जुनून

Submitted by फारएण्ड on 5 June, 2008 - 09:14

फुकट मिळाला तरी राहुल रॉय चा चित्रपट पाहायचा म्हणजे जरा घाबरतच होतो, पण मधे मधे तो वाघ होतो कळाल्यावर म्हंटले जरा सुसह्य असेल तेवढे शॉट्स तरी. पण माणसाचा पौर्णिमेच्या रात्री वाघ होतो आणि दुसर्‍या दिवशी सकाळी परत माणूस हा यातील सर्वात अचाट आणि अतर्क्य भाग नाही. माणसासारखी माणसे काही प्रसंगात कसे वागतात ते त्यापेक्षा अतर्क्य आहे.

हे दोन शॉट बघा:

आपल्या डॉ मुलीच्या हातून बरा झाल्याचे सांगणारा पेशंट घरी येऊन बसलाय आणि मारक्या बकरीच्या नज़रेने इकडेतिकडे बघतोय (राहुल रॉय कडे बघून मारक्या म्हशीच्या म्हणता येत नाही). मुलगी तर एका होनहार-छाप संगीतकाराच्या प्रेमात आहे. पण हा पेशंट तिला सांगतो की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे. मी उद्या परत येतो तोपर्यंत मला सांग. लगेच आई तिला सांगते की त्या फालतू संगीतकार वगैरेचा नाद सोड आणि याच्याशी लग्न कर. याचे कर्तृत्व काय? तर ऊंचे खानदान का है आणि शिकार जबरी करतो. एवढ्या दोन जमेच्या बाजू असल्यावर २४ तासांत उत्तर द्यायलाच पाहिजे ना?

दुसरा प्रसंग: राहुल रॉय आणि पूजा भट हनिमून साठी एका हॉटेलात उतरतात. मग नेमकी ती पूरणमासी की रात असल्याने रात्री राहुल रॉय स्वत:च्याच गळ्यावरून हात फिरवत काहीतरी त्रास होत असल्याचे दाखवत रूम बाहेर पडतो. "घुटन सी हो रही है" आणि बायको त्याला जाउ देते. नंतर तो वाघ बनून एका तरूणीला मारतो आणि सकाळी त्याच हॉटेल मधेच पडलेला जागा होतो. त्याला कोणीही तोपर्यंत बघत नाही. मग ही इकडेतिकडे शोधत असताना तो परत येतो. लग्नानंतरच्या पहिल्या रात्री काही तरी त्रास होत असल्याचे सांगून गायब झालेला नवरा सकाळी परत आल्यावर तिला राग बिग काही येत नाही. कारण त्याला "घुटन सी" होत होती! (मात्र पहिल्या रात्री राहुल रॉय बाहेरच राहिल्यामुळे शेवटी कोण मरणार आणि कोणाच्या गळ्यात पूजा भट पडणार ते इथेच कळते).

पूजा भट च्या चेहर्‍यावर कसलेच भाव फारसे येत नाहीत. एकदा तो होनहार प्रियकर अविनाश वाधवान येऊन तिला विचारतो की ती (आता राहुल रॉय बरोबर) आनंदी आहेस का दु:खी, तर ती रडतरडत याला आनंदी म्हणून सांगते, वर म्हणते चेहर्‍यावर जाउ नको. बहुधा पुढचा डॉयलॉग "चेहर्‍यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा Happy

आत्तापर्यंत आपण नाग, भूत वगैरे बघितले. येथे नुसता शेर च नाही तर शेर चे भूत आहे. हा शेर लोकांना मारतो, पण लपूनछपून. पुन्हा खात नाहीच. का तर म्हणे फार वर्षांपूर्वी एक शेर व शेरनी एकत्र असताना एका शिकार्‍याने त्यांच्यापैकी एकाला मारले. म्हणून दर पौर्णिमेला त्या वाघाचे भूत त्या जंगलात फिरते व जर कोणी माणूस दिसला तर त्याला मारते. आणि जर कोणी त्या वाघाला मारले तर मारणाराच दर पौर्णिमेला वाघ होतो व इतरांना मारतो. त्यामुळे चांगले आदिवसी जंगलात जाउ नको सांगत असताना राहुल रॉय साहेब जातात व वाघ होऊन बसतात.

आता अविनाश वाधवान आणि पूजा भट ला एकत्र आणायचे म्हणजे राहुल रॉय ला मारले पाहिजे (आणि ते नाही केले तर वाधवान साहेब जबरी पीळ गज़ला गात बसतील). पण ते कसे करणार? पोलीस तर विश्वास ठेवत नाहीत. ज्याच्यावर आरोप आहे तो काहीच दिवसांपूर्वी वाघाच्या हल्ल्यात मेला हे डॉक्टरांनी जाहीर केलेले असताना पुन्हा उठून बसला, व जेव्हा वाघाच्या हल्ल्याच्या खुणा असलेले खून होतात तेव्हा तो नेमका गायब असतो या गोष्टींची संगती वगैरे लावायच्या भानगडीत पोलिस पडत नाहीत. एकतर अवतार गिल पाहुणा कलाकार असल्याने तो काय काय करणार? पण निदान जरा काही दिवस नजरकैदेत राहुल रॉय ला ठेउन बघू. किंवा निदान झू मधल्या पिंजर्‍यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल असा व्यावहारिक दृष्टिकोन ही कोणी दाखवत नाही.

