खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...

Submitted by shailesh vasant... on 5 February, 2011 - 11:09

खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद
छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात दोन शिवथर होते. एक शिवथर तालुका आणि दुसरे बिरवाडी तालुक्यातील शिवथर गाव. समर्थ रामदास स्वाम्मिन्च्या घळीचे ठिकाण शिवथर तालुक्यातील मौजे पारमाची कोंड नलवडा येथील असल्याने त्यास शिवथर ची घळ असे म्हटले जात होते तर बिरवाडी तालुक्यातील शिवथर गावाचा उल्लेख कौल नामा या धोंडो राघोजी देशमुख यांच्या पत्रात दिसून येतो. येथेच समर्थ साहित्याचे अभ्यासाक आणि शिवथर घळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी एका डोंगरात हि घळ खणली...म्हणजे ती स्वयंभू नव्हती. बिरवाडी जवळच्या खरवली गावातील भटजी भागवत यांनी या खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद केल्याचा हा विडीओ
http://youtu.be/4Aylw5PDcjg
खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...श्रीरामनवमीला दर्शनाची संधी
छ.शिवाजी महाराजांचे आणखी एक पत्र सांगते दुसरे शिवतर
पोलादपूर(शैलेश पालकर)-भोर घाटातील वरंध कुंभारकोंड येथे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या स्वयंभू शिवथर घळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता समर्थभक्तांची वाट सुकर करण्यापर्यंत झाले आहे. त्यामुळे येत्या रविवार, दि.1 एप्रिल 2012 रोजी येणाऱ्या श्रीरामनवमीनिमित्त भाविकांना या स्वयंभू शिवथर घळीच्या दर्शनाची संधी मोठया प्राप्त होणार आहे. एकीकडे, मातीकामाचा रस्ता पूर्ण झाला असताना दुसरीकडे छ.शिवाजी महाराज यांचे आणखी एक पत्र संशोधनादरम्यान आढळून आले असून त्यामुळे दुसरे सिवतर तत्कालीन बिरवाडी तालुक्यात अस्तित्वात होते, अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे खऱ्या शिवथरघळीच्या दर्शनासोबत संशोधनाचीही वाट सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातून श्रीसांप्रदायाची कागदपत्रे यांतील रामदास आणि रामदासी भाग एकूणतिसावा श्रीरामदासींची ऐतिहासिक टिपणे या बाडामध्ये श्रीशिवछत्रपतींचा 1573 तील एक अस्सल कौलनामा या पहिल्या टिपणातील कोंढवी प्रगण्याचा करीना पान क्र. 5 वर 'बाजी येसवंतराव सिवतर ताा.बीरवाडी येथे ठेविला' असा उल्लेख दिसून येत आहे.
सर्वशृत शिवथर घळीचे नेमके हेच ठिकाण असून त्या शिवथरघळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी पाटील-देशमुखांची कागदपत्रे संशोधनादरम्यान विचारात घेऊन हे स्थळ निश्चित केल्याचे त्यांच्या श्रीसांप्रदायिक विविध विषय या लेखामध्ये पान क्र.6 वर दिसून येत आहे. शंकर श्रीकृष्ण देव या लेखात,'साताऱ्याजवळ शिवथर आहे तेंच हे शिवथर असेल, असे वाटून त्याच्या आसपासच्या डोंगरात घळीचा शोध घेण्यात विनाकारण काही काळ गेला. पण बीरवाडी, पारमाची वगैरे स्थळांचा उल्लेख वरील कित्येक लेखांकांत आलेला पाहून महाड तालुक्यातील बीरवाडीजवळपास हे शिवथर असावे, असे वाटून तिकडे गेलो आणि त्या अत्यंत रमणीय व परमपूज्य अशा घळीचे दर्शन घडले!' असे म्हणतात.
मात्र, या लेखाचा कालावधी पाहता या देव यांच्या संशोधनादरम्यानच्या काही व्यक्ती हयात असण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसा सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोध घेतला असता बिरवाडीजवळच्या खरवली येथील अनंत रामकृष्ण भागवत या पौरोहित्य करणाऱ्या वृध्द व्यक्तीने 'शिवथरघळीच्या खणण्याच्या कामादरम्यान श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी असल्याचे सांगून आता जेथे शिवथरघळ आहे तिथे त्यावेळी डोंगर होता. तिथे घळीचा आकार देत खणण्याचे काम सुरू असताना आता जिथे मर्ूत्या बसविल्या आहेत; तेथपर्यंत खणताना आपण होतो. मूर्ती बसविल्यानंतर त्यापुढील भाग खणण्यात आल्याचे अनंत भागवत यांनी सांगून आता जिथे धबधबा आहे तेथे पाण्याचे ओहोळ होते आणि आता तिथे धबधबा आहे, असे सत्य सांगितले आहे. त्यावेळी श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी गजानन जोशी व राम परांजपे हेदेखील आपणासोबत होते,' अशा अनेक आठवणी अनंत भागवत यांनी सांगितल्यामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांच्या सर्वशृत शिवथर घळीबाबतचा फोलपणा उघड झाला आहे.
आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते डिसेंबर महिन्यात भूमिपूजन होऊन सुरू झालेले वरंध-कुंभारकोंड येथील खऱ्या शिवथरघळीच्या रस्त्याचे काम आता घळीपर्यंत येऊन ठेपले असून आता या घळीच्या दर्शनाची वाट जीप व तत्सम वाहनांसाठी सुकर झाली आहे. यासोबतच सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधनकार्यदेखील वरंध-कुंभारकोंड येथील घळच खरी शिवथरघळ असल्याप्रत येऊन पोहोचले असल्याने आता खऱ्या समर्थभक्तांनी सर्वशृत शिवथरघळीचा फोलपणा आणि सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या घळीचा खरेपणा पडताळून सत्याची कास धरण्याची संधी श्रीरामनवमीपासून अनुभवावी, असे आवाहन संशोधनकार्यातील सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.
SHIVTHAR RASTA1.JPGसमर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीसमोरची नाही
पोलादपूर - समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीला उद्देशून असल्याचे काही समर्थअभ्यासक सांगतात, पण मोरगावचा गणपती सरळसोंड वक्रतुंड नसून सोंड डाव्या बाजूला आहे. म्हणून त्यांचा दावा खोटा आहे. असे सत्याची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न या मंडळींनी चालविले असल्याचे दिसून येत आहे. ही आरती सुंदरमठामधील आनंदवनभुवनामध्ये रचली असून महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केल्यानंतर या आरतीने गणपतीचे स्तवन समर्थांनी केले, असे प्रतिपादन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी रामदासपठार येथील सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीनिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचनावेळी केले.
DASNAVAMI SATKAR1.JPG
`सुंदरमठ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच शिवथरची घळ’ असे असूनही समर्थांची शिकवण महत्वाची आहे हे त्रिकालाबाधित सत्य सांगताना समर्थांच्याच `इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम।’ या आज्ञेलाच आनंदवनभुवन सापडले नसल्याने लपवून वेगळेच ठिकाण दाखविण्याचा प्रयत्न तत्कालीन समर्थ साहित्याच्या अभ्यासकांकडून झाला. मात्र, सत्य उघडकीस येऊनही त्यास विरोध करताना काहींकडून समर्थांच्या शिकवणीचाही विपर्यास केला जात आहे, असेही यावेळी अरविंदनाथ महाराज म्हणाले. यावेळी संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज माधव महाराज नामदास यांच्यासह धर्मगुरू चोगले, मानेमाऊली, अध्यक्ष सखाराम पवार,आपलं पोलादपूरचे संपादक भगवान साळवी, जयश्री जाधव आणि असंख्य हरिभक्त उपस्थित होते.

