हा पक्षी कोणता?

Posted
15 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
12 वर्ष ago

माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.

प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)

चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).

आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):

लालु १:

सावली १ :Smew , Male - नादखुळा

अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा

भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)

प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्‍यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन

उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा

किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.

याला कशाला ओळखायला पाहिजे ? कोणीही ओळखेल Happy मी फक्त पक्षीप्रेमींना पहायला टाकला हा फोटो Proud मी "अवल : ६" असं कुठे टाकलं ? Lol

नादखुळा,
तु भारतात आहेस का आता?
मी लहानपणी पक्षांच्या मराठी नावाची खुप चांगली पुस्तकं / फिल्ड गाईड्स बघितली होती. सुंदर चित्र / फोटो आणि मराठी इंग्लिश नावे असं. तुला माहिती असतील तर नाव सांग मला.

बी एस कुलकर्ण्यांचं पक्षी निरीक्षणच सध्या सगळे फॉलो करतात. खास नोंदी पुणे युनिव्हर्सिटी मधे संबंधित विभागात नक्की मिळतील अशी आशा आहे.

बाकी, भारतीय पक्षी निरीक्षणाबद्दल इथे सुरेख माहिती आहे.
http://www.kolkatabirds.com/birdwatching.htm

लीना मेहंदळे यांचं 'सोनं देणारे पक्षी' हे एक खूप जुनं पुस्तक आहे. बाकी भुंग्याकडे काही पुस्तकांची माहीती असेलच.

अवल...... तू टाकलेला फोटो फ्लायकॅचर..... त्याला मराठीत "स्वर्गीय नर्तक" म्हणतात. Happy

सलीम अलींचे "द बूक ऑफ इंडिअन बर्ड्स" वापरा..... पटापट त्यात पक्षी कसे शोधायचे ते आत्मसात करा......... बस्स......!!!

आता आठ वर्षांहूनही जास्त झाली फिल्डवर हार्डकोअर बर्ड वॉचिंग न करून.... पण तेंव्हा ह्या पुस्तकाने जे जग दाखवलं ...... नावासकट डोक्यात फिट आहे............ कुठलीही साईट लागणार नाही मग.
फार तर फार शंका निरसनासाठी वापरायला हरकत नाही साईट्स.

ज्याला ह्यात खरच अभ्यास करायचाय...... त्यांनी सलीम अलींचे हे पुस्तक वापराच.....!!!!!

कॅरी करायला सुटसुटीत...... वजन जास्त नाही........ आणि शोधून बघितलेला पक्षी कम्फर्म करायला पण ब्येस्ट....... गो फॉर इट दोस्त.....!!! Happy

तळटीपः नाखु, वरच्या विधानाचा गैरसमज नको रे करून घेऊस. नवीन तंर्त आहेत तर ती वापरायलाच हवीत, पण बेसिक पक्कं करायचं असेल तर या पुस्तकांना पर्याय नाही. तिथे तुम्हाला या साईट्स काहीच ऑन फिल्ड मदत करू शकत नाहीत.

भुंग्या हेच एकमेवं पुस्तक वापरतेय सध्या. Happy पण अजुन सवय झाली नाही शोधायची. शिवाय गाईडबरोबर पण कधी गेलेले नाही अजुन.
नादखुळा धन्यवाद. बघते साईट.

रच्याकने ऑन फिल्ड साठी आयफोनचे आयबर्ड म्हणुन एक पेड सॉफ्टवेअर आहे. पण ते अमेरिकन पक्षांसाठी आहे Happy भारतातल्या पक्षांसाठी तयार करायला हवं. चांगली बिझ. आयडिया आहे.

मलाही गाईडबरोबर जायचे आहे एकदा पक्षीनिरीक्षणाला. उगाच कुठेतरी पक्षी दिसतात असे वाचुन जातोय सध्या. या रविवारी चलो शिवडी आहे. पुढच्या रविवारी काळे करकोचे आले आहेत म्हणे ९ वर्षांनी आले आहेत म्हणे सातार्‍याजवळ. तिकडे जाईन म्हणतोय.

सावली, आयडिया छान आहे. बीएनएचएस सारख्या संस्था काम करत असतीलही त्यावर.

इतर काही पुस्तकं आहेत..... भारतीय उपखंडातल्या पक्ष्यांवर. पण पक्षी निरिक्षण करायचं, दुर्बीण सांभाळायची गळ्यातली आणि अश्यावेळी पुस्तक उघडून रिफर करून कन्फर्म करायचं यासाठी "द बूक ऑफ इंडिअन बर्ड्स" ला पर्याय नाही दुसरा. इतर पुस्तकांची वजनं जास्त आहेत.

अर्थात, पाणवठ्यावरचे पक्षी ओळखायला हे पुस्तक तितकेसे परिपूर्ण नाही.

अरे कांदेपोहे असा काय प्रोग्राम ठरवला तर मलाही कळवत जा किंवा इथे टाका जरा माहिती कार्यक्रमाची.
सध्या नवीन कुठल्या कुठल्या जागा आहेत टच गेलाय. Sad

अरे आणि विशेष गाईडची गरज नाही. बर्‍यापैकी माहिती असलेली व्यक्ती असली तरी एकत्रित करता येतं पक्षी निरिक्षण. अगदीच काय कोणी कावळ्याला भारद्वाज म्हणणार नाही याची काळजी घ्यायची Wink

बाकी ट्रायल अँड एरर मेथड रे..... चुकलं तरी कोण फासावर चढवणार आहे का??? स्वतः शिकण्यात जास्त मजा आहे. असा ग्रूप करायचा आणि पडायचं बाहेर.

कांपो, तूम आगे बढो हम तुम्हारा पिछा करताय Proud

भुंग्याच्या मतांशी सहमत. Happy सावली, तु सांगितलेल्या छोटेखानी सॉफ्टवेअरची आयडीया सुंदर आहे. Lets Try. केपी, जमल्यास मला सुद्धा ई-मेल कर.

सॉफ्ट्वेअर करता चांगले फोटो व ऑडिओ ट्युन्स लागतील. निदान १०० तरी.
अ‍ॅन्ड्रॉईड करता थोडे प्रोग्रामींग केले आहे - हा प्रोग्राम सोपा आहे, पण मटेरीयल लागेल.

वॉव. खरच करुयात.
फोटो आणि ट्युन्स दोन्ही बहुतेक विकत घ्यावे लागेल. किंवा BNHS च्या डेटाबेस मधुन मिळवता आले तर उत्तम आहे. त्या व्यतिरिक्त इतर माहीती आणि सर्च डेटाबेस बनवावा लागेल. बुक ऑफ इंडीयन बर्डस मधे अशी स्पेक्स वरून टेबल वगरे दिलेली आहेत.

aschig,
पण अँड्रॉइड मधे एक प्रॉब्लेम आहे. युनिकोड फाँट्स अजुन दिसत नाहियेत. मी इथे जाऊन दुकानात पण बघुन आले. माबो दिसत नाही. Sad
आयफोन मधे हा प्रॉब्लेम नाहीये.

Pages