खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...

Submitted by shailesh vasant... on 5 February, 2011 - 11:09

खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद
छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात दोन शिवथर होते. एक शिवथर तालुका आणि दुसरे बिरवाडी तालुक्यातील शिवथर गाव. समर्थ रामदास स्वाम्मिन्च्या घळीचे ठिकाण शिवथर तालुक्यातील मौजे पारमाची कोंड नलवडा येथील असल्याने त्यास शिवथर ची घळ असे म्हटले जात होते तर बिरवाडी तालुक्यातील शिवथर गावाचा उल्लेख कौल नामा या धोंडो राघोजी देशमुख यांच्या पत्रात दिसून येतो. येथेच समर्थ साहित्याचे अभ्यासाक आणि शिवथर घळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी एका डोंगरात हि घळ खणली...म्हणजे ती स्वयंभू नव्हती. बिरवाडी जवळच्या खरवली गावातील भटजी भागवत यांनी या खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद केल्याचा हा विडीओ
http://youtu.be/4Aylw5PDcjg
खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...श्रीरामनवमीला दर्शनाची संधी
छ.शिवाजी महाराजांचे आणखी एक पत्र सांगते दुसरे शिवतर
पोलादपूर(शैलेश पालकर)-भोर घाटातील वरंध कुंभारकोंड येथे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या स्वयंभू शिवथर घळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता समर्थभक्तांची वाट सुकर करण्यापर्यंत झाले आहे. त्यामुळे येत्या रविवार, दि.1 एप्रिल 2012 रोजी येणाऱ्या श्रीरामनवमीनिमित्त भाविकांना या स्वयंभू शिवथर घळीच्या दर्शनाची संधी मोठया प्राप्त होणार आहे. एकीकडे, मातीकामाचा रस्ता पूर्ण झाला असताना दुसरीकडे छ.शिवाजी महाराज यांचे आणखी एक पत्र संशोधनादरम्यान आढळून आले असून त्यामुळे दुसरे सिवतर तत्कालीन बिरवाडी तालुक्यात अस्तित्वात होते, अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे खऱ्या शिवथरघळीच्या दर्शनासोबत संशोधनाचीही वाट सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातून श्रीसांप्रदायाची कागदपत्रे यांतील रामदास आणि रामदासी भाग एकूणतिसावा श्रीरामदासींची ऐतिहासिक टिपणे या बाडामध्ये श्रीशिवछत्रपतींचा 1573 तील एक अस्सल कौलनामा या पहिल्या टिपणातील कोंढवी प्रगण्याचा करीना पान क्र. 5 वर 'बाजी येसवंतराव सिवतर ताा.बीरवाडी येथे ठेविला' असा उल्लेख दिसून येत आहे.
सर्वशृत शिवथर घळीचे नेमके हेच ठिकाण असून त्या शिवथरघळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी पाटील-देशमुखांची कागदपत्रे संशोधनादरम्यान विचारात घेऊन हे स्थळ निश्चित केल्याचे त्यांच्या श्रीसांप्रदायिक विविध विषय या लेखामध्ये पान क्र.6 वर दिसून येत आहे. शंकर श्रीकृष्ण देव या लेखात,'साताऱ्याजवळ शिवथर आहे तेंच हे शिवथर असेल, असे वाटून त्याच्या आसपासच्या डोंगरात घळीचा शोध घेण्यात विनाकारण काही काळ गेला. पण बीरवाडी, पारमाची वगैरे स्थळांचा उल्लेख वरील कित्येक लेखांकांत आलेला पाहून महाड तालुक्यातील बीरवाडीजवळपास हे शिवथर असावे, असे वाटून तिकडे गेलो आणि त्या अत्यंत रमणीय व परमपूज्य अशा घळीचे दर्शन घडले!' असे म्हणतात.
मात्र, या लेखाचा कालावधी पाहता या देव यांच्या संशोधनादरम्यानच्या काही व्यक्ती हयात असण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसा सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोध घेतला असता बिरवाडीजवळच्या खरवली येथील अनंत रामकृष्ण भागवत या पौरोहित्य करणाऱ्या वृध्द व्यक्तीने 'शिवथरघळीच्या खणण्याच्या कामादरम्यान श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी असल्याचे सांगून आता जेथे शिवथरघळ आहे तिथे त्यावेळी डोंगर होता. तिथे घळीचा आकार देत खणण्याचे काम सुरू असताना आता जिथे मर्ूत्या बसविल्या आहेत; तेथपर्यंत खणताना आपण होतो. मूर्ती बसविल्यानंतर त्यापुढील भाग खणण्यात आल्याचे अनंत भागवत यांनी सांगून आता जिथे धबधबा आहे तेथे पाण्याचे ओहोळ होते आणि आता तिथे धबधबा आहे, असे सत्य सांगितले आहे. त्यावेळी श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी गजानन जोशी व राम परांजपे हेदेखील आपणासोबत होते,' अशा अनेक आठवणी अनंत भागवत यांनी सांगितल्यामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांच्या सर्वशृत शिवथर घळीबाबतचा फोलपणा उघड झाला आहे.
आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते डिसेंबर महिन्यात भूमिपूजन होऊन सुरू झालेले वरंध-कुंभारकोंड येथील खऱ्या शिवथरघळीच्या रस्त्याचे काम आता घळीपर्यंत येऊन ठेपले असून आता या घळीच्या दर्शनाची वाट जीप व तत्सम वाहनांसाठी सुकर झाली आहे. यासोबतच सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधनकार्यदेखील वरंध-कुंभारकोंड येथील घळच खरी शिवथरघळ असल्याप्रत येऊन पोहोचले असल्याने आता खऱ्या समर्थभक्तांनी सर्वशृत शिवथरघळीचा फोलपणा आणि सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या घळीचा खरेपणा पडताळून सत्याची कास धरण्याची संधी श्रीरामनवमीपासून अनुभवावी, असे आवाहन संशोधनकार्यातील सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.
SHIVTHAR RASTA1.JPGसमर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीसमोरची नाही
पोलादपूर - समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीला उद्देशून असल्याचे काही समर्थअभ्यासक सांगतात, पण मोरगावचा गणपती सरळसोंड वक्रतुंड नसून सोंड डाव्या बाजूला आहे. म्हणून त्यांचा दावा खोटा आहे. असे सत्याची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न या मंडळींनी चालविले असल्याचे दिसून येत आहे. ही आरती सुंदरमठामधील आनंदवनभुवनामध्ये रचली असून महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केल्यानंतर या आरतीने गणपतीचे स्तवन समर्थांनी केले, असे प्रतिपादन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी रामदासपठार येथील सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीनिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचनावेळी केले.
DASNAVAMI SATKAR1.JPG
`सुंदरमठ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच शिवथरची घळ’ असे असूनही समर्थांची शिकवण महत्वाची आहे हे त्रिकालाबाधित सत्य सांगताना समर्थांच्याच `इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम।’ या आज्ञेलाच आनंदवनभुवन सापडले नसल्याने लपवून वेगळेच ठिकाण दाखविण्याचा प्रयत्न तत्कालीन समर्थ साहित्याच्या अभ्यासकांकडून झाला. मात्र, सत्य उघडकीस येऊनही त्यास विरोध करताना काहींकडून समर्थांच्या शिकवणीचाही विपर्यास केला जात आहे, असेही यावेळी अरविंदनाथ महाराज म्हणाले. यावेळी संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज माधव महाराज नामदास यांच्यासह धर्मगुरू चोगले, मानेमाऊली, अध्यक्ष सखाराम पवार,आपलं पोलादपूरचे संपादक भगवान साळवी, जयश्री जाधव आणि असंख्य हरिभक्त उपस्थित होते.