समर्थांच्या खर्या शिवथर घळीबाबतचे सद् गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधन वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचविणारे पत्रकार अभ्यासक शैलेश पालकर यांचा माधवमहाराज नामदास यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशमूर्ती उंचच उंच का? चुकीचा अर्थ लावल्यानेच
समर्थांची शिकवण जेवढी महत्वाची आहे तेवढेच समर्थांचे वास्तव्य असलेले प्रत्येक स्थान महत्वाचे आहे. मात्र, सत्याला विरोध करणारे मिथ्य सोडण्याचे धारिष्टय़ नसलेले स्वतःला समर्थभक्त म्हणवून खर्या शिवथर घळीच्या पुराव्यासह झालेल्या संशोधनाला उपेक्षित ठेवू पाहात आहेत. अशांवर समर्थांची कृपाच नाही म्हणून ते समर्थांच्या या सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीला येऊ शकत नाहीत, असे सांगून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केलेले हे संशोधन समर्थभक्तांसाठी केव्हाही पडताळून स्विकारावे असे सत्य असल्याचे, यावेळी पत्रकार पालकर यांनी सांगितले.

सध्या उंचच उंच गणेशमूर्तीबाबत मूर्तीकारांकडून उंची कमी ठेवण्यासाठीचा आग्रह योग्य आहे. कारण, `समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोही पुरूष सिंधूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद माघपर्यंत।’ यातील `दोही पुरूष’चा अर्थ काहींनी दोन पुरूष उंचीची गणेशमूर्ती असा लावल्याने गणेशमूर्ती उंचच उंच साकारण्याची मंडळांची स्पर्धा सुरू झाली आहे. ती पूर्णतः अयोग्य असून दोही पुरूष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी हे होत, अशी माहिती त्यांनी दिली. पालकर यांच्या या अभ्यासपूर्ण माहितीचे माधवमहाराज नामदास यांनी विशेष कौतुक केले.

छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट

RAMNAGAR PETH1.jpg

समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत गेल्यावर्षी १ जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.
छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३ मध्ये पान क्र.२२ वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची,नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा,मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर पारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके१५९७ भाद्रपद वद्य ८ रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी १२ वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुस-या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिस-या कारभा-याच्या हातची आहेत.या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे १२ वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ,बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा ख-या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

