खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद
छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात दोन शिवथर होते. एक शिवथर तालुका आणि दुसरे बिरवाडी तालुक्यातील शिवथर गाव. समर्थ रामदास स्वाम्मिन्च्या घळीचे ठिकाण शिवथर तालुक्यातील मौजे पारमाची कोंड नलवडा येथील असल्याने त्यास शिवथर ची घळ असे म्हटले जात होते तर बिरवाडी तालुक्यातील शिवथर गावाचा उल्लेख कौल नामा या धोंडो राघोजी देशमुख यांच्या पत्रात दिसून येतो. येथेच समर्थ साहित्याचे अभ्यासाक आणि शिवथर घळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी एका डोंगरात हि घळ खणली...म्हणजे ती स्वयंभू नव्हती. बिरवाडी जवळच्या खरवली गावातील भटजी भागवत यांनी या खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद केल्याचा हा विडीओ
http://youtu.be/4Aylw5PDcjg
खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...श्रीरामनवमीला दर्शनाची संधी
छ.शिवाजी महाराजांचे आणखी एक पत्र सांगते दुसरे शिवतर
पोलादपूर(शैलेश पालकर)-भोर घाटातील वरंध कुंभारकोंड येथे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या स्वयंभू शिवथर घळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता समर्थभक्तांची वाट सुकर करण्यापर्यंत झाले आहे. त्यामुळे येत्या रविवार, दि.1 एप्रिल 2012 रोजी येणाऱ्या श्रीरामनवमीनिमित्त भाविकांना या स्वयंभू शिवथर घळीच्या दर्शनाची संधी मोठया प्राप्त होणार आहे. एकीकडे, मातीकामाचा रस्ता पूर्ण झाला असताना दुसरीकडे छ.शिवाजी महाराज यांचे आणखी एक पत्र संशोधनादरम्यान आढळून आले असून त्यामुळे दुसरे सिवतर तत्कालीन बिरवाडी तालुक्यात अस्तित्वात होते, अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे खऱ्या शिवथरघळीच्या दर्शनासोबत संशोधनाचीही वाट सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातून श्रीसांप्रदायाची कागदपत्रे यांतील रामदास आणि रामदासी भाग एकूणतिसावा श्रीरामदासींची ऐतिहासिक टिपणे या बाडामध्ये श्रीशिवछत्रपतींचा 1573 तील एक अस्सल कौलनामा या पहिल्या टिपणातील कोंढवी प्रगण्याचा करीना पान क्र. 5 वर 'बाजी येसवंतराव सिवतर ताा.बीरवाडी येथे ठेविला' असा उल्लेख दिसून येत आहे.
सर्वशृत शिवथर घळीचे नेमके हेच ठिकाण असून त्या शिवथरघळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी पाटील-देशमुखांची कागदपत्रे संशोधनादरम्यान विचारात घेऊन हे स्थळ निश्चित केल्याचे त्यांच्या श्रीसांप्रदायिक विविध विषय या लेखामध्ये पान क्र.6 वर दिसून येत आहे. शंकर श्रीकृष्ण देव या लेखात,'साताऱ्याजवळ शिवथर आहे तेंच हे शिवथर असेल, असे वाटून त्याच्या आसपासच्या डोंगरात घळीचा शोध घेण्यात विनाकारण काही काळ गेला. पण बीरवाडी, पारमाची वगैरे स्थळांचा उल्लेख वरील कित्येक लेखांकांत आलेला पाहून महाड तालुक्यातील बीरवाडीजवळपास हे शिवथर असावे, असे वाटून तिकडे गेलो आणि त्या अत्यंत रमणीय व परमपूज्य अशा घळीचे दर्शन घडले!' असे म्हणतात.
मात्र, या लेखाचा कालावधी पाहता या देव यांच्या संशोधनादरम्यानच्या काही व्यक्ती हयात असण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसा सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोध घेतला असता बिरवाडीजवळच्या खरवली येथील अनंत रामकृष्ण भागवत या पौरोहित्य करणाऱ्या वृध्द व्यक्तीने 'शिवथरघळीच्या खणण्याच्या कामादरम्यान श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी असल्याचे सांगून आता जेथे शिवथरघळ आहे तिथे त्यावेळी डोंगर होता. तिथे घळीचा आकार देत खणण्याचे काम सुरू असताना आता जिथे मर्ूत्या बसविल्या आहेत; तेथपर्यंत खणताना आपण होतो. मूर्ती बसविल्यानंतर त्यापुढील भाग खणण्यात आल्याचे अनंत भागवत यांनी सांगून आता जिथे धबधबा आहे तेथे पाण्याचे ओहोळ होते आणि आता तिथे धबधबा आहे, असे सत्य सांगितले आहे. त्यावेळी श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी गजानन जोशी व राम परांजपे हेदेखील आपणासोबत होते,' अशा अनेक आठवणी अनंत भागवत यांनी सांगितल्यामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांच्या सर्वशृत शिवथर घळीबाबतचा फोलपणा उघड झाला आहे.
आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते डिसेंबर महिन्यात भूमिपूजन होऊन सुरू झालेले वरंध-कुंभारकोंड येथील खऱ्या शिवथरघळीच्या रस्त्याचे काम आता घळीपर्यंत येऊन ठेपले असून आता या घळीच्या दर्शनाची वाट जीप व तत्सम वाहनांसाठी सुकर झाली आहे. यासोबतच सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधनकार्यदेखील वरंध-कुंभारकोंड येथील घळच खरी शिवथरघळ असल्याप्रत येऊन पोहोचले असल्याने आता खऱ्या समर्थभक्तांनी सर्वशृत शिवथरघळीचा फोलपणा आणि सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या घळीचा खरेपणा पडताळून सत्याची कास धरण्याची संधी श्रीरामनवमीपासून अनुभवावी, असे आवाहन संशोधनकार्यातील सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीसमोरची नाही
पोलादपूर - समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीला उद्देशून असल्याचे काही समर्थअभ्यासक सांगतात, पण मोरगावचा गणपती सरळसोंड वक्रतुंड नसून सोंड डाव्या बाजूला आहे. म्हणून त्यांचा दावा खोटा आहे. असे सत्याची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न या मंडळींनी चालविले असल्याचे दिसून येत आहे. ही आरती सुंदरमठामधील आनंदवनभुवनामध्ये रचली असून महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केल्यानंतर या आरतीने गणपतीचे स्तवन समर्थांनी केले, असे प्रतिपादन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी रामदासपठार येथील सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीनिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचनावेळी केले.
`सुंदरमठ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच शिवथरची घळ’ असे असूनही समर्थांची शिकवण महत्वाची आहे हे त्रिकालाबाधित सत्य सांगताना समर्थांच्याच `इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम।’ या आज्ञेलाच आनंदवनभुवन सापडले नसल्याने लपवून वेगळेच ठिकाण दाखविण्याचा प्रयत्न तत्कालीन समर्थ साहित्याच्या अभ्यासकांकडून झाला. मात्र, सत्य उघडकीस येऊनही त्यास विरोध करताना काहींकडून समर्थांच्या शिकवणीचाही विपर्यास केला जात आहे, असेही यावेळी अरविंदनाथ महाराज म्हणाले. यावेळी संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज माधव महाराज नामदास यांच्यासह धर्मगुरू चोगले, मानेमाऊली, अध्यक्ष सखाराम पवार,आपलं पोलादपूरचे संपादक भगवान साळवी, जयश्री जाधव आणि असंख्य हरिभक्त उपस्थित होते.
समर्थांच्या खर्या शिवथर घळीबाबतचे सद् गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधन वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचविणारे पत्रकार अभ्यासक शैलेश पालकर यांचा माधवमहाराज नामदास यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशमूर्ती उंचच उंच का? चुकीचा अर्थ लावल्यानेच
समर्थांची शिकवण जेवढी महत्वाची आहे तेवढेच समर्थांचे वास्तव्य असलेले प्रत्येक स्थान महत्वाचे आहे. मात्र, सत्याला विरोध करणारे मिथ्य सोडण्याचे धारिष्टय़ नसलेले स्वतःला समर्थभक्त म्हणवून खर्या शिवथर घळीच्या पुराव्यासह झालेल्या संशोधनाला उपेक्षित ठेवू पाहात आहेत. अशांवर समर्थांची कृपाच नाही म्हणून ते समर्थांच्या या सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीला येऊ शकत नाहीत, असे सांगून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केलेले हे संशोधन समर्थभक्तांसाठी केव्हाही पडताळून स्विकारावे असे सत्य असल्याचे, यावेळी पत्रकार पालकर यांनी सांगितले.
सध्या उंचच उंच गणेशमूर्तीबाबत मूर्तीकारांकडून उंची कमी ठेवण्यासाठीचा आग्रह योग्य आहे. कारण, `समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोही पुरूष सिंधूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद माघपर्यंत।’ यातील `दोही पुरूष’चा अर्थ काहींनी दोन पुरूष उंचीची गणेशमूर्ती असा लावल्याने गणेशमूर्ती उंचच उंच साकारण्याची मंडळांची स्पर्धा सुरू झाली आहे. ती पूर्णतः अयोग्य असून दोही पुरूष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी हे होत, अशी माहिती त्यांनी दिली. पालकर यांच्या या अभ्यासपूर्ण माहितीचे माधवमहाराज नामदास यांनी विशेष कौतुक केले.
छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट
समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत गेल्यावर्षी १ जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.
छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३ मध्ये पान क्र.२२ वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची,नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा,मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर पारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके१५९७ भाद्रपद वद्य ८ रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी १२ वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुस-या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिस-या कारभा-याच्या हातची आहेत.या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे १२ वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ,बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा ख-या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.
