खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...

Submitted by shailesh vasant... on 5 February, 2011 - 11:09

खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद
छ.शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यात दोन शिवथर होते. एक शिवथर तालुका आणि दुसरे बिरवाडी तालुक्यातील शिवथर गाव. समर्थ रामदास स्वाम्मिन्च्या घळीचे ठिकाण शिवथर तालुक्यातील मौजे पारमाची कोंड नलवडा येथील असल्याने त्यास शिवथर ची घळ असे म्हटले जात होते तर बिरवाडी तालुक्यातील शिवथर गावाचा उल्लेख कौल नामा या धोंडो राघोजी देशमुख यांच्या पत्रात दिसून येतो. येथेच समर्थ साहित्याचे अभ्यासाक आणि शिवथर घळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी एका डोंगरात हि घळ खणली...म्हणजे ती स्वयंभू नव्हती. बिरवाडी जवळच्या खरवली गावातील भटजी भागवत यांनी या खोट्या शिवथर घळी चा रहस्य भेद केल्याचा हा विडीओ
http://youtu.be/4Aylw5PDcjg
खऱ्या शिवथरघळीची वाट सुकर...श्रीरामनवमीला दर्शनाची संधी
छ.शिवाजी महाराजांचे आणखी एक पत्र सांगते दुसरे शिवतर
पोलादपूर(शैलेश पालकर)-भोर घाटातील वरंध कुंभारकोंड येथे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या स्वयंभू शिवथर घळीकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम आता समर्थभक्तांची वाट सुकर करण्यापर्यंत झाले आहे. त्यामुळे येत्या रविवार, दि.1 एप्रिल 2012 रोजी येणाऱ्या श्रीरामनवमीनिमित्त भाविकांना या स्वयंभू शिवथर घळीच्या दर्शनाची संधी मोठया प्राप्त होणार आहे. एकीकडे, मातीकामाचा रस्ता पूर्ण झाला असताना दुसरीकडे छ.शिवाजी महाराज यांचे आणखी एक पत्र संशोधनादरम्यान आढळून आले असून त्यामुळे दुसरे सिवतर तत्कालीन बिरवाडी तालुक्यात अस्तित्वात होते, अशी नोंद आढळून आली आहे. त्यामुळे खऱ्या शिवथरघळीच्या दर्शनासोबत संशोधनाचीही वाट सुकर झाल्याचे दिसून येत आहे.
धुळे येथील समर्थ वाग्देवता मंदिरातून श्रीसांप्रदायाची कागदपत्रे यांतील रामदास आणि रामदासी भाग एकूणतिसावा श्रीरामदासींची ऐतिहासिक टिपणे या बाडामध्ये श्रीशिवछत्रपतींचा 1573 तील एक अस्सल कौलनामा या पहिल्या टिपणातील कोंढवी प्रगण्याचा करीना पान क्र. 5 वर 'बाजी येसवंतराव सिवतर ताा.बीरवाडी येथे ठेविला' असा उल्लेख दिसून येत आहे.
सर्वशृत शिवथर घळीचे नेमके हेच ठिकाण असून त्या शिवथरघळीचे संशोधक शंकर श्रीकृष्ण देव यांनी पाटील-देशमुखांची कागदपत्रे संशोधनादरम्यान विचारात घेऊन हे स्थळ निश्चित केल्याचे त्यांच्या श्रीसांप्रदायिक विविध विषय या लेखामध्ये पान क्र.6 वर दिसून येत आहे. शंकर श्रीकृष्ण देव या लेखात,'साताऱ्याजवळ शिवथर आहे तेंच हे शिवथर असेल, असे वाटून त्याच्या आसपासच्या डोंगरात घळीचा शोध घेण्यात विनाकारण काही काळ गेला. पण बीरवाडी, पारमाची वगैरे स्थळांचा उल्लेख वरील कित्येक लेखांकांत आलेला पाहून महाड तालुक्यातील बीरवाडीजवळपास हे शिवथर असावे, असे वाटून तिकडे गेलो आणि त्या अत्यंत रमणीय व परमपूज्य अशा घळीचे दर्शन घडले!' असे म्हणतात.
मात्र, या लेखाचा कालावधी पाहता या देव यांच्या संशोधनादरम्यानच्या काही व्यक्ती हयात असण्याची शक्यता निर्माण झाल्याने तसा सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोध घेतला असता बिरवाडीजवळच्या खरवली येथील अनंत रामकृष्ण भागवत या पौरोहित्य करणाऱ्या वृध्द व्यक्तीने 'शिवथरघळीच्या खणण्याच्या कामादरम्यान श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी असल्याचे सांगून आता जेथे शिवथरघळ आहे तिथे त्यावेळी डोंगर होता. तिथे घळीचा आकार देत खणण्याचे काम सुरू असताना आता जिथे मर्ूत्या बसविल्या आहेत; तेथपर्यंत खणताना आपण होतो. मूर्ती बसविल्यानंतर त्यापुढील भाग खणण्यात आल्याचे अनंत भागवत यांनी सांगून आता जिथे धबधबा आहे तेथे पाण्याचे ओहोळ होते आणि आता तिथे धबधबा आहे, असे सत्य सांगितले आहे. त्यावेळी श्रीधरस्वामींच्या सेवेसाठी गजानन जोशी व राम परांजपे हेदेखील आपणासोबत होते,' अशा अनेक आठवणी अनंत भागवत यांनी सांगितल्यामुळे शंकर श्रीकृष्ण देव यांच्या सर्वशृत शिवथर घळीबाबतचा फोलपणा उघड झाला आहे.
आ.भरतशेठ गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीत रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मनोहरशेठ भोईर यांच्याहस्ते डिसेंबर महिन्यात भूमिपूजन होऊन सुरू झालेले वरंध-कुंभारकोंड येथील खऱ्या शिवथरघळीच्या रस्त्याचे काम आता घळीपर्यंत येऊन ठेपले असून आता या घळीच्या दर्शनाची वाट जीप व तत्सम वाहनांसाठी सुकर झाली आहे. यासोबतच सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधनकार्यदेखील वरंध-कुंभारकोंड येथील घळच खरी शिवथरघळ असल्याप्रत येऊन पोहोचले असल्याने आता खऱ्या समर्थभक्तांनी सर्वशृत शिवथरघळीचा फोलपणा आणि सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी संशोधित केलेल्या घळीचा खरेपणा पडताळून सत्याची कास धरण्याची संधी श्रीरामनवमीपासून अनुभवावी, असे आवाहन संशोधनकार्यातील सर्व सहकाऱ्यांनी केले आहे.
SHIVTHAR RASTA1.JPGसमर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीसमोरची नाही
पोलादपूर - समर्थरचित गणपतीची आरती मोरगांवच्या गणपतीला उद्देशून असल्याचे काही समर्थअभ्यासक सांगतात, पण मोरगावचा गणपती सरळसोंड वक्रतुंड नसून सोंड डाव्या बाजूला आहे. म्हणून त्यांचा दावा खोटा आहे. असे सत्याची दिशाभूल करण्याचे अनेक प्रयत्न या मंडळींनी चालविले असल्याचे दिसून येत आहे. ही आरती सुंदरमठामधील आनंदवनभुवनामध्ये रचली असून महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव स्थापन केल्यानंतर या आरतीने गणपतीचे स्तवन समर्थांनी केले, असे प्रतिपादन सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी रामदासपठार येथील सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीनिमित्त आयोजित महोत्सवात प्रवचनावेळी केले.
DASNAVAMI SATKAR1.JPG
`सुंदरमठ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच शिवथरची घळ’ असे असूनही समर्थांची शिकवण महत्वाची आहे हे त्रिकालाबाधित सत्य सांगताना समर्थांच्याच `इति श्रीवनभुवनी नाम मान प्रथम।’ या आज्ञेलाच आनंदवनभुवन सापडले नसल्याने लपवून वेगळेच ठिकाण दाखविण्याचा प्रयत्न तत्कालीन समर्थ साहित्याच्या अभ्यासकांकडून झाला. मात्र, सत्य उघडकीस येऊनही त्यास विरोध करताना काहींकडून समर्थांच्या शिकवणीचाही विपर्यास केला जात आहे, असेही यावेळी अरविंदनाथ महाराज म्हणाले. यावेळी संत नामदेव महाराजांचे 16 वे वंशज माधव महाराज नामदास यांच्यासह धर्मगुरू चोगले, मानेमाऊली, अध्यक्ष सखाराम पवार,आपलं पोलादपूरचे संपादक भगवान साळवी, जयश्री जाधव आणि असंख्य हरिभक्त उपस्थित होते.

समर्थांच्या खर्या शिवथर घळीबाबतचे सद् गुरू अरविंदनाथ महाराज यांचे संशोधन वृत्तपत्र आणि इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचविणारे पत्रकार अभ्यासक शैलेश पालकर यांचा माधवमहाराज नामदास यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
गणेशमूर्ती उंचच उंच का? चुकीचा अर्थ लावल्यानेच
समर्थांची शिकवण जेवढी महत्वाची आहे तेवढेच समर्थांचे वास्तव्य असलेले प्रत्येक स्थान महत्वाचे आहे. मात्र, सत्याला विरोध करणारे मिथ्य सोडण्याचे धारिष्टय़ नसलेले स्वतःला समर्थभक्त म्हणवून खर्या शिवथर घळीच्या पुराव्यासह झालेल्या संशोधनाला उपेक्षित ठेवू पाहात आहेत. अशांवर समर्थांची कृपाच नाही म्हणून ते समर्थांच्या या सुंदरमठामध्ये श्रीदासनवमीला येऊ शकत नाहीत, असे सांगून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी केलेले हे संशोधन समर्थभक्तांसाठी केव्हाही पडताळून स्विकारावे असे सत्य असल्याचे, यावेळी पत्रकार पालकर यांनी सांगितले.

सध्या उंचच उंच गणेशमूर्तीबाबत मूर्तीकारांकडून उंची कमी ठेवण्यासाठीचा आग्रह योग्य आहे. कारण, `समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोही पुरूष सिंधूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासि मोहोछव दाविला। भाद्रपद माघपर्यंत।’ यातील `दोही पुरूष’चा अर्थ काहींनी दोन पुरूष उंचीची गणेशमूर्ती असा लावल्याने गणेशमूर्ती उंचच उंच साकारण्याची मंडळांची स्पर्धा सुरू झाली आहे. ती पूर्णतः अयोग्य असून दोही पुरूष म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याणस्वामी हे होत, अशी माहिती त्यांनी दिली. पालकर यांच्या या अभ्यासपूर्ण माहितीचे माधवमहाराज नामदास यांनी विशेष कौतुक केले.