११-११-११ चा योग! ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा दिवस
JAMBHALICHA MAAL1.JPG
पोलादपूर - समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत यंदा १-१-११ या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर समर्थांच्या 'आनंदवनभुवनी' महाकाव्यातील 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी' या कडव्यानुसार दोनपेक्षा जास्तवेळा आलेल्या म्हणजेच बहु ११ अंकाची प्रचिती कार्तिक वद्य प्रतिपदाही आज आल्याने घडत आहे. आजच्या या दुहेरी योगामुळे ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा आजचा दिवस असल्याची नोंद समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्यापासून सुरू झालेल्या शिवथरघळीच्या शोधाची साशंकता दूर होत असल्याने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ (पुन्हा ११) पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. KALYANSWAMI- SAMARTH1.JPG
यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन कृपापूर्वक आज्ञा केली की तुझे नाम कल्याण आहे. कल्याणार्थ प्रसाद घेऊन जाणे. प्रसाद घेऊन सातारांच्या दरवाजियास गेलो, तेच समयी राजश्रीस स्वप्न साक्षात्कार झाला की, श्रीकडून कल्याणगोसावी कल्याणार्थ प्रसाद घेऊन आले.जागृत होताच दरवाजियास हुजूरचा सेवक पाठविला. खरे की काय म्हणून परामृश केला. तो आला. तो आपण बैसलोच होतो. त्याच्या भाषणे या चमत्काराची प्रचिती आली. त्या उपरी त्याच समागमे बिऱ्हाड न घेता राजदर्शनास गेलो. राजश्री पलंगावरून उठोन उभे राहून पुढे येऊन वंदनपूर्व प्रसाद घेतला आणि बोलले की, श्रीचा प्रसाद कल्याण गोसावी याबरोबर आला असता कल्याण आहे, म्हणून त्रिवार बोलिले. आणखी काय आज्ञा म्हणून विचारले. काही आज्ञा संकेत होता निवेदन केले. तेप्रसंगी उंबरजेकडे धावणी होऊन् गुरू वळून आणिली होती. सातारियाचे दक्षिण भागी सोनगांवी खिलार होते त्यामधे सीरगावी अकरा गाई होत्या. त्या खिलारात आणिल्या. हे वर्तमान राजश्रीस विदीत केले. तेही हुजूराच्या भृत्याबरोबरी पत्र देऊन अकरा गाई व अकरा वछे देविली. ती सीरगावी नेऊन ठेविली आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.''ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....''सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे म्हणजेच आज ११-११-११ रोजी आज दोनपेक्षा जास्त वेळा ११ म्हणजे बहुआक्रा आले आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथरप्रांताचा आहे. सध्या सर्वशृत शिवथरघळीकडे माझेरीमार्गे जाणारा रस्ता हा कावळा किल्ल्यामागील खिंड अलिकडे १९७५ च्या दुष्काळी कामादरम्यान खिंड फोडून तयार करण्यात आला आहे. मात्र, समर्थ रामदासस्वामींचा रस्ता पारमाचीहून जात असल्याचे ख-या शिवथरघळीच्या संशोधनादरम्यान दिसून आले आहे. येथे जांभलीच्या चौथरियावर या उल्लेखानुसार जांभळीचा माळ असा उल्लेख असलेला आणि त्यावर जांभळीची झाडे साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी एका रेषेत बाग केल्याप्रमाणे लावल्याचे आढळून आले आहे. मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ असे सातबाराचे उतारे असून तेथे त्या-त्या माळाच्या नावानुसार वैशिष्ठये आढळून आली आहेत. समर्थांचे 'बागप्रकरण' वाचताना समर्थांनी सांगितलेल्या बागेमध्ये काय लावावे? या प्रकरणातील माहितीनुसार अनेक वनस्पतींचे अस्तित्व येथे दिसून आले आहे. आक्रा आक्राची प्रचिती या ख-या शिवथरघळीच्या शोधादरम्यान फार महत्वाची ठरली असून सर्वशृत शिवथरघळीच्या सज्जनगड सेवा समितीने या संशोधनावर केलेली टीकाही ११ मार्च ११ रोजी प्रसिध्द झाली आहे. आजचा बहुआक्राचा आणि कार्तिक वद्य प्रतिपदेचा कल्याणस्वामींनी लिहिलेल्या प्रसंगाचा दिवस एकाचवेळी आला असून समर्थ रामदासस्वामी यांचे बसण्याच्या ठिकाणाचा तपशिलवार उल्लेख या पत्रात असल्याने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगण्याचा आजचा दिवस असल्याचे दिसून येत आहे.
RAMDAS PATHAR.jpg
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोधून काढलेल्या स्वयंभू शिवथरघळीची ख्याती सर्वदूर पसरत असल्याने येथे समर्थभक्त दासपरिवाराची दिवसागणिक उपस्थिती वाढत असताना या दासपरिवाराची दिशाभूल करण्यासाठी रामदासपठारकडे अशा दिशादर्शक फलकावरील 'रामदास' या नावावर काळा रंग फासून शिवथरकडे या शब्दाला 'घळईकडे ३ किमी' अशी जोड देत दासबोधातील व्यावहारिकता स्विकारल्याचे दिसून येत आहे. मार्गशीर्ष शुध्द दशमीला समर्थ रामदासस्वामींनी 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावें॥' ग्रंथराज दासबोधात घातली असा उल्लेख 'समर्थ संप्रदाय' ग्रंथामध्ये शिवथर प्रांतातील बहुशृत घळीचा साशंकतेसह शोध लावणारे समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी १२-१०-३४ नुसार नमूद करताना माघांत श्रीसमर्थ गेले आणि ग्रंथराजात ही ओवी त्यांनी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे श्रीसमर्थशिष्य तंजावरमठपती भीमस्वामी सांगतात. तसे असले किंवा नसले तरी ओवीतच श्रीसमर्थ आपल्या पश्चातच्या काळाचा उल्लेख करीत आहेत, तेव्हा ही त्यांची शेवटची आज्ञा होय, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. असे पान क्रमांक २७३ वर लिहिले आहे. असे असूनही शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या शिवथर प्रांतातील प्रचलित घळीमध्ये शनिवार,दि.५ फेब्रुवारी २०११ पासून शनिवार, दि. १२ फेबु्रवारी २०११ पर्यंत ग्रंथराज दासबोधाच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवथरप्रांतातील नवलवाडीयाचा कोंड या ठिकाणाला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे रामदासपठार असे महसूली गावाचे स्वरूप आले असून येथे असलेल्या सुंदरमठाच्या चौथ-याच्या सातबारा उता-यानुसार ही जागा ब्रिटीश काळापासून आजतागायत कायमधारा माफी झालेली आहे तसेच या पठाराच्या सातबारा उता-यामध्ये मठाचा माळ असा उल्लेख आहे तर जेथे स्वयंभू शिवथरघळ आहे त्या भागात भटाचा माळ असा उल्लेख दिसून येत आहे. या स्वयंभू शिवथरघळीचा शोध घेणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शुध्द दशमीपासून दत्तजयंती व दासबोध जन्मोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र शेंदूरमळई येथे केले होते. शुक्रवारी स्वयंभू शिवथरघळीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अरविंदनाथ महाराजांच्या भक्तगणांनी दासबोध पारायणाची यशस्वी सांगता केली.
यावेळी दररोज सुमारे ३०० हून अधिक दासभक्तांची उपस्थिती या स्वयंभू शिवथर घळीचे दर्शन घेण्यास लाभत असल्याचे दिसून आले. या दासभक्तांची दिशाभूल करण्यासाठी शिवथर प्रांतातील बहुशृत घळीच्या परिसरातील काही प्रतिष्ठित लोकांना कमिटीवर अचानक संधी देऊन स्वयंभू शिवथरघळीला आमच्या घळीचे नांव देऊ नका, अशी चिथावणी नामानिराळे राहू पाहणा-या बोलवित्या धन्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकही रामदासपठारकडे जाणा-या दासभक्तांना घळ मागे राहिली, असे सांगून गाडया सर्वशृत शिवथरघळीकडे नेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यामुळे काहीसा तणाव या भागात दिसून येत असून स्थानिकांना आपसात लढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न शंकर श्रीकृष्ण देव यांना साशंकतेसह आढळून आलेल्या घळीच्या संचालकांकडून केला जात आहे.
एकूणच, ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी पुणे येथील 'जनरेशन नेक्स्ट' या सिटी चॅनेलसोबत वार्तालापादरम्यान केले आहे.
शैलेश पालकरDASNAVAMI SATKAR1.JPGSHIVTHAR RASTA1.JPG

गुलमोहर: 

आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे .. आधी संतांना छळायचे आणि मग ते परलोकी झाले की त्यांच्या नावाने पादुका डोक्यावर घ्यायच्या........ तुम्ही तुमचे संशोधन चालू ठेवा... समर्थ कृपा आपल्या सोबत कायमच राहील....

