पाहिले तुला हळूच

Submitted by तुषार जोशी on 21 January, 2011 - 21:35

.
.
.
पाहिले तुला हळूच काल मी तिथे वळून
रूपमोगरा मनात दरवळे तुझा अजून
.

ओतले मधाळ गोड रूप साजिरे तुझ्यात
चंद्र पाहता वरून लाजतो तुला बघून
.
आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून
.
बघ वळून तू जरा तुझा पतंग लाजरा गं
लाव हास्यज्योत तू गं प्राण चालला विझून
.
हाय काय हासलीस हाय काय लाजलीस
हाय का गं चाललीस जीवनास मंतरून
.
तुषार जोशी, नागपूर
.

गुलमोहर: 

आजकाल आसपास होतसे तुझाच भास
प्राण प्राण रोम रोम गातसे तुझीच धून

वा! खूपच तरल, नाजुक गझल!

पून्हा एकदा मायबोलीवर तुमचं लिखाण पाहून आनंद वाटला.

हाय काय हासलीस हाय काय लाजलीस
हाय का गं चाललीस जीवनास मंतरून

- क्रांति यांना अनुमोदन. अगदी मखमल गझल.

रोमँटीक!! Happy

फक्त एक शंका : शेवटच्या दोन शेरात 'गं' हा शब्द लघु म्हणून योजला आहे तसे चालते का? व्याकरणाच्या दृष्टीने अनुस्वार असलेले अक्षर गुरू मानावे असे म्हटले आहे...जाणकारांनी प्रकाश टाकावा

धन्यवाद!!

विजय भाई तुमची शंका रास्त आहे, हा बदल कसा वाटतो बघा:

.
बघ वळून तू लगेच लाजरा तुझा पतंग
लाव हास्यज्योत तूच प्राण चालला विझून
.

!!