फुकट मिळाला तरी राहुल रॉय चा चित्रपट पाहायचा म्हणजे जरा घाबरतच होतो, पण मधे मधे तो वाघ होतो कळाल्यावर म्हंटले जरा सुसह्य असेल तेवढे शॉट्स तरी. पण माणसाचा पौर्णिमेच्या रात्री वाघ होतो आणि दुसर्या दिवशी सकाळी परत माणूस हा यातील सर्वात अचाट आणि अतर्क्य भाग नाही. माणसासारखी माणसे काही प्रसंगात कसे वागतात ते त्यापेक्षा अतर्क्य आहे.
हे दोन शॉट बघा:
आपल्या डॉ मुलीच्या हातून बरा झाल्याचे सांगणारा पेशंट घरी येऊन बसलाय आणि मारक्या बकरीच्या नज़रेने इकडेतिकडे बघतोय (राहुल रॉय कडे बघून मारक्या म्हशीच्या म्हणता येत नाही). मुलगी तर एका होनहार-छाप संगीतकाराच्या प्रेमात आहे. पण हा पेशंट तिला सांगतो की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी उद्या परत येतो तोपर्यंत मला सांग. लगेच आई तिला सांगते की त्या फालतू संगीतकार वगैरेचा नाद सोड आणि याच्याशी लग्न कर. याचे कर्तृत्व काय? तर ऊंचे खानदान का है आणि शिकार जबरी करतो. एवढ्या दोन जमेच्या बाजू असल्यावर २४ तासांत उत्तर द्यायलाच पाहिजे ना?
दुसरा प्रसंग: राहुल रॉय आणि पूजा भट हनिमून साठी एका हॉटेलात उतरतात. मग नेमकी ती पूरणमासी की रात असल्याने रात्री राहुल रॉय स्वत:च्याच गळ्यावरून हात फिरवत काहीतरी त्रास होत असल्याचे दाखवत रूम बाहेर पडतो. "घुटन सी हो रही है" आणि बायको त्याला जाउ देते. नंतर तो वाघ बनून एका तरूणीला मारतो आणि सकाळी त्याच हॉटेल मधेच पडलेला जागा होतो. त्याला कोणीही तोपर्यंत बघत नाही. मग ही इकडेतिकडे शोधत असताना तो परत येतो. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काही तरी त्रास होत असल्याचे सांगून गायब झालेला नवरा सकाळी परत आल्यावर तिला राग बिग काही येत नाही. कारण त्याला "घुटन सी" होत होती! (मात्र पहिल्या रात्री राहुल रॉय बाहेरच राहिल्यामुळे शेवटी कोण मरणार आणि कोणाच्या गळ्यात पूजा भट पडणार ते इथेच कळते).
पूजा भट च्या चेहर्यावर कसलेच भाव फारसे येत नाहीत. एकदा तो होनहार प्रियकर अविनाश वाधवान येऊन तिला विचारतो की ती (आता राहुल रॉय बरोबर) आनंदी आहेस का दु:खी, तर ती रडतरडत याला आनंदी म्हणून सांगते, वर म्हणते चेहर्यावर जाउ नको. बहुधा पुढचा डॉयलॉग "चेहर्यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा
आत्तापर्यंत आपण नाग, भूत वगैरे बघितले. येथे नुसता शेर च नाही तर शेर चे भूत आहे. हा शेर लोकांना मारतो, पण लपूनछपून. पुन्हा खात नाहीच. का तर म्हणे फार वर्षांपूर्वी एक शेर व शेरनी एकत्र असताना एका शिकार्याने त्यांच्यापैकी एकाला मारले. म्हणून दर पौर्णिमेला त्या वाघाचे भूत त्या जंगलात फिरते व जर कोणी माणूस दिसला तर त्याला मारते. आणि जर कोणी त्या वाघाला मारले तर मारणाराच दर पौर्णिमेला वाघ होतो व इतरांना मारतो. त्यामुळे चांगले आदिवसी जंगलात जाउ नको सांगत असताना राहुल रॉय साहेब जातात व वाघ होऊन बसतात.