आपल्या महाराष्ट्राची परंपराच आहे .. आधी संतांना छळायचे आणि मग ते परलोकी झाले की त्यांच्या नावाने पादुका डोक्यावर घ्यायच्या........ खरे आहे...वेद तो मंद जाहला...आनंदवनभुवनी ...म्हणणारया समर्थान्नाही पंढरपूर येथे तत्कालीन रोषातुन विद्वान परिषदेला सामोरे जावे लागले होते. आता तेच लोक त्यांच्या पादुका दाखवून पैसा गोला करीत आहेत.
तुम्ही तुमचे संशोधन चालू ठेवा... समर्थ कृपा आपल्या सोबत कायमच राहील....धन्यवाद! आपण एकदा तरी रामदास पठार येथील शिवथरघलिला भेट द्या समर्थांची कृपा आपल्यावर देखिल आहे. याचा प्रत्यय घ्या.
जागोमोहनप्यारे | 19 November, 2011 - 03:14
बाग.. मी बांग असे वाचले.. चालू द्या.. नवीन लिहा नाही तर जुनंच वर काढा.. तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करा..

समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे.. ?

काही अक्षरे कशी टाईप करायची हे समजुन येत नव्हते...

पण म्हणून असं सारखं सारखं अक्षर गाळणे-घालणे बरे नव्हे.. अक्षरे गाळी किंवा पदरची घाली तो एक मूर्ख असं स्वतः समर्थानीच दासबोधात लिहून ठेवलं आहे ना?

दासनवमीला हॅपी बर्थ डे असलेला..

जागोमोहनप्यारे

उदय | 19 November, 2011 - 04:06
दासनवमीला हॅपी बर्थ डे असलेला..
----- जामोप्या तुमचे किती हॅपी बर्थ डे असतांत एका वर्षात ?

जागोमोहनप्यारे | 19 November, 2011 - 15:02
हॅपी बर्थ डे दोन असतात.... एक तारखेने आणि एक तिथीने..

आमची टवाळी करताना समर्थच म्हणतात `टवाल़ा आवडे विनोद,' असे म्हणाला होतात जागोमोहनप्यारे!!!! पण आता तुमचीच टवाळी उडविली गेली आहे. त्यामुले ही जागा यासाठी नाही हे भान ठेवावे.
स्मितू | 19 November, 2011 - 16:51
आताच १ तारखेला जाऊन आलो आहे आम्ही शिवथर घळीला... काय रमणिय स्थळ आहे... आहाहा!!!

रामदास स्वामीचे कोणतेहि ठिकाण रमणिय स्थळ नाही. रमणी आणि रामदास स्वामींचा अर्था-अर्थी काहीही सम्बन्ध नाही. आपल्याला समर्थ अजुन समजलेले दिसत नाहित. कारण आपण ज्या शिवथर घळीला रमणिय स्थळ म्हणता तिथे त्यांचे वास्तव्य कधीही नव्हते.

जय जय रघुवीर समर्थ!

शिवथर हे वर्णन शिव म्हणजे वेस-सीमा-हद्द ज्याची थरा-थरांची असे `चहू बाजूंनी डोंगर... मध्ये देवाचे शिखर..!' असलेल्या डोंगराचे आहे. ज्या डोंगरात ही घळ आहे तिला शिवथर घळ असे म्हटले आहे. आणि ती घळ आम्ही शोधली आहे. आपण रामदासपठारकड़े जाल तेव्हा सभोवती असलेले डोंगर हे थरा-थरांचे असलेले दिसून येतात. मध्येच रामदास पठार आहे. येथील नवलवाडीयांचा कोंड ही जागा समर्थांच्या सुंदरमठाची आहे. तेथे जाल तेव्हा जय जय रघुवीर समर्थ! अश्या आरोळ्या देतच जाल. येथे राम चिंतित जावे.
आम्ही येथे समर्थांची जुनी पायवाट शोधली आहे. निबिड़ अरण्यातुन घनदाट जंगलातून तेथे अजूनही पायरीचे कातीव दगड आहेत. पण आम्ही केलेले संशोधन प्रत्यक्ष न अनुभवता नेटकरी समर्थभक्त टिका टवाळी करतात. आणि आम्हा सारख्या समर्थ भक्तानाच समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे.. ? असे विचारन्याचा डावपेच खेळतात...खरे तर तेच समर्थांच्या आम्हासारख्या सेवकांकडे वक्र पाहून या भूमंडळी मोठेपणाचा तोरा मिरवित आहेत.....
जागोमोहनप्यारे... आणि त्यांच्या सवंगडयाना आवाहन आहे. एक पैसा ही दान न करता तेथे जा सोबत समर्थांचे साहित्य ग्रन्थ घ्या आणि आम्ही त्यानुरूप माहिती देत. तेथील सर्व जागा दाखवू. कारण आम्ही तुमच्याकड़े वक्र पाहात नाही. समर्थान्चिच आम्हाला शिकवण आहे... `अपराधी जन चुकताची गेले... चुकताची गेले... ते जन हाती धरे दयाळ... कल्याण करी रामराया.' याखेरीज `देवभक्त येक़ झाले.... मिलाले सर्व जीवही.... संतोष पावले तेथे.... आनंदवनभुवनी' हीच या संशोधनाची यशस्विता आहे. हे देव भक्त म्हणजे शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या घलिचे भक्त जे खरे समर्थान्चेच भक्त आहेत.. ते अपराधी जन आहेत....कारण ते देव(शंकर श्रीकृष्ण देव) भक्त चुकतची गेले आहेत, त्यांना आम्ही समर्थांच्या शिकवणीनुसार दुरावा देणार नाही...शंकर श्रीकृष्ण देव उर्फ़ नानासाहेब.... समर्थ म्हणतात दिग्पति चालले सर्वे... नाना सेना(शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या घलिचे भक्त) परोपरी... आणि समर्थ पुढे म्हणतात, वेष्टित चालले सकले (म्हणजे सर्वाना गुंडालीत चालले आहेत...)आनंदवनभुवनी'.... आता अधिक काळ समर्थ भक्तांना गुंडालू नका... संतोष पावन्यासाठी आनंदवन भुवनी या.
`आर्जवपणे मागणे हां निस्पृहाचा धर्म नव्हे.' या समर्थ आद्न्येच्या इतिहासामुले आमचे संशोधन पक्के आणि खरे ठरत आहे. त्यामुले तुमच्याकडेही आर्जवपणे काहीही मागितले जाणार नाही. जे समर्थांच्या पादुका दाखवून पैसे गोला करतात, त्यांना या समर्थ आद्न्येचा विसर कसा पडला? त्यांची टवाळी कधी करणार आणि कोण करणार?