छ.शिवाजी महाराजांच्याही पत्रातून समर्थ रामदास स्वामींचे स्थान स्पष्ट

RAMNAGAR PETH1.jpg

समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत गेल्यावर्षी १ जानेवारीपासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर आता संशोधनादरम्यान समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांनी नलावडे कोंड याठिकाणी समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य असल्याच्या स्पष्ट उल्लेखाकडे केलेले दूर्लक्षच कारणीभूत असल्याचे उघड झाले आहे.
छ.शिवाजी महाराज यांच्याच एका पत्राचा संदर्भ श्रीसंप्रदायाची कागदपत्रे लेखांक १३ मध्ये पान क्र.२२ वर आला असून त्यामध्ये नलावडे कोंड येथे श्री येऊन राहिल्यामुळे पेठ वसविण्याची आज्ञा केल्याचा इतिहास उघड करीत आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन ... आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....'' या लेखांकामधील नवलवाडीयाचा कोंड म्हणजे नलावडे कोंड याकडे समर्थ अभ्यासकांचे दूर्लक्ष झाल्यानेच शिवथर घळीबाबतचे संशोधन चुकीचे ठरत आहे.
सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची,नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथर तालुक्यातील आहे. कल्याण स्वामींच्या पत्रानंतर आता छ.शिवाजी महाराजांचे पत्रदेखील उपलब्ध झाले असून समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्याबाबत यामध्ये कोंड नलवडा,मौजे पारमाची,ताा. सिवतर असा उल्लेख दिसून येत आहे. या पत्रातील बराचसा मजकूर पारशी भाषेत परंतु मूळ पत्र मोडीमध्ये असल्याची माहिती उपलब्ध असून शके१५९७ भाद्रपद वद्य ८ रोजी हे पत्र लिहिण्यात आले आहे. यातील आज्ञेचा तपशील 'कोड मजकुरी म्हणजे (नलवडा कोड येथे) श्री येउनु राहीलियाउपरी पेठ वसवावयाची आज्ञा केली आणी १२ वर्षे पावेतो दिवाणास हासील माफ म्हणून देवीला....बारा वर्षाउपरी दिवाण हासील देत जाणे कौल असे परवानगी हुजूर मोर्तब सुद' असा आहे. या आज्ञापत्रावर शिवमुद्रा आणि त्र्यंबकसुत मोरेश्वर यांची मोहोर आणि 'मर्यादेय विराजते' अशी मोहोर असून संपूर्ण पत्र एका कारकुनाच्या हातचे 'परवानगी हुजूर' ही अक्षरे दुस-या कारकूनाच्या हातचे तर 'मोर्तब सुद' ही अक्षरे तिस-या कारभा-याच्या हातची आहेत.या पत्रावरून आजतागायत समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य कोठे होते,याबाबतच्या वादावर पडदा पडला असून समर्थांच्या नलवडा कोंड येथील वास्तव्याच्या कालावधीचाही अंदाजही लावण्यास छ.शिवाजी महाराजांनी सुमारे १२ वर्षापर्यंत रामनगर पेठेचा दिवाण हासील माफ करण्याची आज्ञा दिल्यावरून स्पष्ट होत आहे.
आतापर्यंतच्या संशोधनादरम्यान सुंदरमठ, रामवेधीघळ म्हणजेच आनंदवनभुवन म्हणजेच खरी शिवथरघळ,रामगंगा, गुप्तगंगा, खनाळ, देवतार्चनाची जागा, पहिला गणेशोत्सव,जांभळीचा माळ, भटाचा माळ, मठाचा माळ, देवगिरी, घोडउडान, गोविंदमाची, मंडपाचा माळ,बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ तसेच मार्ग सोपान करून जावे, समर्थांचे सिंहासन अशा अनेक संकल्पना पुराव्यानिशी सिध्द झाल्या असून सद्गुरू अरविंदनाथ महाराजांनी अनेकवेळा ख-या शिवथरघळीच्या संशोधनाबाबत वाद न घालता सर्व समर्थभक्तांनी सामंजस्याने वस्तुस्थितीची शहानिशा करून घेण्याचे आवाहन केले आहे.

११-११-११ चा योग! ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा दिवस
JAMBHALICHA MAAL1.JPG
पोलादपूर - समर्थ रामदास स्वामी यांच्या सर्वग्रंथलेखनाची जागा कोणती याबाबत यंदा १-१-११ या वर्षाच्या पहिल्याच दिवसापासून सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाच्या दाव्यापासून सुरू झालेल्या दुमतानंतर समर्थांच्या 'आनंदवनभुवनी' महाकाव्यातील 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी' या कडव्यानुसार दोनपेक्षा जास्तवेळा आलेल्या म्हणजेच बहु ११ अंकाची प्रचिती कार्तिक वद्य प्रतिपदाही आज आल्याने घडत आहे. आजच्या या दुहेरी योगामुळे ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगणारा आजचा दिवस असल्याची नोंद समर्थभक्त शंकर श्रीकृष्ण देव यांच्यापासून सुरू झालेल्या शिवथरघळीच्या शोधाची साशंकता दूर होत असल्याने करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांच्या श्रीसमर्थ आणि समर्थ संप्रदाय या शोधग्रंथात पगडी यांनी दुस-या प्रकरणात पान क्रमांक ११ (पुन्हा ११) पासून 'कल्याणस्वामींचे पत्र' या मथळयाखाली श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७ नुसार उल्लेख केला आहे. KALYANSWAMI- SAMARTH1.JPG
यामध्ये 'छत्रपती शिवाजी महाराजांचा सातारा येथील आजार पाहता ही घटना इ.स. १६७५ ची म्हणावी लागेल. कल्याणस्वामींच्या पत्रात महाराजांच्याही व्यक्तित्वाचे हृदयंगम दर्शन घडते. कल्याणस्वामी म्हणतात.(श्रीसांप्रदायाची कागदपत्रे लेखांक ८७) ''श्रीशिवथरी असता राजश्री छत्रपती यास शरीरव्यथा बहुत कठीण ऐकोन कृपापूर्वक आज्ञा केली की तुझे नाम कल्याण आहे. कल्याणार्थ प्रसाद घेऊन जाणे. प्रसाद घेऊन सातारांच्या दरवाजियास गेलो, तेच समयी राजश्रीस स्वप्न साक्षात्कार झाला की, श्रीकडून कल्याणगोसावी कल्याणार्थ प्रसाद घेऊन आले.जागृत होताच दरवाजियास हुजूरचा सेवक पाठविला. खरे की काय म्हणून परामृश केला. तो आला. तो आपण बैसलोच होतो. त्याच्या भाषणे या चमत्काराची प्रचिती आली. त्या उपरी त्याच समागमे बिऱ्हाड न घेता राजदर्शनास गेलो. राजश्री पलंगावरून उठोन उभे राहून पुढे येऊन वंदनपूर्व प्रसाद घेतला आणि बोलले की, श्रीचा प्रसाद कल्याण गोसावी याबरोबर आला असता कल्याण आहे, म्हणून त्रिवार बोलिले. आणखी काय आज्ञा म्हणून विचारले. काही आज्ञा संकेत होता निवेदन केले. तेप्रसंगी उंबरजेकडे धावणी होऊन् गुरू वळून आणिली होती. सातारियाचे दक्षिण भागी सोनगांवी खिलार होते त्यामधे सीरगावी अकरा गाई होत्या. त्या खिलारात आणिल्या. हे वर्तमान राजश्रीस विदीत केले. तेही हुजूराच्या भृत्याबरोबरी पत्र देऊन अकरा गाई व अकरा वछे देविली. ती सीरगावी नेऊन ठेविली आणि श्रींच्या दर्शनास पारमाचीस शिवथरप्रांती नवलवाडीयाचा कोंड तेथे जांभलीच्या चौथरियावर श्री संतोषरूप बैसले होते...श्रीच्या इच्छेस काय आले ते बोलिले की, 'तुम्ही नि:स्पृह हे प्रयोजन तुम्हास बोलिले नाही. श्रीचे स्थळाची नित्य व वार्षिके महोत्सव व राजगृही प्रसाद नेणे कार्यभाग संपादून घेणे हे सर्व दिवाकर गोसावी यांनी करावे. आर्जव वृत्तीने मागणे नि:स्पृहाचा धर्म नव्हे.''ही आज्ञा कार्तिक वद्य प्रतिपदेची असे कल्याणस्वामी लिहितात. संवत्सराचे नांव दिले नाही....''सेतू माधव पगडी यांनी श्री सांप्रदायाची कागदपत्रांचा उल्लेख करून लिहिलेल्या या प्रसंगाचा दिवस कल्याणस्वामींच्या लिखाणानुसार कार्तिक वद्य प्रतिपदेचा आहे म्हणजेच आज ११-११-११ रोजी आज दोनपेक्षा जास्त वेळा ११ म्हणजे बहुआक्रा आले आहे. याप्रसंगामध्ये श्री संतोषरूप बैसल्याचा उल्लेख ज्या तपशिलासह आहे. तो पारमाची, नवलवाडीयाचा कोंड येथील शिवथरप्रांताचा आहे. सध्या सर्वशृत शिवथरघळीकडे माझेरीमार्गे जाणारा रस्ता हा कावळा किल्ल्यामागील खिंड अलिकडे १९७५ च्या दुष्काळी कामादरम्यान खिंड फोडून तयार करण्यात आला आहे. मात्र, समर्थ रामदासस्वामींचा रस्ता पारमाचीहून जात असल्याचे ख-या शिवथरघळीच्या संशोधनादरम्यान दिसून आले आहे. येथे जांभलीच्या चौथरियावर या उल्लेखानुसार जांभळीचा माळ असा उल्लेख असलेला आणि त्यावर जांभळीची झाडे साडेतीनशेहून अधिक वर्षांपूर्वी एका रेषेत बाग केल्याप्रमाणे लावल्याचे आढळून आले आहे. मंडपाचा माळ, बोरीचा माळ, उंबराचा माळ, फणशीचा माळ, घाणीचा माळ आणि गाराचा माळ असे सातबाराचे उतारे असून तेथे त्या-त्या माळाच्या नावानुसार वैशिष्ठये आढळून आली आहेत. समर्थांचे 'बागप्रकरण' वाचताना समर्थांनी सांगितलेल्या बागेमध्ये काय लावावे? या प्रकरणातील माहितीनुसार अनेक वनस्पतींचे अस्तित्व येथे दिसून आले आहे. आक्रा आक्राची प्रचिती या ख-या शिवथरघळीच्या शोधादरम्यान फार महत्वाची ठरली असून सर्वशृत शिवथरघळीच्या सज्जनगड सेवा समितीने या संशोधनावर केलेली टीकाही ११ मार्च ११ रोजी प्रसिध्द झाली आहे. आजचा बहुआक्राचा आणि कार्तिक वद्य प्रतिपदेचा कल्याणस्वामींनी लिहिलेल्या प्रसंगाचा दिवस एकाचवेळी आला असून समर्थ रामदासस्वामी यांचे बसण्याच्या ठिकाणाचा तपशिलवार उल्लेख या पत्रात असल्याने सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांच्या ख-या शिवथरघळीच्या शोधाची सत्यता सांगण्याचा आजचा दिवस असल्याचे दिसून येत आहे.
RAMDAS PATHAR.jpg
सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी शोधून काढलेल्या स्वयंभू शिवथरघळीची ख्याती सर्वदूर पसरत असल्याने येथे समर्थभक्त दासपरिवाराची दिवसागणिक उपस्थिती वाढत असताना या दासपरिवाराची दिशाभूल करण्यासाठी रामदासपठारकडे अशा दिशादर्शक फलकावरील 'रामदास' या नावावर काळा रंग फासून शिवथरकडे या शब्दाला 'घळईकडे ३ किमी' अशी जोड देत दासबोधातील व्यावहारिकता स्विकारल्याचे दिसून येत आहे. मार्गशीर्ष शुध्द दशमीला समर्थ रामदासस्वामींनी 'आमची प्रतिज्ञा ऐसी। काही न मागावे शिष्यासी। आपणामागे जगदिशासी। भजत जावें॥' ग्रंथराज दासबोधात घातली असा उल्लेख 'समर्थ संप्रदाय' ग्रंथामध्ये शिवथर प्रांतातील बहुशृत घळीचा साशंकतेसह शोध लावणारे समर्थ साहित्याचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव यांनी १२-१०-३४ नुसार नमूद करताना माघांत श्रीसमर्थ गेले आणि ग्रंथराजात ही ओवी त्यांनी मार्गशीर्षांत म्हणजे दोनच महिने आधी घातली, असे श्रीसमर्थशिष्य तंजावरमठपती भीमस्वामी सांगतात. तसे असले किंवा नसले तरी ओवीतच श्रीसमर्थ आपल्या पश्चातच्या काळाचा उल्लेख करीत आहेत, तेव्हा ही त्यांची शेवटची आज्ञा होय, असे मानण्यास प्रत्यवाय नाही. असे पान क्रमांक २७३ वर लिहिले आहे. असे असूनही शंकर श्रीकृष्ण देव यांनी शोधलेल्या शिवथर प्रांतातील प्रचलित घळीमध्ये शनिवार,दि.५ फेब्रुवारी २०११ पासून शनिवार, दि. १२ फेबु्रवारी २०११ पर्यंत ग्रंथराज दासबोधाच्या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.शिवथरप्रांतातील नवलवाडीयाचा कोंड या ठिकाणाला समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे रामदासपठार असे महसूली गावाचे स्वरूप आले असून येथे असलेल्या सुंदरमठाच्या चौथ-याच्या सातबारा उता-यानुसार ही जागा ब्रिटीश काळापासून आजतागायत कायमधारा माफी झालेली आहे तसेच या पठाराच्या सातबारा उता-यामध्ये मठाचा माळ असा उल्लेख आहे तर जेथे स्वयंभू शिवथरघळ आहे त्या भागात भटाचा माळ असा उल्लेख दिसून येत आहे. या स्वयंभू शिवथरघळीचा शोध घेणारे सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी मार्गशीर्ष महिन्याच्या शुध्द दशमीपासून दत्तजयंती व दासबोध जन्मोत्सवाचे आयोजन श्रीक्षेत्र शेंदूरमळई येथे केले होते. शुक्रवारी स्वयंभू शिवथरघळीमध्ये पोलादपूर तालुक्यातील अरविंदनाथ महाराजांच्या भक्तगणांनी दासबोध पारायणाची यशस्वी सांगता केली.
यावेळी दररोज सुमारे ३०० हून अधिक दासभक्तांची उपस्थिती या स्वयंभू शिवथर घळीचे दर्शन घेण्यास लाभत असल्याचे दिसून आले. या दासभक्तांची दिशाभूल करण्यासाठी शिवथर प्रांतातील बहुशृत घळीच्या परिसरातील काही प्रतिष्ठित लोकांना कमिटीवर अचानक संधी देऊन स्वयंभू शिवथरघळीला आमच्या घळीचे नांव देऊ नका, अशी चिथावणी नामानिराळे राहू पाहणा-या बोलवित्या धन्यांनी दिली आहे. त्यामुळे या परिसरातील लोकही रामदासपठारकडे जाणा-या दासभक्तांना घळ मागे राहिली, असे सांगून गाडया सर्वशृत शिवथरघळीकडे नेण्यास प्रवृत्त करीत आहेत. यामुळे काहीसा तणाव या भागात दिसून येत असून स्थानिकांना आपसात लढवून स्वत:ची पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न शंकर श्रीकृष्ण देव यांना साशंकतेसह आढळून आलेल्या घळीच्या संचालकांकडून केला जात आहे.
एकूणच, ज्यांना स्वयंभू शिवथर घळीबाबत सत्यता पडताळून पाहावयाची आहे, त्यांनी विद्वान परिषदेचे आयोजन करून विचारमंथन करून खात्री करून घ्यावी, असे आवाहन या पार्श्वभूमीवर सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी पुणे येथील 'जनरेशन नेक्स्ट' या सिटी चॅनेलसोबत वार्तालापादरम्यान केले आहे.
शैलेश पालकरDASNAVAMI SATKAR1.JPGSHIVTHAR RASTA1.JPG

