प्रकाशचित्र"गीत" — ५ (अंतिम)

Submitted by जिप्सी on 30 January, 2011 - 12:08

प्रकाश"चित्रगीत" १ – नाविका चल तेथे . . .
http://www.maayboli.com/node/22470
प्रकाश"चित्रगीत" – २
http://www.maayboli.com/node/22535
प्रकाशचित्र"गीत" – ३
http://www.maayboli.com/node/22708
प्रकाशचित्र"गीत" — ४
http://www.maayboli.com/node/22904
=================================================
=================================================
आज आचानक एकाएकी
मानस लागे तेथे विहरू
खेड्यामधले घर कौलारू

पूर्वदिशेला नदी वाहते, त्यात बालपण वहात येते
उंबरठ्याशी येउन मिळते, यौवन लागे उगा बावरू

आयुष्याच्या पाउलवाटा, किती तुडविल्या येता जाता
परि आईची अठवण येता, मनी वादळे होती सुरू

स्वर - मालती पांडे
गीत - अनिल भारती

=================================================
=================================================
पूर्वेच्या देवा, तुझे सूर्यदेव नाव
प्रभातीस येशी सारा जागवीत गाव

विधाता जगाचा तूची उधळीत आशा
उजळिशी येता येता सभोवती जग, दिशा
रथ तुझा सोनियाचा धावे भरधाव

अंधारास प्रभा तुझी मिळे प्रभाकर
दिवसा तू ज्ञानदीप लावी दिवाकर
सृष्टीला या चैतन्याचा तुझा पेहराव

पुष्पपत्रदानाची रे तुला नसे आस
तूच चालुनिया येशी माझिया घरास
भक्ताठायी गुंतला रे तुझा भक्तिभाव

स्वर - रामदास कामत
गीत - गंगाधर महांबरे

=================================================
=================================================
नभं उतरू आलं, चिंब थरथर वलं
अंग झिम्माड झालं, हिरव्या बहरात

अशा वलंस राती, गळा शपथा येती
साता जल्मांची प्रीती, सरंल दिनरात

वल्या पान्यात पारा, एक गगन धरा
तसा तुझा उबारा, सोडून रीतभात

नगं लागंट बोलू, उभं आभाळ झेलू
गाठ बांधला शालू, तुझ्याच पदरा

स्वर - आशा भोसले
गीत - शान्‍ता शेळके

=================================================
=================================================
एक फुलले फूल आणि फुलून नुसते राहिले
त्या कुणी ना पाहिले, त्या कुणी ना पाहिले

मंद अगदी गंध त्याचा, मंद इवले डोलणे
साधले ना, मुळीच त्याला नटुनथटुनी लाजणे
कोवळे काळिज त्याचे परि कुणासी मोहिले

त्या कुणाला काय ठावे, या फुलाची आवडी
तो न आला या दिशेला, वाट करुनी वाकडी
या फुलाला मात्र दिसली, दुरुन त्याची पाऊले

एक दुसरे फूल त्याने, खुडुन हाती घेतले
या फुलाचे जळून गेले, भाव अगदी आतले
करपली वेडी अबोली, दुःख देठी राहिले

स्वर - आशा भोसले
गीत - ग. दि. माडगूळकर

=================================================
=================================================
भले बुरे जे घडुन गेले विसरुनी जाऊ सारे क्षणभर
जरा विसावु या वळणावर या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण कसे न कळता जातो गुंतुन
उगाच हसतो उगाच रुसतो, क्षणात आतुर क्षणात कातर
जरा विसावु या वळणावर या वळणावर

कधी उन तर कधी सावली, कधी चांदणे कधी काहिली
गोड करुनिया घेतो सारे लावुनिया प्रितीची झालर
जरा विसावु या वळणावर या वळणावर

स्वर: अनुराधा पौडवाल
गीत: ?

=================================================
=================================================
हिरवा निसर्ग हा भवतीने, जीवन सफर करा मस्तीने
मन सरगम छेडा रे, जीवनाचे गीत गा रे, गीत गा रे, धुंद व्हा रे

नवे पंख पसरा ऊंच उंच लहरा
भिरभिरणारे, गीत गा रे
गीत गा रे, धुंद व्हा रे

गुलाबी हवा अशी मंद मंद वाहते
शराबी कळी अशी चिंब चिंब नाहते
सुगंधी फुलांना नशा आज आली
सडा शिंपिला हा जणू प्रितीने

नव्या संगीतातले तराणे नवे असे
कुणी सोबती मला मिळाया हवे असे
जन्म हे जगावे, विश्व हे बघावे
एकरूप व्हावे संगसाथीने

स्वर - सोनू निगम
गीत - जगदीश खेबूडकर

=================================================
=================================================
पैल तो गे काऊ कोकताहे
शकुन गे माये सांगताहे

उड उड रे काऊ तुझे सोन्यानें मढवीन पाऊ
पाहुणे पंढरीरावो घरा कैं येती

दहिंभाताची उंडी लावीन तुझे तोंडी
जीवा पढिये त्याची गोडी सांग वेगी

दुधें भरूनी वाटी लावीन तुझें ओंठी
सत्य सांगे गोठी विठो येईल कायी

स्वर - लता मंगेशकर
रचना - संत ज्ञानेश्वर

=================================================
=================================================
धनगराची मेंढरं गा धनगराची मेंढरं
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं

अवो साजिरी दिसत्यात
ही गोजिरवाणी हरणं
पर मानुस लई उफराटा
काळं त्याचं करणं
अवो त्याची भूक लई मोठी
त्याची दानत लई खोटी
सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती, सुरी फिरुतिया त्याच्या नरड्यावरती
आन्‌ आई-बाच्या चुका पायी बळी जाती लेकरं
मातीवाणी काळं कोणी दुधावाणी पांढरं !

स्वर - राम कदम
गीत - जगदीश खेबूडकर

=================================================
=================================================
कुण्या गावाचं आलं पाखरू
बसलंय्‌ डौलात न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात

कसं लबाड खुदूखुदू हसतंय, कसं कसं बघतंय्‌ हं
आपल्याच नादात ग बाई बाई आपल्याचं नादात

मान करून जराशी तिरकी, भान हरपून घेतंय्‌ गिरकी
किती इशारा केला तरी बी
आपल्याच तालात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात

कशी सुबक टंच बांधणी, ही तरुण तनु देखणी
कशी कामिना चुकून आली
ऐने महालात, न्‌ खुदूखुदू हसतंय्‌ गालात

स्वर - उषा मंगेशकर
गीत - जगदीश खेबूडकर

=================================================
=================================================
सांज आली दूरातून, क्षितिजाच्या गंधातून

मनी नकार दाटले, हात हातीचे सुटले
मागे वळून पाहता शब्दभाव सर्व पुसले
आले जीवन काळोखे सारे समोर दाटून

कळी कळी वेचताना अशी संध्याकाळ झाली
घराकडे वळणारी वाट अंधारी बुडाली
नामरूपहीन वृक्ष उभे भिती पांघरून

आत बाहेर घेरून आल्या घनदाट छाया
चुकलेल्या गुरापरी जीव लागे हंबराया
कळी कळी वेचताना वेळ गेलीसे टळून

स्वर - सुमन कल्याणपूर
गीत - शान्‍ता शेळके

=================================================
=================================================
जीर्ण पाचोळा पडे तो
आडवाटेला दूर एक माळ
तरू त्यावरती एकला विशाळ
आणि त्याच्या बिलगूनिया पदास
जीर्ण पाचोळा पडे तो उदास

उषा येवो शिंपित जीवनासी
निशा काळोखी दडवू द्या जगासी
सूर्य गगनातूनी ओतू द्या निखारा
मूक सारे हे साहतो बिचारा

तरूवरची हसतात त्यास पाने
हसे मूठभर ते गवतही मजेने
वाटसरू वाट तुडवीत त्यास जात
परी पाचोळा दिसे नित्य शांत

आणि अंती दिन एक त्या वनांत
येई धावत चौफेर क्षुब्ध वात
दिसे पाचोळा घेरूनी तयाते
नेई उडवुनी त्या दूर दूर कोठे

आणि जागा हो मोकळी तळाशी
पुन्हा पडल्या वरतून पर्ण राशी

स्वर - लता मंगेशकर
गीत - कुसुमाग्रज

=================================================
=================================================
हिरव्या हिरव्या रंगाची, झाडि घनदाट
सांग्‌ गो चेड्‌वा दिस्तां कसो, खंडळ्याचो घाट

हिरव्याहिरव्या झाडीत हिरवीहिरवी पानां,
हिरव्याहिरव्या पानांत वारो गाता गानां
पुना-बाँबे हीच गो तुझ्या, सासरची वाट

खंडाळ्याच्या घाटात हवा थंडगार,
थंडिमधे लालि चढे गालि गुलजार
तो-यामध्ये होऊ नको, उभी अशी ताठ

स्वर - शारदा, जयवंत कुलकर्णी
गीत - रमेश अणावकर

=================================================
=================================================
घनदाट रानी वाहे झुळुझुळु पाणी
पाखरे ही गोड गाती देवाजीची गाणी

वेळुच्या बनात चाले वा-याचे गायन
पाचोळ्याने भवताली धरिले रिंगण
वाजवितो बासरी का इथे चक्रपाणी

दुरावर ऐकु येई सागराचे गीत
निळे निळे डोंगर निश्चळ पुढे समाधीत
ध्यान लावुनी बैसले ऋषी-मुनी वाणी

वा-यामध्ये ऐकु येई तुझे कान गूज
चंद्र सूर्य ता-यामाजी प्रभू तुझे तेज
राही सदा देवा माझ्या श्यामच्या जीवनी

स्वर - आशा भोसले
गीत - यशवंत

=================================================
=================================================
फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो !
फुलाफुलांचे पंख लावुनी बागेमध्ये आलो !

