निसर्गस्वर

Submitted by पुरंदरे शशांक on 18 February, 2011 - 00:58

निसर्गस्वर

अवचित आला मेघ कुठुनसा
बरसून जाई आनंदरेषा

रेषांनी त्या लाजून अवनी
झाकून घे मुख पानफुलांनी

फुलाफुलांचे गोड गोडुले
मधुकुंभ भर-भरुनि वाहले

वाहत तेथील गंध मंदसा
भ्रमर द्विजगणा हाकारितसा

हाक ती जरि असली अनामिक
परस्परांची होते जवळिक

जवळिक होते गीत मधुरसे
गुंजत राही मनीमानसे

मनात घुमता हे आलापीगत
बरसून जाती असेच अवचित

गुलमोहर: 

मुक्ता....
खरंच की खूप सुंदर आहे तुझी ही "आवर्तन" कविता - आशयपूर्ण अन लयदार आवर्तनातील - कशी काय माझी बघायची राहिली ? तू संदर्भ दिलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद.

सुरेख Happy

"रेषांनी त्या लाजून अवनी
झाकून घे मुख पानफुलांनी"
.... छान

--------------------------------------------------------------------------------
छंद, लय, यमक याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक.