मराठा संघर्ष - पेशवे व पेशवाई
छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले आणि त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. त्याच्या उत्तराभीमुख राजकारणामुळे मराठेशाही अटकेपार जाऊन आली. पेशव्यांच्या उदय अस्तावर अनेक पुस्तके आहेत त्यामुळे या लेखात मी वंशावळीवर वा ईतर गोष्टींवर न जाता मुख्य पेशव्याच्या उदय कसा झाला हे मांडनार आहे. प्रस्तुत लेखात विस्तारभयामुळे अनेक घटना येनार नाहीत पण पेशवे कोण होते, त्यांचाकडे गादी का आली ह्याच गोष्टींवर विचार करत आहे.
महाराजांनी छत्र चामरे धरायच्या आधीच पेशवे पद निर्मान केले होते. स्वराज्याचे पहिले पेशवे हे सोनोपंत डबिर होते. त्यांचा नंतर निळोपंताना (मुलगा) पेशवाई न जाता राझेंकर कुळकर्णी पेशवे झाले व त्यापुढे मोरोपंत पिंगळे हे पेशवे झाले. महाराज जर स्वराज्याची उजवी बाजु होते तर मोरोपंत हे डावी ईतके मोठे काम पंतानीं करुन ठेवले आहे. स्वराज्य जिंकने हे काम सेनापतीचे पण त्यावर अंमल चढविने हे पेशव्यांचे. असे हे पेशव्यांचे महत्व.
नंतर पेशवाईच्या काळातील पहिला पेशवा बाळाजी विश्वनाथ भट कसा झाला ते पाहु.
बाळाजी विश्वनाथ भट हा मुळचा कोकणातील श्रीवर्धनचा होता. त्याचा घरान्याकडे दंडाराजपुरी व श्रीवर्धन परगण्यांची देशमुखी साधारण १४०० पासुन होती. रिसायसकार ( गो स सरदेसाई, यांनी फार मोठी कामगीरी मराठी ईतिहासासाठी केली आहे) लिहीतात की भट घरान्यतील लोक कदाचित थोरल्या महाराजांकडे नोकरीला होते. दंडाराजपुरी म्हणल्यावर जंजीरा बाजुला आलाच. तिथे सिध्दी होता त्याचा उपद्रव वाढल्यामुळे मुळ पेशवा देशावर आला. राजाराम महाराजांच्या काळात बाळाजी पुणे प्रांताचा सरसुभेदार होता तर १९०४ ते १७०७ मध्ये तो दोलताबादेचा सरसुभेदार होता. याच काळात कदाचित तो धनाजी जाधवाबरोबर मोहीमेस गेला असावा असा निष्कर्ष ईतिहास्कार काढतात. घाटावर येतानाचे त्याचे वय कदाचित २० एक असेल.
दोलताबादचा सुभेदार असताना त्याची स्वतःची राजमुद्रा होती.
" श्री उमाकान्तपदांभोजभजनाप्रसमुन्नते: |
बाळाजी विश्वनाथास्य मुद्रा विजयहेतराम ||"
धामधुमीच्या काळात जरी तो महाराणी ताराबाई सोबत काम करत असला तरी शाहु सुटुन आल्यावर त्याला शाहुचा पक्ष महत्वाचा वाटला म्हणुन तो तिकडे गेला. शाहु - ताराराणि युध्दात धनाजी जाधव ताराराणि कडुन होता. युध्द करायला तो निघाला पण युध्द झालेच नाही. बाळाजी विश्वनाथाने मोलाची कामगिरी करुन धनाजी जाधवास शाहुच्या पक्षात ओढले. कमजोर असलेला शाहु पक्ष धनाजी जाधव मुळे बळजोर झाला. ह्या घटनेला फार महत्व आहे. यामुळे बाळाजी विश्वनाथ शाहुचा मुख्य सहकारी झाला त्यामुळे शाहुने खुश होऊन बाळाजीस "सेनाकर्ते" ही पदवी बहाल केली.
पुढे जेव्हा तेव्हाचा पेशवा बहिरोपंत पिंगळे याला आग्र्यांनी अटक केली तेव्हा स्वराज्या समोर मोठा कठीन प्रश्न निर्मान झाला. एक सरदार दुसर्याला अटक करतो. तो सोडविन्यासाठी प्रतिनिधीशी सल्ला मसलत करुन शाहुने बाळाजी विश्वनाथला पेशवा केला. तेव्हा प्रथम भट घराने पेशवे झाले. पेशव्याने मोठ्या हिकमती आंग्र्याशी युध्द न करता सलोखा केला त्यामुळे त्याचे वजन आणखीन वाढले.