आता अविनाश वाधवान आणि पूजा भट ला एकत्र आणायचे म्हणजे राहुल रॉय ला मारले पाहिजे (आणि ते नाही केले तर वाधवान साहेब जबरी पीळ गज़ला गात बसतील). पण ते कसे करणार? पोलीस तर विश्वास ठेवत नाहीत. ज्याच्यावर आरोप आहे तो काहीच दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मेला हे डॉक्टरांनी जाहीर केलेले असताना पुन्हा उठून बसला, व जेव्हा वाघाच्या हल्ल्याच्या खुणा असलेले खून होतात तेव्हा तो नेमका गायब असतो या गोष्टींची संगती वगैरे लावायच्या भानगडीत पोलिस पडत नाहीत. एकतर अवतार गिल पाहुणा कलाकार असल्याने तो काय काय करणार? पण निदान जरा काही दिवस नजरकैदेत राहुल रॉय ला ठेउन बघू. किंवा निदान झू मधल्या पिंजर्यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल असा व्यावहारिक दृष्टिकोन ही कोणी दाखवत नाही.
पण इंग्रजांनी उगाच आपल्यावर राज्य नाही केले! त्या जंगलात आलेल्या एका ब्रिटिश फॉरेस्ट ऑफिसर ने एक जुने बाड लिहून ठेवलेले असते. त्यात याला मारायचा मार्ग लिहीलेला असतो. मग अविनाश वाधवान चा इंडियाना जोन्स होतो आणि एका गुहेतील देवळात पौर्णिमेच्या चंद्राचा लेसर पेक्षाही पॉवरफुल 'किरण' ज्या खंजीरावर पडतो तो खंजीर घेऊन बर्याच फाइटिंग नंतर शेवटी राहुल रॉय ला मारतो.
यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच राहतो" एवढे क्वालिफिकेशन वाधवान ला पुरेसे असायला हवे. पण तोपर्यंत त्याच्या गाण्यांच्या कॅसेट्स वगैरे निघालेल्या असतात, म्हणजे तो ही प्रश्न सुटला.
अशा चित्रपटांमधे सहसा नायक दिवसा एकदम 'गरीब बिचारा' असतो व कधीतरी एकदम सिरीयल किलर, मास्क, शहेनशाह, वाघाचे भूत वगैरे होतो. उलट येथे राहुल रॉय माणूस असताना एवढी कृत्ये करतो की त्याने वाघ होऊन वेगळे काय केले असा प्रश्न पडतो. त्यात तो काली करतूते करतो म्हणून काय पिक्चरभर काळा ड्रेस घालूनच फिरलं पाहिजे काय? मूळ वाघाच्या हल्ल्यातून मेला हे डॉक्टर सांगत असताना भिंतीतून आलेल्या एका किरणामुळे तो परत जिवंत होतो (त्यानंतर पण पूर्ण बरा व्हायला पूजा भट ला त्याला आठ पंधरा दिवस स्वत:च्या हाताने सूप वगैरे भरवायला लागते). मग मात्र गोळी (लॉंग शॉट मधे वरच्या खिशाला व क्लोजप मधे पोटाला) लागली तरी एक मिनीटात ती जखम भरून काढू शकतो. म्हणजे गोळीमुळे फक्त त्याचा खिसा गायब होतो. वाघाचेही आपण वाघ आहोत की भूत हे नक्की ठरत नाही, कारण कधी सामान्य वाघांप्रमाणे रस्त्यावरून चालावे लागते तर कधी तो पूजा भट ला स्वप्न पाडून बाजूच्या भिंतीतून रक्त सोडू शकतो, बंगल्यात असताना आलेल्या पोलिसाच्या बंद कारमधेच एकदम जाऊ शकतो.
पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का?
हर्पा... ते संस्कृत काही
हर्पा... ते संस्कृत काही समजलं नव्हतं...
