बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो.

Submitted by ऋयाम on 27 February, 2011 - 05:34

बदल इतिहासः -

सदर लेखाचे मूळ नाव : - "तनू वेड्स मनू!!!"
समाजकंटकांनी केलेल्या नुकसानापोटी : "तनू वेड्स मनू : घुमजाव!!!"
समाजकंटकांनी पुनःपुन्हा चालुच ठेवलेल्या नुकसानापोटी : " बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो"

मूळ लेख पुढिलप्रमाणे.

----------------------------------------------------------------------------------------------------------------------

आधीच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते.

"HITCH" चित्रपटात 'विल स्मिथच्या' तोंडी एक वाक्य आहे, जे थोडंसं बदलून इथे वापरता येईल कदाचित.

"प्रेक्षक चित्रपटगृहात आला आहे, म्हणजे दिग्दर्शक/प्रोड्युसर लोकांचं निम्मं काम झालं आहे! आता त्यांना फक्त एवढंच करायचं आहे, की त्यांनी काहीतरी फालतुगिरी दाखवुन त्यांना तिथुन उठून जायला भाग पाडू नये!"

ह्या चित्रपटात अगदी शेवटपर्यंत हे 'तत्व' पाळलं गेलं आहे. आता शेवट जरा... असो.

बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार सुंदर दिसते.

हा एक कॉलेज ग्रुपने जाण्यासारखा चित्रपट आहे, फॅमिलीपट नाही. मसालापट आहे, पण उगाच मारामार्‍या नाहीत. थोडा पाठलाग वगैरेही आहे, पण थ्रिलर नाही. राणावत बाई अपेयपान, अफुंकफुंकन करताना आढळतात... मधेमधे काही डायलॉग्सन 'बीप' द्याव्या लागल्यात, यावरुन संवादांची तीव्रता समजून घ्यावी.

आणि हो.. "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार जास्त सुंदर दिसते.

चित्रपट चालू झाल्यापासून संपेपर्यंत लग्नच लग्न आहेत. ओघाने येणारी गाणी, अर्थात 'संगीत' आहेच!
पण कुठेही 'सुरज बडजात्यागिरी' नाही. उगाचच हसणारा आलोक नाथ नाही. ह्याऽ वयात लाजणारी .. जाऊदे..
चित्रपटभर रंगांची उधळण आहे, पण संजय ली. भ. साहेबांसारखा कुठेही त्याचा 'अट्टाहास' नाही.
अजीर्ण होत नाही कशाचंही.

टीपीकल उत्तर भारतीय लग्नातले प्रसंग मजेशीर पद्धतीने दाखवले गेले आहेत. मिश्राजींच्या (आर माधवन) मित्राचे डायलॉग्स, टायमिंग, भारी! 'जय मातादी!!!' सुरेख एकदम! सरदार मित्र आणि त्याची बायकोही अ‍ॅडोरेबल वगैरे. प्रति शाहरूख अर्थात जिमी शेरगिलही बरा आहे.

बाकी बॅकग्राऊंड स्कोअर सुंदर आहे, कुठेही बोर वाटत नाही.. गाणीही मस्तच! मधे एकदोन गाण्यात कंगना राणावतने फार छान नृत्य केलं आहे.

बाकी, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फारच सुंदर दिसते.

मागच्या वर्षी कांदा आणि कपडे महाग झाले होते. त्या काळात आपण कांदा कमी खात असु. हा चित्रपट त्या काळातला असल्याने कंगना राणावतचे कपडे कमी असणं ओघाने आलंच... असो.

काही काही सीन मधे आर माधवनने केवळ डोळ्यातून फार छान अभिनय केला आहे. एकूण फार डायलॉग्सच कमी आहेत सर्वांना चित्रपटात. छान दिसला आहे माधवन चित्रपटभर.

कंगना, 'मिश्राजींच्या' प्रेमात पडल्यावर, बरोब्बर वेळेवर पडलेला 'पाऊस' निव्वळ अप्रतिम घेतला आहे, तो असा: -
चित्रपटात इष्टसमयी तिला जाणीव होते, की आता ९९ % तरी, 'माधवनाऽ, तूचि माझा नाथ!'
आता बोलायला तर पाहिजे!?
आणि म्हणून ती सगळं सोडून त्याला भेटायला जाते. भेटून बोलणं झाल्यावर दोघेजण बाहेर पडतात.
पांढर्‍या कपड्यातली कंगना आणि बरोबर 'मिश्राजी!' अचानक जोरात पाऊस येतो, आणि त्या पावसात दोघेही चिंब चिंब नखशिखांत भिजतात.
पावसातून चालता चालता कंगना डोळे मिटते. एकदोन सेकंदांनी डोळे उघडते आणि...

हे सगळं चित्रपटगृहातच जरूर जरूर बघा!

जाता जाता एवढच सांगतो, "तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार म्हणजे फारच सुंदर दिसते. Proud

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भुंगेश. आपण एकाच कंगनातले मणी. Happy

>>आधीच सांगते, "तनू वेड्स मनू" मधे माधवन सुंदर दिसतो.
बघा बघा. आता कोणी माई का लाल म्हणून दाखवा.
" माधवन चं पोटच सुटलंय.
त्याला हिंदी बोलता येत नाही म्हणून त्याला डेलॉग नाहीयेत.
अ‍ॅक्चुअली त्याला एक्टींगच्च एत नाही म्हणूनच्च डेलॉग्स नाहीएत.
असंही तो गप असलेलाच बरा..
त्याला पचत नाही म्हणून तो पिताना दाखवलेला नाही... " वगैरे तारेतोड...

