं" नाही
ऋयाम, माधवन "मिश्राजीं" नाही "शर्माजी" आहेत ...कन्गनाला बघता बघता तोही विसर पडला का?
हुर्रे!!! कोणीतरी ओळखलं
हुर्रे!!! कोणीतरी ओळखलं
सो क्यूट. मग लाडू कधी देताय?
सो क्यूट. मग लाडू कधी देताय?
सध्या परीक्षेचा सीझन असल्याकारणे सिनेमा नंतर बघू.
'कंगनाको कंगना पहनानेका सपना'
'कंगनाको कंगना पहनानेका सपना' आहे वाटतं.
ऋयामा
ऋयामा
ऋयाम... आता तुझ्यासाठी
ऋयाम...

आता तुझ्यासाठी म्हणून तरी हा पिच्च्रर फ्यायलाच हवा
Pages