अर्धी वाटी बारीक चिरलेला कोबी
अर्धी वाटी बारीक चिरलेला कॉलीफ्लॉवर
अर्धी वाटी बारीक चिरलेलं गाजर
अर्धी वाटी बारीक चिरलेले मश्रूम्स
अर्धी वाटी बारीक चिरलेला तोफू (ऐच्छिक)
अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा
अर्धी वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात
१ टे. स्पू बारीक चिरलेला लसूण
१ टे. स्पू बारीक चिरलेलं आलं
२ हिरव्या मिरच्या बारीक चिरून
२ टे. स्पू. डार्क सोया सॉस
१ टि. स्पू. स्वीट चिली सॉस
२ टे. स्पू. केचप (टोमॅटो सॉस)
१ टि. स्पू. चिली सॉस
१ टि. स्पू शेजवान सॉस
चार कप व्हेजीटेबल स्टॉक किंवा १ व्हेजीटेबल bouillon cube
१ टे. स्पू. कॉर्नफ्लावर
१ टे. स्पू. तेल
चवीसाठी मीठ
तेलावर कांदा परतून घ्या.
लगेच लसूण, आलं घालून परता.
गाजर, कोबी, फ्लॉवर घालून परतून चार कप व्हे. स्टॉक किंवा पाणी + व्हे. bouillon घालून सगळे सॉस घाला. चव बघून मीठ, लागल्यास अजून सॉसेस घाला.
उकळी आल्यावर कॉर्नफ्लावर पाण्यात मिसळून सूप मधे घाला.
गॅस बंद करून गरम गरम सर्व्ह करा. वरून कांद्याच्या पातीने सजवा.
१. यात हवं असल्यास अजिनोमोटो घालू शकता. रेस्टॉरंटमधे मिळणार्या सूपच्या जवळपास चव येते. मी घालत नाही.
२. नॉनव्हेज सूप हवं असल्यास चिकन स्टॉक वापरा आणि शिजवलेल्या चिकनचे तुकडे घाला.
.
.
धन्यवाद. करून बघणेत येईल.
धन्यवाद.
करून बघणेत येईल.
मस्तच. मिंगचे सॉसेस वापरतेस
मस्तच. मिंगचे सॉसेस वापरतेस का देशी दुकानात मिळणारे ?
अंजली, चांगलीय कृती. एक
अंजली,
चांगलीय कृती.
एक विनंती ,अलीकडेच इथे पाककृतीवर झालेल्या चर्चेत असे नमूद केले होते की, कुठल्याही पाककृतीचा 'माहितीचा स्त्रोत' हा नुसता ईटरनेट नसून स्पष्ट असावा. अॅडमिन ह्यांनी सुद्धा सांगितले की नुसते 'ईंटरनेट' लिहून चालणार नाही. कुठल्या ब्लॉगर वरून 'उचललेली' असेल पाकृ तर तसे ब्लॉगरला श्रेय द्यावे. तेव्हा तुम्ही सुद्धा कृपया ते नक्की कुठल्या 'लिंक' वरून घेतली ते लिहिणार का नुसते ईंटरनेट लिहिण्यापेक्षा?
व जमल्यास पाककृतीच्या पुस्तकाच्या लेखिकेला ते श्रेय देणार का त्यांची (मूळ लेखक व पुस्तकांची) नावं नमूद करून?
मेधा, चिंग्ज सिक्रेट्चे देशी
मेधा, चिंग्ज सिक्रेट्चे देशी दुकानात मिळणारे सॉसेस वापरते.
ध्वनी, हि पाककृती कुठल्या एका ब्लॉगवरची किंवा एका साईटवरची नाही. ४-५ वर्षांपूर्वी इंटरनेटवर शोधाशोध करताना ४-५ कृतींमधलं सामान वापरून पहिल्यांदा हे सूप केलं. नंतर स्वतःचे अजून काही प्रयोग करून ही कृती तयार केली. कुठल्या साईटसवरून माहिती मिळाली तेही आता आठवत नाही. परत त्या साईटस सापडल्या तर जरूर त्यांची नावं लिहीन.
धन्यवाद अंजली तुम्ही
धन्यवाद अंजली तुम्ही प्रामाणिक उत्तर दिलेत म्हणून.
मस्तच गरमगरम सूप आणि नूडल्स
मस्तच गरमगरम सूप आणि नूडल्स खायला खूपच मजा येईल. मी त्या जिंजर टोफूची वाट बघतेय. ती लिहिली नाहीयेस का अजून ?
अंजली,आज करुन पाहिलं....मस्त
अंजली,आज करुन पाहिलं....मस्त झालंय....
अगो, इथे टाकली आहे बघ जिंजर
अगो, इथे टाकली आहे बघ जिंजर तोफूची रेसेपी.
पूर्वा, धन्यवाद
मस्त आहे रेसिपी. आज करणारे.
मस्त आहे रेसिपी. आज करणारे. मी वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आयत्यावेळी घालते.
छान पाकृ!
छान पाकृ!
मस्तच
मस्तच