बदल इतिहासः -
सदर लेखाचे मूळ नाव : - "तनू वेड्स मनू!!!"
समाजकंटकांनी केलेल्या नुकसानापोटी : "तनू वेड्स मनू : घुमजाव!!!"
समाजकंटकांनी पुनःपुन्हा चालुच ठेवलेल्या नुकसानापोटी : " बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो"
मूळ लेख पुढिलप्रमाणे.
----------------------------------------------------------------------------------------------------------------------
आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते.
"HITCH" चित्रपटात 'विल स्मिथच्या' तोंडी एक वाक्य आहे, जे थोडंसं बदलून इथे वापरता येईल कदाचित.
"प्रेक्षक चित्रपटगृहात आला आहे, म्हणजे दिग्दर्शक/प्रोड्युसर लोकांचं निम्मं काम झालं आहे! आता त्यांना फक्त एवढंच करायचं आहे, की त्यांनी काहीतरी फालतुगिरी दाखवुन त्यांना तिथुन उठून जायला भाग पाडू नये!"
ह्या चित्रपटात अगदी शेवटपर्यंत हे 'तत्व' पाळलं गेलं आहे. आता शेवट जरा... असो.
बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार सुंदर दिसते.
हा एक कॉलेज ग्रुपने जाण्यासारखा चित्रपट आहे, फॅमिलीपट नाही. मसालापट आहे, पण उगाच मारामार्या नाहीत. थोडा पाठलाग वगैरेही आहे, पण थ्रिलर नाही. राणावत बाई अपेयपान, अफुंकफुंकन करताना आढळतात... मधेमधे काही डायलॉग्सन 'बीप' द्याव्या लागल्यात, यावरुन संवादांची तीव्रता समजून घ्यावी.
आणि हो.. "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार जास्त सुंदर दिसते.
चित्रपट चालू झाल्यापासून संपेपर्यंत लग्नच लग्न आहेत. ओघाने येणारी गाणी, अर्थात 'संगीत' आहेच!
पण कुठेही 'सुरज बडजात्यागिरी' नाही. उगाचच हसणारा आलोक नाथ नाही. ह्याऽ वयात लाजणारी .. जाऊदे..
चित्रपटभर रंगांची उधळण आहे, पण संजय ली. भ. साहेबांसारखा कुठेही त्याचा 'अट्टाहास' नाही.
अजीर्ण होत नाही कशाचंही.
टीपीकल उत्तर भारतीय लग्नातले प्रसंग मजेशीर पद्धतीने दाखवले गेले आहेत. मिश्राजींच्या (आर माधवन) मित्राचे डायलॉग्स, टायमिंग, भारी! 'जय मातादी!!!' सुरेख एकदम! सरदार मित्र आणि त्याची बायकोही अॅडोरेबल वगैरे. प्रति शाहरूख अर्थात जिमी शेरगिलही बरा आहे.
बाकी बॅकग्राऊंड स्कोअर सुंदर आहे, कुठेही बोर वाटत नाही.. गाणीही मस्तच! मधे एकदोन गाण्यात कंगना राणावतने फार छान नृत्य केलं आहे.
बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फारच सुंदर दिसते.
मागच्या वर्षी कांदा आणि कपडे महाग झाले होते. त्या काळात आपण कांदा कमी खात असु. हा चित्रपट त्या काळातला असल्याने कंगना राणावतचे कपडे कमी असणं ओघाने आलंच... असो.
काही काही सीन मधे आर माधवनने केवळ डोळ्यातून फार छान अभिनय केला आहे. एकूण फार डायलॉग्सच कमी आहेत सर्वांना चित्रपटात. छान दिसला आहे माधवन चित्रपटभर.
कंगना, 'मिश्राजींच्या' प्रेमात पडल्यावर, बरोब्बर वेळेवर पडलेला 'पाऊस' निव्वळ अप्रतिम घेतला आहे, तो असा: -
चित्रपटात इष्टसमयी तिला जाणीव होते, की आता ९९ % तरी, 'माधवनाऽ, तूचि माझा नाथ!'
आता बोलायला तर पाहिजे!?