मऊ मऊ माझ्या पंखांची, नक्षी सुंदर रंगांची
धुक्यात फिरता इकडे तिकडे दवबिंदूंनी न्हालो
फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो

फुलाफुलावर बसतो मी खुदकन गाली हसतो मी
डोळे मिटुनी थेंब मधाचे मिटक्या मारीत प्यालो
फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो

नकाच लागू पाठी रे, नका धरु मज हाती रे
कृरपणा हा बघुनी तुमचा मनोमनी भ्यालो
फूलपाखरू झालो रे मी फूलापाखरू झालो

स्वर: ?
गीत: जगदीश खेबूडकर

=================================================
=================================================
हे दीपा तू जळत रहा

असाच जागत या विजनावर
जीवनसुम तिमिरास वहा ॥

नक्षत्रांशी होते नाते
परी न आता सांगायाचे
भग्न चि-यावर वादळात या
तुला मला रे जळावयाचे
विसर मंदिरे विसर गोपुरे
श्रेय इथे मातीत पहा ॥

स्वर - कान्होपात्रा किणीकर
गीत - वि. वा. शिरवाडकर

=================================================
=================================================

गुलमोहर: 

सदर मालिकेत मला स्वतःलाच कुठेतरी थोडासा तोचतोचपणा जाणवत आहे त्यामुळे हि मालिका इथेच संपवत आहे. :-). प्रकाशचित्रगीत भाग १-४ ला दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनापासुन आभार.

लोभ आहेच तो असाच वृद्धिंगत व्हावा.
— योगेश

मला तरी तोचतोचपणा नाही जाणवला. आता हि मालिका संपवतो आहेस तर दुसरी एखादी सुरु कर लवकरच.

सुंदर.. ते एक फूलले फूल मस्तच.. Happy नि हो, फोटोंची आवड असणार्‍याला कंटाळा कसला येणार रे... तरीपण अगदी वेळेवर मालिका संपवत आहेस हे माझे मत.... आवडले.. आता पुढील मालिकेच्या प्रतिक्षेत Happy

तोच तोच पणा जाणवण्याचा प्रश्न्च नाहि, प्रत्येक नव्या फोटोला नविन गाणं, आणि सगळंच अप्रतिम....
दुसर्‍या मालिकेचि प्रति़क्षा.... लवकर येउ देत.......

प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद Happy
कदाचित पाचही भागात वेगळेपण (माझ्या इतर थीमप्रमाणे) मला जाणवत नसल्याने असेल Happy
मी नक्कीच प्रयत्न करेन काहितरी वेगळे घेऊन येण्याचा.
पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद Happy

'वळण' माळशेज घाटाच्या रस्त्यावरचं आहे का?>>>हो, माळशेज घाटाच्या रस्त्यावरचेच Happy

जिप्सी, मला आत्ताच ईन मीन तीन कडून ह्या तुझ्या थीमबद्दल कळाले. सगळे फोटो आणि त्याला अनुसरून गाणी अफलातून! काय कलेक्शन आहे रे तुझ्याकडे गाण्यांचे! ग्रेट..

जिप्सी - तुझ्या सगळ्याच थीम्स ग्रेट म्हणजे ग्रेटच असतात - तू कलाकार असल्याने तुला नाविन्याची आवड असणे स्वाभाविक आहे - पण तोचतोचपणा येतोय हे काही कारण देउ नकोस - रसिकांवर सगळं सोपव बरं, आणि फोटो काढत जा व इथे टाकत जा.............
ही गाणी व फोटो - दोन्हीही बेस्टच.......

जिप्सीजी तुम्हाला साष्टांग नमस्कार! तुमची ही निसर्ग मालिका म्हणजे तापलेल्या ग्रीष्मात थंडगार प्रसन्न वार्‍याची झुळूक, तहानलेल्या जीवाला अमृत मिळावे. डोळे खरचं निवतात हे बघुन, आणी तुमचा हेवा ( चांगल्या अर्थाने ) वाटतो, की तुम्हाला हे सर्व अनुभवायला मिळते. मालिका खंडीत करु नका, प्लीज ~!