रामदास स्वामीचे कोणतेहि ठिकाण रमणिय स्थळ नाही. रमणी आणि रामदास स्वामींचा अर्था-अर्थी काहीही सम्बन्ध नाही. आपल्याला समर्थ अजुन समजलेले दिसत नाहित.<<

व्वा "रमणिय" या शब्दाची काय व्यख्या केलेय.

>>कारण आपण ज्या शिवथर घळीला रमणिय स्थळ म्हणता तिथे त्यांचे वास्तव्य कधीही नव्हते.<<

आणखी एक नविन माहीती.

शिवथर हे वर्णन शिव म्हणजे वेस-सीमा-हद्द ज्याची थरा-थरांची असे `चहू बाजूंनी डोंगर... मध्ये देवाचे शिखर..!' असलेल्या डोंगराचे आहे. ज्या डोंगरात ही घळ आहे तिला शिवथर घळ असे म्हटले आहे. आणि ती घळ आम्ही शोधली आहे. आपण रामदासपठारकड़े जाल तेव्हा सभोवती असलेले डोंगर हे थरा-थरांचे असलेले दिसून येतात. मध्येच रामदास पठार आहे. येथील नवलवाडीयांचा कोंड ही जागा समर्थांच्या सुंदरमठाची आहे.
वेताळ_२५ ही आहे ती आणखी एक नविन माहीती.

तुम्ही क्रमाने १-२ असे धागे काढले असतेत तर क्रमवार समजले असते.. त्यातच येडिट करत बसलात, वाचणारा येडा होतो अशाने. काही कळत नाही.

बरं मग शेवटी काय ठरलं ..? कोणती घळ खरी अन कोणती डुप्लीकेट ? समर्थांच्या नावावर पैसे कोण ओढणार ?

कोणती घळ खरी अन कोणती डुप्लीकेट ?
----- जेथे समर्थांचे विचार मनात येतात, प्रत्यक्ष आचरणात येतात ते आनंदवनभुन... Happy

वर कुणीतरी म्हटले आहे 'समर्थांचे विचार महत्वाचे आहे, कोणत्या जागेवर बसुन ते लिहीले गेले हे तितकेसे महत्वाचे नाही... '.

११-११-११ चा योग हे शिर्षक का दिले आहे ? समर्थांचा संबंध इंग्रजी कॅलेंडरशी Happy

आज ग्रंथराज दासबोध पूर्तीदिनाचा वर्धापनदिन
समर्थ रामदासस्वामी यांच्या सर्वग्रंथादि लेखनातील ग्रंथराज दासबोधातील शेवटची ओवी 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काहीही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावे॥'ही ग्रंथराज दासबोधामध्ये समर्थांनी समाविष्ठ केल्याचे वर्णन समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांच्या समर्थसंप्रदाय या ग्रंथात दिसून येत आहे. ही ओवी समर्थ माघांत गेले आणि ग्रंथराजांत त्यांनी ही ओवी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे समर्थशिष्य तंजावरमठपति भीमस्वामी सांगतात, असा उल्लेख या ग्रंथात दिसून येत आहे. त्यामुळे मार्गशीर्ष शुध्द दशमी हा श्रीमतदासबोध पूर्तीदिनाचा वर्धापनदिन असल्याचे मत सुंदरमठ,आनंदवनभुवन आणि शिवथरघळीचे संशोधक सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मांडले आहे. समर्थसंप्रदाय या ग्रंथातील 'संप्रदायाचे पुढचे स्वरूप' या प्रकरणात समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी श्रीसमर्थहि जातेवेळी जी शेवटची आज्ञा करून गेले ती पाळावयास नको काय?....असे मत व्यक्त करून त्यांची शेवटची आज्ञा 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काहीही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावे॥' माघांत श्रीसमर्थ गेले आणि ग्रंथराजांत त्यांनी ही ओवी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे समर्थशिष्य तंजावरमठपति भीमस्वामी सांगतात. तसे असले किंवा नसले तरी ओवीतच समर्थ आपल्या पश्चातच्या काळाचा उल्लेख करीत आहेत, तेव्हा त्यांची ही ओवी शेवटची आज्ञा आहे, असे मानण्यास प्रत्यवाय नाही, असे विवेचन करणाऱ्या शंकर श्रीकृष्ण देव यांनी, ही शेवटची आज्ञा बाराव्या दशकातील उत्तमपुरूष निरूपणांत ग्रंथित केलेली आहे. उत्तमपुरूष निरूपणांचे दासबोधांत दोन समास आहेत; एक, बाराव्याचा दहावा आणि दुसरा अठराव्याचा सहावा. यापैकी बाराव्याचा दहावा मध्ये जो उत्तम पुरूष असेल, त्याने कसे वागावे, याचे पांच पन्नास नियम श्रीसमर्थांनी सांगितले आहेत...असे मत शंकर श्रीकृष्ण देव यांनी मांडले आहे. त्यामुळे श्रीसमर्थांकडून ही शेवटची ओवी ज्यावेळी लिहिली गेली; तो दिवस मार्गशीर्ष शुध्द दशमी असल्याने हाच ग्रंथराज दासबोधपूर्तीचा दिवस असून आज या दिवसाचा वर्धापनदिन असल्याचे मत सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मांडले आहे.

पालकरसाहेब, आपण मला त्या ४८ वर्तमानपत्राची आणि ४ वेबसाईट्सची यादी देणार होतात. कधी लिहिणार आहात त्याबद्दल?? तसेच नियमितपणे म्हणजे नक्की कशा पद्धतीने आपल्या बातम्या प्रसिद्ध होतात?? अख्ख्या रायगड जिल्ह्यामधे ४८ वर्तमानपत्र नक्कीच नाहीत. (संदर्भः २०१०चे एबीसी) संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणाल तर एवढ्या सर्व वर्तमानपत्राना "नियमित" बातम्यी देऊन तुम्हाला अशा इतर संशोधनासाठी वेळ मिळतो ही कौतुकाची बाब म्हणावी. Happy त्यामुळे हे जाणून घेण्याची मला साहजिकच उत्सुकता लागली आहे.