गुलमोहर: 

शिवाजी महाराज जन्मतारिख १६२७ की १६३०
शिवजयंती सरकारी तारखे प्रमाणे की तिथि प्रमाणे
शिवाजी महाराजांचे उत्तराधिकारी दोन कोल्हापुर आणि सातारा
दोन शिवसेना एकमेकांविरुध्द लढत आहेत.
आता दोन शिवतरघळी आणि त्यावर वाद

मराठी माणसांनो, आपणच आपली ताकद असल्या गोष्टीत खर्ची करायची का ?
कोइंबतुरला १२०० तमिळ लेखक कविंचे संमेलन होते त्यात अतामिळ माणसाला कोणतेच स्थान नाही. काही परदेशी माणसे यात सामिल होती ज्यांनी तामिळ भाषेवर संशोधन केले होते पण या परिषदेत रजनिकांतला स्थान नव्हते. केवळ मुळचा तामिळ नाही म्हणुन रजनिकांतला द्र्मुक किंवा अण्णाद्रमुक पक्ष विधानसभेचे तिकीट देत नाही.
याबाबत टोकाची दरी असलेल्या दोन पक्षात एकमत होते.

पुण्याच्या साहित्य संमेलनात मात्र अमिताभ बच्चन येतात आणि मोडक्या तोडक्या मराठीत मी मराठीच आहे म्हणल की आपण भुलतो?

Amitabh.jpg

गरज आहे संत रामदासांविरुध्द गरळ ओकणार्‍या त्यांना आदिलशाहीचे हस्तक म्हणवणार्‍यांविरुध्द आवाज उठविण्याची.

त्याच बरोबर हा चालु वाद तातडीने संपवण्याची. मराठी नसलेल्या वाहिन्या याला प्रसिध्दी देतील हो. त्यांना असले हवेच आहे.

पालकर साहेब, अनेक वर्ष ज्या घळीला शिवथरघळ म्हणुन ओळखल जात. त्या ठिकाणी अनेक धार्मिक उपक्रम चालतात ती शिवथरघळ नाहीच अस म्हणण कोणाला रुचेल. तुम्ही इथे उपक्रम करा. पण ही अस्सल शिवथर घळ न म्हणता. आपले ध्येय जर समर्थ रामदास यांचा विचार प्रचार करण्याचे असेल तर स्थान मुळ कोणते म्हणुन भांडणे योग्य आहे का ?

जननी जन्मभूमि चे महत्त्व का नाकारता? आम्ही सांगतो ते स्थान केवळ दासबोधाचे जन्मस्थान आहे म्हणून की कोण्या माणसाचे जन्मस्थान नाही म्हणून? सावरकरांना जन्मभूमि का महत्वाची वाटली? तुम्हाला हे लेखन भांडण अथवा वाद का वाटते?
या लेखाच्या सुरुवातीस रामदास पठार शब्दातील रामदास शब्दांवर काला रंग फासन्याच्या कृतिवरून ज्या वेदना व्हाव्यात त्या संवेदना संपल्या असल्या तर जननी जन्मभूमिचे महत्त्व नाही पटले तर आश्चर्य वाटणार नाही. अशी जाणीव या लेखावरील प्रतिक्रिया वाचून होते. जन्माचा सम्बन्ध आई या भावनेशी आहे. ही भावनाच का संपली? यासाठी स्वातंत्र्यापुर्वी हिन्दुस्तानात पाकिस्तान समाविष्ट होता म्हणून आपण मातृभूमि-जन्मभूमि तो देश मानाल? नाही ना? मग जोपर्यंत समर्थांच्या सर्वग्रन्थ लेखनाची जागा निश्चित नव्हती. तोपर्यंतच अनेक वर्ष ज्या घळीला शिवथरघळ म्हणुन ओळखल जात. त्या ठिकाणी अनेक धार्मिक उपक्रम चालतात हे रुचेल. पण समर्थांच्या सर्वग्रन्थ लेखनाची खरी जागा जन्मभूमि शोधल्यानंतर रामदास पठार शब्दातील रामदास शब्दांवर काला रंग फासन्याच्या कृतीला खोट्या जन्मभूमिसाठी चक्क दासबोधाच्या निर्मात्याच्या नावावर काला रंग लावला गेला हा संवेदना संपल्याचे लक्षण आणि पाकिस्तानला जन्मभूमि मानण्याचा औदार्यपूर्वक विचार मांडण्याचा प्रकार आहे. १८५७ पासून क्रांतिकारक देशप्रेमी ब्रिटिशांविरूद्ध लढत होते... आणि १९४७ साली हिंदुस्तान स्वतंत्र होण्याची लक्षणे दिसली. पण पहिला स्वतंत्र झाला पाकिस्तान. मग ब्रिटिशांविरूद्ध लढ़णारे क्रांतिकारक देशप्रेमी पाकिस्तानच्या स्वतंत्रतेसाठी बलिदानास तयार झाले होते काय? तसे म्हणणे बलिदानाचा अपमान आहे ना? या बलिदानानंतर भारत स्वतंत्र झाला. मग ज्यानी संशोधन केले ते शिवथरघळीचे जे साशंकता पूर्ण होते आणि आम्ही त्या शंका लक्षात घेवुन जे संशोधन केले आणि आम्हाला सुंदरमठ आणि आनंद वनभुवन हे सर्व ग्रन्थ लेखनाचे स्थान सापडले आता संशोधनाचे मुळ शिवथरघळीचे साशंकता पूर्ण संशोधन हेच आहे त्यामुळ त्याच संशोधकांच्या साशंकतापूर्ण शोधातील शंका दूर करणारी ठिकाणे आम्ही शोधली आहेत. असत्य पाहिलेत आता सत्यही मानायला शिका की! त्यामुले पहिले जे सापडले त्यासाठी संशोधन सुरु नव्हते तर आता जे शोधले त्यासाठीच हे संशोधन कार्य समर्थ भक्तांनी केले. हे देखिल स्विकारावे असे वाटत नाही? हे समर्थ भक्तांचे नव्हे तर समर्थ द्रोहिंचे लक्षण आहे, असे का वाटत नाही?

शैलेश, आपण जे आनंदवनभुवनी काव्याबद्दल लिहिले आहे ते आणि मंगेशकरांनी गाईलेले काव्य हे एकच आहे का ? मी या आधी देखील मंगेशकरांच्या निरूपणा बद्दल विचारले होते.
आपण किंवा आणखी कोणी यावर प्रकाश टाकू शकेल का ?

या आधी देखील मंगेशकरांच्या निरूपणा बद्दल विचारले होते.
आपण किंवा आणखी कोणी यावर प्रकाश टाकू शकेल का ?

>>>

मंगेशकर खोटारडे आहेत ....समर्थ द्रोहि आहेत .. समर्थांच्या नावाचा वापर करु माया जमवलीये त्यांन्नी ....ते इतके वर्ष लोकांचा बुध्दी भेद करत आहेत ..आमचीच घळ खरी आहे ...तुमची घळ डुप्लीकेट ...चायना मेड ...खोटा माल आहे ...

शैलेश, आपण जे आनंदवनभुवनी काव्याबद्दल लिहिले आहे ते आणि मंगेशकरांनी गाईलेले काव्य हे एकच आहे का ? मी या आधी देखील मंगेशकरांच्या निरूपणा बद्दल विचारले होते.
आपण किंवा आणखी कोणी यावर प्रकाश टाकू शकेल का ?

>>>

मंगेशकर खोटारडे आहेत ....समर्थ द्रोहि आहेत .. समर्थांच्या नावाचा वापर करु माया जमवलीये त्यांन्नी ....ते इतके वर्ष लोकांचा बुध्दी भेद करत आहेत ..आमचीच घळ खरी आहे ...तुमची घळ डुप्लीकेट ...चायना मेड ...खोटा माल आहे ...

काय चालले आहे हे?

मंगेशकरांच्या निरूपणाबद्दल एवढाच प्रकाश टाकू की आपण म्हणता तसे मंगेशकरांनी गाईलेले हे काव्य आहे. पण आपणास समर्थानी हे ५९ कड़व्यांचे हे काव्य लिहिले आहे हे माहीत असल्यास मंगेशकरांनी गाईलेले हे काव्य केवळ ७ ते ८ कड़व्यांचे आहे. आपण या गायनावरिल भाष्याला निरूपण का म्हणावे? समर्थांना समजेल तो समर्थ आणि आता त्यांच्या बाबतच्या आम्ही केलेल्या संशोधनावर टिका करणारे (अर्थातच आमच्या संशोधनाची खातरजमा केल्याशिवाय!) हे देखिल समर्थच! पण आम्ही ` मंगेशकर खोटारडे आहेत ....समर्थ द्रोहि आहेत .. समर्थांच्या नावाचा वापर करु माया जमवलीये त्यांन्नी ....ते इतके वर्ष लोकांचा बुध्दी भेद करत आहेत ..आमचीच घळ खरी आहे ...तुमची घळ डुप्लीकेट ...चायना मेड ...खोटा माल आहे" असे कधीच म्हणालो नाही. आम्ही अनेक वेळा तुम्ही म्हणता ती `तुमची घळ डुप्लीकेट ...चायना मेड ...खोटा माल आहे' ही घळ पाहिली आणि अभ्यासली आहे. पण तेथे ज्यांच्या भावना गुंतल्या आहेत. त्या भावना संशोधनात विचारात घेता येत नाहीत. सेतु माधव पगड़ी यांचे समर्थ आणि समर्थ सम्प्रदाय पुस्तक वाचा. पगड़ी म्हणतात शंकर श्रीकृष्ण देव यांचा समर्थ ह्रदय ग्रन्थ वाचला पण ते संशोधनाऐवजी समर्थान्प्रती भावोक झालेले दिसतात. म्हणून मी इतिहास संशोधन करण्याकडे वळलो. याच देवांनी तुमच्या भावना गुंतल्या आहेत. त्या घळइचा शोध लावला आहे. आम्ही हा दोष दूर केला त्यामुळ आपल्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. मना सज्जना... म्हणा आणि मनावर ताबा मिळवा.