११-११-११ चा योग! ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा दिवस
पोलादपूर - समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत यंदा १-१-११ या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर समर्थांच्या 'आनंदवनभुवनी' महाकाव्यातील 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी' या कडव्यानुसार दोनपेक्षा जास्तवेळा आलेल्या म्हणजेच बहु ११ अंकाची प्रचिती कार्तिक वद्य प्रतिपदाही आज आल्याने घडत आहे. आजच्या या दुहेरी योगामुळे ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा आजचा दिवस असल्याची नोंद समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्यापासून सुरू झालेल्या शिवथरघळीच्या शोधाची साशंकता दूर होत असल्याने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ (पुन्हा ११) पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे.
यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन कृपापूर्वक आज्ञा केली की तुझे नाम कल्याण आहे. कल्याणार्थ प्रसाद घेऊन जाणे. प्रसाद घेऊन सातारांच्या दरवाजियास गेलो, तेच समयी राजश्रीस स्वप्न साक्षात्कार झाला की, श्रीकडून कल्याणगोसावी कल्याणार्थ प्रसाद घेऊन आले.जागृत होताच दरवाजियास हुजूरचा सेवक पाठविला. खरे की काय म्हणून परामृश केला. तो आला. तो आपण बैसलोच होतो. त्याच्या भाषणे या चमत्काराची प्रचिती आली. त्या उपरी त्याच समागमे बिऱ्हाड न घेता राजदर्शनास गेलो. राजश्री पलंगावरून उठोन उभे राहून पुढे येऊन वंदनपूर्व प्रसाद घेतला आणि बोलले की, श्रीचा प्रसाद कल्याण गोसावी याबरोबर आला असता कल्याण आहे, म्हणून त्रिवार बोलिले. आणखी काय आज्ञा म्हणून विचारले. काही आज्ञा संकेत होता निवेदन केले. तेप्रसंगी उंबरजेकडे धावणी होऊन् गुरू वळून आणिली होती. सातारियाचे दक्षिण भागी सोनगांवी खिलार होते त्यामधे सीरगावी अकरा गाई होत्या. त्या खिलारात आणिल्या. हे वर्तमान राजश्रीस विदीत केले. तेही हुजूराच्या भृत्याबरोबरी पत्र देऊन अकरा गाई व अकरा वछे देविली. ती सीरगावी नेऊन ठेविली आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.''ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....''सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे म्हणजेच आज ११-११-११ रोजी आज दोनपेक्षा जास्त वेळा ११ म्हणजे बहुआक्रा आले आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथरप्रांताचा आहे. सध्या सर्वशृत शिवथरघळीकडे माझेरीमार्गे जाणारा रस्ता हा कावळा किल्ल्यामागील खिंड अलिकडे १९७५ च्या दुष्काळी कामादरम्यान खिंड फोडून तयार करण्यात आला आहे. मात्र, समर्थ रामदासस्वामींचा रस्ता पारमाचीहून जात असल्याचे ख-या शिवथरघळीच्या संशोधनादरम्यान दिसून आले आहे. येथे जांभलीच्या चौथरियावर या उल्लेखानुसार जांभळीचा माळ असा उल्लेख असलेला आणि त्यावर जांभळीची झाडे साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी एका रेषेत बाग केल्याप्रमाणे लावल्याचे आढळून आले आहे. मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ असे सातबाराचे उतारे असून तेथे त्या-त्या माळाच्या नावानुसार वैशिष्ठये आढळून आली आहेत. समर्थांचे 'बागप्रकरण' वाचताना समर्थांनी सांगितलेल्या बागेमध्ये काय लावावे? या प्रकरणातील माहितीनुसार अनेक वनस्पतींचे अस्तित्व येथे दिसून आले आहे. आक्रा आक्राची प्रचिती या ख-या शिवथरघळीच्या शोधादरम्यान फार महत्वाची ठरली असून सर्वशृत शिवथरघळीच्या सज्जनगड सेवा समितीने या संशोधनावर केलेली टीकाही ११ मार्च ११ रोजी प्रसिध्द झाली आहे. आजचा बहुआक्राचा आणि कार्तिक वद्य प्रतिपदेचा कल्याणस्वामींनी लिहिलेल्या प्रसंगाचा दिवस एकाचवेळी आला असून समर्थ रामदासस्वामी यांचे बसण्याच्या ठिकाणाचा तपशिलवार उल्लेख या पत्रात असल्याने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगण्याचा आजचा दिवस असल्याचे दिसून येत आहे.
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोधून काढलेल्या स्वयंभू शिवथरघळीची ख्याती सर्वदूर पसरत असल्याने येथे समर्थभक्त दासपरिवाराची दिवसागणिक उपस्थिती वाढत असताना या दासपरिवाराची दिशाभूल करण्यासाठी रामदासपठारकडे अशा दिशादर्शक फलकावरील 'रामदास' या नावावर काळा रंग फासून शिवथरकडे या शब्दाला 'घळईकडे ३ किमी' अशी जोड देत दासबोधातील व्यावहारिकता स्विकारल्याचे दिसून येत आहे. मार्गशीर्ष शुध्द दशमीला समर्थ रामदासस्वामींनी 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावें॥' ग्रंथराज दासबोधात घातली असा उल्लेख 'समर्थ संप्रदाय' ग्रंथामध्ये शिवथर प्रांतातील बहुशृत घळीचा साशंकतेसह शोध लावणारे समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी १२-१०-३४ नुसार नमूद करताना माघांत श्रीसमर्थ गेले आणि ग्रंथराजात ही ओवी त्यांनी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे श्रीसमर्थशिष्य तंजावरमठपती भीमस्वामी सांगतात. तसे असले किंवा नसले तरी ओवीतच श्रीसमर्थ आपल्या पश्चातच्या काळाचा उल्लेख करीत आहेत, तेव्हा ही त्यांची शेवटची आज्ञा होय, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. असे पान क्रमांक २७३ वर लिहिले आहे. असे असूनही शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या शिवथर प्रांतातील प्रचलित घळीमध्ये शनिवार,दि.५ फेब्रुवारी २०११ पासून शनिवार, दि. १२ फेबु्रवारी २०११ पर्यंत ग्रंथराज दासबोधाच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवथरप्रांतातील नवलवाडीयाचा कोंड या ठिकाणाला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे रामदासपठार असे महसूली गावाचे स्वरूप आले असून येथे असलेल्या सुंदरमठाच्या चौथ-याच्या सातबारा उता-यानुसार ही जागा ब्रिटीश काळापासून आजतागायत कायमधारा माफी झालेली आहे तसेच या पठाराच्या सातबारा उता-यामध्ये मठाचा माळ असा उल्लेख आहे तर जेथे स्वयंभू शिवथरघळ आहे त्या भागात भटाचा माळ असा उल्लेख दिसून येत आहे. या स्वयंभू शिवथरघळीचा शोध घेणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शुध्द दशमीपासून दत्तजयंती व दासबोध जन्मोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र शेंदूरमळई येथे केले होते. शुक्रवारी स्वयंभू शिवथरघळीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अरविंदनाथ महाराजांच्या भक्तगणांनी दासबोध पारायणाची यशस्वी सांगता केली.
यावेळी दररोज सुमारे ३०० हून अधिक दासभक्तांची उपस्थिती या स्वयंभू शिवथर घळीचे दर्शन घेण्यास लाभत असल्याचे दिसून आले. या दासभक्तांची दिशाभूल करण्यासाठी शिवथर प्रांतातील बहुशृत घळीच्या परिसरातील काही प्रतिष्ठित लोकांना कमिटीवर अचानक संधी देऊन स्वयंभू शिवथरघळीला आमच्या घळीचे नांव देऊ नका, अशी चिथावणी नामानिराळे राहू पाहणा-या बोलवित्या धन्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकही रामदासपठारकडे जाणा-या दासभक्तांना घळ मागे राहिली, असे सांगून गाडया सर्वशृत शिवथरघळीकडे नेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यामुळे काहीसा तणाव या भागात दिसून येत असून स्थानिकांना आपसात लढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न शंकर श्रीकृष्ण देव यांना साशंकतेसह आढळून आलेल्या घळीच्या संचालकांकडून केला जात आहे.
एकूणच, ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी पुणे येथील 'जनरेशन नेक्स्ट' या सिटी चॅनेलसोबत वार्तालापादरम्यान केले आहे.
शैलेश पालकर
नविन घळ शोधली गेली ते उत्तमच
नविन घळ शोधली गेली ते उत्तमच झाले

रामदास नावावर काळे फासण्यात "ब्रिगेडी" टाईप लोकान्चाच सहभाग असू शकतो असे मला वाटते.
माझ्याकरता, दोन्ही स्थाने पूज्य आहेत. वर बर्याच कुणाकुणाला शब्दच्छलाद्वारे म्हणायचे आहे की आधी देव मनात असावा, भाव असावा, बाकी ठिकाणी तो नाहीच वगैरे...... त्यान्चे मत त्यान्ना लखलाभ. माझ्याकरता मात्र ही दोनच काय, पण समर्थान्ची अजुन असलेली सर्वच स्थळे तिथे स्वतः जाऊन अनुभूती घ्यावी अशी आहेत. अन अर्थातच, तिथेच काय की कोणत्याही देवस्थानात्/पवित्र मानलेल्या स्थळी काय, अनुभुती घ्यायचि तर मनाचि विशिष्ट "व्यावहारीक" कवाडे बन्द करुन ठराविक "अध्यात्न्मिक जाणिवान्च्या" खिडक्याच उघड्या ठेवाव्या लागतात, ज्यान्ना हे जमते त्यान्ना तत्काळ अनुभुती प्राप्त होते, बाकिच्यान्ना तेथिल उघडीवाघडी गटारे, भटकी जनावरे, उघडेबम्ब बडवे इत्यादी सर्वान्मध्ये बाजार दिसुन येतो. असे माझे मत.!
समर्थाचिया सेवका वक्र
समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे..
-( दासनवमीला हॅपी बर्थडे असणारा जागोमोहन्प्यारे
)
चैतन्य दीक्षित | 7 February,
चैतन्य दीक्षित | 7 February, 2011 - 07:06 नवीन
कालच मित्राशी बोलत होतो...