आणि म्हणून ती सगळं सोडून त्याला भेटायला जाते. भेटून बोलणं झाल्यावर दोघेजण बाहेर पडतात.
पांढर्या कपड्यातली कंगना आणि बरोबर 'मिश्राजी!' अचानक जोरात पाऊस येतो, आणि त्या पावसात दोघेही चिंब चिंब नखशिखांत भिजतात.
पावसातून चालता चालता कंगना डोळे मिटते. एकदोन सेकंदांनी डोळे उघडते आणि...
हे सगळं चित्रपटगृहातच जरूर जरूर बघा!
जाता जाता एवढच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार म्हणजे फारच सुंदर दिसते.
ऋयाम, माझ्या कंपनीत कुणीतरी
ऋयाम, माझ्या कंपनीत कुणीतरी कंगना लुकअलाइक आहे "म्हणे"..तुमची भेट घालून देऊ का?

मी मात्र मॅडीसाठी बघणार हा चित्रपट
मला फक्त एक लक्षात आलं नाही
मला फक्त एक लक्षात आलं नाही ... की...
तनू वेड्स मनू मध्ये कंगना राणावत नेमकी किती सुंदर दिसते?
मला तर ती काही सुंदर वगैरे
मला तर ती काही सुंदर वगैरे दिसली नाही.... तिच्या गालावरचा लाल मेक अप तर डोळ्यांना खुपत होता.
पिक्चर बकवास आहे.... मैत्रिणिच्या लग्नात दारू पिऊन उलटि करण्याची इच्छा असलेली नायिका झेपली नाही.
तीला दारु न पिताच उलट्या होत
तीला दारु न पिताच उलट्या होत असतील. ते कळू नये म्हणून दारु प्यायली असेल बिच्चारी
असुद्या, भयानक आहेस रे तु..
असुद्या, भयानक आहेस रे तु.. बाकी कंगनाच्या बाबतीत हे खरे ठरु शकते...
'तनू वेड्स मनू मध्ये माधवन
'तनू वेड्स मनू मध्ये माधवन फारच सुंदर दिसतो'- असं काहीतरी असेलसं वाटलं होतं की भौ मला
बारीक झालाय का तो?? हल्ली एकदोन चित्रपटात जरा जास्तच खाऊन सुखी असलेल्यासारखा दिसत होता. ह्या चित्रपटाच्या प्रोमोमध्ये बारीक वाटतोय.
(ह्याचे प्रोमोज दिवसातुन १ ते २ ह्या वेळात कंपल्सरी पाहावे लागतात. आमच्या ऑफिसचा आणि ह्या चित्रपटाचा काहीतरी संबंध असावा. फुडकोर्टमधल्या टिविवर निवडक चित्रपटांच्या जाहिरातीत ह्याची जाहिरात सतत दिसत असते
आता सवयीने टिविकडे पाहातच जेवायला होते)
अग साधने, मी अन्नविषबाधेविषयी
अग साधने, मी अन्नविषबाधेविषयी म्हणतोय. तूला काय वाटलं ?
>> बारीक झालाय का तो?? हल्ली
>> बारीक झालाय का तो?? हल्ली एकदोन चित्रपटात जरा जास्तच खाऊन सुखी असलेल्यासारखा दिसत होता.>>
नाही, अजूनही तसाच सुखी आहे. पण तो मला आवडतो. त्याने खुप चांगलं काम केलय.
लै भारी ... पण खरच.. कंगना
लै भारी
...
पण खरच.. कंगना आयुष्यात भारी दिसते..
तेच ते.. तुला डोळे मारमारुन
तेच ते.. तुला डोळे मारमारुन जे वाटले ते...
मागच्या वर्षी कांदा आणि कपडे
मागच्या वर्षी कांदा आणि कपडे महाग झाले होते. त्या काळात आपण कांदा कमी खात असु. हा चित्रपट त्या काळातला असल्याने कंगना राणावतचे कपडे कमी असणं ओघाने आलंच... असो.
<<< कंगनाचे कमी म्हणजे नंबर ऑफ ड्रेसेस कमी असं म्हणायचय का ऋयामा ?