शाहुने मांडलिकी स्वरुप राज्य स्विकारल्यामुळे जेव्हा दिल्लीत गडबड झाले तेव्हा शाहुने हुसेन अलीला मदत करन्यासाठी बाळाजी विश्वनाथला पाठवले. ही मराठ्यांची पहिली मोहीम. (स्वतंत्र न्हवती पण त्यामुळे उत्तरेतल्या वाटा समजल्या, राजकारण समजले). जाताना बाळाजीने आपल्या कोवळ्या पोराला ( पहिला बाजीराव उर्फ विश्वास राव) सोबत घेतले. सन १७१८. ) या मोहीमेत सामील होताना एक तह झाला त्यात पण पेशव्याने मोलाची कामगिरी बजावली. हाच तो करार ज्यात पहिलेंदा चओथाई चा मुद्दा आला व पुढे निझामासोबत बाजीरावाने युध्द केले.
राजारामाने सनदादेऊन राज्य वाढीस लावायचा प्रयत्न केला होता. बाळाजी ने तो पुढे नेऊन त्याला मराठा मडंळाचे मोठे स्वरुप आणले.
बाळाजीच्या पश्चात त्याचा मुलगा बाजीराव पेशवा झाला. त्याला विरोध झाला नाही कारण तो वयाचा ११ व्या वर्षापासुन राजकारणात व स्वार्यात समाविष्ट होता. (पहीली स्वारी शाहु विरुध्द चंद्रसेन जाधव (धनाजी चे सुपुत्र).) पण तो वारल्यावर त्याचा मुलाला म्हणजे बाळाजी बाजीराव ( नानासाहेब पेशवे) लगेच पेशवाई मिळाली नाही. बाजीरावाचे जामात बाबूजी नाईक बारामतीकर (जोशी) हा ३ महीने पेशवा होता. तो प्रंचड श्रिमंत होता. शाहुवर त्याचे प्रंचड कर्ज होत त्यामुळे त्याने पेशवाई विकत घेतली असे म्हणता येईल. पण नंतर शाहुने परत नानासाहेबांना पेशवाई सन्मानाने परत केली. पण यापुढे मात्र नानासाहेबाने पेशवाई वंशपरंपरेने मागीतली व ती त्याला देऊ केली. पूढे १७४९ च्या आसपास शाहु महाराज निवर्तले त्यामुळे सर्व अधिकार पेशव्यांकडे आले.
पेशव्यांना बर्याच लोकांचा विरोध होता. जसे सेनापती दाभाडे, रघुजी भोसले, पंत प्रतिनिधी वैगरे. बाजीरावाने आणखी एक मोठे युध्द दाभाडेशी गुजरात / माळव्यासाठी केले व त्यात तो विजयी झाला.
पेशव्यांचा कारभार (पेशवे म्हणुन)
बाळाजी विश्वनाथ - १७१३ ते १७२० पेशवाई प्रारंभ.
बाजीराव - १७२० ते १७४० ( बंघु चिमाजी आपा)
मधिल दोन तिन महीने बाबुजी नाईक.
बाळाजी बाजीराव -( नानासाहेब) १७४० ते १७६१ ( बंधु रघुनाथ, चुलत बंधु सदाशिव, अपत्य विश्वासराव, माधवराव)
माधवराव - १७६१ ते ७२
नारायनराव - १७७२-७३
रघुनाथराव १७७३-७४
सवाई माधवराव - ते बाजीराव दुसरा १७७४ ते १८१८. पेशवाई समाप्त.
पुढे अमृतराव व नंतर नानासाहेब दुसरे यांनी १८५७ च्या स्वातंत्र्यसमर मध्ये भाग घेतला.
धन्यवाद
धन्यवाद केदार. चांगली माहिती. बाजीरावाचे ही खरे नाव वेगळेच होते काय म्हणजे? आणि पुणे हे सत्ताकेंद्र मधे काही दिवस नव्हते का? पेशवे यांच्या (व भोसल्यांच्या ही) सध्याच्या पिढ्या कोठे आहेत?
पुण्यात भांडारकर रस्त्याजवळच्या एका गल्लीत एक "पेशवे" असे पदवी सारखे नाव असलेली एका बंगल्यापुढची पाटी आठवते. बहुधा डेक्कन च्या बाजूने गेलो तर कमला नेहरू पार्क च्या आधीची गल्ली.
हो खरे नाव
हो खरे नाव विश्वासराव पण ते बाजी राव कधी झाले हे मला माहीत नाही. कदाचित एखादी लढाई जिंकल्यावर झाले असन्याचा वाव आहे.
बाजीराव हा एकच असा पेशवा होता की जो त्याचा फोजे बरोबर अभष्य भक्षन व अपेयपान नित्याने करत असे. राणोजी शिंदे व मल्हारराव होळकरांना त्याने घडविले, वाढविले.
भोसल्यांच्या पिढ्या सातारा वर कोल्हापुरला राहातात. ( हे दत्तक भोसले, महाराजांचा वंश सातार्यासाठी शाहु सोबत व कोल्हापुरसाठी बहुतेक रामराजा किंवा दुसरा संभाजी सोबत संपला नक्की आठवत नाही.). भोसले कुळीची किंवा पेशव्यांची वंशावळ बहुतेक मायबोलीवर् कुठेतरी पाहीली होती फार पुर्वी, नक्की आठवत नाही कुठे ती.)
पेशवे कुठे राहातात हे ही मला माहीत नाही. पण पर्वतीवरच्या संग्रहालयात वंशावळ व सध्याची पेशव्यांची पिढी ह्यांचे नाव पाहीले होते ७-८ वर्षांपुर्वी.
तेवढे तिन महिने पुणे सत्ताकेंद्र न्हवते पण शाहु महाराजांना नानासाहेब पेशव्याची फोज काय चिज आहे हे माहीत होत. त्याचा फोजेत शिंदे व होळकर होते. त्यामुळे कदाचित शाहु महाराजांनी परत पेशवे पद देऊ केले असेल.
खुप छान
खुप छान माहीती....
केदार
केदार उत्तम लेख. फक्त शेवटच्या ओळीत १८७५ एवजी १८५७ कर. तसेच पेशवे कायम सातारकरांच्या बाजुला होते. कोल्हापुरकरांकडे कधीही नव्हते. याचे काही खास कारण?
मंदार
सही! आता
सही! आता यापुढे काय लिहिणार?
धन्यवाद
धन्यवाद केदार , खुप छान माहिती दिलीस.
यापुढे अजुन येऊ दे............
केदार, छान
केदार, छान लिहिता पण प्लिज शुदध लिहिलत तर बर होईल.
आज
आज शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी ह्याहुन चांगल काय वाचायला मिळणार होत
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**
आभार
आभार केदार, पेशवे आणि पेशवाई, हे शब्द पराक्रमापेक्षा, ऐषाआरामाशीच निगडित झालेत. एका वेग़ळ्या पैलुवर लिहिलेय, ते छान झाले. पुढे येणारच असेल.
सहीरे
सहीरे केदार्!!!!अजुन येउ देत.
झकास हिंदु कॅलेंडरप्रमाणे शिवजयंती १६ तारखेला आहे. आज राजकारण आहे बाकी काही नाही.
केदार,
केदार, सुरेख लिहितो आहेस! विस्तारभय वगैरे बाळगु नकोस. जे जे लिहिशील पेशवाईबद्दल ते सगळं आवडून वाचु!
सर्वांना
सर्वांना मनापासुन धन्यवाद.
मॄ नक्कीच.
मंदार बद्ल केला. टायपो.
फक्त पेशवेच नाहीत तर सध्या १६८९ ते पेशवाई पर्यंतचा वेध घ्यायच्या विचार करतोय. ज्या गोष्टी सहज माहीती होतात त्यांना मी टाळत आहे पण ज्या गोष्टी आपल्याला सहसा खोलात वाचल्याशिवाय माहीती होनार नाहीत त्या द्यायचा प्रयत्न करेन. ही मालीका अचानक सुरु केल्यामुळे थोडी विस्कळीत होन्याची शक्यता आहे.
पुढचा लेख खास स्लार्टीच्या धमकीमुळे
तसेच एखाद्या घटने विषयी जास्त माहीती हवि असेल तर ते ही सांगा मी नक्कीच ती देन्याचा प्रयत्न करेन.