जागो पुरुषो जागो Proud Light 1

हे करांजी?????????????????????????????????????????????/ काय आहे????

@ ऋयाऽम खुश हुआ Rofl

चला, आता रैना गटग वगैरे झालं तर मी अनुपस्सित Proud किंवा हेम्लेट घालून

समु,
करांजी म्हणजे कंगना राणावत जी.

"तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत सुंदर दिसते. >>> नक्कीच अप्रतिम अगदी Proud म्यूट करून पाहिला तर पिक्चर भारीच भासतो !

म्यूट करून पाहिला तर पिक्चर भारीच भासतो !>>> Proud डिस्प्ले घालवला तर कसा भासतो?

ऋयामचं वयच असं आहे की त्याला काहीही सुंदरच दिसेल. Wink

"तनू वेड्स मनू" मधे कंगना राणावत फार जास्त सुंदर दिसते.>>> Biggrin अगदी अगदी!!!! ऋयामा, हे तू उपहासानेच लिहिलं असावंस असं वाटतंय, कारण कंगना राणावत तिच्या इतर काही चित्रपटात खरंच छान दिसली आहे. ह्या एका चित्रपटात मात्र तिचा मेक-अप अतिशयच वाईट आहे आणि त्यामुळे ती भलतीच वाईट दिसते आहे, असं मला चित्रपटभर वाटत राहिलं.

खरंच की रुनी, हे सुचलंच नाही मला!!!! अर्थात, राणावत बाईंच्या 'सुंदर' मेक-अपने दीपून गेलेल्या डोळ्यांना तो देखणा माधवन दिसलाच नाही, हा भाग वेगळा Biggrin

हे ईश्वरा, सर्वांनाऽ (आमच्यासारखेच्च) तरुण मन दे-आरोग्य देऽ.
सर्वांना सुखात, आनंदात, ...ऐश्वर्यात ठेव
सर्वांच भलं कर, कल्याण कर, रक्षण कर
आणि कंगनाचे गोड नाम मुखात अखंड राहू दे...!!!

Light 1

अरे बापरे! पार वाया गेलयं की हो..(कोण ते ओळखा).

तो माधवन बराय तसा.. कधी कधी फक्त लुंगी वर बांधून नाराळाच्या ढिगामध्ये उभा राहिला तर कसा दिसेल हा विचार चमकतो बस इतकेच. Proud

लोकहो उद्या रुयाम इथे येऊन "तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो म्हणून पाने खर्ची घालायला लागला तर कसे" असा विचार करून त्याला तनूच्या हवाली करा आता Lol

किशोरकुमारच्या जीवनावर येणार्‍या एका चित्रपटात कंगना "मधुबालाचा" रोल करणार आहे म्हणे.... Wink

ऋयामा, आपली दोन सोफ्याची तिकिटं बूक कर रे...... Happy

चाहे कोई भी साथ ना दे तुम्हारा....... मै हुं ना Proud

<<बदल इतिहासः -

सदर लेखाचे मूळ नाव : - "तनू वेड्स मनू!!!"
समाजकंटकांनी केलेल्या नुकसानापोटी : "तनू वेड्स मनू : घुमजाव!!!"
समाजकंटकांनी पुनःपुन्हा चालुच ठेवलेल्या नुकसानापोटी : " बर बाबा, तनू वेड्स मनू मधे माधवन cute दिसतो"

मूळ लेख पुढिलप्रमाणे. >> आता तरी खुष??

" भुंगा. तुम दोनो अकेले नहीं हो! हम तुम्हारे सात है! "
- नाव प्रसिद्ध न करण्याच्या बोलीवर शेकडो मायबोलीकरांनी मा.करांजी यांना पाठिंबा दर्शवलाय.
- २२ मे २०११. १३:२० भारतीय प्रमाणवेळ.

ऋयामा, आता प्रत्येक पोस्टमधे कंगना च्या जागी माधनव करुन टाक तेवढे .. माधवनला "बालांधर्वांचा" रोल द्यायला पाहिजे होता, असेहि लिहिलेस तरी चालेल.

दिनेशदा... Proud

ह्यांच्या मधुनेच ते तनू, मनू आणि तो कोण तो गनू(तो विल्लन होऽ ) चा रोल करायल हवा होता म्हटलं की हे समाजकंटक खुष होतील बघा. Uhoh

स्त्री हिच स्त्रीची शत्रु असते रे बाबा. जळ्ळा मेला तो पुरुषांचा जन्म ! उघडपणे कुणा तरुणीला सुंदर देखील म्हणता येत नाही.

>>स्त्री हिच स्त्रीची शत्रु असते रे बाबा. जळ्ळा मेला तो पुरुषांचा जन्म ! उघडपणे कुणा तरुणीला सुंदर देखील म्हणता येत नाही.

Rofl बघा की. Light 1

! उघडपणे कुणा तरुणीला सुंदर देखील म्हणता येत नाही.>>> पण दिनेशदा तो इतर कुणाविषयी नाही कंगना विषयी बोलतो आहे Proud
ऋयामा... मि तुझ्या विरोधी गटात रे.. कटरिना /करिना वाला Happy

स्त्रीचा द्वेष करणार्या १० व्यक्तींपैकी ९ स्त्रीया असतात, आणि त्या उरलेल्या दहावीचा द्वेष करत असतात, असं कुणीतरी म्हटलय

@राम

< ऋयामा... मि तुझ्या विरोधी गटात रे.. कटरिना /करिना वाला >

इथे महत्त्वाचा.
ट असेल तर द्या |ळी. आपण एका गटात Wink ट नसेल तर हट.....
कारण तुमची ती ट नसलेली हिरॉईन मला टरी आवटत नाही.
Proud Light 1

Pages