समर्थांच्या खर्या शिवथर घळीबाबतचे सद् गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधन वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचविणारे पत्रकार अभ्यासक शैलेश पालकर यांचा माधवमहाराज नामदास यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशमूर्ती उंचच उंच का? चुकीचा अर्थ लावल्यानेच
समर्थांची शिकवण जेवढी महत्वाची आहे तेवढेच समर्थांचे वास्तव्य असलेले प्रत्येक स्थान महत्वाचे आहे. मात्र, सत्याला विरोध करणारे मिथ्य सोडण्याचे धारिष्टय़ नसलेले स्वतःला समर्थभक्त म्हणवून खर्या शिवथर घळीच्या पुराव्यासह झालेल्या संशोधनाला उपेक्षित ठेवू पाहात आहेत. अशांवर समर्थांची कृपाच नाही म्हणून ते समर्थांच्या या सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीला येऊ शकत नाहीत, असे सांगून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केलेले हे संशोधन समर्थभक्तांसाठी केव्हाही पडताळून स्विकारावे असे सत्य असल्याचे, यावेळी पत्रकार पालकर यांनी सांगितले.

सध्या उंचच उंच गणेशमूर्तीबाबत मूर्तीकारांकडून उंची कमी ठेवण्यासाठीचा आग्रह योग्य आहे. कारण, `समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोही पुरूष सिंधूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद माघपर्यंत।’ यातील `दोही पुरूष’चा अर्थ काहींनी दोन पुरूष उंचीची गणेशमूर्ती असा लावल्याने गणेशमूर्ती उंचच उंच साकारण्याची मंडळांची स्पर्धा सुरू झाली आहे. ती पूर्णतः अयोग्य असून दोही पुरूष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी हे होत, अशी माहिती त्यांनी दिली. पालकर यांच्या या अभ्यासपूर्ण माहितीचे माधवमहाराज नामदास यांनी विशेष कौतुक केले.

छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट

RAMNAGAR PETH1.jpg

समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत गेल्यावर्षी १ जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.
छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३ मध्ये पान क्र.२२ वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची,नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा,मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर पारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके१५९७ भाद्रपद वद्य ८ रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी १२ वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुस-या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिस-या कारभा-याच्या हातची आहेत.या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे १२ वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ,बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा ख-या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

११-११-११ चा योग! ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा दिवस
JAMBHALICHA MAAL1.JPG
पोलादपूर - समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत यंदा १-१-११ या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर समर्थांच्या 'आनंदवनभुवनी' महाकाव्यातील 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी' या कडव्यानुसार दोनपेक्षा जास्तवेळा आलेल्या म्हणजेच बहु ११ अंकाची प्रचिती कार्तिक वद्य प्रतिपदाही आज आल्याने घडत आहे. आजच्या या दुहेरी योगामुळे ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा आजचा दिवस असल्याची नोंद समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्यापासून सुरू झालेल्या शिवथरघळीच्या शोधाची साशंकता दूर होत असल्याने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ (पुन्हा ११) पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. KALYANSWAMI- SAMARTH1.JPG
यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन कृपापूर्वक आज्ञा केली की तुझे नाम कल्याण आहे. कल्याणार्थ प्रसाद घेऊन जाणे. प्रसाद घेऊन सातारांच्या दरवाजियास गेलो, तेच समयी राजश्रीस स्वप्न साक्षात्कार झाला की, श्रीकडून कल्याणगोसावी कल्याणार्थ प्रसाद घेऊन आले.जागृत होताच दरवाजियास हुजूरचा सेवक पाठविला. खरे की काय म्हणून परामृश केला. तो आला. तो आपण बैसलोच होतो. त्याच्या भाषणे या चमत्काराची प्रचिती आली. त्या उपरी त्याच समागमे बिऱ्हाड न घेता राजदर्शनास गेलो. राजश्री पलंगावरून उठोन उभे राहून पुढे येऊन वंदनपूर्व प्रसाद घेतला आणि बोलले की, श्रीचा प्रसाद कल्याण गोसावी याबरोबर आला असता कल्याण आहे, म्हणून त्रिवार बोलिले. आणखी काय आज्ञा म्हणून विचारले. काही आज्ञा संकेत होता निवेदन केले. तेप्रसंगी उंबरजेकडे धावणी होऊन् गुरू वळून आणिली होती. सातारियाचे दक्षिण भागी सोनगांवी खिलार होते त्यामधे सीरगावी अकरा गाई होत्या. त्या खिलारात आणिल्या. हे वर्तमान राजश्रीस विदीत केले. तेही हुजूराच्या भृत्याबरोबरी पत्र देऊन अकरा गाई व अकरा वछे देविली. ती सीरगावी नेऊन ठेविली आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.''ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....''सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे म्हणजेच आज ११-११-११ रोजी आज दोनपेक्षा जास्त वेळा ११ म्हणजे बहुआक्रा आले आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथरप्रांताचा आहे. सध्या सर्वशृत शिवथरघळीकडे माझेरीमार्गे जाणारा रस्ता हा कावळा किल्ल्यामागील खिंड अलिकडे १९७५ च्या दुष्काळी कामादरम्यान खिंड फोडून तयार करण्यात आला आहे. मात्र, समर्थ रामदासस्वामींचा रस्ता पारमाचीहून जात असल्याचे ख-या शिवथरघळीच्या संशोधनादरम्यान दिसून आले आहे. येथे जांभलीच्या चौथरियावर या उल्लेखानुसार जांभळीचा माळ असा उल्लेख असलेला आणि त्यावर जांभळीची झाडे साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी एका रेषेत बाग केल्याप्रमाणे लावल्याचे आढळून आले आहे. मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ असे सातबाराचे उतारे असून तेथे त्या-त्या माळाच्या