आता समर्थांना भेटायचेच असेल, तर ते दासबोध, आत्माराम यातूनच.
आता ते गडावरही (सज्जनगडावर) नाहीत आणि कुठ्ल्या घळीत बिळीत तर मुळीच नाहीत.
श्या...
>>>>>
हजार वेळा अनुमोदन !
साधु संतांचा पदस्पर्ष झालेल्या जवळपास सगळ्याच जागा पैसे कमवायचे ठिकाण झाल्या आहेत
वरील लेखातही तसे काही करण्याचा प्रयत्न दिसुन आला .
असो .
सज्जनगडावर समर्थ दरवाज्या पाशी एक उर्दु / फार्सी शिलालेख आहे गडाविशयी त्यातले एक वाक्य ...
" तू विवंचना मुक्त होण्याचे स्थान आहेस पण पुन्हा तुच विवंचना युक्त आहेस "
ह्वे सगळे नक्की काय चलुए?
ह्वे सगळे नक्की काय चलुए? कुणी फ़ासला म्हणे हा काळा रंग?
अरविंदनाथ महाराजांनी उलगडला
अरविंदनाथ महाराजांनी उलगडला 'रामदासपठार'चा सर्व इतिहास

श्रीक्षेत्र रामदासपठार येथे श्रीसमर्थ रामदास स्वामी पुण्यतिथीनिमित्त तपोनिधी सद्गुरू श्रीअरविंदनाथ महाराज यांचे सांगतेचे प्रवचन आयोजित करण्यात आले असता त्यांनी प्रवचनामध्ये रामदासपठारचा ऐतिहासिक भूगोलच समर्थ परिवारासमोर मांडला. यावेळी अरविंदनाथ महाराजांनी शोधलेल्या दासबोधादी सर्वग्रंथलेखनाचे जन्मस्थान घळीचा उल्लेख 'आनंदवनभुवन' असा करण्यास मान्यता दर्शवून यासंदर्भात उद्भवू पाहणा-या वादांना पूर्णविराम दिला. या प्रवचनाची चर्चा सध्या संपूर्ण प्रांतामध्ये होत आहे. सद्गुरू स्वानंद सुखनिवासी गणेशनाथ महाराज संस्थानाचा समर्थ मठ असलेल्या ठिकाणी मोठया शामियान्यामध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत रविवार,दि. २० फेब्रुवारी २०११ पासून दासनवमी उत्सवानिमित्त सुरू झालेले श्रीसमर्थांना अभिषेक, कलशपूजन, ध्वजारोहण, वीणापूजन, व्यासपीठपूजन, त्यानंतर दासबोध पारायण, काकडा, प्रात:स्मरण, मनाचे श्लोक, किर्तन, प्रवचन, हरिजागर आणि सकाळची तसेच संध्याकाळची पंगत आदींसह अखंड श्रीदासबोधाचे वाचन अशा दैनंदिन कार्यक्रमांचा अखेरचा दिवस असल्याने सकाळी ८ वाजल्यापासूनच रामदासपठारकडे सद्गुरू अरविंदनाथ महाराजांचे प्रवचन ऐकण्यासाठी परिसरातील श्रध्दाळूंची आगेकूच सुरू झाली.याप्रसंगी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी, आतापर्यंत रामदासपठारचा मठाचा माळ आणि भटाचा माळ असे दोन सातबाराचे उतारे आढळून आले असता त्यांचा सुंदरमठ आणि दिवाकरभट या दोन समर्थकालीन संकल्पनांसोबत संदर्भ आढळून आला, असे सांगून या रामदासपठार गावाचा तत्कालीन उल्लेख नवलवाडीयाचा कोंड असा होत असे तर या कोंडाच्या परिसरामध्ये मंडपाचा माळ, जांभळीचा माळ, उंबराचा माळ, फणसीचा माळ, बोरीचा माळ, देवळाचा माळ, आडाचा माळ, गाराचा माळ आणि घाणीचा माळ असे जमिनींची नांवे असलेल्या सातबारा महसूली उता-यांची पूर्वापार नोंदी असलेली जंत्रीच हाती लागली असून या कागदपत्रांद्वारे रामदासपठारचा ऐतिहासिक भूगोल स्पष्ट होण्यास मदत होत आहे, असे स्पष्ट केले. या परिसरात घाणीचा माळ येथे तेलाच्या घाणीचे क्षेत्र असून येथे अन्य भागाच्या तुलनेत माती असूनही गवत उगवण्याचे प्रमाण तुरळक असल्याचे दिसून येत आहे. आडाचा माळ या जमिनीमध्ये आड म्हणजेच विहिर दिसून आली आहे तर गाराच्या माळावरील हवा अन्यठिकाणच्या तुलनेत अतिशय गारवा असलेली आहे. मठाच्या माळालगतच मंडपाचा माळ नावाची जमीन दिसून आल्याने या ठिकाणी पहिला पाच महिने कालावधीचा गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर भाविकांसाठी मंडपाची सुविधा येथे करण्यात आल्याचे दिसून येते तर घाणीचा माळ ही जमीन या लगतच असल्याने त्याकाळी छ.शिवरायांनी दिलेले अन्न शिजविण्याकामी लागणारे तेल या घाणीद्वारे तयार केले जात असावे, असा तर्कसंगत आधार असल्याचे यावेळी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी सांगितले.यावेळी यासंदर्भातील अभ्यासक पत्रकार शैलेश पालकर, माजी रायगड जिल्हा परिषद अध्यक्षा अपेक्षा कारेकर, अमोल कारेकर, माझेरीचे सरपंच अनिल मालुसरे आणि वैशाली जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार पालकर यांनी, सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी शोधलेली दासबोधादी सर्वग्रंथलेखनाचे जन्मस्थान घळ हेच समर्थ रामदास स्वामी यांचे दहा संवत्सरापर्यंत सलग वास्तव्याचे ठिकाण होते हे निर्विवाद सत्य असल्याचे सांगून स्वत: समर्थांनी या घळीचा उल्लेख कोणत्याही गावाच्या नावाने केला नसल्याकडे लक्ष वेधले. यासाठी पालकर यांनी 'सुंदर पाहोन वास केला। दास संन्निध ठेविला। अवघा प्रांतचि पावन केला। कृपाळूपणे॥' याखेरिज 'समर्थ सुंदरमठी गणपती केला।दोन्ही पुरूषे सिंदूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद मासपर्यंत॥' या समर्थकृत लेखनामध्ये प्रांत अशी शब्दरचना केली आहे आणि प्रांताचा नामोल्लेख टाळला आहे तर घळीचा उल्लेख करण्यासाठी 'आनंदवनभुवन' हे ५९ कडव्याचे दीर्घ काव्य लिहिले आहे, हे लक्षात घेऊन या घळीला 'आनंदवनभुवन' असे नांव अजरामर करावे, असे आवाहन केले. केवळ दिवाकरभटांच्या पत्रात हा उल्लेख 'श्रीकडील हरेकविशी बोभाट होऊ नये यासाठी समर्थ दहा संवत्सरापर्यंत कोठे न जाता ... येकांतस्थळी शिवरथरचे घळी जाऊन बसले.. असा संदर्भ आहे. यानंतर अनेकांनी असाच उल्लेख केला असला तरी समर्थांनी मात्र, आनंदवनभुवनी असा उल्लेख केला आहे. 'शिवरथरचे घळी' या उल्लेखाशी साधर्म्य असलेल्या गावातच ही घळ पाहिल्याचे मत ज्यांनी ज्यांनी मांडले; त्या शंकर श्रीकृष्ण देवांनाही तशी ठाम खात्री देता नव्हती जी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी शोधलेल्या घळीबाबत ठामपणे व्यक्त करता येते, असे सांगून समर्थांनी जो उल्लेख टाळला तो या घळीसंदर्भात आपणही टाळून वाद उद्भवू देऊ नये, असे सांगितले. यावेळी सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी या घळीला 'आनंदवनभुवन' म्हणण्यास मान्यता दिल्याने सर्व समर्थप्रेमींनी 'जय जय रघुवीर समर्थ' चा जयघोष करून आनंद व्यक्त केला.
कोण सारखे म्हणतंय? कि पैसे
कोण सारखे म्हणतंय? कि पैसे कमविण्याचे ठिकाण झाले आहे? कोणी कमाविले पैसे? आणि कोणाला ते हवे आहेत? उगीचच स्वताच्या डोक्यातील एक लालसा इतरांच्या डोक्यावर थापणे बरे नाही! इथे वेळ, पैसा, श्रम, बुद्धी यांचे योगदान देवून जे काही आम्ही करतो आहोत ते अश्यारीतीने का बदनाम करता? जी शिवथर घळ नव्हतीच तिचे ऐश्वर्य पाहून या मग कळेल कोणी पैसे कमाविले ते! आणि मग जे समर्थांचे आनंदवनभुवन आहे तेथे या आणि मग विचार करा तेथे तुम्ही ज्या पैश्यांचा उल्लेख करता त्यांची गरज आहे काय? तुम्ही आम्हाला संताप आणू शकत नाही मात्र कीव करायला नक्कीच लावता आहात!
शिवथरघळ संशोधनाबाबत
शिवथरघळ संशोधनाबाबत विद्वानपरिषद हवी- सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे आवाहन
समर्थ रामदासस्वामी यांनी सर्वग्रंथ लेखन केलेल्या वरंध कुंभारकोंड येथील आनंदवनभुवन घळीचे संशोधन करणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्याकडून दिशाभूल होत असल्याचे काहींनी शिवथरघळ येथे पत्रकार परिषद घेऊन आरोप केल्याच्या बातम्या शुक्रवारी दि.११ मार्च २०११ रोजी काही दैनिकांमध्ये प्रसिध्द झाल्या आहेत. याबाबत प्रस्तुत प्रतिनिधीने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्यासोबत दूरध्वनीवरून संपर्क साधला असता शिवथरघळ विश्रामगृहाच्या उद्धाटनाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक राजकारणी आणि ठेकेदारी व्यवसायातील लोकांनी घेतलेली 'ती'पत्रकार परिषद जरी अरविंदनाथ महाराज यांच्या संशोधन कार्यावर शिंतोडे उडविणारी असली तरी त्यांनी ज्या विद्वानांचा उल्लेख केला आहे; त्यांना सोबत घेऊन संशोधनाबाबत विद्वान परिषद घ्यावी, असे आवाहन केले आहे.