माझ्या शुध्दलेखानाच्या चुका आहेत त्या बद्दल दिलगीर आहे. त्या कमी करायच्या प्रयत्न करतो. लेखानंतर विचारपुशीत चुका काय आहेत हे लिहल्या तर लेख सुधारन्यास वाव मिळेल. परत एकदा धन्यवाद.
केदार; लेखा
केदार;
लेखामधून चांगली माहिती दिली आहे. अजून विस्ताराने येऊ दे. अजून एक सांगावंसं की तुझ्या प्रतीसादाला उत्तर देताना रावबाजींच्या अभक्ष-भक्षण, अपेय-पानाबद्दल सांगण्याचा संदर्भ कळला नाही. त्याच्याही आधी रावबाजी एक जागतिक किर्तीचे सेनापती आहेत. त्यांनी एकही लढाई हरलेली नाही. (चूक असल्यास दुरुस्त करणे) त्यांनी मरठी स्वराज्यातली घराणेशाही मोडीत काढऊन शिंदे-होळकरांसारखे सरदार घडवले याचा त्रोटक मुद्दा आला आहे. तो विस्ताराने आला तर हे महत्वाचे काम लोकांसमोर येईल.
फरेंड;
तू ज्या पाटीचा उल्लेख केला आहेस तो बरोबर आहे. तिथे उदयसिंह पेशवा हे पेशव्यांचे वंशज रहातात.
भोसल्यांचे सध्याचे वंशज म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज आणि सातार्याचे उदयनमहाराज
श्री
पेशव्यांच
पेशव्यांचे वंशज पेशवे हेच आडनाव लावतात की भट ? रघुनाथराव हाही एक मोठा वीर पेशवा होता ना ? एकदा मी अटक कुठे आहे हे नकाशात बघितले आणि थक्कच झालो.
***
असेच काही द्यावे घ्यावे
दिला एकदा ताजा मरवा
देता घेता त्यात मिसळला
गंध मनातील त्याहून हिरवा
- इंदिरा
मी असे
मी असे ऐकले आहे की अटकेत आत्ता सुद्धा राघोबादादाची समाधी आहे आणि तेथे अजूनही दिवा लावण्यात येतो (पाकिस्तानात?)
नवीन
नवीन माहिती वाचावयास मिळाली. असेच काहीतरी लिहीत जा....धन्यवाद.
रघुनाथराव
रघुनाथराव हाही एक मोठा वीर पेशवा होता ना >>>
हो. बापासारखच. मैलोनमैल अंतर सहज कापुन काढनारा व धडाक्यात शत्रुनिर्दालन करनारा पेशवा. अटक ही नदी आहे. ईराणी-तुर्की लोकांनी अफगाण घेतल्यापासुन (म्हणजे राजा अनंतपाळ जेव्हा कंदहार ला हारला) अफगाण व हिंदुस्थानाची सिमा म्हणजे अटक नदी. हा राघोबा अटकेला जाऊन लढुन आला आहे. या स्वारीत म्लेंच्छांना पळवुन लावल्यावर राघोबाने शिंखाना जोरदार मार दिला, नजिबाला सोडुन दिला त्यामुळे पाणिपत चे गणित बदलले व शिखही सोबतीला आले नाही. त्या स्वारीचे वर्णन पण कधीतरी करेन. फार रोमांचक स्वारी आहे ती.
अमोल अटकेत नाही. बहुतेक पुण्यात किंवा आर्यवर्तात. मी वाचुन परत लिहीन.
टिळक्श्री - बाजीरावा बद्दल लिहीने संपले नाही. या लेखाची मर्यादा फक्त अमोलने एक प्रश्न विचारला होता पेशवाई कुठुन सुरु झाली तेवढीच ठेवली. प्रत्येक पेशव्यावर मी सविस्तर लिहीनार आहे. अभक्ष्य भक्षणाबद्दल ह्यासाठी लिहीले की हा माणुस थोर लहान, सरदर, शिलेदार यात भेद करत नसे, प्रंसगी त्याचां ताटातील खात असे त्यामुळे होळकर - शिंदे तयार झाले पण मी संदर्भ त्रुटक दिला, नंतर पुर्ण लिहीन.