वरंधजवळील रामगंगा धबधबा अन् गुप्तगंगा दर्शन वर्षापर्यटकांना पर्वणी!
Full Ghalai1234.jpg
महाड ते पुणे महामार्गावर वरंध घाटामधून माझेरीजवळच्या कावळा किल्ल्याच्या मागे रामदासपठारकडे जाणा-या रस्त्यावरून रामदासपठारकडे गेल्यानंतर तेथून काही मिनिटांच्या अंतरावर पावसाचे जलतुषार अंगावर घेत वर्षासहलीचा आनंद घेताना समर्थ रामदासस्वामींच्या आनंदवनभुवनालगतचा रामगंगा धबधबा यंदा समर्थभक्तांसह पर्यटकांनाही पर्वणी ठरणार आहे. येथील गुप्तगंगेचे दर्शनही दासबोधातील वर्णनानुरूप आहे, याचा प्रत्यय प्रत्यक्षदर्शीना यानिमित्ताने येऊ शकेल. याठिकाणी केलेले पर्यटन म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन आल्याचा अनुभव असेल, असे समर्थांनी आनंदवनभुवन काव्यामध्ये वर्णन केले आहे. 'स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी। तीर्थासि तुळणा नाही। आनंदवनभुवनी।' या कडव्यामध्ये समर्थांनी आकाशातून लोटल्यासारख्या वाटणा-या जलप्रपाताचे वर्णन केले आहे. या जलप्रपाताचे उगमस्थान नसल्याने लोटली असा शब्दप्रयोग केला आहे. हा जलप्रपात 'रामवेधी निरंतरी।' म्हणजेच येथे असलेल्या घळीचा आकार प्रवेशद्वारापासून अंतरभागापर्यंत रामाच्या धनुष्यासारखा अर्धवर्तुळाकार आहे, या घळीच्या जवळचा हा जलप्रपात असलेला धबधबा आहे; म्हणून या धबधब्याला समर्थ 'रामगंगा' असे म्हणतात. गंगानदी ज्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते; त्याप्रमाणे हा धबधबा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात असल्याने या धबधब्यास घळीच्या 'रामवेधी' आकारानुसार राम आणि जलप्रवाहाच्या दिशेनुसार गंगा असा 'रामगंगा' उल्लेख समर्थांनी केला आहे. या रामगंगा धबधब्याकडे पाहून या आनंदवनभुवन काव्यातील 'उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया। जप तप अनुष्ठाने। आनंदवनभुवनी।' या कडव्याची सार्थता येथे येणा-यांस जाणवते. या धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे साधारणत: १५ फूट लांब आणि ९ फूट रूंदीचे सपाट कातळ दिसून येते. सुर्याचे दक्षिणायन सुरू होताना स्नानसंध्या, जप, तप आणि अनुष्ठाने तसेच पुरश्चरणं करण्यास समर्थ रामदासस्वामींना या रामगंगा धबधब्याच्या उदंड पाण्याचा उपयोग होत असल्याचा या कडव्याचा अर्थ येथे वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांना नक्कीच अनुभवता येईल.समर्थ प्रतापातील गिरीधरस्वामीलिखित उल्लेखानुसार तसेच 'समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन। सूर्यप्रकाश सन्निध उदक उर्ध्वगमन। मार्ग सोपान करूनी जावे॥ समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या जलप्रपातास समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.येथे असलेल्या गुप्तगंगेचा उल्लेखही ' ग्रंथी जी वर्णिली मागे। गुप्तगंगा महानदी। जळात रोकडे प्राणी। आनंदवनभुवनी॥' समर्थकृत आनंदवनभुवनी कवनामध्ये दिसून येते. यात समर्थांच्या सर्वग्रंथलेखनात श्रीमद दासबोध हा ग्रंथ आहे. यामध्ये ज्याप्रमाणे गुप्तगंगेचे वर्णन करण्यात आले आहे. त्यावर्णनानुसार येथील गुप्तगंगा आहे, हे या वर्षापर्यटनादरम्यान पडताळून पाहता येईल. येथेदेखील गंगानदी ज्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते; त्याप्रमाणे दासबोधातील दशक अकरावे- समास सातवा मध्ये वर्णन केल्यानुसार 'केवळ अचंचळी निर्माण जाली। अधोमुखें बळें चालिली। अखंड वाहे परी देखिली। नाहींच कोणी।' अशा या गुप्तगंगेमध्ये 'वळणें वाकाणें भोवरे। उकळया तरंग झरे। लादा लाटा कातरे। ठाईं ठाई॥ शुष्क जळाचे चळाळ। धारा धबाबे खळाळ। चिपळया चळक्या भळाळ। चपळ पाणी॥ फेण फुगे हेलावे। सैरावैरा उदक धावे। थेंब फुई मोजावे॥ अणुरेणू किती॥ वोसाणे वाहती उदंड। झोतावे दकटे दगड। खडक बेटे आड। वळसा उठे॥ मृद भूमी तुटोन गेल्या। कठीण तैश्याच राहिल्या। ठाईं ठाईं उदंड पाहिल्या। सृष्टीमध्ये।' अशाप्रकारची वर्णने यादीनुसार प्रत्यक्ष पाहण्यास मिळतात. यातही सर्वात महत्वाचे म्हणजे या समासात म्हटल्याप्रमाणे 'येक बळाचे निवडले। ते पोहतचि उगमास गेले। उगमदर्शने पवित्र जाले। तीर्थरूप॥ तेथें ब्रह्मादिकांची भुवनें। ब्रह्मांडदेवतांची स्थाने। उफराटी गंगा पाहातां मिळणे। सकळांस तेथे॥' पर्यटकांनी या गुप्तगंगेच्या प्रवाहाविरूध्द वाटचाल केली की, समोरच आनंदवनभुवन असल्याचे पाहण्यास मिळते. हा मार्ग मात्र, वरंध कुंभारकोंड येथून आनंदवनभुवनाकडे पायी चालत जाण्याचा आहे.समर्थांच्या ख-या शिवथरघळीचा शोध सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी यंदा ११२०११ रोजी तमाम समर्थभक्तांना नववर्षभेट दिल्यानंतर येत्या शनिवारी, ११ जून २०११ रोजी ज्येष्ठ शुध्द दशमीला गंगेचे स्वर्गातून भूतलावर आगमन झाल्याचा दिवस गंगादशमी आहे. यादिवशी अन् त्यापुढेदेखील समर्थांच्या रामगंगा आणि गुप्तगंगा या माहानद्यांचे दर्शन घेण्याची पर्वणी या पावसाळयापासून वर्षासहलींच्या पर्यटकांप्रमाणेच समर्थभक्तांनादेखील उपलब्ध होणार आहे. ghal 123.jpgDhabdhaba 2.jpgGUPT GANGA.jpg

आपण पत्रकार आहात का? असल्यास कुठल्या वर्तमानपत्रासाठी अथवा टीव्ही चॅनलसाठी आपण काम करता? आपला "बीट" कुठला?

आपण मुक्त पत्रकार असाल तर आतापर्यंत आपले लिखाण कुठे प्रसिद्ध झाले आहे?

वरील सद्गुरू अरविंद महाराज याबद्दल जास्त माहिती मिळू शकेल का? त्याचा व्यवसाय कुठला? तसेच, वरील सर्व संशोधनासाठी त्याना कुणीकुणी सहकार्य केले? त्याचा स्वतःचा पीआरओ आहे का? असल्यात कृपया त्याचा सपंर्क देणे.

धन्यवाद.

आपल्या प्रश्नांमध्ये समर्थ नाहित. पण तरीही त्यावर उत्तरे देण्यास आम्ही असमर्थ नाही.
>आपण पत्रकार आहात का? असल्यास कुठल्या वर्तमानपत्रासाठी अथवा टीव्ही चॅनलसाठी आपण काम करता? आपला "बीट" कुठला?
मी मुक्त पत्रकार आहे, महाराष्ट्रातील किमान ४८ दैनिक आणि साप्ताहिकामधून माझे लेखन नियमित प्रसिद्द होते. चार वेबसईट देखिल माझ्या बातम्या प्रसिद्द करतात. माझा कोणत्याही टिव्ही चनेलशी सम्बन्ध नाही. पण माझ्या या अभ्यासाबाबत सहारा समय टिव्ही चानेलऩे थेट प्रक्षेपण प्रसारित करून मुलाखत घेतली आहे.

>आपण मुक्त पत्रकार असाल तर आतापर्यंत आपले लिखाण कुठे प्रसिद्ध झाले आहे?
महाराष्ट्रातील सद्गुरु गणेशनाथ महाराज संस्थान आलंदी, शेंदुरमलई यांचे प्रमुख अरविन्दनाथ महाराज हे गेली २५ वर्षे यावर अभ्यास करीत आहेत. त्यांना याव्यतिरिक्त व्यवसायाची गरज नाही. त्यांना आतापर्यंत सहकार्याऐवजी असहकारच अनुभवावा लागला आहे. त्यांचा पीआरओ कोणीही नाही. आध्यात्मिक क्षेत्रात जे शंशोधन होते ते संशयास्पद मानण्याची आणि अशा सन्शोधकाना थोतांड मानण्याची नव्या पत्रकारांची शोध पत्रकारिता सुचविते. वरील सर्व संशोधनासाठी त्याना मी स्वत सहकार्य केले आहे. आपण अधिक माहितीसाठी मला संपर्क साधू शकता. ९२२६८४९१८५ / ९८९०३२०१२७
http://realshivtharghal.blogspot.com/

>वरील सद्गुरू अरविंद महाराज याबद्दल जास्त माहिती मिळू शकेल का? त्याचा व्यवसाय कुठला? तसेच, वरील सर्व संशोधनासाठी त्याना कुणीकुणी सहकार्य केले? त्याचा स्वतःचा पीआरओ आहे का? असल्यात कृपया त्याचा सपंर्क देणे.

धन्यवाद.

आध्यात्मिक क्षेत्रात जे शंशोधन होते ते संशयास्पद मानण्याची आणि अशा सन्शोधकाना थोतांड मानण्याची नव्या पत्रकारांची शोध पत्रकारिता सुचविते.>>>

वरील वाक्यासाठी योग्य ते संदर्भ द्या.

महाराष्ट्रातील किमान ४८ दैनिक आणि साप्ताहिकामधून माझे लेखन नियमित प्रसिद्द होते. चार वेबसईट देखिल माझ्या बातम्या प्रसिद्द करतात.>> याची यादी देऊ शकाल का? आपण पत्रकार संघाचे सदस्य आहात का?

आणि सर्वात महत्त्वाचे, जे काय उत्तर द्यायचे ते इथेच द्या. मी इथे येऊन वाचेन. मला व्यक्तिगत संपर्कामधून मेल पाठवण्याची आवश्यकता नाही.

धन्यवाद.

आपल्या प्रश्नावलित पुन्हा समर्थ दिसून येत नाहीत.
माझ्या बातम्या प्रसिद्द होत असलेल्या चार वेबसईट व् वृत्तपत्रांची यादी मी देवू शकतो. मी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचा गेली १४ वर्षे सदस्य आहे.
आध्यात्मिक क्षेत्रात जे संशोधन होते ते संशयास्पद मानण्याची आणि अशा सन्शोधकाना थोतांड मानण्याची नव्या पत्रकारांची शोध पत्रकारिता सुचविते.>>>

वरील वाक्यासाठी योग्य ते संदर्भ द्या. खालिल भूमिकेत असेच जाणवते.

सर्व संशोधनासाठी त्याना कुणीकुणी सहकार्य केले? त्याचा स्वतःचा पीआरओ आहे का? असल्यात कृपया त्याचा सपंर्क देणे.
आणि सर्वात महत्त्वाचे, जे काय उत्तर द्यायचे ते इथेच द्या. मी इथे येऊन वाचेन. मला व्यक्तिगत संपर्कामधून मेल पाठवण्याची आवश्यकता नाही.
आध्यात्मिक क्षेत्रात जे संशोधन होते ते संशयास्पद मानण्याची आणि अशा सन्शोधकाना थोतांड मानण्याची नव्या पत्रकारांची शोध पत्रकारिता सुचविते.
ना संशोधक थोतांड आणि त्यास प्रसिध्ही देणारे आम्ही. थोतांड. आता जरा समर्थंविषयी आणि आमच्या संशोधना विषयी वीचाराल काय?


