दाण्याची चिक्की

Submitted by पूनम on 12 June, 2008 - 03:40
लागणारा वेळ: 
५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भाजलेले दाणे सव्वा वाटी
किसलेला गूळ १ वाटी
वेलदोड्याची पूड १ टीस्पून

क्रमवार पाककृती: 

भाजलेले दाणे मिक्सरमधून एकदाच फिरवून भरड कूट करून घेणे. थोडे दाणे अर्धवट आणि थोडं कूट होईल इतपत. खलबत्ता असेल तर उत्तम.
गूळ चिरलेला असला तरी तो किसून घेणे. (याची सर्वात सोप्पी पद्धत म्हणजे गूळ कूकर मधून वाफवून घेणे.)
जाड बुडाच्या कढईत एक वाटी किसलेला गूळ घालणे, आच मंद ठेवून सतत घोटणे. गूळ पातळ होऊन त्याचा पाक होईल.
लगेच त्या पाकात दाण्याचे भरड कूट घालणे. एकजीव करणे. एकदा एकत्र केले की वेलदोड्याची पूड घालून परत एकजीव करणे. गॅस बंद करणे.
दाणे-गूळाचा मोठ्ठा लाडू होईल कढईत Happy
पोळपाटाला साजूक तूपाचा हात लावणे आणि त्यावर हा लाडू उतरवणे. हातावर प्लॅस्टिकची पिशवी घेऊन थापणे. ते जमत नसेल तर लाटण्यालाही तूप लावून हा लाडू लाटणे- एकाच दिशेनी. हे करेपर्यंत लाडू थोडासा निवतो. त्यामुळे व्यवस्थित लाटता येते. सुरीने चिक्कीच्या रेघा पाडून घेणे.
पूर्ण गार झाल्यावरच चिक्की खाणे! Happy

वाढणी/प्रमाण: 
या प्रमाणाच्या नॉर्मल चौकोनी आकाराच्या २५ चिक्क्या तरी होतील.
अधिक टिपा: 

चिक्की जरा जाडच ठेवा.
गूळ जितका एका consistencyचा तितकी चिक्की चांगली, झटपट आणि खमंग होते, म्हणून गूळ किसायचा कंटाळा करू नका Happy

माहितीचा स्रोत: 
गरज (आवड) ही शोधाची जननी आहे ;)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझी पध्दत:-
१ वाटी दाणे (साले काढून भरड)
१ वाटी गुळ (बारीक चिरलेला )
चिमूट्भर सोडा
तूप छोटा चमचा

कढईत गुळाचा पक्का पाक करणे
पाक होत आला की त्यात कडेने १/२ छोटा चमचा तूप सोडणे.
नंतर चिमूटभर सोडा टाकून तो नीट ढवळून घेणे.
कढई खाली उतरवून त्यात दाणे टाकणे.
आधीच ओट्यावर थोडी जागा तूप लावून तयार ठेवायची.
कढईत दाणे गुळात नीट मिक्स करून घेतले की त्याचा कढईच्या उष्णतेने गोळा होईल.
तो गोळा ओट्यावर ठेवून हाताला थोडे तूप लावून गोल गोल फिरवून दाबून घ्यावा. चपळाईने तूप लावलेले लाटणे घेऊन भराभर लाटा. सुरीने लगेच रेघा आखा. २-३ मिन्टात गार झालं की हाताने तुकडे करा. रेघा पाहून.
जितकं पातळ लाटू शकाल चपळाईने तितकी खुटखुटीत होईल चिक्की..
तीळ
तीळ + दाणे मिक्स
दाणे + डाळ्वं
सेम रेसिपी..

एक थोडासा वेगळा प्रश्न - ओट्यावर आपण गरम पदार्थ ओततो तर ओट्याच्या दगडाला काही तडे वगैरे जात नाहित ना? माझा संगमरवरी दगड आहे आणि मी कधिच गरम वस्तु ठेवत नाही त्यावर. खाली जाळी ठेऊनच मग कुकर वगैरे ठेवते.

साधना.

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

साधना, ही चिक्की म्हणजे काही उ़कळतं पाणी नव्हे.. गोळा आपण टेकवतो तूप लावलेल्या जागी अन दोन्ही हातांना तूप लावून गोल गोल फिरवायचा असतो. नंतर लगेच लाटायचा असतो.. ह्यात इतकी चपळाई करावी लागते ना, कारण गोळा क्षणोक्षणी गार होत असतो.. थोडा जरी हात मंदावला तर लाटण अवघड जात अन चिक्की जाड होते..आखून घेणे अजुन कठीण जातं.. ओट्याला इजा होणार नाही अस वाटतय, बघ करून, नाहीतर मोठ्या ताटाची उलटी बाजू किंवा लाकडी पाट घेऊन करून बघ.

अलिकडे खुपदा पदार्थ थेट ओट्यावरच लाटायचे सूचवलेले असतात. पांढरा टणक ओटा असेल तर ठिक पण जर हलका असेल तर त्यामधे तेल मूरते व ओटा तेलकट होतो. तसेच काहि संगमरवरावर खास पॉलिश केलेले असते ते निघून जाते. म्हणुन शंका असेल तर ओट्यावर इतर काहि आच्छादन घालून हे प्रकार करावेत. हेवी ड्युटी फॉईल हा एक चांगला पर्याय आहे.
ओट्यावर करायचा फायदा असे कि हाताला मोकळी जागा भरपूर मिळते.

दिनेश आणि अना-मीरा, धन्यवाद...

चिक्की तशी एकदम गरम नसेल बहुतेक आणि त्यामुळे ओट्याला काही अपायही होणार नाही, पण बेसनाची खांडवी करताना ओट्यावर ओता असे असते ना कृतीत, ते आठवले मला. शंका निरसन करुन घेतलेले चांगले...

______________________________________
आला दिवस गेला दिवस - ही रे कसली जिंदगी?
घे उराशी स्वप्न एक, उजळू दे तुझी जिंदगी!
उचल पावले, अन घे तळहातावर तुझी जिंदगी-
पुढेच टाकत तंबू जगणे - हीच खरी जिंदगी!

चिक्कीचा गोळा स्टेनलेस स्टीलच्या ताटाला तुपाचा हात लाउन त्यात पण पसरवता येतो. तसेच चटके सहन होत नसतील तर वाटीला तुप लाउन ठेवायचे नि मग त्याने गोळा सारखा करायचा. मग लाटणे आहेच लाटायला.

चिक्की लाटण्याने छान लाटली जाते. लाटता लाटता लाटण्याने त्याच्या बाजू आत सरकवल्या तर चौकोनी आकार येतो व त्याच्या सगळ्या चौकोनी वड्या पडतात. लाटून झाल्यावर वाटीच्या बुडाने पॉलिश करायचे म्हणजे चिक्की अगदी गुळगुळीत दिसते. हे सगळ अगदी झटपट करावे लागते.