नावानुसार वैशिष्ठये आढळून आली आहेत. समर्थांचे 'बागप्रकरण' वाचताना समर्थांनी सांगितलेल्या बागेमध्ये काय लावावे? या प्रकरणातील माहितीनुसार अनेक वनस्पतींचे अस्तित्व येथे दिसून आले आहे. आक्रा आक्राची प्रचिती या ख-या शिवथरघळीच्या शोधादरम्यान फार महत्वाची ठरली असून सर्वशृत शिवथरघळीच्या सज्जनगड सेवा समितीने या संशोधनावर केलेली टीकाही ११ मार्च ११ रोजी प्रसिध्द झाली आहे. आजचा बहुआक्राचा आणि कार्तिक वद्य प्रतिपदेचा कल्याणस्वामींनी लिहिलेल्या प्रसंगाचा दिवस एकाचवेळी आला असून समर्थ रामदासस्वामी यांचे बसण्याच्या ठिकाणाचा तपशिलवार उल्लेख या पत्रात असल्याने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगण्याचा आजचा दिवस असल्याचे दिसून येत आहे.
RAMDAS PATHAR.jpg
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोधून काढलेल्या स्वयंभू शिवथरघळीची ख्याती सर्वदूर पसरत असल्याने येथे समर्थभक्त दासपरिवाराची दिवसागणिक उपस्थिती वाढत असताना या दासपरिवाराची दिशाभूल करण्यासाठी रामदासपठारकडे अशा दिशादर्शक फलकावरील 'रामदास' या नावावर काळा रंग फासून शिवथरकडे या शब्दाला 'घळईकडे ३ किमी' अशी जोड देत दासबोधातील व्यावहारिकता स्विकारल्याचे दिसून येत आहे. मार्गशीर्ष शुध्द दशमीला समर्थ रामदासस्वामींनी 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावें॥' ग्रंथराज दासबोधात घातली असा उल्लेख 'समर्थ संप्रदाय' ग्रंथामध्ये शिवथर प्रांतातील बहुशृत घळीचा साशंकतेसह शोध लावणारे समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी १२-१०-३४ नुसार नमूद करताना माघांत श्रीसमर्थ गेले आणि ग्रंथराजात ही ओवी त्यांनी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे श्रीसमर्थशिष्य तंजावरमठपती भीमस्वामी सांगतात. तसे असले किंवा नसले तरी ओवीतच श्रीसमर्थ आपल्या पश्चातच्या काळाचा उल्लेख करीत आहेत, तेव्हा ही त्यांची शेवटची आज्ञा होय, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. असे पान क्रमांक २७३ वर लिहिले आहे. असे असूनही शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या शिवथर प्रांतातील प्रचलित घळीमध्ये शनिवार,दि.५ फेब्रुवारी २०११ पासून शनिवार, दि. १२ फेबु्रवारी २०११ पर्यंत ग्रंथराज दासबोधाच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवथरप्रांतातील नवलवाडीयाचा कोंड या ठिकाणाला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे रामदासपठार असे महसूली गावाचे स्वरूप आले असून येथे असलेल्या सुंदरमठाच्या चौथ-याच्या सातबारा उता-यानुसार ही जागा ब्रिटीश काळापासून आजतागायत कायमधारा माफी झालेली आहे तसेच या पठाराच्या सातबारा उता-यामध्ये मठाचा माळ असा उल्लेख आहे तर जेथे स्वयंभू शिवथरघळ आहे त्या भागात भटाचा माळ असा उल्लेख दिसून येत आहे. या स्वयंभू शिवथरघळीचा शोध घेणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शुध्द दशमीपासून दत्तजयंती व दासबोध जन्मोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र शेंदूरमळई येथे केले होते. शुक्रवारी स्वयंभू शिवथरघळीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अरविंदनाथ महाराजांच्या भक्तगणांनी दासबोध पारायणाची यशस्वी सांगता केली.
यावेळी दररोज सुमारे ३०० हून अधिक दासभक्तांची उपस्थिती या स्वयंभू शिवथर घळीचे दर्शन घेण्यास लाभत असल्याचे दिसून आले. या दासभक्तांची दिशाभूल करण्यासाठी शिवथर प्रांतातील बहुशृत घळीच्या परिसरातील काही प्रतिष्ठित लोकांना कमिटीवर अचानक संधी देऊन स्वयंभू शिवथरघळीला आमच्या घळीचे नांव देऊ नका, अशी चिथावणी नामानिराळे राहू पाहणा-या बोलवित्या धन्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकही रामदासपठारकडे जाणा-या दासभक्तांना घळ मागे राहिली, असे सांगून गाडया सर्वशृत शिवथरघळीकडे नेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यामुळे काहीसा तणाव या भागात दिसून येत असून स्थानिकांना आपसात लढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न शंकर श्रीकृष्ण देव यांना साशंकतेसह आढळून आलेल्या घळीच्या संचालकांकडून केला जात आहे.
एकूणच, ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी पुणे येथील 'जनरेशन नेक्स्ट' या सिटी चॅनेलसोबत वार्तालापादरम्यान केले आहे.
शैलेश पालकरDASNAVAMI SATKAR1.JPGSHIVTHAR RASTA1.JPG