सद गुरु अरविंद नाथ महाराज काय म्हणतात आणि मी काय लिहितोय ते संशयास्पद नसून समर्थांचीच `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' अशी आज्ञा आहे. ती समर्थ परिवाराने शीरसावंज्ञ मानावी. एवढेच सांगणे आहे. या साठी अवश्य वाचा
http://www.maayboli.com/node/23327
http://realshivtharghal.blogspot.com
समर्थांचीच `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' अशी आज्ञा आहे
ही आदन्या समर्थांनी कधी केली? कोठे आहे तो उल्लेख? कोठे आहे ते आनंदवनभुवन? असे काही प्रश्न आपनाकडून अपेक्षित आहेत.

धबधबे सांगतात समर्थांचे वास्तव्य...! हेळवाकला 'गिरीचे मस्तकी गंगा...'
महाड तालुक्यातील सर्वशृत शिवथरघळीलगतच्या जवळच्या धबधब्याला 'गिरीचे मस्तकी गंगा...' हे समर्थांचे काव्य लागू असल्याचे सांगितले आहे. मात्र, अलिकडेच, ख-या शिवथर घळीचा शोध लागताना अनेक खोटया संकल्पनाही उघड होऊ लागल्या आहेत. यामध्ये चिपळूणजवळील हेळवाकच्या घळीलगतच्या धबधब्याचे वर्णन समर्थांनी 'गिरीचे मस्तकी गंगा...' असे केल्याचे समर्थ वाङमयाद्वारे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, सर्वशृत शिवथरघळीलगतच्या धबधब्याला 'खुटयाचा विरा' असे त्याकाळी नांव होते, अशीही पुराव्यासह माहिती हाती लागली आहे.
हेळवाकच्या धबधब्याचे वर्णन...'गिरीचे मस्तकी गंगा।...'
चिपळूणमार्गे कुंभार्ली घाटातून कोयना जलविद्युत केंद्राच्या वर घाटमाथ्यावर आल्यानंतर तिथल्या हनुमंतमंदिरापासून अनेक धबधबे दिसून येतात. हेळवाळ गावाजवळील रामघळीकडे जाताना कोंढावळयाच्या धनगरवाडीवर थांबून घनदाट जंगलातून वाट काढावी लागते. काही अंतरावर एका कपारीवरून थेट दरीमध्ये कोसळणा-या एका जलप्रपाताचे म्हणजेच धबधब्याचे दर्शन होते. ही कपारी म्हणजेच रामघळ जी समर्थ रामदासस्वामींनी चिंतनासाठी उपयोगात आणली. सुमारे सव्वाशे फूट उंचावर एका खोल दरीलगतच्या घळीत शंकराच्या एका पिंडीखेरिज काहीच नाही. या रामघळीबाबत इतिहाससंशोधक सेतू माधव पगडी यांच्या 'समर्थ आणि समर्थ संप्रदाय' या चिंतन ग्रंथामध्ये ६ व्या पानावर 'गिरीचे मस्तकी गंगा। तेथुनी चालली बळे। धबाबा लोटती धारा। धबाबा तोय आदळे। गर्जतो मेघ सिंधु। ध्वनी कल्लोळ उठिला। कडयासी आदळे धारा। वात-आवरक्त होतसे। तुषार उठती रेणू। सीत मिश्रित धुकटे। दराची तुटला मोठा।' हे हेळवाळच्या धबधब्याचे वर्णन असल्याचे नमूद केले आहे. जे येथे येऊन अनुभवावे असेच आहे. याच ग्रंथातील १२४ पानावर गद्यपत्रे प्रकरणात सेतू माधव पगडी यांनी समर्थांनी इ.स.१६७४ मधील रघुनाथभटांना उद्देशून खास त्यांच्या हस्ताक्षरामध्ये लिहिलेल्या पत्रातील मजकूरामध्ये हेळवाकच्या घळीत चातुर्मासांत समर्थांना सीतळाईचा म्हणजेच हेळवाकच्या धबधब्याच्या कर्कश्य आवाजासोबतच्या बोच-या थंडीचा त्रास झाला असताना रघुनाथभटांनी समर्थांना चाफळ या उष्ण स्थळी पाठविल्याबद्दल विनम्रतापूर्वक आभार मानत असल्याचा उल्लेख आहे.
'खुटयाच्या विरा'ला 'गिरीचे मस्तकी गंगा।...'ची खोटी उपमा
समर्थ रामदास स्वामींचे वास्तव्य सर्वग्रंथलेखन काळात कुंभेजाईदेवीलगतच्या लोकवस्तीत असल्याचे साशंकतेसह सांगणारे समर्थ वाङमयाचे गाढे अभ्यासक शंकर श्रीकृष्ण देव तथा नानासाहेब देव यांनी महाड तालुक्यातील या आंबेजाईच्या लगतच्या लोकवस्तीला आंबेशिवथर असे म्हटले आहे अन् येथील घळीला शिवथरघळ म्हणताना जवळच्या धबधब्याला 'गिरीचे मस्तकी गंगा...' हे समर्थांचे काव्य लागू असल्याचे सांगितले आहे. मात्र, या धबधब्याबाबत 'राजधानी रायगड' या भारत इतिहास संशोधक मंडळ ग्रंथमाला क्र.२४ मध्ये विष्णू वासुदेव जोशी लिखित या ग्रंथामध्ये सर्वशृत शिवथरघळीच्या संशोधनाच्या काळातील वर्णनाचा उल्लेख दिसून येतो. ११८ व्या पानावरील १६ व्या प्रकरणात 'शिवतराच्या आग्नेयेस २ फर्लांगावर डोंगराच्या पायथ्याशीच दरडीत एक घळई आहे. घळ लेण्यांप्रमाणे खडकांत खोदली असून यात अनेक खोल्या आहेत. हल्ली त्या खोल्या नादुरूस्त व अंध:कारमय आहेत. घळईत शेजारी पाण्याचा लहानसा झोत पडतो. घळईच्या शेजारी हा 'खुटयाचा विरा' नावाचा ओढा आहे.' असे वर्णन असून तेव्हा शिवथरघळीशेजारी पाण्याचा लहानसा असलेला झोत आता प्रचंड कसा झाला. याबाबत या निर्जन ठिकाणी 'हे वर्णन शिवथरचे की चाफळचे की दोन्ही ठिकाणचे किंवा आपणास अद्याप माहिती नसलेल्या तिस-याच शिवथरघळीचे' अशी स्वत: संशोधक शंकर श्रीकृष्ण देवांनी व्यक्त केलेली साशंकता दूर करण्याचे काही प्रयत्न झाल्याने हा खुटयाचा विरा आता जीवघेणा जलौघ झाला आहे. या धबधब्यात पडलेले महाकाय पाषाण पुन्हा जागचे जागी लावले तर पुर्वीचा 'खुटयाच्या विरा' हा पाण्याचा लहानसा झोत होता हे दिसून येईल. हा 'गिरीचे मस्तकी गंगा।...'ची खोटी उपमा देण्यासाठी झालेला प्रयत्न प्रत्यक्षात येथे येणारे समर्थभक्त सर्वांगाने भिजतात; तर समर्थांनी लिहिलेला दासबोध कसा सुका राहिल? मग तो समर्थभक्तांना वाचण्यास कसा मिळेल? याबाबतची नवीन सहजसुलभ शंका निर्माण करतो.
रामदासपठार येथील 'रामगंगा' धबधबा रामवेधी आकाराच्या 'आनंदवनभुवन'लगत
RAMGHAL.jpg
महाड ते पुणे महामार्गावर वरंध घाटामधून माझेरीजवळच्या कावळा किल्ल्याच्या मागे रामदासपठारकडे जाणा-या रस्त्यावरून रामदासपठारकडे गेल्यानंतर तेथून काही मिनिटांच्या अंतरावर पावसाचे जलतुषार अंगावर घेत वर्षासहलीचा आनंद घेताना समर्थ रामदासस्वामींच्या आनंदवनभुवनालगतचा रामगंगा धबधबा यंदा समर्थभक्तांसह पर्यटकांनाही पर्वणी ठरणार आहे. येथील गुप्तगंगेचे दर्शनही दासबोधातील वर्णनानुरूप आहे, याचा प्रत्यय प्रत्यक्षदर्शीना यानिमित्ताने येऊ शकेल. याठिकाणी केलेले पर्यटन म्हणजे तीर्थक्षेत्री जाऊन आल्याचा अनुभव असेल, असे समर्थांनी आनंदवनभुवन काव्यामध्ये वर्णन केले आहे.'स्वर्गीची लोटली जेथे। रामगंगा माहानदी। तीर्थासि तुळणा नाही। आनंदवनभुवनी।' या कडव्यामध्ये समर्थांनी आकाशातून लोटल्यासारख्या वाटणा-या जलप्रपाताचे वर्णन केले आहे. या जलप्रपाताचे उगमस्थान नसल्याने लोटली असा शब्दप्रयोग केला आहे. हा जलप्रपात 'रामवेधी निरंतरी।' म्हणजेच येथे असलेल्या घळीचा आकार प्रवेशद्वारापासून अंतरभागापर्यंत रामाच्या धनुष्यासारखा अर्धवर्तुळाकार आहे, या घळीच्या जवळचा हा जलप्रपात असलेला धबधबा आहे; म्हणून या धबधब्याला समर्थ 'रामगंगा' असे म्हणतात. गंगानदी ज्याप्रमाणे उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते; त्याप्रमाणे हा धबधबा उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहात असल्याने या धबधब्यास घळीच्या 'रामवेधी' आकारानुसार राम आणि जलप्रवाहाच्या दिशेनुसार गंगा असा 'रामगंगा' उल्लेख समर्थांनी केला आहे. या रामगंगा धबधब्याकडे पाहून या आनंदवनभुवन काव्यातील 'उदंड जाहले पाणी। स्नानसंध्या करावया। जप तप अनुष्ठाने। आनंदवनभुवनी।' या कडव्याची सार्थता येथे येणा-यांस जाणवते. या धबधब्याचे पाणी जेथे कोसळते तेथे साधारणत: ३५ फूट लांब आणि १९ फूट रूंदीचे सपाट कातळ दिसून येते. सुर्याचे दक्षिणायन सुरू होताना स्नानसंध्या, जप, तप आणि अनुष्ठाने तसेच पुरश्चरणं करण्यास समर्थ रामदासस्वामींना या रामगंगा धबधब्याच्या उदंड पाण्याचा उपयोग होत असल्याचा या कडव्याचा अर्थ येथे वर्षासहलीसाठी आलेल्या पर्यटकांना नक्कीच अनुभवता येईल.समर्थ प्रतापातील गिरीधरस्वामीलिखित उल्लेखानुसार तसेच 'समर्थे पर्वती केले येक गुप्तसदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन। सूर्यप्रकाश उदक सन्निध उर्ध्वगमन। मार्ग सोपान करूनी जावे॥ समर्थ प्रताप गिरीधरस्वामींनी समर्थ रामदास स्वामींच्या या सदनाचे वर्णन केले आहे. हे सदन पर्वतावर आहे, गुप्त आहे, तेथे प्रसंगी देवार्चन म्हणजेच देवघर ठेवता येते, सूर्यप्रकाश सन्निध आहे, म्हणजेच या गुप्तसदनाला पूर्व-पश्चिमेचा उगवतीचा व मावळतीचा सूर्यप्रकाश समोर आहे, उदक म्हणजे या रामगंगा धबधबा समोर ठेऊन उर्ध्वगमन म्हणजेच उर्ध्व दिशेने जावे आणि यासाठी मार्ग सोपा करून सोपान म्हणजे शिडीसारखे चढून जावे, अशी वर्णनानुरूप परिस्थिती आढळते.GIRICHE MASTAKI GANGA1.jpg

आपल्या प्रश्नांमध्ये समर्थ नाहित. पण तरीही त्यावर उत्तरे देण्यास आम्ही असमर्थ नाही. >>>

काय नौटन्की आहे? समर्थभक्ताला अशी डायलोगबाजी शोभत नाही!!

