हा पक्षी कोणता?

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

माझ्या बिघडलेल्या फोटोंकरता एक उपयोग शोधण्यात मी यशस्वी झालो आहे असे मला वाटते. खास करुन पक्षांचे फोटो. इथे मी असे फोटो टाकीन ज्यात पक्षी नीट ओळखु येत नाही, आणि तुम्हाला तो ओळखायचे आव्हान देईन. अर्थात उत्तरादाखल माझ्याजवळ त्या पक्षाचा चांगला फोटो देखील असेल. झब्बु देण्याबाबत तीच एक अट आहे. एक कोडेदार फोटो असेल तर एक उत्तरदार देखील असावा.

प्रश्न देतांना तुमच्या नावाचा उल्लेख करुन एक रनींग नंबर वापरा (उदा. माझा पहिला प्रश्न असेल aschig १)
उत्तर देतांना प्रश्नाच्या क्रमांक वापरता येईल. (या सुचनेकरता माधवला (व सावलीला सुद्धा) धन्यवाद)

चला तर करुया सुरु. (पुढच्या पोस्टींग मध्ये पहिला प्रश्न असेल).

आत्तापर्यंतचे प्रश्नः
aschig 1: उत्तर साधना (मृनिश - अर्धे उत्तर)
aschig 2: उत्तर सावली
aschig 3: उत्तर भुंगा (नादखुळा चे पण बरोबर होते)
aschig 4: उत्तर जयु
aschig 5: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 6: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 7: उत्तर भुंगा/नादखुळा
aschig 8: उत्तर नादखुळा
aschig 9: उत्तर सावली/भुंगा
aschig 10 (30 nov 2011):
aschig 11 (31 jan 2012): अर्धे उत्तर साधना/कापो/भुंगा
aschig 12 (29 mar 2012): उत्तर वेका
aschig 13 (10 apr 2012): उत्तर भुंगा
aschig 14 (10 apr 2012): उत्तर भुंगा/ shendenaxatra
aschig 15: (10 apr 2012): वेका
aschig 16: (27 apr 2012): वेका (/साधना - साधनेबद्दल)
aschig 17: (29 apr 2012): वेका (+ साधना/इंद्रधनुष्य)
aschig 18: (30 apr 2012): वेका/भुंगा
aschig 19: (24 may 2012): वेका/इंद्रधनुष्य
aschig 20: (9 oct 2012): वेका
aschig 21: (16 Feb 2013): वेका
aschig 22: (18 Feb 2013): rmd/2
aschig 23: (21 Feb 2013): सावली/भुंगा
aschig 24: (23 Feb 2013): rmd
aschig 25: (28 Feb 2013): वेका
aschig 26: (4 Mar 2013): वेका/rmd
aschig 27: (15 apr 2013): rmd/कांदापोहे
aschig 28: (9 may 2013): rmd
aschig 29: (14 may 2013): कांदापोहे
aschig 30: (21 may 2013): राज
aschig 31: (3 aug 2013): वेका
aschig 32: (4 oct 2013): साधना/rmd/सारीका
aschig 33: (20 Oct 2013): rmd
aschig 34: (21 Oct 2013): rmd
aschig 35: (21 Dec 2013):

लालु १:

सावली १ :Smew , Male - नादखुळा

अवल १: भुंगा
अवल २ : पर्वत कस्तुरी : नादखुळा
अवल ३ : सूर्यपक्षी : भुंगा, aschig, कांदापोहे
अवल ४ : कॉर्मोरंट : सावली, भुंगा

भुंगा, सचिन्_साची वगैरे (वेळ मिळाल्यावर क्रमांक व उत्तरे कोणी दिली हे लिहीन)

प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्‍यांची नावे अशी इथे देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन

उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा

किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.

कठीण आहे सांगणं....... इतरांनी मदत करा........ नाखु, अस्चिग गेले कुठे???? एकत्र केरळ फिरतायत????

Thicknee जातीतला पक्षी आहे तो. त्याचे नाव Great Thicknee आहे. सहसा उत्तर भारतात आढळतो. जामनगर, आग्रा , चंबळ नदिच्या खोर्‍याजवळ.

नादखुळा हेच नाव मला आठवत नव्हते बरेच दिवस शोधतोय, राजस्थान ला रणथंभोर मधे हा फोटो काढला तेव्हा गाईड ने या नावाचा उच्चार केला होता.

भुंगा अरे तो स्मिव आहे. थंडीच्या मौसम मधे तो स्थलांतर करतो. भारतात सुद्धा तो ह्याच सिझन मधे पाहिला जातो. मे महिन्यात अंडी उबवण्याचा कार्यक्रम चालतो. Wink

सावलीच्या फोटोमधला Smew हा Male Specis आहे.