गुलमोहर: 

आदरणीय गामा जी...
जय जय रघुवीर समर्थ!
आपण सज्जनगड आणि महेश यांना दिलेली उत्तरे मला आणि या सत्य संशोधनासाठी निश्चितच उपयुक्त आहे, त्याबद्दल ऋणी आहे. या लिंक वर संशोधन आणि संशोधक यांना हेटाळणीची वागणूक सातत्याने दिली गेली आहे. नंदिनी नावाच्या पत्रकार समर्थ सोडून मलाच इथे व्यक्त होण्याचा आग्रह दुराग्रहाने करीत आहेत. मला यात स्वारस्य नाही....समर्थच काही कार्य आमच्या हातून करून घेत असावेत त्यामुळे आम्ही समर्थांचीया सेवका वक्र पाहे...असा या भूमंडळावर कोणी समर्थ सेवकच असेल असे मानू शकत नाही...आणखी एक पत्र ज्याद्वारे त्याकाळी शिवथर असा उल्लेख असलेली दोन ठिकाणे होती हे सिध्द होते...त्यापैकी एक सर्वश्रुत शिवथर घळ असलेले ठिकाण तत्कालीन बिरवाडी तालुक्यातील शिवथर आहे. शंकर श्रीकृष्ण देव आणि श्रीधर स्वाम्मिनी याठिकाणी घळ खणली. आणि ती सर्वश्रुत केली. आणि आमच्या संशोधनातून सिध्द झालेली घळ हि शिवथर तालुक्यातील मौजे पारमाची कोंड नलवडा म्हणजेच नवलवाडियाच्या कोंडावरची आहे.SIVTHAR BIRVAADI1.jpg
सज्जनगड वाले समर्थांना अजून पुरेसे ओळखत नसावेत. म्हणून ते दासबोध जयंती त्या सर्वश्रुत शिवथर घळीत साजरी करतात जर `आमुची प्रतिज्ञा ऐसी, काही न मागावे शिष्यासी, आपणामागे जगदिशासी, भजत जावे' असे समर्थांनी माघ महिन्यात जाण्याआधी (देहत्याग करण्याआधी) दोन महिने म्हटले आणि हि शेवटची ओवी दासबोधात समाविष्ठ केली. तर समर्थ सज्जनगडावर गेले. तत्पूर्वी पाच वर्षे तेथे वास्तव्य होते. तर हि ओवी समाविष्ठ झाल्यानंतर दासबोध पूर्ण सज्जनगडावर झाला (आम्ही संशोधित केलेल्या शिवथर घळीमध्ये समर्थांनी सर्व ग्रंथास आरंभ केला आहे.यात `वेदशास्त्र धर्मचर्चा, पुराणे महात्मे किती, कवित्वे नुतने जीर्णे, आनंदवन भुवनी' यांचा समावेश असलेल्या टिपणांचे सर्व ग्रंथामधील लेखन अभिप्रेत आहे. ) असताना ते दासबोध जयंती त्या सर्वश्रुत शिवथर घळीत साजरी का करतात? समर्थांच्या शेवटच्या ओवीचा अर्थ ते आचरणात आणीत नाहीत हि बाब वेगळीच. समर्थांनाही त्यांनी `भी' मागण्याची दिलेली शिकवण अनुग्रही विसरले याची खंत होती. माघ महिन्यात समर्थ गेले त्यापूर्वी दोन महिने म्हणजे मार्गशीर्ष महिना असतो. तोच महिना दासबोध पूर्तीचा आहे.
यातील सज्जनगड यांनी केलेला आरोप आपण परस्पर उडवून लावला आहे. खरे तर, त्यांनी समर्थांची इच्छा `देव भक्त एक झाले मिळाले सर्व जीवही संतोष पावले तेथे आनंदवन भुवनी.' नुसार आमच्या संशोधनातील आनंद वन भुवनासोबत असण्याची गरज आहे. आम्हाला सत्य मांडताना कोणाचे वाभाडे काढायचे नाहीत. पण खोट्याचा असा दुराग्रह झाला तर ते आपोआपच निघतील. अपराधी जन चुकतची गेले हे जन हाती धरे दयाळा....अशी आम्हाला समर्थांची आज्ञा आहे. त्यामुळे या चुकत गेलेल्या आणि चुकत जाणार्या समर्थ भक्तांपासून आम्ही दूर जावू पाहत नाही...त्यामुळे त्यांनीही नाहक संशोधन बदनाम करू नये. कल्याण स्वाम्मिच्या प्रसंगातील आर्जव वृत्तीने मागणे हे निस्पृहाचे लक्षण नव्हे हि आज्ञाही सज्जनगड आचरणात आणीत नाही. असे असूनही आमच्या संशोधनासाठी कोणी देणगी देवू नये असे काही म्हणतात.. त्यांच्याकडे आणि कोणाकडेही आम्ही कधीच काही मागितले नाही...तरीही असा दंभ कशासाठी? आणि...छे...अधिक खूप सविस्तर लिहू शकलो असतो. पण गामाजी येथे सत्य समजून त्याची पाठराखण करण्याची इच्छा असलेले आपणासारखे एखादेच आहेत. म्हणून केवळ आपणापर्यंत पोहोचल्याचे समाधान आहे. सत्य आणि समर्थभक्त यांचे नाते अतूट आहे. म्हणूनच आमचे सत्य समर्थ भक्तांपर्यंत पोहोचण्यासाठी वृत्तपत्रे, न्यूज चानेल्स, वेबसाईट्स अशी माध्यमे आम्ही स्वीकारली आहेत.
महेशजी, निखील वागले आणि अन्य कोणी आपण म्हणता तसे तयार झाले तर आम्ही सामोरे जाण्यास तयार आहोत. आमची थेट प्रक्षेपणासह मुलाखत घ्यावी आणि प्रत्यक्ष संशोधनाच्या ठिकाणी येवूनही खातरजमा करावी. समर्थ कृपेने आम्ही आमचे सत्य मोठ्या चेनेल समोरही मांडताना असमर्थ ठरणार नाही. आपणही या संशोधनास सहकार्य करीत असाल तर स्वागत आहे. खूप काही सत्य समर्थ जगतापासून लपविले गेले आहे...ते मांडताना आनंद होईल....आम्हाला आणि तुम्हालाही...जय जय रघुवीर समर्थ!!!