साधा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देताना पण उगाचच समर्थान्ना गुन्तवायची काही गरज आहे का?

खरच समर्थ अश्या लोकान्ची "गुन्तवणुक" च झाले आहेत.

--------

खर तर इथे प्रतिसाद देउन TRP नाही वाढवायचा. पण अगदिच नाहि राहवले म्हणुन!!

काय नौटन्की आहे? साधा प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देताना पण उगाचच समर्थान्ना गुन्तवायची काही गरज आहे का? खरच समर्थ अश्या लोकान्ची "गुन्तवणुक" च झाले आहेत. खर तर इथे प्रतिसाद देउन TRP नाही वाढवायचा. पण अगदिच नाहि राहवले म्हणुन!!
>>>समर्थ रामदास स्वामींची खरी शिवथर घल सापडली आहे. . पण समर्थ भक्तांना अद्याप जुन्या घलिवर श्रद्धा आहे. आम्हाला या संशोधनाबाबत विद्वान परिषद् व्हावी आणि खरे खोटे समर्थ जगतासमोर यावे अशी इच्छा आहे. आम्ही चुकीचे ठरल्यास आमचा आग्रह नसेल. समर्थांची सर्वग्रन्थ लेखनाची जागा उपेक्षित रहू नये असे वाटते. कृपया सहकार्य करावे ही विनंती. कृपया या लिंक वाचा
http://realshivtharghal.blogspot.com/
http://www.maayboli.com/node/23327

समर्थभक्ताला अशी डायलोगबाजी शोभत नाही!!
काय नौटन्की आहे?
>>>>किती घाणेरडे शब्द आहेत हे!!! आम्ही समर्थभक्त आहोत हे मान्य करता आणि असे शब्द वापरता? कुठल्या झोपड़पट्टीत राहता? आम्हाला काय शोभते अथवा नाही याची चर्चा करण्यापूर्वी असे अशोभनिय उदगार? छे!! तुम्ही समर्थभक्त असूच शकत नाही TRP चे सोडा तुमच्या सारखे येथे आले याची लाज वाटावी असे शब्द तुम्ही वापरले आहेत. TRP वाढत असेलच तर त्यातुन तुम्हाला आम्ही वगळतो. जा आपला नामनदिवा अन्यत्र उजेड पाडण्यासाठी घेऊन जा!

समर्थ रामदास स्वामींचा पहिला सार्वजनिक गणेशोत्सव;
भारत इतिहास संशोधक मंडळाचे सपशेल दूर्लक्ष!

श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी १७५० च्या सुमारास भाद्रपदातील गणेशोत्सव थाटामाटाने करण्यास सुरूवात केली. लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनसंघटनेच्या उद्देशातून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. अलिकडेच, शनिवार, दि. २० ऑगस्ट २०११ पुणे शहर 'सकाळ' दैनिकातून त्यापूर्वी १७३२ मध्ये पुणे येथे गणेशोत्सवाची प्रथा होती व त्याकाळीदेखील मिरवणुकीत मानाचा क्रम ठरला होता; हे एका दूर्मिळ दस्तावेजाद्वारे स्पष्ट झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, त्यापूर्वीच समर्थ रामदास स्वामी यांनी महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केल्याचे ढळढळीत पुरावे उपलब्ध झाले असताना भारत इतिहास संशोधक मंडळाकडून त्याकडे दूर्लक्ष होत असल्याची खंत समर्थ रामदासस्वामींच्या शिवथरघळीबाबत संशोधन करणारे अरविंदनाथ महाराज यांनी व्यक्त केली आहे.
शनिवार, दि. २० ऑगस्ट २०११ पुणे शहर 'सकाळ' दैनिकातील बातमीमध्ये १७३२ मध्ये पुणे येथे गणेशोत्सवाची प्रथा होती व त्याकाळीदेखील मिरवणुकीत मानाचा क्रम ठरला होता; हे एका दूर्मिळ दस्तावेजाद्वारे स्पष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रचलित माहितीनुसार श्रीमंत नानासाहेब पेशवे यांनी १७५० च्या सुमारास भाद्रपदातील गणेशोत्सव थाटामाटाने करण्यास सुरूवात केली. लोकमान्य टिळकांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी जनसंघटनेच्या उद्देशातून गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप प्राप्त करून दिले. या दोन घटनाच चर्चेत असताना त्यापूर्वीही पुणे येथील गणेशोत्सव आणि मिरवणुकीतील मानाचा क्रम अस्तित्वात असल्याचे दूर्मिळ दस्तावेजाद्वारे स्पष्ट होत असल्याचे भारत इतिहास संशोधक मंडळात राजेंद्र ढोमे यांना १७३२ सालचा अप्रकाशित दस्तावेज मिळाला असल्याचे इतिहासाचे अभ्यासक मंदार लवाटे यांनी माहिती देताना सांगितल्याचे बातमीत नमूद करण्यात आले आहे.
मंदार लवाटे यांनी सांगितले की,'पेशव्यांच्या गणेशोत्सवाचे अनुकरण त्यांच्या सरदारांनी केले असून या दस्तावेजातील माहितीत, कन्हेरसर येथे राहणारे इतिहासप्रसिध्द राणोजी शिंदे यांनी पुणेनजिकच्या औंध या गावची त्रिंबकजी आणि सूर्याजी शिंदे यांची निम्मी पाटीलकी विकत घेतली, असा उल्लेख असून तपशिलामध्ये मानपान आणि हक्क यांचा उल्लेख आहे. यातील एका कलमामध्ये 'गणेश चौथीचा गणेश पुढे रानवडे यांचा, मागून सिंदीयांचा'असे स्पष्ट म्हटले आहे. याचा अर्थ त्याकाळी औंध सारख्या छोटया गांवातही गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठा होत असताना मिरवणूक निघत असावी आणि त्यातील मानाचे क्रमांकही निश्चित ठरविले जात असावेत. त्यानुसारच मूळ पाटील असलेल्या रानवडे यांच्या गणपतीचा मान पहिला ठेवला आहे.' यासंदर्भात १७५२ मधील नोंद उपलब्ध असून गराडे या सासवडजवळील गावाची पाटीलकी थोरले बाजीराव पेशवे आणि त्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी विकत घेतली होती. नानासाहेब पेशवे यांनी पुरंदरे यांना देऊन टाकली. या पाटीलकीचे हक्क व मानपान याविषयी यात कलम असून, 'गणेश-गौरी पुरंदरे यांच्या पुढे व मागे जगदाळे यांच्या' असा स्पष्ट उल्लेख आहे.
PUNE GANESH TRADITION.jpg
सुंदरमठ व आनंदवनभुवन एकाच ठिकाणी असलेल्या शिवथरघळीचे संशोधक सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी गिरीधरस्वामींच्या समर्थ प्रताप ग्रंथामध्ये आलेल्या उल्लेखाबाबत इतिहास संशोधक सेतू माधव पगडी यांनी समर्थ आणि समर्थसंप्रदाय ग्रंथामध्ये पान क्रमांक १०६ वर यापेक्षाही आधी म्हणजे इ.स. १६७५ मध्ये समर्थ रामदास स्वामींनी महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाचे आयोजन केल्याचे वर्णन केल्याचे पुराव्यादाखल सांगितले आहे. 'समर्थे सुंदरमठी गणपती केला। दोनी पुरूषे सिंदूरवर्ण अर्चिला। सकळ प्रांतासी मोहोछव दाविला। भाद्रपद माघपर्यंत। शिवराजासी अकरा मुष्ठी भिक्षा मागो धाडीली। शिवराज म्हणे माझी परिक्षा समर्थे मांडीली। अकरा अकरी (एकवीसाशे-१२१) खंडया कोठी पाठविली। हनुमान स्वामीमुष्ठी लक्षुनिया॥' असे हे वर्णन आहे. हा गणेशोत्सव कशासाठी आयोजित करण्यात आला असावा याचे वर्णन समर्थंरचित 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...' या आरतीमध्ये दिसून येते. विजापूरचा सरदार अफझलखान हिंदवी स्वराज्यावर चाल करून आल्याचे शिवथरघळीतील आनंदवनभुवनामध्ये समर्थांना समजून आले. समर्थांच्या आनंदवनभुवनी कवितेतील ८ वे कडवे 'हे साक्ष देखिले दृष्टी। किती कल्लोळ ऊठिले। विघ्नघ्ना प्रार्थिले गेलो। आनंदवनभुवनी॥८॥' हे याचा पुरावा आहे. यानंतर सन १६५८ साली 'सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची...' या आरतीद्वारे समर्थांनी 'संकटी पावावे। निर्वाणी रक्षावे।' असा म्हणजेच आमच्या महाराजांना या संकटामध्ये पाव आणि त्यांचे निर्वाणापासून रक्षण कर, असा नवस समर्थांनी गणपतीला केला.
FIRST GANESHOTSAV.jpg
सन १६५९ साली अफझलखान प्रतापगडाच्या पायथ्याशी मारला गेला. सन १६७४ साली शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि छत्रपतींना निर्वाणीपासून रक्षिणा-या गणपती नवस फेडण्यासाठी समर्थांनी शिवरायांकडे अकरा मुष्ठी भिक्षा मागितली. शिवरायांनी दिलेले १२१ खंडी धान्य भाद्रपद चतुर्थी ते माघ चतुर्थीपर्यंत सरासरी दररोज ६७५ किलो दिवसाला महाप्रसादासाठी लागल्यास सुमारे पाच महिने चाललेल्या या महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवास दररोज ९५०० भाविक महाप्रसादाचा लाभ घेण्यास उपस्थित राहिले असावेत. त्यामुळेच समर्थांचा हा महाराष्ट्रातील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सव कोकणासह देशात सर्वदूर पसरला असावा तसेच समर्थरचित गणपतीची आरती यामुळे सर्वच गणेशोत्सवामध्ये म्हणण्याचा प्रघात आजतागायत सुरू आहे. 'दास रामाचा वाट पाहे सदना' या शब्दांचा संदर्भ घेता समर्थांचे रामदासपठार येथील ख-या शिवथरघळीजवळ सापडलेल्या आनंदवनभुवनाचा उल्लेख 'सदन'असा गिरिधरस्वामींनी केला आहे. 'समर्थ पर्वती केले येक गुप्त सदन। प्रसंगे ठेवावया देवार्चन। सूर्य प्रकाश सन्निध उदक जाण। मार्ग सोपान करून जावे।' ARWINDNATH MAHARAJ.JPGयामुळे आनंदवनभुवन जसे समर्थांच्या सर्वग्रंथलेखनाचे ठिकाण आहे तसेच ते या आरतीचेही जन्मस्थान आहे, असा दावा अरविंदनाथ महाराज यांनी केला आहे. भारत इतिहास संशोधक मंडळामार्फत पुणे जिल्ह्यातील गणेशोत्सवाची परंपरा आणि मानाचा क्रम विचारात घेतला जात असताना महाराष्ट्रातील पहिला सार्वजनिक गणेशोत्सव समर्थ रामदास स्वामी यांनी महाड तालुक्यातील रामदासपठार येथील सुंदरमठामध्ये तब्बल पाच महिने आयोजित करून स्वराज्यावर व छत्रपतींवर आलेल्या संकटापासून वाचविणा-या गणपतीचा नवस फेडल्याच्या इतिहासाकडे दूर्लक्ष झाल्याची खंत सुंदरमठ व आनंदवनभुवन एकाच ठिकाणी असलेल्या शिवथरघळीचे संशोधक सद्गुरू अरविंदनाथ महाराज यांनी व्यक्त केली आहे.
'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥'
गेल्यावर्षी शनिवार, दि.११ सप्टेंबर २०१० रोजी सुंदरमठामध्ये समर्थांनी गणेशोत्सव केल्यानंतर तब्बल ३३५ व्या वर्षी गणेशोत्सव करण्यात आला. सुंदरमठ असलेल्या रामदासपठार येथे पूर्वीच्या १० गणेशमूताअची प्रतिष्ठापना होत असे. त्यामुळे ही ११ वी गणेशमूर्ती होती. ३३५ वर्षे यात ३+३+५ृ ११ हा पहिला ११ तर ११ सप्टेंबर हा दुसरा ११ आणि रामदासपठावरील ११ वी गणेशमूर्ती हा तिसरा ११ असा 'आक्रा आक्रा बहु आक्रा। काय आक्रा कळेचिना। गुप्त ते गुप्त जाणावे। आनंदवनभुवनी॥' या कडव्याच्या प्रचितीचा भाग होता.