दिनेश तुम्ही जी पेशवाई वर्णन करत आहात ती १८१० व त्या नंतरची, त्या आधी पेशव्यांना साक्षात अहमदशहा अब्दाली सारखा लढवय्या माणुस, नजिब, दिल्लीचा बादशाहा देखील घाबरायचा. त्यांनी मोठे कार्य केले आहे ते पुढे येनारच आहे.
तुम्हा सर्वांच्या प्रतिसादामुळे ईतिहास तुमच्यासमोर ठेवन्याची / मांडन्याची माझ्यावर मोठी जबाबदारी आली, याची जाणिव मला आहे व ती थोडी फार पुर्ण करन्याचा प्रयत्न नक्कीच करेन. लिहीताना मी शक्यतो दोन्ही बाजुने लिहीन्याचा प्रयत्न करनार आहे त्यामूळे "आपल्या घोडचुका" देखील मांडनार आहे.
केदार,
केदार, सर्वप्रथम तू या विषयावर लिहायला सुरु केलेस ह्याचा आनंद झाला, आता खूप छान अन् मुद्देसूद माहिती वाचायला मिळेल. नियमित लिही मात्र. मुद्दाम रविवारी शांतपणे वाचायच ठरवल होत. मस्त लिहिलं आहेस.
>>>नंतर निळोपंताना (मुलगा) पेशवाई न जाता राझेंकर कुळकर्णी पेशवे झाले व त्यापुढे मोरोपंत पिंगळे हे पेशवे झाले
.
रांझेंकरांकडे का आणि कशी गेली पेशवाई? आणि मग पिंगळ्यांकडे? हे सांगू शकशील का?
छत्रपती
छत्रपती महाराजांनी स्वराज्य स्थापण केले पण त्या स्वराज्याला दिशा दिली ती बाजीराव पेशव्याने. >>>>>. इथे "पण" शब्द खटकला. त्याचा अर्थ थोडा वेगळा होतो. पण तुला तसे म्हणायचे नसावे म्हणुन सांगते. . तीथे "आणि " शब्द हवा होता. बाकी चांगली महिती देतोयएस.. shares and history good and different combination..
चुक लक्षात
चुक लक्षात आनुन दाखविल्या बद्दल धन्यवाद लोपा. मला त्यातुन वेगळा अर्थ अपेक्षित न्हवता. पुढे लक्षात ठेवेन. आणी हो अशी चुक दिसली तर सांग.
रांझेंकरांकडे का आणि कशी गेली पेशवाई? आणि मग पिंगळ्यांकडे? हे सांगू शकशील का? >> अनेक कागदपत्र नष्ट झाल्यामुळे ह्या नौकरीत बदल का केला हे बर्याचदा ईतिहास सांगत नाही. येथे असलेल्या पुस्तकांत शोधले, काही खास कारण दिसले नाही, कदाचीत दुसर्या काही पुस्तकात ते कारण मिळाले तर नक्की सांगन्याचा प्रयत्न करेन.
केदार थोडी
केदार थोडी माहिती add करतो आहे राग मानु नये...
बाजीरावाने आणखी एक मोठे युध्द दाभाडेशी गुजरात / माळव्यासाठी केले >>> बाजिरावानी हे युद्ध गुजरातच्या काही भागासाठी केले, माळव्यासाठी नाही पहिल्यांदा बाळाजी विश्वनाथानी छत्रपती शाहुंकडे गुजरातच्या काही भागाची मागणी केली होती, पण शाहुनी ती धूडकावुन लावली.. तेंव्हा गुजरात हा सेनापती खंडेराव दाभाडेंच्या ताब्यात होता... खंडेरावांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा त्र्यंबकराव हा सेनापती झाला, बाजिरावानी छत्रपतीना न सांगता गुजरातवर स्वारी केली, आणी त्र्यंबकरावाचा वध केला... त्यानंतर ही शाहुनी दाभाडे आणी पेशव्यांच्यात दिलजमाई करायचे खुप प्रयत्न केले पण त्यांच्यातील वैर वाढतच गेले...
छत्रपती शिवरायानी वंशपरंपरागत पदे बंद केली होती, त्यामुळेच सोनोपंत आणी त्यानंतर कुलकर्णी पेशवे झाले... पुढे राज्याभिषेकानंतर अष्टप्रधानानी ही पदे वंशपरंपरागत करुन घेतली...
