हा चंद्र तुझ्यासाठी हि रात तुझ्यासाठी
आरास हि ता-यांची गगनात तुझ्यासाठी
कैफात अश्या वेळी मज याद तुझी आली
येना... ओव्हरत्या स्वप्नांना घेऊन ये तू
थरथरत्या स्पर्शांना घेऊन ये तू
अनुरागी रसरंगी होऊन ये तू
नाजुकशी एक परी होऊन ये तू
वर्षाव तुझ्या तारुण्याचा रिमझिमता माझ्यावरी होऊ दे
रेशीम तुझ्या लावण्याचे चंदेरी माझ्यावरी लहारू दे
नाव तुझे माझ्या ओठांवर येते फुल जसे कि फुलताना दरवळते
इतके मज कळते अधुरा मी येथे चंद रात हि बघ निसटून जाते
बांधीन गगनास झुला जर देशील साथ मला
हे क्षण हळवे एकांताचे दाटलेले माझ्या किती भवताली
चाहूल तुझी घेण्यासाठी रात्र झाली आहे मऊ मखमाली
आज तुला सारे काही सांगावे विलगुनीया तू मजला ते ऐकावे
होउन कारंजे उसळी मन माझे पाउल का अजुनी न तुझे वाजे
जीव माझा व्याकुळला दे आता हाक मला
स्वर : स्वप्नील बांदोडकर
=================================================
=================================================
वाट इथे स्वप्नातिल संपली जणू
थांबवितो धारांनी सावळा घनू, ग बाई
आजूबाजूच्या पानांनी, वेढली ही निळाई
चिंतनात बैसली ग, मंत्रमुग्ध राई
फुलूनिया आली गडे, बावरी तनू
द-यांतुनी आनंदला, पाणओघ नाचरा
आसमंत भारीतो ग, गानसूर हासरा
माथ्यावरी दिसले ग, इंद्राचे धनू
स्वर - सुमन कल्याणपूर
=================================================
=================================================
दीप लाविले ज्योती गाती, शुभंकरोती बोल रंगती
जा रे जा रे मना माझिया माहेरा....
मायमाऊली ओवी गाई, गायने रंगुनी सुर ग राहिले
स्मृती हासती डोळ्यामधुनी, दर्पणे दिसत असे घर सानुले
अशाच वेळी माझ्या भोवती
दीप लाविले..........
दिवा आकाशी खुण सांगतो पाहुनी थांबती पाऊली काय गं
ओट्यावरती बालपणीचे खेळते स्वप्न का सारखे सांग गं
अशाच वेळी माझ्या भोवती
दीप लाविले..........
स्वरः सुमन कल्याणपूर
=================================================
=================================================
का हासला किनारा पाहुनी धुंद लाट
पाहुनिया नभाला का हासली पहाट
होती समोर माया गंभीर सागराची
संगीतमय मनाचे किलबिल पाखरांची
काठावरी उभी मी तो न्याहळीत पाठ
का हासला किनारा पाहुनी धुंद लाट........
चाहुल जाणीवेची स्पर्शातुनी गळाली
भारावलेल्या कळीला जणु पाकळी मिळाली
कमलापरी जुळावे ते स्वप्नरम्य हात
का हासला किनारा पाहुनी धुंद लाट......
स्वर: अनुराधा पौडवाल
=================================================
=================================================वल्हव वल्हव रे वल्हव रे होडी
पल्याड माझं गाव रे मला पोचीव घरा
आज रात पुनवेची गाणं गात नाचायची
आयली भरती समिंदरा.....
चारी दिशा रंगलेलं आभाळ हे निळ निळ
चांदण्याच्या मेळाव्यात चांदराजा आज फुलं
लाटासवे ताल धरी शिडामंदी वारा
वार्यासंगे मन जाई माझिया माहेरा
वल्हव वल्हव रे........
घर माझं सोन्यावाणी नाही मला काही कमी
भाग्य माझं साधंभोळं आज अमृतात न्हालं
देवाजीची किरपा झाली आयली लक्ष्मी घरा
सर्वसुखी आनंदाचा तुच रे निवारा
वल्हव वल्हव रे........
स्वरः सुमन कल्याणपूर
=================================================
=================================================
प्रकाश"चित्रगीत" – नाविका चल तेथे . . .
http://www.maayboli.com/node/22470
प्रकाश"चित्रगीत" – २
http://www.maayboli.com/node/22535
प्रकाशचित्र"गीत" – ३
http://www.maayboli.com/node/22708
नेहेमीप्रमाणे सुंदरच.
नेहेमीप्रमाणे सुंदरच.
मफो, अप्रतिम गीतं आणि त्याला
मफो, अप्रतिम गीतं आणि त्याला साजेशी प्रचि....अतिसुंदर!!!!! नेहमीप्रमाणेच
अनिरूद्धजी, लाजो धन्स
अनिरूद्धजी, लाजो धन्स
Pages