शैलेश वसंत पालकर,

कृपया वरील बिरवाडीच्या शिवथरघळीचा उल्लेख असलेला उतारा कोणत्या पुस्तकातला आहे ते स्पष्ट करावे. यामुळे संदर्भ जुळवण्यास मदत होईल! Happy

आ.न.,
-गा.पै.

रामदास आणि रामदासीं भाग २९ वा
रामदासींची ऐतिहासिक टिपणे.
टिपण १ ले
श्रीशिवछत्रपतींचा १५७३तील अस्सल कौलनामा
कोंढवी परगण्याचा करीना
पान क्र. ५
विशेष म्हणजे आम्ही समर्थ वाग्देवता मंदिरातून हि पुस्तके मिळवून अभ्यासत आहोत. त्यांचा पडताळा आम्हाला खऱ्या शिवथर घळीचा शोध घेताना करता आला...आमचे संशोधित सत्य नाकारणार्याना आम्हाला नाही तर या कागदपत्रांना खोटे ठरवावे लागणार आहे....त्यामुळे जसे रामदास पठार या फलकावरील `रामदास' नावावर काळ फासले गेले तसे हे पुरावे जेथून प्राप्त झाले ती पुस्तके खोटी ठरविण्याच्या कोणी भरीस पडू नये...

शैलेश वसंत पालकर,

संदर्भाबद्दल धन्यवाद! यापुढेही एखादे टिपणाचे चित्र देतांना त्याच्या संदर्भाचा उल्लेख करीत जावे. यामुळे महाजालावरील माझ्यासारख्या दूरस्थ वाचकांना युक्तिवाद चटकन विश्वासार्ह वाटतो. Happy

आ.न.,
-गा.पै.

देव देव बहु देव। नाना देव परोपरी। दाटणी ...जाहाली मोठी। आनंदवनभुवनी।। २०।।
दिग्पती चालले सर्वे। नाना सेना परोपरी। वेष्टित चालले सकळे। आनंद वन भुवनी।।२१।।

यात शंकर श्रीकृष्ण देव यांना नाना म्हणतात यात माझा काय दोष? शिवथर घळ त्याना दिसली आणि त्या शिवथर घळीच्या संशोधनाचे समर्थक म्हणजेच `नाना सेना' परोपरीने आम्हाला वेष्टित चालली अथवा गुंडाळीत चालली आहे असा अर्थ लावला तर समर्थांनी भविष्यकथन केलेच नाही असे मी का म्हणू? या कवितेत समर्थ पुढे म्हणतात,
देव सर्वस्व भक्तांचा। देव भक्त दुजे नसे। संदेह तुटला मोठा। आनंदवनभुवनी।।४५।।
हे भविष्य आहे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधनांती सिद्ध केलेल्या आनंदवनभुवनाचे आणि ते सागितले आहे समर्थांनी. त्यामुळे समर्थ हे ज्या भक्ताचे सर्वस्व आहेत त्यामध्ये शंकर श्रीकृष्ण देव यांच्या समर्थकांनाहि समर्थ हेच देवस्थानी आहेत त्यामुळे हे देव भक्त समर्थ भक्तच आहेत त्यांना शंकर श्रीकृष्ण देव यांना शिवथर घळ समर्थक म्हणून दुजे नसे या समर्थांच्या आज्ञेविरोधात मी का जावे? त्यांचा सर्व ग्रंथ लेखनाची जागा शिवथर घळ की आनंदवनभुवन याबाबतचा संदेह तुटण्याचे ठिकाण आनंदवनभुवनी असेल असे समर्थांनी भविष्य सांगितले आहे. तर आम्ही त्या शंकर श्रीकृष्ण देव यांच्या शिवथर घळ समर्थाकांप्रती द्वेष का करावा?
कल्याण करी रामराया। अपराधी जन चुकतची गेले।
चुकतची गेले। हे जन हाती धरे दयाळा।
असे समर्थांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे नव्या शिवथर घळ म्हणजेच आनंदवनभुवनिच्या संशोधनाप्रती जे अपराधी जन चुकतची गेले आहेत त्यांचाहि संदेह तुटण्याचे ठिकाण आनंदवनभुवनी असेल. आणि मग समर्थांनी पुढे केलेले भविष्य कथन खरे ठरावे अशी अपेक्षा आहे ते असे.....
देव भक्त एक झाले। मिळाले सर्व जीवही। संतोष पावले तेथे।आनंदवनभुवनी।।४६।।
स्मरले लिहिले आहे। बोलता चालता हरी। काये होईल ते पाहावे। आनंदवनभुवनी।।५७।।

गंमत आहे. ही वरची पोस्ट यांनीच आधी १ एप्रिल २०११ ला ही पोस्ट केली होती.
http://www.maayboli.com/node/23327?page=1
(कोण म्हणतो की मोठ्या मोठ्या पोस्टी वाचताना लक्षात रहात नाही? ही पोस्ट पाहिल्याबरोबर एक वर्षापूर्वी वाचलेली पोस्ट आठवली)
हे पूर्ण महिनाभर एप्रिल फूल साजरा करतात की काय?