कापोचे मात्र फावते.>>>
माझे काय फावते. त्याने फोटो टाकले तेव्हा दिसत होते. आता दिसत नाहीयेत. भुंग्या नीट टाक रे फोटो.

माझ्या कॅमेर्‍यातल्या सगळ्या फोटोंचे असेच होते... टाकल्यावर काही काळाने ते दिसत नाहीत. माझ्या काही लेखातही असेच झाले होते........ कोणाला माहित असल्यास विपूत मार्गदर्शन करा.

अरे नाखु, उलट पक्षी रिलेटेड काही चांगल्या साईट्स असतील तर तूच कळव रे. नक्की पहात जाईन.
मागे सुकीने एकदा मराठी नावे असलेली साईट सांगितली होती, आता मी पण विसरलो. सेव्ह नव्हती केली तेंव्हा.

भुंगा, अरे त्यावर मी एक सविस्तर लेख टाकेन सध्या एका वेगळ्याच लेखावर काम करतो आहे. खरतंर पक्षी निरीक्षण करताना बर्‍याचदा असे होते कि तो पक्षी कुठेतरी या आधी पाहिला आहे? किंवा तो कुठल्या स्पेसिस मधे येतो हे लक्षात येतं रे लवकर पण एक्झॅक्ट नाव अन त्याबद्दल आणखी माहिती मिळवायची असल्यास आंतरजालाचा आधार घ्यावाच लागतो.

आजच एक वाईट बातमी वाचली मटा मधे. माळढोक पक्षी नामशेष होत चालला आहे. त्याला वाचवलं पाहीजे.

तुझं खरय नाखु....... मी मगाशी लिहिलेलं एडिटलय...... अरे तो माझा वैयक्तिक दोष आहे रे.....

त्यामुळे तुमच्याकडून नवनवीन साईट्स कळल्या तर नक्की पहात जाईन.

मी शाळेत असताना एक "पक्षी मुक्ती अभियान" हे राबवलं होतं.... सुरुवातिला ते वैयक्तिक पातळीवरच होतं. श्री. माधव गवाणकर यांची ती कल्पना होती. आणि मी तेंव्हा कमवत नसल्याने मी खर्च करण्म शक्यच नव्हतं.......... त्यावरही लिहिन मी आता म्हणजे आपल्यासारखे काही जण तो प्रकल्प पुन्हा राबवू शकतील.....

भुंगा, तो प्रकल्प पुन्हा एकत्रितरित्या राबवला जाईल याची खात्री नाही देऊ शकत पण माझ्याकडून जितकं शक्य होईल तितके मी करेलच रे.

मुळात पाणवठ्याजवळच्या झाडांची तोड रोखली पाहीजे. काही दुर्मिळ अन नामशेष होणार्‍या पक्ष्यांचे खाद्य तिथे उपलब्ध करून देता आले तर उत्तमच. याबाबत 'वेळास' च्या कासव संवर्धनाचे एक उत्तम उदाहरण आहे.

अश्विनी के, बरोबर आहे तुझं. तो चिमणीचाच फोटो आहे.हिचं वेगळेपण हे तिच्या पंखांवर असलेल्या डिझाईनमुळे आहे. ह्या चिमणीला सिंगिंग स्पॅरो सुद्धा म्हणतात. दाट जंगलात आढळते.

Savannah Sparrow हे नाव आहे तीचं.

धन्यवाद नाखु
सिंगिंग स्पॅरो हे नाव एकदम साजेसे आहे या पक्ष्या ला.
मी त्याचा गाण्याचे रेकॉर्डींग केले आहे. न थांबता बराच वेळ एका सुरात गातो हा

प्रश्न क्रमांक व उत्तर देणार्‍यांची नावे अशी इथे (हेडरमध्ये) देत राहण्यासंबंधी एक सुचना:
तुम्ही प्रश्न टाकल्यावर मला संपर्कातुन एक्झॅक्ट वर्डींग कळवलेत तर मी तसेच्या तसे कॉपी-पेस्ट करु शकेन

उदा.: भुंगा ७: अनुत्तरीत
मग उत्तर मिळाल्यावरः
भुंगा ७: उत्तर दानखुळा

किंवा दोन्ही एकत्र (उत्तर मिळाल्यावर).
पहा जमल्यास.

अश्विनी अगं किती नाचशील??? ती सिंगिंग स्पॅरो ओळखल्यावर तुझी एकदम डांसिंग अश्विनी झाली.

रच्याकने, ती चिमणी सुकलेल्या कारवीच्या बनात बसलीय वाटते (काहीतरी ओळखलं किनै????? Happy )

Pages