अरे वा फार दिवसांनी इकडे काहीतरी नविन लिहिले गेले आहे.
त्या ओळीची प्रचिती यावी म्हणून ३३५ वर्षे थांबले होते का सगळे ?

तसे इथे नेहमीच अभ्यासून प्रकटणे सुरु असतेच!!! आपल्या सारखे न अभ्यासणारे फार दिवसांनी इथे आलेत...
>>>त्या ओळीची प्रचिती यावी म्हणून ३३५ वर्षे थांबले होते का सगळे ?

" असे कसे? अहो तुमच्या येण्याचीच वाट पाहात होतो!! आलात....पण एकदम शेवत ची ओळ वाचलित की काय? काय हो हे बेगडी समर्थ प्रेम? याबद्दल निंदा तरी का करायची? कोण हो कौतुक वाटते तुमचे आम्हास!! आला आहात तर आता या बर!!! समजल ना?"

सातारा जिल्ह्यातील पार-श्रीक्षेत्र पार्वतीपूरची श्रीरामवरदायिनी-तुळजाभवानीचेच रूप
पोलादपूर (शैलेश पालकर) - समर्थ रामदास स्वामींनी जन्मदात्रीचे वर्णन, 'रामवरदायिनी माता। दास धुंडूनी आणली।ओळखी पाडिता ठायी। भिन्न भेद असेचिना॥' असे केलेले आढळते. तेच सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरपासून रस्त्याने २० कि.मी. आणि प्रतापगडापासून ३ कि.मी अंतरावर रस्त्यालगतच्या फाटयापासून ४ कि.मी अंतरावर वसलेले श्रीक्षेत्र पार्वतीपूर म्हणजेच पारसोंड येथील श्रीरामवरदायिनी मंदिर होय. येथे आजपासून नवरात्रौत्सवानिमित्त असंख्य भाविकांची रेलचेल सुरू होणार आहे. शुक्रवारी दूर्गाष्टमीनिमित्त येथे श्रीपितांबरी चक्रपूजा, श्रीपितांबरी याग, विशेष आरती, गोंधळ आणि अलिबागच्या आमदार मिनाक्षीताई पाटील यांच्यासौजन्याने मंगळवारी दि.४ ऑक्टोबर २०११रोजी प्रतिवर्षीप्रमाणे दूर्गाष्टमीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
केव्हातरी समर्थ रामदासांनी तुळजापूरहून देवीची मूर्ती शोधून पारघाटी आणली. ती मुर्ती पारसोंड येथून चार कि.मी. अंतरावरील मेट या दूर्गम जंगलाच्या ठिकाणी ठेवली. याबाबत,'तुळजापूर ठाकेना। चालली पश्चिमेकडे। पारघाटी जगन्माता। सद्य येऊनि राहिली॥' असा उल्लेख आढळून येतो. याचा पूर्वेतिहास पाहता, छ.शिवरायांनी जावळीचे राज्य ताब्यात घेतल्यानंतर समोरचा भोरप्याचा डोंगर त्यांच्या दृष्टीस आला आणि त्यांनी मिळालेली जावळीतील सर्व संपत्ती या डोंगरावर किल्ला बांधण्यासाठी खर्च करण्यासाठी वापरण्याचे ठरविले.१६५६ साली या कामास सुरूवात होऊन १६५८ साली भव्य किल्ला उभारण्यात आला. मात्र, याच कालात मराठेशाहीवर अफजलखानाचे दृष्टचक्र आले आणि त्याने वाटेत येताना तुळजापूरचे भवानी मंदिर फोडून टाकले.
पोलादपूर येथे मठ असलेले कवींद्र परमानंद यांच्या शिवभारतात तुळजापूरच्या भवानीमातेचा उल्लेख असून त्यात खानाने देवीचा अवमान केल्याचा निर्देशही आहे. दूसऱ्या निर्देशात कवींद्र परमानंदांनी, 'इदा निमन्पी दैत्यरे। विमुच्या तुळजापूरम्। उदेता स्मिता जानी ही। सहाय्या येवं ते स्वयंम्।यथा जाते नं कंसेन। यथा हमवसा निता।पूर्व तथा धुनै ते नाप्याव। ज्ञातास्मी पाप्यमा॥' असे म्हणजेच देवीने शिवरायांना दर्शन देऊन सांगितले की, सध्या मी तुझ्या सहाय्यासाठी तुळजापूर सोडून जवळ आले आहे असे समज, पूर्वी जसा मूर्ख कंसाने तसा (सध्या या पाप्याने) माझा अवमान केला आहे. यावरूनच तुळजाभवानी मातेच्या कृपेनेच अफजलखानाचा वध करून महाराजांची किर्ती आसमंतात उजळून निघाली. चारी यवनी शाह्यांना धास्ती बसली.मात्र, ही तुळजाभवानी माता तुळजापूर येथे नव्हती तर पार येथे येऊन राहिली असल्याचे स्पष्ट होते.
पुराणसंदर्भांचा उल्लेख सांगताना पुजारी शंकर बाबू शिंदे यांनी माहिती दिली की, भगवान शंकर हे पार्वतीसोबत असतानाही ध्यानस्थ बसत असल्याने पार्वतीने महादेवा, आपणापेक्षा श्रेष्ठ कोण, ज्यांचा जप आपण करता, असा प्रश्न केला. त्यावर महादेवांनी आपण प्रभू रामचंद्रांची भक्ती करीत असल्याचे सांगितले. सीतामाईचे रावणाने हरण केल्याने एकवचनी रामचंद्रांनी डोळे बंद करून अन्य कोणतीही स्त्री नजरेत येऊ नये, यासाठी डोळे बंद करून आत्माराम झाले आहेत. ते याद्वारे आपले मार्गाक्रमण करीत आहेत. हे सांगितल्यानंतर पार्वतीमातेने रामचंद्रांची परिक्षा घेण्याचे ठरवून तिने सीतामाईचे रूप धारण केले आणि रामचंद्रांनी मात्र तिच्याकडे दूर्लक्ष केले. यामुळे पार्वतीमातेला प्रकट व्हावे लागले. प्रभू रामचंद्रांनी पार्वतीमातेला ओळखून तिची पूजा केली आणि पार्वतीने रावणाचा संहार करून तु सीतेला परत मिळवशील असा वर दिला ते ठिकाण तुळजापूरला आहे असे काही लोकांचे म्हणणे आहे. पण ते खरे नाही कारण रामचंद्रांना वरदान दिले ते स्थान पार आहे, असे सांगितले.
समर्थ रामदासस्वामींच्या सर्वग्रंथलेखनाच्या जागेचे आनंदवनभुवन आणि सुंदरमठाचे संशोधक सद्गुरू अरविंदनाथ महाराज आणि अभ्यासक-पत्रकार शैलेश पालकर यांनी 'सुंदरमूर्ती सुंदरगुण। सुंदर किर्ती सुंदर लक्षण। सुंदरमठी देवे आपण। वास केला॥१२॥ गिरीकंदरी सुंदरवने। सुंदर वाहाती जीवने।त्यामध्ये सुंदर भुवने।रघुनाथाची॥१३॥ सुंदर पाहोन वास केला। दास संन्निध ठेविला। अवघा प्रांतचि पावन केला। कृपाळूपणे॥१४॥' या श्रीदासायनातील उल्लेखात पुढे 'अंतरनिष्ठ अखंड ध्यानी। सन्निध रामवरदायिनी। विश्वमाता त्रयलोक्य जननी। मूळमाया॥१५॥' या उल्लेखानुसार समर्थांना महाड तालुक्यातील रामदासपठार येथील सुंदरमठ येथे ध्यानस्थ बसल्यावर सातारा जिल्ह्यातील पारसोंड येथील श्रीरामवरदायिनी सन्निध दिसत असावी असा अंदाज बांधून 'गुगल अर्थ' द्वारे तसा शोध घेतला असता ही दोन्ही ठिकाणे सरळ रेषेने जोडता येत असल्याचे दिसून आले आहे. मात्र, तत्पूर्वीच्या संशोधनकर्त्यांनी शिवथरघळ व रामवरदायिनीचा शोध घेताना चंद्रराव मोरे यांचा वाडा असावा, असा अतार्किक व प्रत्यक्ष वाडा न दाखविता दावा केला होता. तो या संशोधनामुळे फोल ठरला आहेच; शिवाय, अफझलखानाने तुळजापूरच्या भवानीमंदिराचा विध्वंस केला आणि तत्पूर्वीच, तेथील मूर्ती समर्थांनी येथे आणली होती,हे स्पष्ट झाले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना अफझलखानाच्या वधाची प्रेरणा देणारी देवी श्रीरामवरदायिनीच होती, असे 'आनंदवनभुवनी' काव्यातून संशोधनांती स्पष्ट झाले आहे. आनंदवनभुवनी काव्यात `कल्पांत मांडिला मोठा। म्लेंच्छ दैत्य बुडावया। कैपक्ष घेतला देवी। आनंदवनभुवनी।।२७।। बुडाले सर्वही पापी। हिन्दुस्थान बळवले। अभक्तांचा क्षयहो झाला। आनंदवनभुवनी।।२८।।' यासोबतच रामवरदायिनीचा स्पष्ट उल्लेख असलेल्या ओव्या `रामवरदायिनीमाता। गर्द घेऊनी उठली। मर्दिले पूर्वीचे पापी! आनंदवनभुवनी।।४१।। प्रत्यक्ष चालली राया। मुळमाया समागमे। नष्ट चांडाळ ते खाया। आनंदवनभुवनी।।४२।। भक्तांसी रक्षिले मागे। आताही रक्षिते पहा। भक्तांसी दिधले सर्वे। आनंदवनभुवनी।।४३।। याही समर्थानी रचल्या आहेत.
समर्थांच्या आत्माराम ग्रंथाचे प्रेरणास्थानही पार तथा पार्वतीपूर परिसर आहे,असेही या संशोधनाद्वारे उघड झाले आहे.
सोंडकर व शिंदे यांच्याकडे परंपरागत पूजेचा कार्यक्रम असतो. विजापूर, निझाम आणि सिद्दी या तीनही यवनी शाह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या चंद्रराव मोरे यांच्या ताब्यातील ही बाजारपेठ असल्याने येथे मोठी आर्थिक उलाढाल होत असे. त्याकाळी ७०० ते १००० घरांचे हे गांव आता केवळ शेकडयावर घरे असल्याचेही पुजारी शंकर शिंदे सांगतात. देवस्थान जागृत आहे आणि चिपळूणचे तत्कालीन आमदार राजाराम शिंदे यांनीही दसपटी दादर येथे श्रीरामवरदायिनी मंदिराचे प्रतिमंदिर करण्याचे प्रयत्न यशस्वी केले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
मंदिराच्या आवारात मानाई, बगाड, सिंह, हेमाडपंथी रचना, नागांचे शिल्प, भव्य दिपमाळा, मंदिरावर कळस, भक्त निवासमंदिर, केदारेश्वराचे मंदिर, देवीच्या सिंहासनास चांदीचा मुलामा आदी कामे करण्यात आली आहेत.पार येथे श्रीरामवरदायिनी देवीच्या यात्रेचा सोहळा चैत्र आमावस्येला सुरू होऊन वैशाख षष्ठीला संपतो, असेही त्यांनी सांगितले.देवीचा वार गुरूवार असल्याने जशी गर्दी होते. तशीच मंगळवारी दूर्गाष्टमीनिमित्त मोठया संख्येने भाविकांचा पूर येथे लोटणार असल्याने पार्वतीपूर म्हणजेच पारसोंडचे ग्रामस्थ भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेत.
RAMVARDAYINI MATA12.jpg

स्थान महात्म्य तूळजापुर चे जसे अबाधित आहे तसेच दासबोध आणि सर्वग्रन्थ लेखनाची जागा सुंदर मठ आणि आनंदवनभुवनी असल्याचे स्थान महात्म्य अबाधित रहावे. एव्हडीच इच्छा आहे.