पण इंग्रजांनी उगाच आपल्यावर राज्य नाही केले! त्या जंगलात आलेल्या एका ब्रिटिश फॉरेस्ट ऑफिसर ने एक जुने बाड लिहून ठेवलेले असते. त्यात याला मारायचा मार्ग लिहीलेला असतो. मग अविनाश वाधवान चा इंडियाना जोन्स होतो आणि एका गुहेतील देवळात पौर्णिमेच्या चंद्राचा लेसर पेक्षाही पॉवरफुल 'किरण' ज्या खंजीरावर पडतो तो खंजीर घेऊन बर्‍याच फाइटिंग नंतर शेवटी राहुल रॉय ला मारतो.

यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच राहतो" एवढे क्वालिफिकेशन वाधवान ला पुरेसे असायला हवे. पण तोपर्यंत त्याच्या गाण्यांच्या कॅसेट्स वगैरे निघालेल्या असतात, म्हणजे तो ही प्रश्न सुटला.

अशा चित्रपटांमधे सहसा नायक दिवसा एकदम 'गरीब बिचारा' असतो व कधीतरी एकदम सिरीयल किलर, मास्क, शहेनशाह, वाघाचे भूत वगैरे होतो. उलट येथे राहुल रॉय माणूस असताना एवढी कृत्ये करतो की त्याने वाघ होऊन वेगळे काय केले असा प्रश्न पडतो. त्यात तो काली करतूते करतो म्हणून काय पिक्चरभर काळा ड्रेस घालूनच फिरलं पाहिजे काय? मूळ वाघाच्या हल्ल्यातून मेला हे डॉक्टर सांगत असताना भिंतीतून आलेल्या एका किरणामुळे तो परत जिवंत होतो (त्यानंतर पण पूर्ण बरा व्हायला पूजा भट ला त्याला आठ पंधरा दिवस स्वत:च्या हाताने सूप वगैरे भरवायला लागते). मग मात्र गोळी (लॉंग शॉट मधे वरच्या खिशाला व क्लोजप मधे पोटाला) लागली तरी एक मिनीटात ती जखम भरून काढू शकतो. म्हणजे गोळीमुळे फक्त त्याचा खिसा गायब होतो. वाघाचेही आपण वाघ आहोत की भूत हे नक्की ठरत नाही, कारण कधी सामान्य वाघांप्रमाणे रस्त्यावरून चालावे लागते तर कधी तो पूजा भट ला स्वप्न पाडून बाजूच्या भिंतीतून रक्त सोडू शकतो, बंगल्यात असताना आलेल्या पोलिसाच्या बंद कारमधेच एकदम जाऊ शकतो.

पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का? Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' >>>>>>>>>>>>
Rofl
बॉल स्टेडियमच्या बाहेर Lol
जबरा लिहिलय.
अजुन पन्चेस हवे होते रे Happy
.............................................................
**Expecting the world to treat u fairly coz u r a good person is like
expecting the lion not to attack u coz u r a vegetarian.
Think about it.**

फारच मस्त!
वाघाचेही आपण वाघ आहोत की भूत हे नक्की ठरत नाही,<<< Lol
वाघ, लांडगा, साप, नाग हे आटोपले. पण डुक्कर, गाढव, लामा वगैरेची रुपं घेणा'रा' किंवा 'री' वर सिनेमा नाही काढला अजून कुणी!

>>पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का? <<

ह ह पो दु!!!!
ह ह म ची वे आ!
आणि ती वरची निळी गडबडगुंडा करत बसणारी बाहुली!!

-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

चेहर्‍यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा>> सही है.. Happy
- अनिलभाई

धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे >> जबरी पंच.

पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का?

ह. ह. पु वा. जबरी.......

जुनून हा cat people वरुन बनवीला आहे. महाविद्यालयात असताना काहि खास गोष्टींच्या आकर्षणापायी पाहीला होता. मुळ चित्रपटात हिरोइन जंगली श्वापद बनताना दाखवीले आहे. पण आपल्या पुजा बेबीला असे तसे कसे काय दाखवावे हा प्रश्न मनात येउन महेश भट्टने राहुलला वाघ बनवीले असावे.

राहुल रॉय ला वाघाच्या ऐवजी तरस बनवणं जास्त शोभलं असतं त्याला....

पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का? <<<<<<<<<<
ज ब री!!!!!!!! Lol
नेक्ष्ट?

आणि हो, वाघ कपडे घालत नाही तसाच हाही पुन्हा माणूस होताना कपडे नसतात, मग तो जागा होऊन कपडे घालून येतो, असे कुठेसे वाचले होते. दरवेळी वाघ होताना कपड्यांची बॅग एखाद्या ठिकाणी लपवून ठेवत असतो का? भलतीकडेच माणूस झाला म्हणजे???????? (हा प्रश्न अनूने विचारला होता, i think.)