मी कुठला मुव्ही पाहिला माहित नाही पण मी माहिलेल्या तनु वेड्स मनु मधे कंगना सुंदरही दिसत नाही आणि कपडेही काही तोकडे वगैरे नाहीत, सलवार कमीझ मधेच आहे कि :अओ:.. रुंद / खोल गळे वगैरे काय ६०-७० दशकातलय हिरॉइन्सही घालायच्या.
कंगना इन फॅक्ट नेहेमीचय मुव्हिज मधे वेस्टर्न आउटफिट्स मधे इतकी सॉलिड स्टायलिश दिसते, इथे मात्र भोजपुरी आयटेम गर्ल्स सारखा मेक अप- कपडे, विचित्र कुरळ्या केसांचा मधे भांग.. वाट लावलीये तिची !
डबल पोस्ट.
डबल पोस्ट.
आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू"
आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते. >> तु नक्की पूर्ण चित्रपट बघितलास कि एखदाच सीन बघितलास ?
पावसाच्या सीनमधे काय ती चांगली दिसते पण बाकी भागात अतिशय विचित्र वाटते. rebellion care-a-damn attitude दाखवण्याच्या फंदात काहितरी भलतेच झालय. movie drags after interval and loses its appeal. DJ ला अनुमोदन. पण कंगना seems perfect casting for that role.
सगळ्यात भाव खाऊन जातो शर्माजीचा मित्र पप्पी, दिपक डोब्रियाल.
अरे काय ऋयामला लाकडी बॉक्सात
अरे काय ऋयामला लाकडी बॉक्सात उभं केल्यासारखे ' कधी सुंदर दिसते? पूर्ण पिक्चरभर की एखाद्या सीनमध्येच?' वगैरे जाब विचारताय. सुंदर दिसणारी कंगना बघायला ऋयामचेच डोळे हवेत. हो की नाही मास्तर..
सुंदर दिसणारी कंगना बघायला
सुंदर दिसणारी कंगना बघायला ऋयामचेच डोळे हवेत >> प्रापप्ते षोडशे वर्षे गर्दभी अप्सरा भवेत style मधे लिहिलस एकदम
गेल्या महिन्यात माधवनला २
गेल्या महिन्यात माधवनला २ फुटांवरून पाहिला. अरे ही साऊथैंडियन मंडळी स्क्रीनवर इतकी सो कॉल्ड हँडसम कशी दिसतात भौ.......... समोर आला तर गर्दीत ओळखणार पण नाही इतका सामान्य आहे तो चारचौघांसारखा. स्माईल मात्र खल्लास आहे.


आणि तरीही इतर चारचौघींसारखं माझी बायको पण जीव ओवाळून टाकते त्याच्यावर.
त्यात त्याचं पोरगं माझ्या बायकोच्या शाळेत आणि त्याची बायको मराठी. मग काय, ज्या दिवशी शाळेत येऊन माझ्या बायकोशी तो गप्पा मारून जातो, त्या संध्याकाळी "किती क्युट आहे रे तो" असं काहीतरी निमूटपणे ऐकावं लागतं घरात.
हल्ली तिच्या तोंडून हे वाक्य ऐकलं की सर्वात आधी मला "ऋयाम"चीच आठवण येते
पण तरीही कंगना रानावतच फार म्हणजे फारच सुंदर दिसते.
अरे वा ! कंगनाच्या अप्रतीम
अरे वा ! कंगनाच्या अप्रतीम सौंदर्यासाठी तरी डी व्ही डी आणून हा सिनेमा नक्की बघणार!
अरे वा ! कंगनाच्या अप्रतीम
अरे वा ! कंगनाच्या अप्रतीम सौंदर्यासाठी तरी डी व्ही डी आणून हा सिनेमा नक्की बघणार!
>>>>>
डीव्हीडीवरचे तिचे फोटो बघून समाधान मानलत तरी चालेल. नाहीतर सगळा पिक्चर बघितल्यावर डीव्हीडीचे पैसे "ऋयामकडे" मागायची इच्छा होईल
आपल्या भारत देशात 'घुमजाव' या
आपल्या भारत देशात 'घुमजाव' या शब्दाला काही अर्थ उरला आहे की नाही? एवढा चांगला जाहिर घुमजाव करुनही परत परत हा धागा ताणण्यामागे वैयक्तिक आकस तर नाही ना, असा संशय माझ्या मनात दाट होऊ पाहतो आहे.