ती यादी इथेच लिहा. मला व्यक्तिगत संपर्कामधून मेल वगैरे नको.

अ‍ॅडमिन, तुमचे इथे लक्ष असू द्या. Happy चार वेबसाईट्समधे मायबोली.कॉमचा समावेश असेल तर... Happy

रायगड जिल्ह्यामधे ४८ वर्तमानपत्र नक्कीच नाहीत. (संदर्भः २०१०चे एबीसी) संपूर्ण महाराष्ट्राचे म्हणाल तर एवढ्या सर्व वर्तमानपत्राना "नियमित" बातम्यी देऊन तुम्हाला अशा इतर संशोधनासाठी वेळ मिळतो ही कौतुकाची बाब म्हणावी.
उत्सुकता की आणखी काही? यातही आमचे समर्थ नाहीत. व्यक्तिगत माहितीसाठी मी हि धागा वापरीत नाही.
चार वेबसाईट्समधे मायबोली.कॉमचा समावेश असेल तर...
अरेरे एवढ्यावरच ज्ञान संपले की काय?
थांबा आणि पहा पहिले समर्थ साहित्याच्या आभ्यासानंतर प्रकटणे. मग कधी तरी माझे प्रकटणे. मी निमित्त मात्र आहे. करता करविता कोण आहे??? जय जय रघुवीर समर्थ!!!!

'आमची प्रतिज्ञा ऐसी। काहीही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावे॥'
या आज्ञेबाबत काही विचारले असते तर.....नाही.... समर्थांचे विचार महत्वाचे म्हणणारे प्रत्यक्षात मात्र स्वत:चीच दिशाभूल करीत तर नाहीत ना?

शैलेश साहेब.... नंदिनी यांचे प्रश्न अडचणित टाकणारे आहेत आणि म्हणुन शब्दांचा खेळ होतो आहे असा समज वाचक करवुन घेतात आणि त्यांची दिशाभुल होते.

समर्थांचे विचार महत्वाचे म्हणणारे प्रत्यक्षात मात्र स्वत:चीच दिशाभूल करीत तर नाहीत ना?
---- आपण शंकाचे निरसन करुन, योग्य दिशा दाखवण्याचे कार्य करावे अशी विनंती. तुम्हाला प्रामाणिक पणे वाचकांची दिशाभुल व्हायला नको असे वाटत असेल तर आढेमोढे न घेता द्या ना प्रश्नांची अडेतोड उत्तरे... अर्थात तसे जमत नसेल तर दिशाभुल होणे संभव आहे.

उत्सुकता की आणखी काही? यातही आमचे समर्थ नाहीत. व्यक्तिगत माहितीसाठी मी हि धागा वापरीत नाही.
>> कृपया योग्य ती माहिती द्या. ४८ नाहीतर किमान पाच वर्तमानपत्राची तरी नावे द्याल अशी आशा.

अरेरे एवढ्यावरच ज्ञान संपले की काय?
थांबा आणि पहा पहिले समर्थ साहित्याच्या आभ्यासानंतर प्रकटणे. मग कधी तरी माझे प्रकटणे. मी निमित्त मात्र आहे. करता करविता कोण आहे??? जय जय रघुवीर समर्थ!!!!
>> हा शब्दखेळ थांबवा. आपण मला अपेक्षित असलेली माहिती देणे गरजेचे आहे. स्वतःला पत्रकार म्हणवत असाल तर आपले लिखाण जिथे प्रसिद्ध होते अशा प्रकाशनांची माहिती आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. तेव्हढे सोडून बाकी बरेच काही लिहित आहात. आमच्या ज्ञानाची आपण चिंता करू नये. आपण निमित्तमात्र आहात हे ठाऊक आहे फक्त कुणाला निमित्तमात्र आहात हे समजू दे सर्वाना.

आपल्या माहितीसाठी सांगून ठेवते. मला रायगड जिल्ह्यामधे पत्रकारितेचा दांडगा अनुभव आहे.

अ‍ॅडमिन, इकडे लक्ष असू द्या...

आपल्या माहितीसाठी सांगून ठेवते. मला रायगड जिल्ह्यामधे पत्रकारितेचा दांडगा अनुभव आहे.
स्वतःला पत्रकार म्हणवत असाल तर आपले लिखाण जिथे प्रसिद्ध होते अशा प्रकाशनांची माहिती आपल्याजवळ असणे गरजेचे आहे. तेव्हढे सोडून बाकी बरेच काही लिहित आहात. आमच्या ज्ञानाची आपण चिंता करू नये.
मलाही आपल्या पत्रकारितेचा दांडगा अनुभव देत आहात काय? माफ करा आपण मला ओळखले नाहीत...तर रायगड जिल्ह्यामधे पत्रकारितेचा दांडगा अनुभव असेल असे कसे म्हणू शकाल? किती वर्षे काढलीत या क्षेत्रात? तरी देखील मला ओळखत नाहीत. माझी माहिती नाही? असो मलाही तुमची माहिती नाही.... यावरून आपल्याला रायगड जिल्ह्यामधे पत्रकारितेचा दांडगा अनुभव असल्याचा दांडगा परिचय मला झाला आहे.
आपण निमित्तमात्र आहात हे ठाऊक आहे फक्त कुणाला निमित्तमात्र आहात हे समजू दे सर्वाना. आता हाच प्रश्न आपल्याला विचारीत आहे...नाही देणार ना याचे उत्तर?