समर्थ रामदास स्वामींनाही त्यांनी 'वेद तो मंद जाणावा। सिध्द आनंदवनभुवनी। अतुळ महिमा तेथे।आनंदवनभुवनी॥' असे लिहिल्यानंतर समर्थांच्या कारभा-यांच्या त्रासामुळे समर्थांना गागाभट्ट यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे विद्वान परिषदेला सामोरे जावे लागले होते. या विद्वान परिषदेमध्ये समर्थांनी एका मोळी विकणा-या माणसाकडून वेद म्हणवून घेतले आणि तो मोळी विकणारा तत्पूर्वीच्या जन्मातील संत ज्ञानेश्वर माऊलींनी वेद वदवून घेतलेला रेडा आणि तत्पूर्वीच्या जन्मात शापित गंधर्व होता, हे सप्रमाण दाखवून देत त्यांच्या विधानाला पुष्टी दिली, असे सांगून याच धर्तीवर ज्यांनी पत्रकार परिषदेत ज्या विद्वानांचा नामोल्लेख केला आहे; त्यांनाच त्या परिषदेत उपस्थित केले असता त्या आरोपांना वेगळे महत्व आले असते. आरोपकर्त्यांनी त्यांच्या शिवथरघळीचे पुरेसे समर्थन केले नसून केवळ अरविंदनाथ महाराजांविरूध्द तोंडसुख घेतले आहे, असे सद्गुरू अरविंदनाथ महाराजांचे म्हणणे आहे.
या बातमीमागे शिवथरघळ येथील विश्रामगृहाच्या उद्धाटनाच्या पार्श्वभूमीचा मुहूर्त जरी असला तरी ज्या दिवशी आनंदवनभुवनाच्या शोधाची बातमी प्रसिध्द झाली त्या दिवशी ११११ दिनांक होती तर आरोपकर्त्यांची बातमीदेखील ११३११ रोजी प्रसिध्द झाली आहे. यावरून 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥' आरोपकर्त्यांनीदेखील या समर्थरचित 'आनंदवनभुवनी' काव्यातील अनुभव आम्हास दिला आहे, असे गूढ विधान सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केले असून समर्थांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर देण्याइतके गिरिधरस्वामी नक्कीच मोठे होते, असे आरोपकर्त्यांना म्हणावयाचे असेल तसेच दिवाकर भटाने लिहिलेल्या पत्रातील उल्लेखात 'शिवरथर' असे लिहिल्याचा संदर्भ देणारे आरोपकर्ते समर्थांनी मात्र 'प्रांत'असा उल्लेख का केला, याचे उत्तर देत का नाहीत, असा प्रश्न सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केला आहे.
राजकारणी आणि ठेकेदारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपकर्त्यांचा समर्थ वाङमयाचा उत्तरे देण्याएवढा अभ्यास नसल्याने त्यांनी विद्वान परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घ्यावा, आम्हीदेखील सर्व समर्थभक्तांना निशंकपणे आनंदवनभुवनाचे दर्शन व्हावे यासाठी विद्वानांना निमंत्रित करण्याचे प्रयत्न करीत आहोत, असे ठामपणे सांगितले आहे.
समर्थ रामदास स्वामी यांनी
समर्थ रामदास स्वामी यांनी सर्वग्रन्थ लेखन केले ते ठिकाण पहा
http://www.youtube.com/watch?v=rl_aH-XPLXs
Aanand Van Bhuvan where Samarth Ramdas Swami Wrote all written by him.
http://realshivtharghal.blogspot.com/
खरे तर या धाग्यावर काही
खरे तर या धाग्यावर काही बोलणार नव्हतो पण आपण मला
shailesh vasant... | 1 March, 2011 - 10:37
कोण सारखे म्हणतंय? कि पैसे कमविण्याचे ठिकाण झाले आहे? कोणी कमाविले पैसे? आणि कोणाला ते हवे आहेत? उगीचच स्वताच्या डोक्यातील एक लालसा इतरांच्या डोक्यावर थापणे बरे नाही! इथे वेळ, पैसा, श्रम, बुद्धी यांचे योगदान देवून जे काही आम्ही करतो आहोत ते अश्यारीतीने का बदनाम करता? जी शिवथर घळ नव्हतीच तिचे ऐश्वर्य पाहून या मग कळेल कोणी पैसे कमाविले ते! आणि मग जे समर्थांचे आनंदवनभुवन आहे तेथे या आणि मग विचार करा तेथे तुम्ही ज्या पैश्यांचा उल्लेख करता त्यांची गरज आहे काय? तुम्ही आम्हाला संताप आणू शकत नाही मात्र कीव करायला नक्कीच लावता आहात!
हा वैयक्तीक मेल पाठवला आहे म्हणुन ......
--- चला , तुम्ही म्हणता तीच खरी शिवथरघळ हे मान्य करुया ....
बाकी समर्थांचा वावर असलेल्या जागा ...११ मारुती , चाफळ , सज्जनगड आणि खोटी शिवथरघळ हे पैसे कमावण्याचे ठिकाण झाल्या आहेत हे आपल्याला ही मान्य आहेच
.
.आणि म्हणुनच किमान एक तरी जागा ह्या सार्या प्रकारातुन दूर रहावी म्हणुन मी सर्वांन्ना विनंती करीत आहे की नवीन आणि खर्या शिवथरघळीस कोणतीही देणगी वर्गणी देवु नये ......... ( कोणी द्रव्य दान केल्यास नवीन संशोधकांन्नी निस्पृहपणे त्याचा त्याग करावा ...मठ मांडुन मठाधीपती होवुन बसु नये .)
नवीन आणि खर्या शिवथरघळीस
नवीन आणि खर्या शिवथरघळीस कोणतीही देणगी वर्गणी देवु नये
---- प्रसादपंत तुम्ही तर खर्या-खोट्या प्रचारातली हवाच काढली आहे :स्मित:. आता वादावर पडदा पडावा.
मला एक कळत नाही की २००९ साला
मला एक कळत नाही की २००९ साला पर्यंत कोणालाच कसे कळाले नाही खरी शिवथरघळ कोणती आहे ? श्रीधरस्वामी, शंकरराव देव, सेतुमाधवराव पगडी, इ. लोक मला नाही वाटत उगीच पैसे कमावण्यासाठी भलतीच जागा शिवथरघळ म्हणुन सांगतील.
हे जे कोणी अरविंदनाथ महाराज आहेत त्यांना सुद्धा अचानक २००९ मधे कसा काय शोध लागला ?
असो खरे खोटे अलाहिदा, पण समर्थांच्या जागेपेक्षा सुद्धा त्यांचे विचार महत्वाचे असुन त्यांचा प्रचार आणि प्रसार होणे जास्त आवश्यक आहे.
आणखी एक शंका, वर अनेक लेखांमधे "आनंदवनभुवनी" काव्याचा उल्लेख केला आहे.
मध्यंतरी कोणत्याशा एका कार्यक्रमात पं.ह्रूदयनाथ मंगेशकरांनी या काव्याबद्दल सांगितले होते.
रामदासस्वामी एकदा दिल्लीला गेले होते, त्यावेळेस तिकडच्या भागातील साधू, बैरागी, गोसावी यांचा एक मोठा जमाव लालकिल्ल्यावर आक्रमण करण्यास निघाला. कारण त्यांना मुघल सैन्य त्रास देत असे.
औरंगजेबास हे समजले तेव्हा तो पांढरे निशाण घेऊन शरण आला. कारण त्याला ठाऊक होते की आपण शरण आलो तरी हे लोक काही आपले राज्य हिसकाऊन घेऊ शकणार नाहीत.
पण या प्रसंगामुळे हिंदू साधू संन्याशांना होणारा उपद्रव कमी झाला. या प्रसंगाने प्रभावित होऊन समर्थांनी "आनंदवनभुवनी" हे काव्य लिहिले. जाणकारांनी आणखी प्रकाश टाकावा.
notify@maayboli.com | Add to
notify@maayboli.com | Add to Address book |This is spam
To: palkarsv@rediffmail.com
Subject: New guestbook entry at Maayboli
Date: Fri, 01 Apr 2011 00:57:04 IST
From:
notify@maayboli.com | Add to Address book |This is spam
To: palkarsv@rediffmail.com
Subject: New guestbook entry at Maayboli
Date: Fri, 01 Apr 2011 00:57:04 IST
शैलेश, आपल्या रा��®दास प�� ार या
लेखावर ��®ी एक ��®ुद्दा ��®ांडला
आहे. तो पहावा ही विनंती. आपण
ज्या तळ��®ळीने लिहिले आहे त्या
वरून तथ्य असेल असे वाटते, पण
आता लोकांच्या ��®नात
सर्वश्रुत शिवथरघळ पक्की
बसलेली असल्याने शंका येणे
साहजिक आहे.
सप्तकांडात्मक श्री दासायन
सप्तकांडात्मक श्री दासायन मध्ये अनंतदास रामदासी यांनी आनंदवनभुवनी कवितेवर प्रकाश टाकला आहे तो पृष्ठ क्रमांक २७१ ते २७३ पर्यंत वाचावा..ते म्हणतात पृष्ठ क्रमांक २७३ आनंदवनभुवनी हे प्रकरण किती तरी महत्वाचे आहे. पुढे घडणार्या गोष्टी यात आधीच सांगितल्या आहेत. म्हणून यास कोणी श्री समर्थकृत भविष्यपुराण म्हणतात. पुढे घडणार्या गोष्टी त्यांना (समर्थांना) जश्या स्मरल्या त्या त्यांनी आधीच लिहिल्या म्हणून या प्रकरणास समर्थस्मृती असे नाव कोणी देतात. आता या कवितेतील भविष्य पुराण नोस्त्राडेमास याच्या कवितांप्रमाणे आहे असे मी म्हटले . तर कथित बुद्धीवादी माझी चेष्टा करतील यात शंकाच नाही. पण तरीही काही अद्याप ना घडलेल्या गोष्टी ज्या आनंद वन भुवनी कवितेत आहेत आणि त्या सध्या घडत आहेत त्यांचा अर्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी लावीत आहे.