सायोतैंनी वेळोवेळी अशा संकटातून बाहेर येण्यासाठी मला प्रोतसाहन दिले, याबद्दल मी त्यांचा आजचा अख्खा दिवस ऋणी आहे.
मा.भुंगा यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचाही चारेक तास ऋणी राहण्याचा विचार चालु होता, पण नुकत्याच त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, त्यांचा मला असलेला पाठिंबा हा 'मैत्रिणीच्या मित्राची मैत्रिण, ती माझी मैत्रिण" अशा केवळ राजकारणीय हितसंबंधांमधुन आलेला दिसलेने मी तेच चारेक तास त्यांचा णिशेधच करावा म्हणतो.
>>रुंद / खोल गळे वगैरे काय ६०-७० दशकातलय हिरॉइन्सही घालायच्या.
कपडे कमी म्हणजे हेच म्हणायचे आहे. अहो.. जेवढे काय तिला गळे काढायचेत ते काढ की. पण पब्लिकसमोर कशाला ते? असो.
>>नाहीतर सगळा पिक्चर बघितल्यावर डीव्हीडीचे पैसे "ऋयामकडे" मागायची इच्छा होईल
ऑन सेकंड थॉट्स, भुंगेशनी माझे एका डीव्हीडीचे पैसे वाचवलेच आहेत, तर दोनेक तास ऋणी राहुनच घ्यावे म्हणतो...
>ऋयाम, माझ्या कंपनीत कुणीतरी कंगना लुकअलाइक आहे "म्हणे"..तुमची भेट घालून देऊ का?
नताशा एक फुल यांचा ही मी दोन मिनीटं ऋणी आहे. पण तै, त्या 'लुक अलाईक' ची सध्यातरी गरज नाही. आमच्या कार्यालयात सध्या एक नवीन फुल आलेले आहे. आणि आपण तिथे भुंगागिरी चालु आहे.
>>पिक्चर बकवास आहे.... मैत्रिणिच्या लग्नात दारू पिऊन उलटि करण्याची इच्छा असलेली नायिका झेपली नाही.
मी अमि, अहो. ते स्क्रिप्टमधे आहे हो. त्यात बिचार्या करांजीचा काय दोष? पिक्चर बकवास, फालतु काहीही म्हणा. आ बा चं का जा?
आणि मेन मुद्दा सांगायचाच राहिला. तो लक्षात आणुन दिलेबद्दल मा. बेफिकीरांचाही आभारी आहे.
सांगायचा मुद्दा हा, की "चांगल्या मनाच्या लोकांना करांजी चांगली दिसते..."
मा.भुंगा यांच्या
मा.भुंगा यांच्या पाठिंब्याबद्दल त्यांचाही चारेक तास ऋणी राहण्याचा विचार चालु होता, पण नुकत्याच त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, त्यांचा मला असलेला पाठिंबा हा 'मैत्रिणीच्या मित्राची मैत्रिण, ती माझी मैत्रिण" अशा केवळ राजकारणीय हितसंबंधांमधुन आलेला दिसलेने मी तेच चारेक तास त्यांचा णिशेधच करावा म्हणतो.
>>>>
ऋयामा, यात कुठलेही हितसंबंध गुंतलेले नाहीत रे..... आपला तुला पहिल्या क्षणापासून निर्हेतूक पाठिंबा आहे.
तू त्या चारेक तासांचा पुन्हा विचार करू शकतोस. किंवा ते चार तास राखून ठेव. आपण त्या वेळात सध्या रिलीज होण्याच्या मार्गावर असलेला "अभिनय देव्"चा "गेम" बघूया एकत्र. त्यातही कंगना रानावत एक इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आहे. आणि तुला तर माहिती आहेच की,
कंगना रानावत खूप म्हणजे खूपच सुंदर दिसते.
>> मी अमि, अहो. ते
>> मी अमि, अहो. ते स्क्रिप्टमधे आहे हो. त्यात बिचार्या करांजीचा काय दोष? पिक्चर बकवास, फालतु काहीही म्हणा. आ बा चं का जा?