नंदिनी यांचे प्रश्न अडचणित टाकणारे आहेत आणि म्हणुन शब्दांचा खेळ होतो आहे असा समज वाचक करवुन घेतात आणि त्यांची दिशाभुल होते.
तुम्हाला प्रामाणिक पणे वाचकांची दिशाभुल व्हायला नको असे वाटत असेल तर आढेमोढे न घेता द्या ना प्रश्नांची अडेतोड उत्तरे... अर्थात तसे जमत नसेल तर दिशाभुल होणे संभव आहे.
आजचा महाराष्ट्र,अलिबाग टाईम्स,आजची नवी मुंबई, बहुजन लोकनायक, वृत्त सम्राट, चौफेर, दैनिक विश्वरूप,गावकरी,मुंबई मित्र,कोकण सकाळ, कर्नाळा, केसरी, मुंबई लक्षदीप,लोकदृष्टी, लोकसत्या, सामना वेब, मुंबैसंध्याकाल,निर्भीड लेख, नगरटाईम्स, नवभारतपत्र, दैनिक ऐक्य,रत्नाभूमी, रसायनीटाईम्स, सांजवार्ता पुणे,ठाणे नागरिक, ठाणे वैभव, उरण समाचार,विधान परिवार, अमृत कलश, वृत्त किरण,वार्तादीप, वृत्तानंद, रामप्रहर, प्रहार, महानगर, कुलाबा दर्पण, कृषीवल वेब , रत्नागिरी एक्स्प्रेस, कोकण टुडे, रायगड राज, आपले पोलादपूर, रायगडचा आवाज, सागर(४ आवृत्तीसाठी), पुढारी वेब (८ आवृत्तीसाठी), महाराष्ट्र टाईम्स वेब , नवशक्ती वेब , नवाकाळ, लोकमत, एकमत, लोकनायक पुणे, गोमंतक, तरुण भारत, मराठवाडा नेता, पीएसआय न्यूज एजेन्सी. महावृत्ता.कोम, आणखी बरेच काही. गेल्या २५ वर्षांपासून बातमी महत्वाची बातमीदार नव्हे या तत्वाने कार्यरत आहे.त्यामुळे माझ्यातील बातमीदाराला मी दाबत होतो. अनेक पत्रकार मी या क्षेत्रात तयार केल्याने तेच मला पत्रकारितेत गुरु मानतात. मी मात्र बातमीपुढे नतमस्तक होतो. आता मी तुमच्या पुढेही नतमस्तक होतो..... मी नाही तुम्ही हि नाहीत..... समर्थच मोठे आहेत...तेच माझे गुरु....तुमचेही असावेत.....
नंदिनी यांचे प्रश्न अडचणित टाकणारे आहेत...
पण त्यांचे त्यांनाच! त्यांनी यादी द्यावी किंवा त्यांचा अनुभव सांगावा ... नाही तर केवळ जय जय रघुवीर समर्थ! म्हणून हा विषय येथेच सोडावा. कृपया माझे विषयांतर करणे टाळावे.

नोस्त्राडेमास- समर्थ रामदास स्वामी
सप्तकांडात्मक श्री दासायन मध्ये अनंतदास रामदासी यांनी आनंदवनभुवनी कवितेवर प्रकाश टाकला आहे तो पृष्ठ क्रमांक २७१ ते २७३ पर्यंत वाचावा..ते म्हणतात पृष्ठ क्रमांक २७३ आनंदवनभुवनी हे प्रकरण किती तरी महत्वाचे आहे. पुढे घडणार्या गोष्टी यात आधीच सांगितल्या आहेत. म्हणून यास कोणी श्री समर्थकृत भविष्यपुराण म्हणतात. पुढे घडणार्या गोष्टी त्यांना (समर्थांना) जश्या स्मरल्या त्या त्यांनी आधीच लिहिल्या म्हणून या प्रकरणास समर्थस्मृती असे नाव कोणी देतात. आता या कवितेतील भविष्य पुराण नोस्त्राडेमास याच्या कवितांप्रमाणे आहे असे मी म्हटले . तर कथित बुद्धीवादी माझी चेष्टा करतील यात शंकाच नाही. पण तरीही काही अद्याप ना घडलेल्या गोष्टी ज्या आनंद वन भुवनी कवितेत आहेत आणि त्या सध्या घडत आहेत त्यांचा अर्थ माझ्या अल्पबुद्धीप्रमाणे मी लावीत आहे.
देव देव बहु देव। नाना देव परोपरी। दाटणी ...जाहाली मोठी। आनंदवनभुवनी।। २०।।
दिग्पती चालले सर्वे। नाना सेना परोपरी। वेष्टित चालले सकळे। आनंद वन भुवनी।।२१।।
यात शंकर श्रीकृष्ण देव यांना नाना म्हणतात यात माझा काय दोष? शिवथर घळ त्याना दिसली आणि त्या शिवथर घळीच्या संशोधनाचे समर्थक म्हणजेच `नाना सेना' परोपरीने आम्हाला वेष्टित चालली अथवा गुंडाळीत चालली आहे असा अर्थ लावला तर समर्थांनी भविष्यकथन केलेच नाही असे मी का म्हणू? या कवितेत समर्थ पुढे म्हणतात,
देव सर्वस्व भक्तांचा। देव भक्त दुजे नसे। संदेह तुटला मोठा। आनंदवनभुवनी।।४५।।
हे भविष्य आहे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधनांती सिद्ध केलेल्या आनंदवनभुवनाचे आणि ते सागितले आहे समर्थांनी. त्यामुळे समर्थ हे ज्या भक्ताचे सर्वस्व आहेत त्यामध्ये शंकर श्रीकृष्ण देव यांच्या समर्थकांनाहि समर्थ हेच देवस्थानी आहेत त्यामुळे हे देव भक्त समर्थ भक्तच आहेत त्यांना शंकर श्रीकृष्ण देव यांना शिवथर घळ समर्थक म्हणून दुजे नसे या समर्थांच्या आज्ञेविरोधात मी का जावे? त्यांचा सर्व ग्रंथ लेखनाची जागा शिवथर घळ की आनंदवनभुवन याबाबतचा संदेह तुटण्याचे ठिकाण आनंदवनभुवनी असेल असे समर्थांनी भविष्य सांगितले आहे. तर आम्ही त्या शंकर श्रीकृष्ण देव यांच्या शिवथर घळ समर्थाकांप्रती द्वेष का करावा?
कल्याण करी रामराया। अपराधी जन चुकतची गेले।
चुकतची गेले। हे जन हाती धरे दयाळा।
असे समर्थांनी आम्हाला सांगितले आहे. त्यामुळे नव्या शिवथर घळ म्हणजेच आनंदवनभुवनिच्या संशोधनाप्रती जे अपराधी जन चुकतची गेले आहेत त्यांचाहि संदेह तुटण्याचे ठिकाण आनंदवनभुवनी असेल. आणि मग समर्थांनी पुढे केलेले भविष्य कथन खरे ठरावे अशी अपेक्षा आहे ते असे.....
देव भक्त एक झाले। मिळाले सर्व जीवही। संतोष पावले तेथे।आनंदवनभुवनी।।४६।।
स्मरले लिहिले आहे। बोलता चालता हरी। काये होईल ते पाहावे। आनंदवनभुवनी।।५७।।

आठ दह दिवस झाले की बीबीचं नवीन बारसं करतात.... तुमच्या बीबीला एक काहीतरी नाव द्या.. आणि तुमचे जे मोठे , माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत, त्याना अशी स्वतंत्र शीर्षके द्या.. म्हणजे वाचणार्‍याना सोपे जाईल..