शैलेशजी, आपण हाती घेतलेल्या विषयावर चर्चा करण्याची खरी जागा इतिहासतज्ञांच्या परिषदेत आहे. तेथे या विषयाला वाहून घेतलेली (जर कोणी उरली असतील तर ) अभ्यासू मंडळी तुम्ही देत असलेल्या पुराव्यावर खरा अभ्यास करण्याची शक्यता आहे. आमच्या दृष्टीने समर्थांची शिकवण महत्वाची! समर्थांनी सह्याद्रीमध्ये अनेक जागांचा शोध घेतला असेल. त्यात तुम्ही म्हणता त्या स्थानालाही भेट दिली असेलही.
फोटोवरून तीही जागा विलोभनीय वाटते. पर्यटनस्थळ म्हणून छान वाटेल. पण त्यासाठीच तुम्ही हा मार्ग निवडला असावा अशी लोकांना शंका आली तर तुम्ही रागावणे अयोग्य आहे. तुमच्या महाराजांनी त्या घळीत बसून समर्थांच्या आशिर्वादाने लोकांना समर्थांच्या शिकवणीचा बोध देण्यास हरकत नाही. त्यांचे तेथील प्रवचन लोकप्रीय झाले तर आपोआपच लोक त्याही ठिकाणी भेट देतील. आधी ते ठिकाण असे लोकप्रीय करा आणी नंतर तुमचे संशोधन पटवा. मग तुमच्या हेतूंविषयी शंका घेता येणार नाही. सध्या तरी अशी शंका येणे स्वाभाविकच आहे, कारण असे वाद निर्माण करून लाभाची ठिकाणे निर्माण करण्याच्या अनेक घटना घडताहेत.

आपण हाती घेतलेल्या विषयावर चर्चा करण्याची खरी जागा इतिहासतज्ञांच्या परिषदेत आहे. तेथे या विषयाला वाहून घेतलेली (जर कोणी उरली असतील तर ) अभ्यासू मंडळी तुम्ही देत असलेल्या पुराव्यावर खरा अभ्यास करण्याची शक्यता आहे. आमच्या दृष्टीने समर्थांची शिकवण महत्वाची! समर्थांनी सह्याद्रीमध्ये अनेक जागांचा शोध घेतला असेल. त्यात तुम्ही म्हणता त्या स्थानालाही भेट दिली असेलही.
फोटोवरून तीही जागा विलोभनीय वाटते. पर्यटनस्थळ म्हणून छान वाटेल. पण त्यासाठीच तुम्ही हा मार्ग निवडला असावा अशी लोकांना शंका आली तर तुम्ही रागावणे अयोग्य आहे.
ही शंका येणेहि अयोग्य आहे.समर्थांचीच `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' अशी आज्ञा आहे

तुमच्या महाराजांनी त्या घळीत बसून समर्थांच्या आशिर्वादाने लोकांना समर्थांच्या शिकवणीचा बोध देण्यास हरकत नाही.सध्या तरी अशी शंका येणे स्वाभाविकच आहे, कारण असे वाद निर्माण करून लाभाची ठिकाणे निर्माण करण्याच्या अनेक घटना घडताहेत.
समर्थान्नी ज्या घलीत बसून दासबोध आणि सर्वग्रन्थ लेखन केले. त्या घलीकड़े आपण एवढे उदासीन नजरेने का पाहता? त्यांनी अनेक पादुका आयुष्यात घातल्या असतील मग त्यांची यात्रा काढून तुम्ही पैसे का गोला करता? महाराजांनी तेथे बसून प्रवचन करण्याचा तुमचा सल्ला चांगला असला तरी त्यामागील हेतु कसा आहे हे तुम्हिदेखिल जाणता.

आपण हाती घेतलेल्या विषयावर चर्चा करण्याची खरी जागा इतिहासतज्ञांच्या परिषदेत आहे. तेथे या विषयाला वाहून घेतलेली (जर कोणी उरली असतील तर ) अभ्यासू मंडळी तुम्ही देत असलेल्या पुराव्यावर खरा अभ्यास करण्याची शक्यता आहे. हे आपले मत कदाचित किंवा खात्रिपुर्वक आपणाला `या विषयाला वाहून घेतलेली (जर कोणी उरली असतील तर)' यातील अशी माणसे नसतील याची माहिती असल्यानेच आहे. हां आपण गैर फ़ायदा घेत आहात. पर्यटन स्थळ म्हणून आम्ही हां मार्ग निवडला असेल असे मतदेखिल आपण एका फोतोवारून व्यक्त करता यावरून आपली मते फारच अल्प पुराव्यावारून तयार होत असल्याचे दिसते. आमची येथे व्यक्त झालेली मते संशोधान्ति आहेत. आणि आपली मते असुयेपोटी आहेत. तुम्ही जी पर्यटन स्थले निर्माण केली आहेत त्यापैकी ती खरी शिवथर घळ असल्याचे पुरावे देवू शकाल? नाही देवू शकणार..!! कारण तुमचे इतके वर्षाचे असत्य आता उघडे पडणार आहे म्हणून तुम्ही आमच्या दृष्टीने समर्थांची शिकवण महत्वाची! अशी भूमिका घेतली आहे.
जय जय रघुवीर समर्थ

शैलेश वसंत पालकर,

आपला मुद्दा पटला. जरी समर्थांची शिकवण ग्रंथरूपे उपलब्ध असली तरी त्यांच्या तपश्चर्येचे खरे स्थान शोधणे आवश्यक आहे. अशा स्थानी साधारणपणे साधुलोकांनी पूर्वापार तप आचरलेले असते. त्यामुळे ते स्थान अतिशय सात्विक बनते. अशा स्थानी केलेली उपासना अनेक पटीने फलदायी ठरते हा स्वानुभव आहे.

सहाजिकच समर्थांच्या स्थानाची निश्चिती करणे किती महत्त्वाचे आहे याची (केवळ श्रीगुरुकृपेमुळे) पुरेपूर जाणीव आहे.

ज्या लोकांना स्थानमाहात्म्य गौण वाटते त्यांना एकंच प्रश्न करावासा वाटतो. जसं तुम्हाला देवळात गेल्यावर वाटतं, अगदी तस्संच आपल्या घरी डोळे मिटल्यावर वाटतं का? उत्तर हो असेल तर स्थानास अधिक महत्त्व द्यायची गरज नाही. मात्र उत्तर नकारार्थी आल्यास तीर्थक्षेत्री जाऊन भक्तीभाव वाढवणे आवश्यक आहे.

आजून एक मुद्दा म्हणजे हिंदू धर्मात उपासनेत अचूकपणावर भर आहे. म्हणूनच जेथवर मानवी प्रयत्नांनी सत्य प्रस्थापित करता येते तेथवर ते अवश्य करावेत. त्यामुळे 'यत्न तोचि देव जाणावा' या समर्थोक्तीची अनुभूती येते.

जाताजाता आपल्याला एकंच सुचवावेसे वाटते. ते म्हणजे अनेक लोक इथे अनेक दृष्टीकोन घेऊन येतात. त्यामुळे एखाद्या संदेशांचा प्रतिवाद करतांना आवश्यक तेव्हढेच शब्द वापरावेत. भाषा सौम्य असावी. नकारार्थी शब्दांचा उपयोग शक्यतो टाळावा. यामुळे आपल्या युक्तिवादास एक प्रकारचे वजन प्राप्त होईल.

आपण गटारात आहोत हे सदैव ध्यानी असू द्यावं. त्यामुळे चिखल लागणं ओघानं आलंच. तुम्ही स्वत: पत्रकार असल्याने चिखलफेक काय असते हे मी सांगायला नको. तसंही पाहता चिखलाला घाबरतोय कोण? मात्र अंगी लागलेला चिखल आपण संयमपूर्वक धुवून काढीत आहात असं चित्रं लोकांसमोर उभं राहणं आवश्यक आहे. त्यामुळे आपल्या कार्यास गती लाभेल. अधिक काय सांगू! आपले श्रीगुरु समर्थ आहेत.

त्यांच्या चरणी प्रणाम.

शुभं भवतु.

आपला नम्र,
-गामा पैलवान

गामा पैलवानज़ीखुपच आनंद झाला ही पहिली अनुकुल प्रतिक्रिया वाचून. शतश: धन्यवाद. त्यातही आपण `आपले श्रीगुरु समर्थ आहेत.' असे लिहून त्यांच्या चरणी प्रणाम केला आहे हे अधिक चांगले झाले. मी देखिल मी अथवा सदगुरू अरविन्द नाथ महाराज यांना प्रणाम या खरया शिवथर घळइच्या शोधासाठी करावा अशी कधीही अपेक्षा ठेवली नाही. आम्हाला `देव भक्त येक झाले,,,मिळले सर्व जीवही.. संतोष पावले तेथे... आनंदवनभुवनी' या समर्थांच्या अपेक्षेप्रमाणे सर्व समर्थ भक्तांनी या ठिकाणी भेट द्यावी असे वाटते. समर्थांचीच `इति श्री वन भुवनी नाम मान प्रथम' ही आद्न्या सर्वानी शिरसावंद्य मानावी. म्हणजेच जे आनंदवनभुवन आहे त्यास प्रथम नाव आणि मान द्यावा ही समर्थांची इच्छा आहे. त्यानंतर आत्माराम, दासबोध माझे सिद्ध रूप असा समर्थांनी घालून दिलेला क्रम आहे.बाकी समर्थान्नीच हे कार्य आमच्या कडून करून घेतले आहे. आम्ही निमित्तमात्र आहोत. आम्ही शोधले आणि सापडत गेले. ११-११-११ ही प्रचिती आली. जय जय रघुवीर समर्थ!

श्रीयुत,
shailesh vasant palkar

स्वतःच्याच "प्रतिक्रीया" परत-परत संपादीत करून आणि मुळ लेखातील "प्रकाशचित्रे" बदलून धागा वर आणण्या ऐवजी समर्थ रामदासस्वांमीं विषयी काहीतरी नविन लिहा. जेणेकरून या धाग्यावर येणार्‍याला काही नविन वाचायला मिळेल.

धन्यावाद..!

------------------------------------------------------------------

समर्थां विषयी नविन माहीती वाचायाच्या आशेवर असणारा वेताळ

समर्थां विषयी नविन माहीती वाचायाच्या आशेवर असणारा वेताळ
स्वतःच्याच "प्रतिक्रीया" परत-परत संपादीत करून आणि मुळ लेखातील "प्रकाशचित्रे" बदलून धागा वर आणण्या ऐवजी समर्थ रामदासस्वांमीं विषयी काहीतरी नविन लिहा. जेणेकरून या धाग्यावर येणार्‍याला काही नविन वाचायला मिळेल.

वेताळ बेताल बोलतो तेव्हा राजा विक्रमादित्य काय म्हणतो?.....प्रतिक्रिया संपादित करण्यामागे तुम्हाला अवगत हेतु नव्हता. काही अक्षरे कशी टाईप करायची हे समजुन येत नव्हते...
जावू द्यात लवकरच समर्थांची बाग़ आणि आमचे संशोधन या धाग्यावर वाचण्यास मिळेल.

बाग.. मी बांग असे वाचले.. Proud चालू द्या.. नवीन लिहा नाही तर जुनंच वर काढा.. तुम्ही तुमच्या मनाला येईल ते करा..

समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे.. ?

काही अक्षरे कशी टाईप करायची हे समजुन येत नव्हते...

पण म्हणून असं सारखं सारखं अक्षर गाळणे-घालणे बरे नव्हे.. अक्षरे गाळी किंवा पदरची घाली तो एक मूर्ख असं स्वतः समर्थानीच दासबोधात लिहून ठेवलं आहे ना? Happy Biggrin

दासनवमीला हॅपी बर्थ डे असलेला..

जागोमोहनप्यारे

दासनवमीला हॅपी बर्थ डे असलेला..
----- जामोप्या तुमचे किती हॅपी बर्थ डे असतांत एका वर्षात ? Happy

Pages