तुमचा
तुमचा प्र्यस सुदर आहे
मला शिवजिच्य नन्तर पेशवे कसे उदयस अले ते कलऊन ग्ययचे आहे क्रुपा करून सागने.सम्पूर्न घडामोडी देने.
बाजीरावाची कारकिर्द फक्त २०
बाजीरावाची कारकिर्द फक्त २० वर्षांची. याकाळात त्याची घोडदौड इतकी वेगवान होती की शत्रुच्या अपेक्षेत बाजीरावाचा शत्रुवरचा हल्ला एक दिवस आधीच व्हायचा. जवळ जवळ सगळे आयुष्य बाजीराव घोड्यावर जगला असे म्हणले तर वावगे न ठरावे. शेवटी ऐन तारुण्यात बाजीरावाचा अंत झाला. जिवंतपणी पुण्याचा सनातन ब्राम्हणांकडुन झालेला मस्तानी प्रकरणातला मनस्ताप वेगळाच.
अकबराने केलेली रजपुत पत्नी हिंदुना चालली, रजपुतांना पण चालली पण पुण्याच्या ब्राम्हणांना मस्तानी का चालली नाही हे न कळे.
>>> त्याच्याही आधी रावबाजी एक
>>> त्याच्याही आधी रावबाजी एक जागतिक किर्तीचे सेनापती आहेत.
रावबाजी म्हणजे दुसरा बाजीराव. थोरल्या बाजीरावांचा उल्लेख रावबाजी असा केला जात नाही.
केदार धन्यवाद माहिती मोलाची
केदार
धन्यवाद माहिती मोलाची आहे.
पण बद्द्ल व्याकरण चुकीने काय अर्था चा अनर्थ घडु शकतो ति देखिल एक गंमत आहे
पण काहि प्रश्न मनाला सतत छ्ळत असतात
एका महान व्यक्ति च्या जन्म तारखेचा घोळ का
कधिहि कुठेही पेशवाई बद्द्ल राजकार्णि लोकांच्या तोंडुन पेशव्यां बद्दल स्तुति सुमने एकायला मिळत नाहि
असे का
पेशवा बाजि
पेशवा बाजि धन्यवाद.
पेशव्यांच्या पहिल्या तीन पिढ्यांनी जे केलं ते इतर पेशव्यांनी मातीत घातलं. ब्राह्मण कर्मकांड त्यांचा राजवटीत फार वाढीस लागलं. इतकं की राघोबा प्रत्यक्ष युद्धभूमीवर देखील गंगास्नानाला जात असत. अब्दालीच्या वेळेस तर युद्ध सोडून सदाशिवभाउंना बाजारबुनगे अन स्त्रिया ह्यांचीच काळजी जास्त करावी लागली कारण भाऊ उत्तरेत जात आहेत तर चारी धाम यात्रा होईल अशी भुमिका तत्कालिन समाजाची होती. शस्त्रावरचा विश्वास कमि होऊन शास्त्रावरचा (कर्मकांड) विश्वास वाढिस लागला. जातीभेद, पक्तींभेद जास्त वाढीस लागले, इतके की देशस्थ व कोकनस्थांचेही आपापले कंपू तयार झाले मग राजकारणी लोक कश्याची स्तुती करणार?
राजाराम महाराजांच्या काळात
राजाराम महाराजांच्या काळात बाळाजी पुणे प्रांताचा सरसुभेदार होता तर १९०४ ते १७०७ मध्ये तो दोलताबादेचा सरसुभेदार होता.>> मस्त माहिती. फक्त तो बोल्ड केलेला तेवढा भाग दुरुस्त करावा.
मस्तानी बद्द्ल थोडी माहिती
मस्तानी बद्द्ल थोडी माहिती देता का? सध्या ई टि व्ही मराटी वर बाजीराव मस्तानी मालिका चालु आहे.
केदार माहितीचे अप्रतिम संकलन
केदार माहितीचे अप्रतिम संकलन होते आहे तुझ्यामुळे
थोडे डिटेल्स मधे लिहिले तरी चालेल
धन्यवाद केदार ईतकि चान्गली
धन्यवाद केदार ईतकि चान्गली माहिती दिल्या बद्दल पन बाजीराव-मस्तानी यान्ना कोनते आपत्य होते काय, असल्यास त्याची सम्पुर्न माहिती दिलीस तर बरे होइल
Pages