आठ दह दिवस झाले की बीबीचं नवीन बारसं करतात.... तुमच्या बीबीला एक काहीतरी नाव द्या.. आणि तुमचे जे मोठे , माहितीपूर्ण प्रतिसाद आहेत, त्याना अशी स्वतंत्र शीर्षके द्या.. म्हणजे वाचणार्‍याना सोपे जाईल..

हि प्रतिक्रिया प्रोत्साहनासाठी की हतोत्साहासाठी?

वरील लेखात जे कागदपत्र "अस्सल" म्हणून दिले आहे ते धादांत नकली व फोटोशॊपच्या सहाय्याने बनवलेले आहे...
त्याचा हा घ्या पुरावा.
खालील दुव्यावर रामदासी पत्रांचे अस्सल पुस्तक उपलब्ध आहे.

https://docs.google.com/file/d/0BwvzaVc82WptNzZjZjU3MDktZGJiOC00ODUxLWJj...

समर्थांचे नाव घेऊन राजकारण करणार्यांना पुढे तरी सद्गती लाभो अशी समर्थ चरणी प्रार्थना....

सज्जनगड,

मला लेखात एकच कागदपत्र (१५९७ भाद्रपद व. अष्टमीचं) दिसलं. तुम्हाला तेच अभिप्रेत असावं.

तुम्ही दिलेल्या दुव्यावर गेलो. ते एक पी.डी.एफ. डॉक्युमेंट आहे. त्याच्या पान क्रमांक ६१ वरील पत्रात आणि लेखात दिलेल्या पत्रात काहीही फरक आढळला नाही.

कृपया आपला मुद्दा स्पष्ट करावा. वस्तुस्थिती पडताळल्याशिवाय सरसकट आरोप करू नयेत ही विनंती.

आ.न.,
-गा.पै.

या आधी एवढ्या शेकडो वर्षांत कोणालाच काही कळाले नाही आणि आता तुमच्या अरविंदनाथांना कसे कळाले ? त्यांना सुद्धा या आधी कसे कळाले नाही ? समजा सर्वशृत घळीला खरी घळ आहे असे म्हणले तर काय फरक पडणार आहे ?
तुम्ही आणि तुमचे हे अरविंदनाथ कोणत्यातरी "जनरेशन नेक्स्ट" नावाच्या चॅनेलला सांगता तर बाकीच्या अतिप्रसिद्ध वाहिन्यांना का नाही सांगत ? निखिल वागळे, स्टारमाझा, ईटिव्ही, आयबीएन, इ. बर्‍याच वाहिन्या आहेत. तसेच वृत्तपत्रे आहेत.
तो "जनरेशन नेक्स्ट" चॅनेल आजच्या जनरेशनला माहिती तरी आहे का ?

आजचा महाराष्ट्र,अलिबाग टाईम्स,आजची नवी मुंबई, बहुजन लोकनायक, वृत्त सम्राट, चौफेर, दैनिक विश्वरूप,गावकरी,मुंबई मित्र,कोकण सकाळ, कर्नाळा, केसरी, मुंबई लक्षदीप,लोकदृष्टी, लोकसत्या, सामना वेब, मुंबैसंध्याकाल,निर्भीड लेख, नगरटाईम्स, नवभारतपत्र, दैनिक ऐक्य,रत्नाभूमी, रसायनीटाईम्स, सांजवार्ता पुणे,ठाणे नागरिक, ठाणे वैभव, उरण समाचार,विधान परिवार, अमृत कलश, वृत्त किरण,वार्तादीप, वृत्तानंद, रामप्रहर, प्रहार, महानगर, कुलाबा दर्पण, कृषीवल वेब , रत्नागिरी एक्स्प्रेस, कोकण टुडे, रायगड राज, आपले पोलादपूर, रायगडचा आवाज, सागर(४ आवृत्तीसाठी), पुढारी वेब (८ आवृत्तीसाठी), महाराष्ट्र टाईम्स वेब , नवशक्ती वेब , नवाकाळ, लोकमत, एकमत, लोकनायक पुणे, गोमंतक, तरुण भारत, मराठवाडा नेता, पीएसआय न्यूज एजेन्सी. महावृत्ता.कोम>>>> वा छान. यांचे कुणी नियमित वाचक आहेत का मायबोलीवर? त्यांच्यापैकी कुणीच तुमचे नाव कसे ऐकले नाही. यापैकी काही वर्तमानपत्रे एकमेकाशी स्पर्धक आहेत. तिथे दोन्ही ठिकाणी तुम्ही "वार्ताहर" आहात की स्ट्रिंगर म्हणून काम करता? (उदा. प्रहार आणि तरूण भारत) ही सारी वर्तमानपत्रे तुमच्या बातम्या रोजच्यारोज छापते का?

आणि विषय असेल माझ्या अनुभवाचा.. तर ते विद्याधर साठेनाच विचारा. (तुम्ही त्याना ओळखत असालच) ते सांगतील. धन्यवाद. Happy

महेश,

>> समजा सर्वशृत घळीला खरी घळ आहे असे म्हणले तर काय फरक पडणार आहे ?

याबद्दल मी इथे स्पष्टीकरण दिले आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर साधूपुरुषांनी वास्तव्य केलेले स्थान अतिशय सात्त्विक बनलेले असते. त्यमुळे ते निश्चित केल्याने उपासकांना लाभच होतो.

पालकरांची लेखनशैली आपणांस कदाचित न रुचण्याची शक्यता आहे. मात्र मूळ मुद्याकडे दुर्लक्ष होऊ नये असं मला वाटतं.

आ.न.,
-गा.पै.

Pages