Proud

अहो ते एकच पोस्ट सतत अपडेट करत असतात. विषय तोच आहे पण जरासा फिरवून फिरवून लिहितात.
मला अजुनही कळत नाही की एवढी वर्षे कोणाला कळाले नाही ते यांनाच कसे कळाले आणि ते सुद्धा एवढ्या वर्षांनतर.
आणि काय फारसा फरक पडणार आहे कोणत्याही जागेला शिवथर घळ म्हणल्याने.
हाँ एक फरक नक्की पडेल की या नविन मंडळींना महत्व मिळणार नाही,
फक्त जुन्या लोकांनाच मिळत राहील. पण म्हणुन इतिहासच बदलायचा ?
अर्थात यातही काही विशेष नाही, कारण आजकाल सर्वत्र सर्रास हे चालू आहे. Sad

दिग्पती चालले सर्वे। नाना सेना परोपरी। वेष्टित चालले सकळे। आनंद वन भुवनी।।२१।।
यात शंकर श्रीकृष्ण देव यांना नाना म्हणतात यात माझा काय दोष?

आग्ग्ग्ग्ग्गोबाई ! नाना म्हणजे माणसाचे नाव? नाना सेना म्हणजे नानांची सेना??? Proud

विरोधक आणी समर्थक, दोघेही समर्थांचे भक्त आहेत मग वाद करता कशाला?.

शेवटी अगाध ज्ञान मिळवुन माणुस कोरडाच राहतो की काय?

विरोधक आणी समर्थक, दोघेही समर्थांचे भक्त आहेत मग वाद करता कशाला?.

>>> वाद कसला ? कोणी तरी समर्थांच्या नावार अजुन एक देऊळ/दुकान थाटायचा प्रयत्न करतय ...त्याला हसतोय आम्ही Biggrin

यात शंकर श्रीकृष्ण देव यांना नाना म्हणतात यात माझा काय दोष?>> Lol
कैच्याकै..

सह्याद्रीच्या डोंगरात घळ सदृष्य पोकळी(गुहा) बर्‍याच ठिकाणी (अगदी जमीनीतही) बघायला मिळतात.
दापोलीजवळ चिखलगावमध्ये डॉ. राजा दांडेकर( अध्यक्ष लोकमान्य न्यास चिखलगाव) यांच्या शेतात आंब्याची कलमं लावण्यासाठी खड्डे खणताना अचानक पहार(सब्बल) जमीनीत जवळपास २०फुट खाली गेली, तिथली माती उपसली तर शिवथर घळ सारखीच गुहा जमीनीत तयार झाली आहे, त्यात जिवंत पाण्याचा झराही आहे.. भुगर्भ शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार सह्याद्रीत आणि खासकरुन कोकणात अशा गुहा खुप ठिकाणी आहेत..

अरे सुमिता तु इकडे लक्ष देउ नकोस. तु एकटाच म्हणजे पुर्वीचा सुमित ना? मी कोण आहे सांग पाहू?

जय जय रघुवीर समर्थ

मी कोण आहे सांग पाहू? >>>>>> .ज्याला जे नाही झाले ते ही दिसते असा दिव्यशक्तिधारक नाही आहे मी..:) एक सामान्य भारतीय आहे...

रानडुक्कर, भूत, जामोप्या, पिसालेला हत्ती, भरत मयेकर, राजेश्वर, एकटाच, सारिका, आम्ही काही दिवस यात नवीन माहिती पोस्ट केली नाही तर लगेच नदीकडचे कातळ समजून येथे घाण करायला आलात?
भूत म्हणतंय, > वाद कसला ? कोणी तरी समर्थांच्या नावार अजुन एक देऊळ/दुकान थाटायचा प्रयत्न करतय ...त्याला हसतोय आम्ही ,
काय बोलावे? काय लिहावे? तुम्हीच म्हणता मिस्टर भूत .....देऊळ/दुकान थाटायचा प्रयत्न!!! हे एकमेकांना पर्याय कोणी तयार केले ते तपासून पहा... लवकरच येथे मुद्देसूद आणि एकामागून एक कठोर सत्य लिहिले जाईल. समर्थांच्या नावावर आज पर्यंत चालणारी देऊळ/दुकान बंद पडेल याची आम्हास तमा नाही.....
तुमची सर्व भुतावळ `समर्थ कृपेने- समर्थांच्या नावावर' असे शब्द वापरणार्यांचे मार्केटिंग बंद पडताना पाहून कळवळेल!!! त्यावेळी समर्थ कृपा असेल तरच तुम्ही टीका टिपण्णी करण्यात सहभाग घ्यावा....समर्थांचे सर्वग्रंथलेखन अभ्यासून येथे प्रकट व्हावे... नासन्यासाठी प्रकट होणार्याने `खटासी खट...नट खटासी नटखट' एव्हढीच खटपट करण्यासाठी येथे येवू नये.....तुम्ही येथे येवून स्वताची शोभा करून घेवू नये...हे विचारपीठ आहे..टवाळखोरांची जत्रा नाही.....नदीकडचे कातळ समजून येथे घाण करायला आलात तर....