देव देव बहु देव। नाना देव परोपरी। दाटणी जाहाली मोठी। आनंदवनभुवनी।। २०।।
दिग्पती चालले सर्वे। नाना सेना परोपरी। वेष्टित चालले सकळे। आनंद वन भुवनी।।२१।।
यात शंकर श्रीकृष्ण देव यांना नाना म्हणतात यात माझा काय दोष? शिवथर घळ त्याना दिसली आणि त्या शिवथर घळीच्या संशोधनाचे समर्थक म्हणजेच `नाना सेना' परोपरीने आम्हाला वेष्टित चालली अथवा गुंडाळीत चालली आहे असा अर्थ लावला तर समर्थांनी भविष्यकथन केलेच नाही असे मी का म्हणू? या कवितेत समर्थ पुढे म्हणतात,
देव सर्वस्व भक्तांचा। देव भक्त दुजे नसे। संदेह तुटला मोठा। आनंदवनभुवनी।।४५।।
हे भविष्य आहे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधनांती सिद्ध केलेल्या आनंदवनभुवनाचे आणि ते सागितले आहे समर्थांनी. त्यामुळे समर्थ हे ज्या भक्ताचे सर्वस्व आहेत त्यामध्ये शंकर श्रीकृष्ण देव यांच्या समर्थकांनाहि समर्थ हेच देवस्थानी आहेत त्यामुळे हे देव भक्त समर्थ भक्तच आहेत त्यांना शंकर श्रीकृष्ण देव यांना शिवथर घळ समर्थक म्हणून दुजे नसे या समर्थांच्या आज्ञेविरोधात मी का जावे? त्यांचा सर्व ग्रंथ लेखनाची जागा शिवथर घळ की आनंदवनभुवन याबाबतचा संदेह तुटण्याचे ठिकाण आनंदवनभुवनी असेल असे समर्थांनी भविष्य सांगितले आहे. तर आम्ही त्या शंकर श्रीकृष्ण देव यांच्या शिवथर घळ समर्थाकांप्रती द्वेष का करावा?
कल्याण करी रामराया। अपराधी जन चुकतची गेले।
चुकतची गेले। हे जन हाती धरे दयाळा। असे समर्थांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे नव्या शिवथर घळ म्हणजेच आनंदवनभुवनिच्या संशोधनाप्रती जे अपराधी जन चुकतची गेले आहेत त्यांचाहि संदेह तुटण्याचे ठिकाण आनंदवनभुवनी असेल. आणि मग समर्थांनी पुढे केलेले भविष्य कथन खरे ठरावे अशी अपेक्षा आहे ते असे.....
देव भक्त एक झाले। मिळाले सर्व जीवही। संतोष पावले तेथे।आनंदवनभुवनी।।४६।।
स्मरले लिहिले आहे। बोलता चालता हरी। काये होईल ते पाहावे। आनंदवनभुवनी।।५७।।
शैलेश राव आपण आमच्या या
शैलेश राव आपण आमच्या या आवाहनाला
"किमान एक तरी जागा ह्या सार्या प्रकारातुन दूर रहावी म्हणुन मी सर्वांन्ना विनंती करीत आहे की नवीन आणि खर्या शिवथरघळीस कोणतीही देणगी वर्गणी देवु नये ......... ( कोणी द्रव्य दान केल्यास नवीन संशोधकांन्नी निस्पृहपणे त्याचा त्याग करावा ...मठ मांडुन मठाधीपती होवुन बसु नये .) "
समर्थन का देत नाहीये ?
आनंदवनभुवनी हे प्रकरण किती
आनंदवनभुवनी हे प्रकरण किती तरी महत्वाचे आहे.
महिमा तो वर्णवेना। विशेष बहुतांपरी। विद्यापीठ ते आहे। आनंदवनभुवनी।।५८।।
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधनांती सिद्ध केलेल्या आनंदवनभुवनाचे मठाधिपती स्वत: समर्थ रामदास स्वामी होते. म्हणून हे विद्यापीठ आणि समर्थ त्याचे कुलगुरु तर अन्य मठाधिपती हे त्या विद्यापीठाच्या कॉलेजचे मठांचे प्राचार्य होते. त्यामुळे आणि समर्थांनी या ठिकाणी मारुती रायांची स्थापना केली नाही कारण ते स्वत: दास रामाचा म्हणवीत असत. आणखी एक आनंदवनभुवन हे सदन होते हे `दास रामाचा वाट पाहे सदना' असा गणपतीच्या आरतीतील उल्लेख जसा सांगतो त्याच प्रमाणे गिरीधर स्वामींच्या समर्थ प्रताप ग्रंथामध्ये
समर्थे पार्वती केले एक गुप्त सदन। प्रसंगी ठेवावया देवार्चन।
सूर्य प्रकाश उदक सन्निध ऊर्ध्व गमन। मार्ग सोपान करून जावे। असा उल्लेख आहे. ज्या शिवथर घळीला सुंदरमठ नाही ती घळ असणे शक्यच नाही कारण
सुंदर मूर्ती सुंदर गुण। सुंदर कीर्ती सुंदर लक्षण। सुंदर माथी देवे आपण। वास केला।
हा सुंदर मठ कसा ओळखावा?
अंतरनिष्ठ अखंड ध्यानी। सन्निध रामवरदायिनी। विश्व माता त्रैलोक्यजननी। मुळ माया।। समर्थ रामदास पठार या सध्याच्या नावाने प्रसिध्द गावातील सुंदर मठ येथून अंतरनिष्ठ अखंड ध्यानी झाले की त्यांना समोरची रामवरदायिनी जी प्रतापगड पारसोंड येथे समर्थांनीच स्थापन केली ती सन्निध दिसत असे. आता आपण हि दोन्ही ठिकाणे google map अथवा wikimapia .org या संकेत स्थळावरून समोर समोर असल्याचे पाहू शकतो. कारण आपण समर्थांसारखे अंतरनिष्ठ अखंड ध्यानी नसल्याने satelite ची मदत घ्यावी लागते. आता मात्र आपण अभ्यासूनच येथे प्रकटावे शंका निरसन होईल.
...........................आणि म्हणुनच किमान एक तरी जागा ह्या सार्या प्रकारातुन दूर रहावी म्हणुन मी सर्वांन्ना विनंती करीत आहे की नवीन आणि खर्या शिवथरघळीस कोणतीही देणगी वर्गणी देवु नये ......... ( कोणी द्रव्य दान केल्यास नवीन संशोधकांन्नी निस्पृहपणे त्याचा त्याग करावा ...मठ मांडुन मठाधीपती होवुन बसु नये.
नवीन आणि खर्या शिवथरघळीस कोणतीही देणगी वर्गणी देवु नये
---- प्रसादपंत तुम्ही तर खर्या-खोट्या प्रचारातली हवाच काढली आहे. आता वादावर पडदा पडावा.
यांचे प्रकटणे अभ्यासून नसल्याने किंवा त्यांना अनुभवास आलेल्या सर्वच जागा द्रव्य दान स्वीकारणार्या असल्याने त्यांची अशी धारणा झाली आहे.
शैलेश राव आपण आमच्या या
शैलेश राव आपण आमच्या या आवाहनाला
"किमान एक तरी जागा ह्या सार्या प्रकारातुन दूर रहावी म्हणुन मी सर्वांन्ना विनंती करीत आहे की नवीन आणि खर्या शिवथरघळीस कोणतीही देणगी वर्गणी देवु नये ......... ( कोणी द्रव्य दान केल्यास नवीन संशोधकांन्नी निस्पृहपणे त्याचा त्याग करावा ...मठ मांडुन मठाधीपती होवुन बसु नये .) "
समर्थन का देत नाहीये ?
ज्या विषयाशी तुम्ही समर्थ नाही तेथे समर्थनाचे काय घेवून बसलात प्रसादपंत?
तुमची जी शिवथर घळ आहे तेथे सर्व सुविधा आहेतच. मग ती खोटी असली तरी तेथे समर्थभक्त राहून समर्थांची खरी सर्वग्रंथलेखनाची जागा पाहण्यास येतील मग आम्ही करीत असलेल्या संशोधनाच्या आनंदवनभुवनासाठी द्रव्य दानाची गरज काय? समर्थांच्या नावाने भक्तांकडून पैसे काढण्यापेक्षा आम्हाला समर्थांची `आमुची प्रतिज्ञा ऐशी। काहीही ना मागावे शिष्यासी। आपणा मागे जगदीशासी। भजत जावे।। ' हि समर्थांची शेवटची आज्ञा महत्वाची वाटते आहे.
तुम्हाला त्याचे काय तुम्ही कैवार कोणाचा घेतलाय? जय जय रघुवीर समर्थ
मला एक कळत नाही, साधु, गुरु
मला एक कळत नाही, साधु, गुरु याम्च्या पैशाविषयी लोक इतके का अॅलर्ट होत आहेत.. , सोने चांदी आम्हा मृत्तिकेसमान असे शिवाजी माहाराजांच्या दुसर्या गुरुनी ( संत तुकाराम) यानी म्हटले आहे, मग कुठल्या साधु,न्बुवा, तात्या, पप्पु , श्री श्री यांच्याकडे अगणित संपत्ती असली तर बिघडले कुठे? भक्तांच्या द्रुष्टीने ती म्रूत्तिकाच नाही का?
( तुकारामाना दुसरे गुरु म्हटलेले आहे. पहिले गुरु दादोजी का रामदास यावर वाद घालू नये.