पण हे जबराट आहे अगदी... !!!
खरचं काय प्रतिभा... काय प्रतिभा... दंडवत घ्या _/\_
(No subject)
हा धागा आताच नाही वाचायचा
हा धागा आताच नाही वाचायचा म्हणून बाजूला ठेवलाय तर हपा काय ऐकतच नाहीत.

जबराट मूड मधे आहेत सध्या.
हपा Lol ....हे धमाल आहे !!!!
हपा Lol ....हे धमाल आहे !!!!
विकु तुमचेही आवडले. पण
विकु
तुमचेही आवडले. पण पिक्चर पुढे बघाच. घुटन सी हो रही है हा पिव्होटल पॉइण्ट आहे. तो यायला पाहिजे रचनेत.
वा वा विकु! क्या बात है!
वा वा विकु! क्या बात है! पुढचे शेर येऊद्यात.
बाकी वरील सर्वांचेच आभार
बाबो.कसला प्रतिभेचा धबधबा
बाबो.कसला प्रतिभेचा धबधबा आलाय इथे.मजा आली वाचून.
भारी!
भारी!
गळा खाजला - याला जाम हसले.
घुटन सी हो रही है हा पिव्होटल
घुटन सी हो रही है हा पिव्होटल पॉइण्ट आहे. तो यायला पाहिजे रचनेत<<<<<
अगदी! विकुंनी रारॉच्या कंठाचे हिंदीत नक्की काय होईल या उत्कंठावर्धक पॉइंटला काव्य थांबवले आहे.
गळा खाजला <<<<<<
बाकी, वेअरवाघाने 'गले मे खिच खिच, गले मे खिच खिच, क्या करू?' म्हणत विक्सची गोळी घेतली असती तर पूजाच्या जीवाला धोका उत्पन्न झाला असता.
विकुंनी रारॉच्या कंठाचे
विकुंनी रारॉच्या कंठाचे हिंदीत नक्की काय होईल या उत्कंठावर्धक पॉइंटला काव्य थांबवले आहे
हो, तिथेच माझ्या प्रतिभेला मेंटल ब्लॉक आला आहे, पण मी एवढ्यात हार मानणार नाही. लग्नाच्या मंंगलाष्टकात वधुपिता रिटायर्ड नायब तहसिलदार आहे हेही मी लीलया घुसवतो !
( शंभरावा प्रतिसाद !)
आज वाचला धागा
आज वाचला धागा
टू द पॉईण्ट आणि आटोपशीर.
एव्हढ्यातच धमाल केली आहे. शेवटचा पंच तर जबराट
(आणि ते नाही केले तर वाधवान साहेब जबरी पीळ गज़ला गात बसतील)

इंग्रजांनी उगाच नाही आपल्यावर राज्य केले
जुनून बस मधे पाहिल्याने थोडासा माहिती होता (कॅटपीपल वरून काढलेला).
यातही भूत असल्याचे आठवत होते , पण तसलेच काही लिहीत होतो म्हणून टाळले वाचायचे.
नाहीतर याचीच कॉपी झाली असती
लग्नाच्या मंंगलाष्टकात
लग्नाच्या मंंगलाष्टकात वधुपिता रिटायर्ड नायब तहसिलदार आहे हेही मी लीलया घुसवतो ! >>> हा हा हा
ह. ह. पु वा. जबरी......
ह. ह. पु वा. जबरी......
(No subject)
प्रतिसाद आणि लेख
सगळ्यांना दंडवत
लेख आणि त्यावरची काव्य सगळंच
लेख आणि त्यावरची काव्य सगळंच भन्नाट जमलय
या सिनेमासाठी म्हणे
या सिनेमासाठी म्हणे हॉलिवूडहून स्पेशल इफेक्टस टीम मागवली होती, ज्यांनी मायकल जॅक्सनसोबत वगैरे काम केलं होतं - इति जेमी ऑल्टर. https://www.youtube.com/watch?v=Q53i6QsxdYQ
Pages