आता मी काय केले ? तुमच्या नाना सेना या शब्दावरची कोटी पाहून हसू आले आणि तुम्ही लगेच हातघाईवर आलात?

( कोणी हसला तर जो चिडतो आणि हातघाईवर येतो, तो एक मूर्ख .
हासतां खिजे पेटे द्वंदा । तो येक मूर्ख ॥ ४८॥ )

---- दासनवमीला जन्मलेला,
जागो समर्थ प्यारे

कमाल आहे! एक वर्षापूर्वीची पोस्ट जशीच्या तशी पुन्हा पोस्ट केली असे म्हटले तर काय घोर अपराध घडला मज पामराकडून?

>>लवकरच येथे मुद्देसूद आणि एकामागून एक कठोर सत्य लिहिले जाईल. <<
समर्थ करो तो दिवस लवकर येवो.......

आता मी काय केले ? >>>>>>

जामोप्या तुमचे नशिबच वाइट आहे. जेथे तिथे तुम्हाला लोक उगाचच नावे ठेवतात. Proud

रमणीय या शब्दाचा अर्थ इथे एवढा भयानक लावला गेला की वाचुन हसूच आले. रमणीय म्हनजे डोळ्यांना सुखावणारे, मनाला शांततेची अनूभुती देणारे आणी सर्व ताप संताप विसरायला लावणारे असा अर्थ आहे, पण प्रस्तुत लेखकांनी रमणी म्हणजे स्त्री असा सोयीस्कर अर्थ लावुन उगीच गैरसमज करुन घेतला

>>प्रस्तुत लेखकांनी रमणी म्हणजे स्त्री असा सोयीस्कर अर्थ लावुन उगीच गैरसमज करुन घेतला<<
अहो त्यांनी अश्या अनेक शब्दांचा आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावुन नको ते गैरसमज करुन घेतले आहेत...:हहगलो:

चला,
समर्थांचे नाव वापरून नव्या पद्धतीने जुनेच राजकारण करून महापुरुषांचे चारित्र्यहनन करणा-या या राष्ट्रद्रोही अवलादीला जरा समर्थ विचारांचे वाचन, चिंतन, मनन तरी त्या निमित्तने घडते आहे...
रावणाला जसा रामाचा ध्यास लागला होता ना अगदी तसेच...

वाचकांना सूचना,

अशा लोकांना व त्यांच्या कथित मतांना किम्मत न देणे हेच अधीक श्रेयस्कर आहे...आपण कितीही बोललो तरी त्यावर यांचा काहीतरी तद्दन भंपक प्रतिवाद असायचाच.
समर्थ म्हणतात त्यप्रमाणे सार त्यागून असार घेणे...व विष्ठा सावडणे हे एकच आहे.
तोंड पसरुनि जैसे सुणे (कुत्रे) रडोनि गेले...

या निमित्ताने आपण सर्वांनी काही समर्थ लिखाण येथे वाचावे...
http://www.Dasbodh.com

शंकर श्रीकृष्ण देवांच नाव काढशील तर कानफटात खाशील.
त्या एका माणसामुळं आज समर्थांचं सर्व लिखाण जगाला उपलब्ध झालेलं आहे.
नाहीतर ते भारतभर पसरलेल्या ११०० रामदासी मठांत विखुरलेलं होतं...
ज्या काळात या देशात रेल्वे नव्हती, बैल्गाड्यांनी पुणे मुंबई प्रवास व्हायचा त्या काळात त्या माणसानं पायी फिरुन हा देश पालथा घतलाय. ढुंगणाखली हिरो होंडा घेऊन नवीन घळ सापडल्यची बोंब मारत फिरणा-या तुझ्यासारख्या भाडोत्री पत्रकाराला काय कळणार आहे त्यातली व्यथा...तुझा पैसा/हप्ता तुला पोचला की तु खुश!
हरामखोर! बास कर आता ही नाटकं..फार ऐकलं तुझं श्वान रुदन..मी शिवथरच्या घळीत अनेकदा आणि अनेक वाटांनी चलत गेलेलो आहे. स्वतः पाहिलं आहे की कशी अगम्या अहे ती घळ...कशी शोधली असेल देवांनी याची कल्पनाच केलेली बरी...तुला दिवसभर इंटरनेट, गूगल मॅप आणि फेसबूक समोर बसून घाणेरड्या गोष्टी बघता बघता असले काहीतरी फाल्तु लिखाण करायला काय जातय,,,भाडोत्री कुठला....

Pages