)
तुमची जी शिवथर घळ आहे >>> वा
तुमची जी शिवथर घळ आहे
>>>
वा वा ...चला वादाच्या भरात तुम्ही "शिवथरघळ .( जुनी अन खोटीही सही
) आमचे नावे करुन टाकलीत ...बहुत आनंद जाहला ...
चला ...चाफळ ...सज्जनगड पाठोपाठ ...शिवथरघळीतही "गोडबोल्यांचे" नाव लागले !!:फिदी:
वा वा ...चला वादाच्या भरात
वा वा ...चला वादाच्या भरात तुम्ही "शिवथरघळ .( जुनी अन खोटीही सही ) आमचे नावे करुन टाकलीत ...बहुत आनंद जाहला ...
चला ...चाफळ ...सज्जनगड पाठोपाठ ...शिवथरघळीतही "गोडबोल्यांचे" नाव लागले.........
..................................................
समर्थ रामदास स्वामींनाही त्यांनी 'वेद तो मंद जाणावा। सिध्द आनंदवनभुवनी। अतुळ महिमा तेथे।आनंदवनभुवनी॥' असे लिहिल्यानंतर समर्थांच्या कारभा-यांच्या त्रासामुळे समर्थांना गागाभट्ट यांच्या उपस्थितीत पंढरपूर येथे विद्वान परिषदेला सामोरे जावे लागले होते.
तुकारामाना दुसरे गुरु
तुकारामाना दुसरे गुरु म्हटलेले आहे. पहिले गुरु दादोजी का रामदास यावर वाद घालू नये.
समर्थांचे सर्व ग्रंथ लेखनाचे स्थान याविषयी आभ्यास करताना या वादावरही सप्रमाण लिहू शकू मात्र विषयांतर करू इच्छित नाही
`आमुची प्रतिज्ञा ऐशी। काहीही ना मागावे शिष्यासी। आपणा मागे जगदीशासी। भजत जावे।। ' हि समर्थांची शेवटची आज्ञा महत्वाची वाटते आहे.
स्मित हास्य मुद्रिका जोडुन व्यन्ग उपहास करता आला असता.
समर्थांचे सर्व ग्रंथ लेखनाचे
समर्थांचे सर्व ग्रंथ लेखनाचे स्थान याविषयी आभ्यास करताना या वादावरही सप्रमाण लिहू शकू मात्र विषयांतर करू इच्छित नाही
>>> हुश्श ! वाचलो बाबा
अवांतर : बाकी एक गोष्ट माझ्या निदर्शनास आलीये -- स्वतःला भक्त सांप्रदायिक "म्हणवुन " घेणारी ही माणसं जरा आडगी आणि हेकटच असतात ..... मागे एका धाग्यावर अशीच चर्चा चालु होती तिथला एक "भक्त" असाच तावातावाने ....सध्या सज्जनगडावर समाधी मंदीरात एसी लावलाय , राम्मुर्ती समोर टेव्ही आणि व्हीडीयो प्लेयर ठेवलाय ,निळ्या गणवेशातला सेक्युरीटी ठेवला, जुनं आन्नगृह पाडुन नवीन अल्ट्रामॉडर्न बांधायचा घाट घातलाय , अन्नदाना साठी कुपनं द्यायला सुरवात केलीये ...याचं समर्थन करीत होता ...
आता काय कसं पटवायचच अशांन्ना ?
)!
बुध्दी दे रघुनायका ! ( ह्यांन्ना तर देच पण आधी मला दे
मी पत्रकार आहे. हे लिहिल्यावर
मी पत्रकार आहे.
हे लिहिल्यावर आणखी दुषित पूर्वग्रह ओकले जातील.
पण तरीही सामर्थ्य आहे चळवळीचे जो जे करील तयांचे.
जय जय रघुवीर समर्थ
>>> हुश्श ! वाचलो बाबा
मी समर्थ भक्त नाही. माझे कोणी मानवी गुरु नाहीत. ग्रंथ हे गुरु स्थानी मी मानतो. समर्थ आणि त्यांचे साहित्य विचार मी इत्यंभूत आत्मसात केले आहेत. ईश्वरी शक्तीवर माझा विश्वास आहे. मी रघुकुलात जन्मलेला आणि वशिष्ट आमच्या सूर्य कुलाचे गुरु मानले जातात. जानव घालतो. मी पुणे येथे जन्मलेला नाही त्यामुळे फिदीफिदी अथवा अ ओ आता काय करायचे अश्या स्मायलीन्चा चिन्हांकित वापर करून कोणाला कमी लेखण्याची इच्छा या वैचारिक व्यासपीठावरून करणारे जे कोणी `जरा आडगी आणि हेकटच' असतील त्यांनी स्वत:चे रूप पाहून इतरांचे वर्णन करू नये.
एरव्ही शिवरायांनी आणि समर्थांनी कोकणाचीच निवड त्यांच्या सर्वोच्च कार्यासाठी का केली असावी? हे आपणा सारख्या विद्वानांना अद्याप समजून आले नसेल असे वाटत नाही. कदाचित ते आपण कर्तुत्व मानत असाल.
आता सज्जन गडाच्या समाधी मंदिराबाबत लिहितो...
कष्टलो कष्टलो देवा। पुरे संसार जाहाला। देहे त्यागासी येणे हो। आनंदवनभुवना।।५।। समर्थांना सज्जनगडावर देह ठेवायचाच नव्हता. हे आम्ही सांगू शकतो. पुरावे तर्क संगत आहेत. पण त्याबाबत लिहितांना फिदीफिदी अथवा अ ओ आता काय करायचे अश्या स्मायलीन्चा चिन्हांकित वापर करून कोणाला कमी लेखण्याची इच्छा या वैचारिक व्यासपीठावरून करणारे जे कोणी ` आडगी आणि हेकट' असतील त्या ठिकाणी आम्ही माघार घेत आहोत.
समर्थ शिवथर प्रांत का सोडून गेले? उद्धव भट आणि दिवाकर भट यांनी शिव-समर्थांच्या उपस्थितीत सुंदरमठ आणि आनंदवनभुवन यांचा उत्तराधिकारी कोण याबाबत वाद घातला. या समर्थांच्या कारभार्यांच्याच खोड्या आहेत. आम्हीही आपल्या खोड्या लक्षात घेवून या विषयावरील अधिक लेखन थांबवितो आहोत. हा तुमच्या विकृतीचा विजय नसून हि विकृती संपविण्यासाठी पुन्हा आक्रमण करण्यासाठी आम्ही एक पाउल माघार घेतली आहे. सारे समर्थ विश्व जेव्हा आनंद वन भुवन हेच सर्व ग्रंथ लेखनाचे जन्म स्थान होते असे मान्य करेल तेव्हा तुम्ही `जरा आडगी आणि हेकटच' असल्याचा पश्चाताप नव्हे तर अभिमान बाळगाल.
एरव्ही शिवरायांनी आणि समर्थांनी कोकणाचीच निवड त्यांच्या सर्वोच्च कार्यासाठी का केली असावी? शिवराय राजगडावरून रायगडवर राजधानी करण्यास आणि चाफळहून आनंदवनभुवनी सर्व ग्रंथ लेखनास समर्थ का आले? हे आपणा सारख्या विद्वानांना अद्याप समजून आले नसेल असे वाटत नाही. कदाचित आपण अभिमान बाळगत असाल.
कष्टलो कष्टलो देवा। पुरे
कष्टलो कष्टलो देवा। पुरे संसार जाहाला। देहे त्यागासी येणे हो। आनंदवनभुवना।।५।।
समर्थांना सज्जनगडावर देह ठेवायचाच नव्हता. हे आम्ही सांगू शकतो. पुरावे तर्क संगत आहेत.
>>>

मग काय आता ती ही समाधी खोटी ठरवणार की काय ??
आणि मग खरी समाधी कोकणातल्या कुठल्या बीचवर आहे ?
आम्हीही आपल्या खोड्या लक्षात घेवून या विषयावरील अधिक लेखन थांबवितो आहोत. हा तुमच्या विकृतीचा विजय नसून हि विकृती संपविण्यासाठी पुन्हा आक्रमण करण्यासाठी आम्ही एक पाउल माघार घेतली आहे
>>> पुन्हा आक्रमण !
डोंबलाचं आक्रमण 
अहो पत्रकार महोदय , उगाच तोंडाचा फोका कशाला ? मागे एका साहित्य सम्मेलनात समर्थांवर अत्यंत नीच पातळीवर जावुन आरोप करण्यात आले , आजही एक " सम्यक आणि आदर्श " संघटना ते काम चालत आहेच .......स.भ सुनील चिंचोळकरां आणि काही मोजक्या स.भ. व्यतिरिक्त कोणी ही त्या विरुध्द आक्रमण केलेले दिसत नाही .
**** मधे दम असेल तर हे आक्रमण बिक्रमण जे काही बोलत आहात ते सातार्यात येवुन बोलुन दाखवा
फिदीफिदी हसणार्या स्मायल्या
फिदीफिदी हसणार्या स्मायल्या समर्थांच्या बीबीवर नसायला हव्यात.
अगदी बरोबर आहे. समर्थानीच म्हणून ठेवले आहे 'टवाळा आवडे विनोद'
छत्रपतींच्याच दोन जन्मतारखा निघाल्या. समर्थांच्या दोन घळ्या निघाल्या तर बिघडलं कुठं ?
(दासनवमीला हॅपी बर्थडे असणारा,
जामोप्या)
रामदासपठारवरच समर्थांचा
रामदासपठारवरच समर्थांचा 'सुंदरमठ'! '...संन्निध रामवरदायिनी।'
समर्थ रामदासस्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती? याबाबत आता एकेक ऐतिहासिक पुरावे उघड होऊ लागले असून याचाच एक महत्वाचा भाग असलेल्या 'सुंदरमठ' परिसराचे पुरावे आता लवकरच समर्थभक्तांना महाड तालुक्यातील रामदासपठार येथील स्वानंद सुखनिवासी सद्गुरू तपोनिधी श्रीगणेशनाथ महाराज संप्रदायाच्या समर्थमठामध्ये पाहण्यास मिळणार आहेत, अशी माहिती याबाबत संशोधन करणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी दिली आहे.