>>
मी कुठे म्हटलय की यात क.रा. चा काही दोष आहे !!!!! कथेची नायिका झेपली नाही, असे मला म्हणायचे होते. मत तो रोल क्.रा. ऐवजी दुसरी कोणीही करत असती तरी झेपली नसती.
"तनू वेड्स मनू" मधे कंगना
"तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार जास्त सुंदर दिसते.
ऋयाम हे तुमचे घुमजाव प्रकरण
ऋयाम हे तुमचे घुमजाव प्रकरण मला अजिबात आवडले नाही.
चार लोकांच्या दबावामुळे, इथले वाचुन त्यांनी चुकून चित्रपट पाहिला तर त्यांना पैसे फुकट गेले याचा फिल येईल या भितीने तुम्ही तुमची आवड अशी दाबावी हे अजिबात पटले नाही. लोकांना काय बोलायचे ते बोलू द्या, पण तुम्ही उगीच घुमजाव वगैरे करु नका. इथे लोकशाही आहे, मोगलाई नाही.
आमच्या कार्यालयात सध्या एक
आमच्या कार्यालयात सध्या एक नवीन फुल आलेले आहे. आणि आपण तिथे भुंगागिरी चालु आहे.
हे सगळ्यात जास्त आवडले. पुढची प्रगती कळवा याच धाग्यावर.
त्या पावसाच्या सीनन॑तर एक
त्या पावसाच्या सीनन॑तर एक रोडवरील सीन आहे तो असा की ती दोघे गाडीत असतात आणि आजुबाजुला भ॑यकर ट्राफिक असते न॑तर जिमी शेरगिल तिथे येऊन क॑कनाला घेवुन जातो तो गेल्यावर काही से॑कदात ते ट्राफिक कमी होते. ही काय भानगड आहे. कळत नाही बुवा. कदचित क॑कनाला पाहाण्यासाठी ती गर्दी असावी असो. मी त्या मुव्हीला एक तास उशीरा पोचली.
तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते. >>>>>>>>>>>याच्या विरुद्ध तनू वेड्स मनू" मधे माधवन सुंदर दिसतो. ती तर अस्सल स्मोकि॑गगर्ल आणि बेवडी न॑बर वन वाटते. व दुसरया॑ना ही जबरदस्ती करुन देते.
या मुव्ही मध्ये माधवन खुपच छान दिसतो आहे. त्या॑चे जे काही थोडेफार हावभाव दाखवले ते चा॑गले आहेत.
काल एकदाचा एका कलीग कडुन हा
काल एकदाचा एका कलीग कडुन हा सीणेमा मीळवला, रात्री १२:३७ मी. ला झोपण्या आधी म्हटल बघु तरी तो पावसाळी पांढरा शीन म्हनुन फॉरवर्ड करुन करुन पांढर्या कपड्यातली कंगना जीथे दिसेल तीथे पॉज करुन करुन पाहीला... अस फॉरवर्ड, रीव्हर्स बर्याच म्हणजे बर्याच वेळा केल्यावर तो काही सेकंदाचा पाऊस दिसला हुश्श!!!! ऋयाम च समीक्षण पाहुन मला वाटलेल जाम रॉमँटिक सीन असेल पण , असु देत आज घरी गेल्यावर समदा चित्रपट बघायचाय निवांत
आयला..... रोमँटीकच आहे की
आयला..... रोमँटीकच आहे की लोकांच्यांनो..

बर चला. आता नवं घुमजाव असं, की तुम्हाला करांजी किती रोमँटिक्क दिसते, हे तुमचा रोमँक्युऽ किती आहे त्यावर अवलांबून आहे.
रोमँक्यु ऋयामा
रोमँक्यु
ऋयामा __________________/\_____________
एकदा माझा पण चेक करून घेईन म्हणतो
आधीच सांगते, "तनू वेड्स मनू"
आधीच सांगते, "तनू वेड्स मनू" मधे माधवन सुंदर दिसतो.
आधीच सांगते, "तनू वेड्स मनू"
आधीच सांगते, "तनू वेड्स मनू" मधे माधवन सुंदर दिसतो. फिदीफिदी
<<
Pages