प्रकाश"चित्रगीत" – २

Submitted by जिप्सी on 9 January, 2011 - 23:39

=================================================
=================================================
मी एक तुला फुल दिले सहज नकळता
त्या गंधातुन मोहरली माझी कविता
त्या झरणीतुन रूणुझुणला शब्द ह्रदयीचा
त्या शब्दातुन मोहरली माझी कविता ....

हे गगन निळे चांदण्यात भिजुनी चिंबले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभले
त्या चांदण्यास कनकाचे साज लाभता
त्या साजातुन मोहरली माझी कविता ....

का पानफुलं लज्जेने चूर जाहले
का सळसळत्या वार्‍यचे नुपुर वाजले
त्या नुपुरांचे किणकिण किण सूर बहरता
त्या बहरातुन मोहरली माझी कविता ....

बघ उमलताच कलिकेची पाकळी जशी
का शब्द शब्द फुलवित असे काव्य मानसी
ह्या दोन मनी काव्याचा भाव लोटता
त्या भावातुन मोहरली माझी कविता ....

स्वरः सुरेश वाडकर
संगीतः श्रीधर फडके
गीतकारः शांताराम नांदगावकर
अल्बमः तेजोमय नादब्रह्म

=================================================
=================================================
मावळत्या दिनकरा, अर्ध्य तुज जोडुनि दोन्ही करा

जो तो वंदन करी उगवत्या, जो तो पाठ फिरवि मावळत्या
रीत जगाची ही रे सवित्या, स्वार्थपरायणपरा

उपकाराची कुणा आठवण, शिते तोवरी भूते अशी म्हण
जगात भरले तोंडपूजेपण, धरी पाठिवर शरा

आसक्त परि तू केलीस वणवण, दिलेस जीवन, हे नारायण,
मनी न धरिले सानथोरपण, समदर्शी तू खरा

प्रभु-सचिवा विरही मुखधूसर, होति दयामृदु नयनिष्ठुर कर
टाकुनि कारभार चंद्रावर, चाललास तू खरा

स्वर - लता मंगेशकर
गीत - भा. रा. तांबे
संगीत - पं. हृदयनाथ मंगेशकर

=================================================
=================================================
ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा

जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले
अस्ताचलास जेथे रविबिंब टेकलेले
जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा

घे साउली उन्हाला कवळून बाहुपाशी
लागुन ओढ वेडी खग येति कोटरासी
एक एक चांदणीने नभदीप पाजळावा

स्वप्नामधील गावा स्वप्नामधून जावे
स्वप्नातल्या प्रियाला मनमुक्त गीत गावे
स्वप्नातल्या सुखाचा स्वप्नीच वेध घ्यावा

स्वर - आशा भोसले
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - पं. ह्रदयनाथ मंगेशकर

=================================================
=================================================
साऊलीस का कळे उन्हामधील यातना
जाणवेल मीलनी कोण विरह वेदना

असती माहिती कशी नदीस घोर वादळे
आसवांत जग बुडे मृगजळास का कळे
जी व्यथा नभातली ती कथाच अंगणा

फूलपंखी का कधी गरुड झेप घेतसे
काजळी तमास का रंग कोण देतसे
हृदयशून्य करिल कोण मंदिरात प्रार्थना

रजनीच्या घरी कधी होई सूर्य पाहुणा
दिसती ना कधी कुणा अंतरातल्या खुणा
सांगते अबोली का कुणास मुग्ध भावना

स्वर - लता मंगेशकर
गीत - गंगाधर महांबरे
संगीत - श्रीनिवास खळे
चित्रपट - सोबती

=================================================
=================================================
माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं धाकल्या दीरा रं
चल जांवया घरा

आज पुनवा सुटलंय दमानं
दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा

शीड फाटलं धावतं पाठी
तुटलं सुकानू मोरली काठी
फेसाल पान्याचा घेरा

कोलीवारा रं राहीला दूर
डोलां लोटीला पान्याचा पूर
संबाल संसार सारा

स्वर - लता मंगेशकर
गीत - शान्‍ता शेळके
संगीत - पं. हदयनाथ मंगेशकर

=================================================
=================================================
भाग – १
http://www.maayboli.com/node/22470
प्रकाश"चित्रगीत" – नाविका चल तेथे . . .

गुलमोहर: 

मायबोलीकर भावना यांनी सांगितल्याप्रमाणे (गेल्या भागात एकच फोटो आणि एकच गाणे असल्याने तो भाग लगेच संपला असे वाटले :-)) एका पेक्षा थोडी(च) जास्त गाणी आणि फोटो प्रदर्शित करत आहे. Happy

योगेश, आपण खरोखर ग्रे८ आहात. इतकी सुंदर कल्पना .. !

असं चित्रमय पुस्तकाच्या प्रत्येक आवृत्तीचा संग्रह करायला मला जरूर आवडेल. Happy

मस्त आहे रे योग्या.. शेवटचा फोटो तर खुपच आवडला.. राजा सारंगाची वाट पाहात उभी असलेली कोळीण.....

पहिला ही आवडला.... Happy

धन्यवाद Happy
रच्याकने, कुणाला पहिल्या गीताचे गीतकार माहित आहे का?>>>>धन्यवाद "क्षिप्रा" पहिल्या गीताचे गीतकार सांगितल्याबद्दल.

अरे नवर्‍यापेक्षा म्हावर्‍याचीच पाहत असेल. जेवण करायला उशिर झाला असेल तिला.

अरे नवर्‍यापेक्षा म्हावर्‍याचीच पाहत असेल. जेवण करायला उशिर झाला असेल तिला.>>>>> Proud

आणि तिच्या एकुण आविर्भावावरुन म्हावरा आणायला लेट करणा-या नव-यालाही ती रव्यात घोळवुन तळणार यात शंका वाटत नाहीये मला... Happy

मफो ___/\___ मानल बाबा तुला!! अप्रतिम कवितांना साजेशी अप्रतिम प्रकाशचित्रे!!!

Pages