प्रकाशचित्र"गीत" – ३

Submitted by जिप्सी on 16 January, 2011 - 22:27

=================================================
=================================================
काळ्या मातीत मातीत तिफन चालते,
तिफन चालते, तिफन चालते
ईज थयथय नाचते ढग ढोल वाजवितो,
ढोल वाजवितो, ढग ढोल वाजवितो

सदाशिव हाकारतो नंदी बैलाच्या जोडीला
संग पारवती चाले ओटी बांधून पोटाला
सरीवर सरी येती माती न्हाती धुती होते
कस्तुरीच्या सुवासानं भूल जिवाला पडते
भूल जिवाला पडते वाट राघूची पाहते
राघू तिफन हाकतो मैना वाटुली पाहते

चालं ऊनपावसाचा पाठशिवणीचा खेळ
लोणी पायाला वाटती मऊ भिजली ढेकळं
काळ्या ढेकळात डोळा हिरवं सपान पाहतो
डोळा सपान पाहतो काटा पायांत रुततो
काटा पायांत रुतता लाल रगात सांडतं
लाल रगात सांडतं हिरवं सपान फुलतं

स्वर - अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर
गीत - विठ्ठल वाघ
संगीत - अनिल-अरुण
चित्रपट - अरे संसार संसार

=================================================
=================================================
होडी चाले लाटेवरी कोण चालवे उमगेना
खेळ नियतीचा कळेना, दैव कळले ना कुणा
होडी चाले लाटेवरी कोण चालवे उमगेना........

होडी नवी दर्या जुना लाटालाटांनी खेळ हा पाहिला
होडी चाले लाटेवरी कोण चालवे उमगेना........

जरी शांत भासले उरी लपून वादळे
त्यांची चाहूल परी मिळेना
दैव कळले ना कुणा.....
विसरू नका मुंजा मोगा, तुझेविणा संसार माका नाका
होडी चाले लाटेवरी.......

दूर क्षितिज लाघवी बोल घालुन बोलवी
क्षणा पुढचे काहि दिसेना
दैव कळले ना कुणा.....
विसरू नका मुंजा मोगा, तुझेविणा संसार माका नाका
होडी चाले लाटेवरी.......

स्वरः सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर
संगीत: ह्रदयनाथ मंगेशकर

=================================================
=================================================

कशी काळ नागिणी, सखे ग, वैरिण झाली नदी
प्राणविसावा पैलतिरावरी, अफाट वाहे मधी.

सुखी मीन हे तरति न गणुनी लाटा कोट्यावधी
सुखी पाखरे गात चालली पार वादळी सुधी

पैलतटी न का तृण मी झाले तुडविता तरी पदी
पैलतटी न का कदंब फुलले करिता माळा कधी

पापीण खिळले तिरा, विरह हा शस्त्राविण वधी
प्राणांचे घे मोल नाविका, लावि पार, ने अधी

स्वर - लता मंगेशकर
गीत - भा. रा. तांबे
संगीत - पं. ह्रदयनाथ मंगेशकर

=================================================
=================================================

नीज माझ्या नंदलाला, नंदलाला रे

शांत हे आभाळ सारे
शांत तारे, शांत वारे
या झर्‍याचा सूर आता मंद झाला, मंद झाला रे

झोपल्या गोठ्यात गाई
साद वा पडसाद नाही
पाखरांचा गल्बलाही बंद झाला, बंद झाला रे

सावल्यांची तीट गाली
चांदण्याला नीज आली
रातराणीच्या फुलांचा गंध आला, गंध आला रे

नीज रे आनंदकंदा,
नीज रे माझ्या मुकुंदा
आवरी या घाग-यांच्या छंदताला, छंदताला रे

स्वर - लता मंगेशकर
संगीत - श्रीनिवास खळ
गीत - मंगेश पाडगावकर

=================================================
=================================================
ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी

त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी

कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी

कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी

कधि जवळ्‌ सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी

स्वर - वाणी जयराम, पं. कुमार गंधर्व
गीत - बाळ कोल्हटकर
संगीत - वसंत देसाई
नाटक - देव दीनाघरी धावला

=================================================
=================================================

प्रकाश"चित्रगीत" – नाविका चल तेथे . . .
http://www.maayboli.com/node/22470
प्रकाश"चित्रगीत" – २
http://www.maayboli.com/node/22535

गुलमोहर: 

मस्त..

छान Happy

जिप्सी, काय अप्रतिम आहेत चित्रगीत. वर्णन करायला माझ्याकडे शब्दच नाहीत. १ प्रचि पाहून कोकणात गेल्यासारख वाटल. माझ बालपण जागृत झाल.' काया मातीत मातीत' ही कविता आम्हाला शाळेत होती.
फार फार धन्यवाद.

तुला फोटोपाहुन गाणि निवडायला सुचतात कि गाण्यावरुन फोटो ? >> अगदी.. Happy योगी.. मस्त रे.. पहिला नि दुसरा फोटो विशेष आवडले रे.. Happy

प्रतिसादाबद्दल खुप खुप धन्यवाद Happy

तुला फोटोपाहुन गाणि निवडायला सुचतात कि गाण्यावरुन फोटो ?>>>धन्यवाद सुनिलजी/यो, खरंतर रोज(च) मराठी गाणी ऐकणे हा माझा आवडता कार्यक्रम आहे Happy आणि कधी कधी फोटो पाहताना बॅकग्राउंडला मराठी गाणी वाजतच असतात. त्याचावरूनच हि कल्पना सुचली. Happy