सदगुरू अरविंदनाथ महाराज यांच्या संशोधनाबाबत गेल्या तीन महिन्यांपासून केवळ टीका करण्यात स्वारस्य मानणा-यांनी या संशोधनाची खातरजमा करण्याऐवजी आपल्या स्थळाचे महत्व कमी होईल या भितीपोटी विविध मार्ग अवलंबिले आहेत. अलिकडेच, या रामदासपठार गावाचा तत्कालीन उल्लेख नवलवाडीयाचा कोंड असा होत असे तर या कोंडाच्या परिसरामध्ये उंबराचा माळ, जांभळीचा माळ, फणसीचा माळ, बोरीचा माळ ही सुंदरमठाच्या फलाहाराची व्यवस्था असलेली जमीन तसेच देवळाचा माळ, आडाचा माळ, गाराचा माळ, मंडपाचा माळ, घाणीचा माळ, मठाचा माळ व भटाचा माळ असे जमिनींची नांवे असलेल्या सातबारा महसूली उता-यांची पूर्वापार नोंदी असलेली जंत्रीच हाती लागली आहे. या कागदपत्रांद्वारे रामदासपठारचा तत्कालीन ऐतिहासिक भूगोल स्पष्ट होण्यास मदत होत आहे. या परिसरात आडाचा माळ या जमिनीमध्ये आड म्हणजेच विहिर दिसून आली आहे तर गाराच्या माळावरील हवा अन्यठिकाणच्या तुलनेत अतिशय गारवा असलेली आहे. मठाच्या माळालगतच मंडपाचा माळ नावाची जमीन दिसून आल्याने या ठिकाणी पहिला पाच महिने कालावधीचा गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर भाविकांसाठी मंडपाची सुविधा येथे करण्यात आल्याचे दिसून येते तर घाणीचा माळ ही जमीन या लगतच असल्याने त्याकाळी छ.शिवरायांनी दिलेले अन्न शिजविण्याकामी लागणारे तेल या घाणीद्वारे तयार केले जात असावे. घाणीचा माळ येथे तेलाच्या घाणीचे क्षेत्र असून येथे अन्य भागाच्या तुलनेत माती असूनही ती नापीक झाल्याने गवत उगवण्याचे प्रमाण तुरळक असल्याचे दिसून येत आहे, असा तर्कसंगत आधार दिसून येत आहे. रामदासपठारच्या मठाचा माळ व भटाचा माळ असे जमिनींचे दोन सातबाराचे उतारे आढळून आले असता त्यांचा सुंदरमठ आणि दिवाकरभट या दोन समर्थकालीन संकल्पनांसोबत
'कळहो होऊनि तुटला। आनंद आनंदी मिसळला।
नुसता भक्तचि उरला। देव कोठे॥९॥
सीमा जाली हद जाली। प्रचित प्रचीतीस आली।
कसी आनंदवेळी वाहिली। सुंदरमठी॥१०॥
दोनी मठ येकचि जाले। दोनी मठ येकचि चाले।
मननसीळ निवाले। येणे शब्दे॥१०॥'असा संदर्भ आढळून आला.
'समर्थे चाफळ अधिष्ठानी श्रीराम संस्थापिले।
मग सुंदरमठी समर्थांचे रहवे झाले।
नाना गिरीकंदरी दास विहरे निर्मियली।
नाना मठ केले लोकोध्दारे॥' या समर्थप्रतापातील आठव्या अध्यायात सुंदरमठाचा असलेला उल्लेख पूर्वीच्या नवलवाडीयाचा कोंड म्हणजेच आताच्या रामदासपठार येथील समर्थमठाच्या चौथ-याचा आहे. याखेरिज गिरिधरस्वामीलिखित समर्थप्रताप ग्रंथामधील
'समर्थ सुंदरमठी गणपती केला।
दोन्ही पुरूषे सिंदूरवर्ण अर्चिला।
सकळ प्रांतासि मोहोछव दाविला।
भाद्रपद मासपर्यंत॥२॥' या लेखनामध्ये सुंदरमठ असा उल्लेख दिसून येतो. या ठिकाणी झालेल्या महाराष्ट्रातील पहिल्या गणेशोत्सवाबाबत
'शिवराजासी अकरा मुष्टी भिक्षा मागो धाडिली।
शिवराज म्हणे माझी परीक्षा समर्थे मांडीली।
अकरा अकरी खंडया कोठी पाठविली।
हनुमानस्वामी मुष्टी लक्षूनिया॥३॥
अकरा खंडयांची किंचित येक मुष्टी।
अकराअकरी धाडिली कोठी।
समर्थ आज्ञा राजा मानी मोठी।
शिवराज तेणें बळावला॥४॥' असा उल्लेख येत दिसून येत आहे.
'सुंदरमूर्ती सुंदरगुण। सुंदर किर्ती सुंदर लक्षण।
सुंदरमठी देवे आपण। वास केला॥१२॥
गिरीकंदरी सुंदरवने। सुंदर वाहाती जीवने।
त्यामध्ये सुंदर भुवने।रघुनाथाची॥१३॥
सुंदर पाहोन वास केला। दास संन्निध ठेविला।
अवघा प्रांतचि पावन केला। कृपाळूपणे॥१४॥' या श्रीदासायनातील उल्लेखात पुढे
'अंतरनिष्ठ अखंड ध्यानी। सन्निध रामवरदायिनी।
विश्वमाता त्रयलोक्य जननी। मूळमाया॥१४॥' या उल्लेखानुसार समर्थांना ध्यानस्थ बसल्यावर सातारा जिल्ह्यातील पारसोंड येथील श्रीरामवरदायिनी सन्निध दिसत असावी असा अंदाज बांधून 'गुगल अर्थ'द्वारे तसा शोध घेतला असता ही दोन्ही ठिकाणे सरळ रेषेने जोडता येत असल्याचे दिसून आले आहे.मात्र, ज्या ठिकाणी हा सुंदरमठ आहे; त्या प्रांताचा उल्लेख असूनही नामोल्लेख नाही. त्यामुळे काहींनी सुंदरमठ आणि घळ ही दोन्ही ठिकाणे एकच असल्याचे नमूद करीत तीच समर्थांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा असल्याचे अंदाज बांधून तसे एकत्र श्रीक्षेत्र साकारले आहे.
प्रत्यक्षात रामदासपठार येथील सुंदरमठ आणि आनंदवनभुवन हे विद्यापीठ असून स्वत: समर्थ हेच त्याचे गुरू होते आणि अन्य मठांसाठी मठाधिपती अशी योजना असल्याचे पुरावे समर्थ वाङमयामध्ये आढळून आले आहेत. त्यामध्ये कल्याणस्वामींचा मठ डोमगांवखेरिज अन्य कोणताही नसल्याने सुंदरमठाचे मठाधिपती कल्याण स्वामी असल्याचे तर्क मांडणारे चुकीचे ठरतात. कोणत्या श्रीक्षेत्राचा वाहतुकीचा व्यवसाय बंद पडेल अथवा कोणते क्षेत्र संशोधनांती सिध्द झाले की कोणत्या ठिकाणची गर्दी कमी होईल, या भितीपोटी संशोधनाबाबत सुरू असलेला अपप्रचार थांबण्यासाठी रामदासपठार येथील समर्थमठामध्ये लवकरच पुरावे सर्वांसाठी खुले करण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले आहे.
सप्तकान्डात्मक श्री दासायन
सप्तकान्डात्मक श्री दासायन पृष्ठ क्रमांक २०९ सुंदर मूर्ती सुंदर गुण। सुंदर कीर्ती सुंदर लक्षण। सुंदर माथी देवे आपण। वास केला।.................अंतरनिष्ठ अखंड ध्यानी। सन्निध रामवरदायिनी। विश्व माता त्रैलोक्यजननी। मुळ माया।। समर्थ रामदास पठार या सध्याच्या नावाने प्रसिध्द गावातील सुंदर मठ येथून अंतरनिष्ठ अखंड ध्यानी झाले की त्यांना समोरची रामवरदायिनी जी प्रतापगड पारसोंड येथे समर्थांनीच स्थापन केली ती सन्निध दिसत असे. आता आपण हि दोन्ही ठिकाणे google map अथवा wikimapia .org या संकेत स्थळावरून समोर समोर असल्याचे पाहू शकतो. कारण आपण समर्थांसारखे अंतरनिष्ठ अखंड ध्यानी नसल्याने satelite ची मदत घ्यावी लागते. आता मात्र आपण अभ्यासूनच येथे प्रकटावे शंका निरसन होईल.
या पानावर २० ओळीमध्ये असेही लिहिले आहे... हे वर्णन शिवथरचे की चाफळचे? का दोन्ही ठिकाणे त्यात अभिप्रेत आहेत? अथवा आपणास माहित नसलेल्या तिसऱ्या एखाद्या सुंदर मठाचे वर्णन यात आहे? आणि पुढे २५ व्या ओळीत समर्थ भक्तांनी या दोन्ही प्रकरणी उलगडा करण्याचा प्रयत्न करावा म्हणून येथे ती दिली आहेत. असेही म्हटले आहे. ३३ व्या ओळीत यापैकी कोणत्या स्थानास समर्थांनी राम वरदायिनी म्हटले आहे ते समजत नाही. पारचे राम वरदायिनी चे स्थान शिवथर ला सन्निध नाही. असे म्हटले आहे. ३८ व्या ओळीत कदाचित आत ` रघुनाथाचे सुंदर भुवन' असेल अशी आशा उत्पन्न झाली. पृष्ठ क्रमांक २१० वर १ ली ओंळ वाचा ... `त्याचाही (सुंदर भुवन) तपास समर्थ कृपेने लागेल. पण हि ऐकीव माहिती समक्ष पाहिल्याशिवाय तिच्या विषयी निश्चित विधान आज कसे करता येईल? तोही योग समर्थांच्या इच्छेने यायचा असेल तेव्हा येईल.' असे लिहिले आहे.
