प्रकाश"चित्रगीत" – नाविका चल तेथे . . .

Submitted by जिप्सी on 6 January, 2011 - 22:51

वेगवेगळी फुले उमलली... या थीमला दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर त्याच प्रकारची अजुन एक थीम घेऊन येत आहे "प्रकाशचित्रगीत". यात एक मराठी गाणे आणि त्या गाण्याला अनुरूप असा मी काढलेला एक(च) Happy फोटो असेल. (प्रत्येक आठवड्याला एक फोटो आणि एक गाणे प्रदर्शित करण्याचा विचार आहे. अर्थात "ओव्हरडोस" होणार नाही याची नक्कीच काळजी घेईन. :-).) आशा आहे कि हि थीमही पूर्वीच्या इतर थीमप्रमाणे आवडेल.

"भंडारदरा" प्रवरा नदीवर बांधलेले ब्रिटीशकालीन धरण. अहमदनगर जिल्ह्यातील निसर्गसौंदयाने ओतप्रोत भरलेले एक अप्रतिम ठिकाण. खरंतर कुठल्याही ऋतुत येथे जा, पण पावसाळ्यातील याचे सौंदर्य वर्णनातीत असते. सभोवती असलेल्या हिरवागार निसर्ग पहात प्रिय व्यक्तीच्या सहवासात "ऑर्थर तलावात" होडीतुन एक फेरी मारताना नकळत गीत ओठावर येते........
=================================================
=================================================
नाविका चल तेथे, दरवळते जेथे चांदणे
नाविका......

जिथे उन्हाचा स्पर्शहि लोभस
सरगम गुंजत झरतो पाऊस
फुलासारखे तिथे फुलावे, तुझे नि माझे जिणे
नाविका चल तेथे ......

मखमालीची जिथली हिरवळ
मुळी न सुकते सुमनांचे दळ
अवकाशाच्या तारा छेडी, वारा मंदपणे
नाविका चल तेथे ......

प्रिय नयनातील, भाव वाचता
चुकुन दिसावा मोर नाचता
दूर देशीचे बुलबुल यावे, कधी मधी पाहुणे
नाविका चल तेथे ......

स्वर - आशा भोसले
(चित्रपट: एकटी)

=================================================
=================================================

गुलमोहर: 

जिप्सी.. अप्रतिम रे... Happy

माझा पहिला मोठा ट्रेक करताना मुरशेतवरून रतनवाडी असा प्रवास धरणातून केला होता. Happy त्याची आठवण झाली... Happy सुंदर...

मस्त रे तो भंडारदर्‍याचा परिसर कुठल्याही ऋतुत खुलुन दिसतो.
हा घे माझा झब्बु..................

दोन्ही फोटो मस्तयत Happy
योगेश तुझं नावाची कॅलिग्राफी तू केलीस? कशी? म्हणजे हाताने की फॉन्ट आहे? छान आहे.

धन्यवाद!!! Happy

योगेश तुझं नावाची कॅलिग्राफी तू केलीस? कशी? म्हणजे हाताने की फॉन्ट आहे?>>>>नीलू हि सगळी मायबोलीकर नीलवेदची कृपा. Happy त्याची सही मला चिक्कार आवडली म्हणुन मीही प्रचंड हट्ट करून त्याच्याकडुन करून घेतली Happy आणि त्यानेही एकाच दिवसात लगेच करून दिली. धन्स नील Happy

रोहित, झब्बुपण मस्तच Happy

योगेश, गाण्यातल्याप्रमाणे दरवळणारे* चांदणे पण दिसायला होते (इथे आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला, या ओळी असणारे, नाविका रे, हे गाणे हवे होते.)
*असे चांदणे पाकिजा मधल्या, चलो दिलदार चलो, मधे दिसले होते.

(इथे आषाढाचे दिस गेले, श्रावणाचा मास सरे, भादवा आला, या ओळी असणारे, नाविका रे, हे गाणे हवे होते.)>>>>दा, मी इथे पावसाळ्याच्या दिवसात गेलो होतो. त्यामुळे "उन्हाचा स्पर्शहि लोभस", "सरगम गुंजत झरतो पाऊस", "मखमालीची जिथली हिरवळ" "नाविक" "होडी" हे सगळे अनुभवता आले, म्हणुन हे गाणे घेतले Happy

योगेश.. फोटो नि त्यास अनुषंगुन गाण छानच. Happy पण खुप काहि कमी पाहिल असं वाटतय. त्यामुळे ते क्रमश: पेक्षा अन प्रत्येक आठवड्यापेक्षा एकत्रच फोटो नि गाणी बरी वाटली असती. हे आपलं मला वाटलेलं हं Happy

सुंदर.