आता त्यानंतर जे काही लिहिले गेले ते खरे किंवा सुंदर मठाला राम वरदायिनी सन्निध दिसलेली जागा सुंदर मठ असल्याचे छायाचित्रात दाखविण्याचा प्रयत्न केला आहे.
सुंदर मठ आणि रामदास पठारचा इतिहास उलगडला हे मुद्दे वाचा आणि बोला मुद्दे सुटले की **** मधे दम असेल तर हे आक्रमण बिक्रमण जे काही बोलत आहात ते सातार्यात येवुन बोलुन दाखवा असा संयम ढळंणारच!
समर्थानीच म्हणून ठेवले आहे 'टवाळा आवडे विनोद' असा प्रकार करताना किंवा अहो पत्रकार महोदय , उगाच तोंडाचा फोका कशाला ? मागे एका साहित्य सम्मेलनात समर्थांवर अत्यंत नीच पातळीवर जावुन आरोप करण्यात आले , आजही एक " सम्यक आणि आदर्श " संघटना ते काम चालत आहेच .......स.भ सुनील चिंचोळकरां आणि काही मोजक्या स.भ. व्यतिरिक्त कोणी ही त्या विरुध्द आक्रमण केलेले दिसत नाही.
असे आपण लिहिता तेव्हा आपल्या **** मधे दम असेल असे वाटत नाही! असे काही जन समर्थांना न समजताच **** मधे दम असेल अशी भाषा करतात त्यामुळेच समर्थांवर अत्यंत नीच पातळीवर जावुन आरोप करण्यात आले असावेत. जय जय रघुवीर समर्थ!
समर्थ रामदास स्वामींनी
समर्थ रामदास स्वामींनी जन्मदात्रीचे वर्णन,
असे म्हणजेच देवीने शिवरायांना दर्शन देऊन सांगितले की, सध्या मी तुझ्या सहाय्यासाठी तुळजापूर सोडून जवळ आले आहे असे समज, पूर्वी जसा मूर्ख कंसाने तसा (सध्या या पाप्याने) माझा अवमान केला आहे. यावरूनच तुळजाभवानी मातेच्या कृपेनेच अफजलखानाचा वध करून महाराजांची किर्ती आसमंतात उजळून निघाली. चारी यवनी शाह्यांना धास्ती बसली.पुराणसंदर्भांचा उल्लेख सांगताना पुजारी शंकर बाबू शिंदे यांनी माहिती दिली की, भगवान शंकर हे माता पार्वतीसोबत असतानाही ध्यानस्थ बसत असल्याने माता पार्वतीने महादेवा, आपणापेक्षा श्रेष्ठ कोण, ज्यांचा जप आपण करता, असा प्रश्न केला. त्यावर महादेवांनी आपण प्रभू रामचंद्रांची भक्ती करीत असल्याचे सांगितले. सीतामाईचे रावणाने हरण केल्याने एकवचनी रामचंद्रांनी डोळे बंद करून अन्य कोणतीही स्त्री नजरेत येऊ नये, यासाठी डोळे बंद करून आत्माराम झाले आहेत. ते याद्वारे आपले मार्गाक्रमण करीत आहेत. हे सांगितल्यानंतर पार्वतीमातेने रामचंद्रांची परिक्षा घेण्याचे ठरवून तिने सीतामाईचे रूप धारण केले आणि रामचंद्रांनी मात्र तिच्याकडे दूर्लक्ष केले. यामुळे पार्वतीमातेला प्रकट व्हावे लागले. प्रभू रामचंद्रांनी पार्वतीमातेला ओळखून तिची पूजा केली आणि पार्वतीने रावणाचा संहार करून तु सीतेला परत मिळवशील असा वर दिला ते ठिकाण तुळजापूरला आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. पण ते खरे नाही कारण रामचंद्रांना वरदान दिले ते स्थान पार आहे, असे सांगितले. सोंडकर व शिंदे यांच्याकडे परंपरागत पूजेचा कार्यक्रम असतो. विजापूर, निझाम आणि सिद्दी या तीनही यवनी शाह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातील ही बाजारपेठ असल्याने येथे मोठी आर्थिक उलाढाल होत असे. त्याकाळी ७०० ते १००० घरांचे हे गांव आता केवळ शेकड्यावर घरे असल्याचेही पुजारी शंकर शिंदे सांगतात. देवस्थान जागृत आहे आणि चिपळूणचे तत्कालीन आमदार राजाराम शिंदे यांनीही दसपटी दादर येथे श्रीरामवरदायिनी मंदिराचे प्रतिमंदिर करण्याचे प्रयत्न यशस्वी केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. मंदिराच्या आवारात मानाई, बगाड, सिंह, हेमाडपंथी रचना, नागांचे शिल्प, भव्य दिपमाळा, मंदिरावर कळस, भक्त निवासमंदिर, केदारेश्वराचे मंदिर, देवीच्या सिंहासनास चांदीचा मुलामा आदी कामे करण्यात आली आहेत.पार येथे श्रीरामवरदायिनी देवीच्या यात्रेचा सोहळा चैत्र आमावस्येला सुरू होऊन वैशाख षष्ठीला संपतो, असेही त्यांनी सांगितले.
'तुळजापूर ठाकेना। चालली पश्चिमेकडे।
पारघाटी जगन्माता। सद्य येऊनि राहिली॥' असे केलेले आढळते. तेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून रस्त्याने २० कि.मी. आणि प्रतापगडापासून ३ कि.मी अंतरावर रस्त्यालगतच्या फाटयापासून ४ कि.मी अंतरावर वसलेले श्रीक्षेत्र पार्वतीपूर म्हणजेच पारसोंड येथील श्रीरामवरदायिनी मंदिर होय.
'रामवरदायिनी माता। दास धुंडूनी आणली।
ओळखी पाडिता ठायी। भिन्न भेद असेचिना॥'
असा उल्लेख आढळून येतो. याचा पूर्वेतिहास पाहता, छ.शिवरायांनी जावळीचे राज्य ताब्यात घेतल्यानंतर समोरचा भोरप्याचा डोंगर त्यांच्या दृष्टीस आला आणि त्यांनी मिळालेली जावळीतील सर्व संपत्ती या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी खर्च करण्यासाठी वापरण्याचे ठरविले.१६५६ साली या कामास सुरूवात होऊन १६५८ साली भव्य किल्ला उभारण्यात आला. मात्र, यानंतर मराठेशाहीवर अफजलखानाचे दृष्टचक्र आले आणि त्याने वाटेत येताना तुळजापूरचे भवानी मंदिर फोडून टाकले. पोलादपूर येथे मठ असलेले कवींद्र परमानंद यांच्या शिवभारतात तुळजापूरच्या भवानीमातेचा उल्लेख असून त्यात खानाने देवीचा अवमान केल्याचा निर्देशही आहे. दूस-या निर्देशात कवींद्र परमानंदांनी,
'इदा निमन्पी दैत्यरे। विमुच्या तुळजापूरम्।
उदेता स्मिता जानी ही। सहाय्या येवं ते स्वयंम्।
यथा जाते नं कंसेन। यथा हमवसा निता।
पूर्व तथा धुनै ते नाप्याव। ज्ञातास्मी पाप्यमा॥'
पार पण तुमच्या सातारा
पार पण तुमच्या सातारा जिल्ह्यात आहे
आलो मी सातारा जिल्ह्यात समर्थांच्या राम वरदायिनी सोबत.
आता दम नका काढू धाप लागेल कुंथणे बरे नोहे.
पोलादपूर येथे मठ असलेले कवींद्र परमानंद यांच्या शिवभारतात तुळजापूरच्या भवानीमातेचा उल्लेख असून त्यात खानाने देवीचा अवमान केल्याचा निर्देशही आहे. दूस-या निर्देशात कवींद्र परमानंदांनी,
'इदा निमन्पी दैत्यरे। विमुच्या तुळजापूरम्।
उदेता स्मिता जानी ही। सहाय्या येवं ते स्वयंम्।
यथा जाते नं कंसेन। यथा हमवसा निता।
पूर्व तथा धुनै ते नाप्याव। ज्ञातास्मी पाप्यमा॥
या कवींद्र परमानंदांच्या समाधी शेजारीच मी राहतो.
छत्रपतींच्याच दोन जन्मतारखा
छत्रपतींच्याच दोन जन्मतारखा निघाल्या. समर्थांच्या दोन घळ्या निघाल्या तर बिघडलं कुठं ?
(दासनवमीला हॅपी बर्थडे असणारा,
जामोप्या)
समर्थांच्या दोनच काय `सर्व देवांचिये साक्षी गुप्त उदंड भुवने' आहेत. पण समर्थच म्हणतात, `सौख्यासी पावणे जाणे आनंदवनभुवनी.'
त्यातही ते आनंदवनभुवन समर्थ लिखित सर्वग्रंथ लेखनाचे जन्म स्थान आहे. आणि कोणाच्या जन्मदात्री दोन असतील? हल्ली `सरोगेट मदर' ची सोय आहे. पण सर्वग्रंथ लेखनाचे जन्म स्थान आनंदवनभुवनच आहे. मग जी घळ नाही पण तिथे अनेक बिळ आहेत ते समर्थ लिखित सर्वग्रंथ लेखनाचे जन्म स्थान कसे असू शकेल?
च्यामारी मला या वादाचे मुळच
च्यामारी मला या वादाचे मुळच लक्षात येत नाहीये !
महत्वाचे काय? समर्थांचा उपदेश/लेखन की त्या लेखनाचे जन्मस्थान?
शिवथरघळ १ खरी की २ री खरी...की अजुन कुठली? काय फ़रक पडतो?
त्यामुळे समर्थांनी जो अमुल्य ठेवा, ज्ञान आपल्याला देवून ठेवलेय त्यात काही फ़रक पडणार आहे काय? मला वाटते कुठल्याही सच्च्या समर्थ भक्ताला याविषयी कसलीही , कुठलीही हरकत असणार नाही.
Pages