एडिटींगमध्ये कापला....तरस.... Lol

    ***
    The facts expressed here belong to everybody, the opinions to me. The distinction is yours to draw.

    बहुधा पुढचा डॉयलॉग "चेहर्‍यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा >
    निदान झू मधल्या पिंजर्‍यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल >
    उलट येथे राहुल रॉय माणूस असताना एवढी कृत्ये करतो की त्याने वाघ होऊन वेगळे काय केले असा प्रश्न पडतो. >>>>>>
    खलास!! Lol
    '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' >>>> हे तर हाईट आहे! Rofl

    ----------------------------
    The cheapest face-lift is a SMILE
    Happy

    धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे
    हे मी "धनी मातुर माझा देवा वाधवानी असू दे" असे वाचले
    (हीरो अविनाश वाधवानिइ अस्ल्या मुळे.)
    पोट धरुन हसनारी बहुली

    सहीच ...
    झकास तु अर्चना पुरणसिंग मोड मधे गेलास का ?? कॉमेडी सर्कस मधे ती प्रत्येकाला म्हण्ते पंचेस थोडे कम लगे Proud
    ~ Do not Wish to be anything but what you are. ~

    >>बहुधा पुढचा डॉयलॉग "चेहर्‍यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा
    Proud
    .
    >>>पूजा भट ने कधीतरी '...धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' हे गाणं जरा जास्तच सिरीयसली म्हंटले असेल का?
    rofl.gif
    .
    जबरदस्तच रे बाबा!! एकदम मस्त!!
    _/\_

    मारक्या बकरीच्या नज़रेने इकडेतिकडे बघतोय >>> अगदी परफेक्ट उपमा Lol
    बाकि वरील सगळ्यांना मोदक...
    धनी मातुर एकदम भन्नाट Lol Lol Lol Lol

    त्यापेक्षा वाघ दर अमावास्येला राहूल रॉय होत असतो असा चित्रपट काढला तर.. ?

    एकदम जबरि.

    <<<यानंतर केवळ "पूर्णवेळ माणूसच राहतो" एवढे क्वालिफिकेशन वाधवान ला पुरेसे असायला ह<<<>> ह. ह. पो.दु. Happy

    हा पिक्चर रिलिज झाल्यानंतर लगेच सुपरर्फ्लॉप झाला होता अस ऐकलेल कारण आता कळल. तसहि पुजा भट, अविनाश वाधवान आणि राहुल रॉय ह्यांना बघायला कोण आपले स्वतःचे पैसे खर्च जाइल?

    कुठल्यातरि जुन्या आणि प्रसिध्ध हॉलिवुड पटाचि कॉपि आहे ना हा पिक्चर कुणाला माहितिय का? मुळ चित्रपटात लांडगा असतो म्हणे.

    Lol
    मराठमोळी, या विषयावरचा विंग्रजी पिच्चर पाहीला मी TV वर. पण नाव आठवत नाहीये. हीरो आणि हिरवीण दोन्ही रात्री रूप बदलून हिंडतात. हीरोचे 'असे' होणे पहिल्यापासून दाखवितात. पण हिरवीणचे रूप मात्र शेवटी बाहेर पडते. तिथे खंजर वगेरे भाकडकथा वाटल्याने director ने 'and they live happily ever after (as is)' असे दाखवून the end केलेला दिसतो.

    <<जुनून हा cat people वरुन बनवीला आहे.>>

    मराठमोळी, हे काय वर एका अभिप्रायात लिहिलेलं आहे हॉलीवूडपटाचं नाव....

    जागोमोहनप्यारे...

    समस्त वाघ जमातीनी तुझं असं काय घोडं मारलंय की तू त्यांच्यापैकी एकाला 'राहूल रॉय' बनवायला निघालायस....

    राहुल रॉय ने वाघ बनण्याचा प्रयत्न करणं ठीक आहे... कारण तो अयशस्वी होणार हे सत्य आहे...
    पण वाघानी राहुल रॉय बनायचं....

    छे छे....

    वाघ जमातीचा इतका अपमान कोणीही केला नसेल...

    _______
    नमस्ते लंडन

    आईशप्पथ. ह. ह. पु.वा.
    ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
    सोने (विकत) घ्या आणि सोन्यासारखे रहा.:)

    अरे वर लक्षच गेल नाहि माझ. एकन्दर ही थीम बरिच पॉप्युलर दिसतेय हॉलिवुड मध्ये, कारण ज्या पिक्चर बद्दल मी बोलत होते तिथे माणसाच ला.न्ड्ग्यात रुपा.न्तर होत.

    सोने (विकत) घ्या आणि सोन्यासारखे रहा.... tumhee sonaar aahaat kaa ?

    हा हा हा
    "चेहर्‍यावर जाऊ नको, आपल्या दोघांनाही acting करता येत नाही" हा एडिटिंग मधे कापला असावा >>>
    निदान झू मधल्या पिंजर्‍यात ठेउन बघू, झालाच वाघ तर तिकडे वापरता येईल >>>>
    धनी मातुर माझा देवा वाघावानी असू दे...' >>>> केवळ अशक्य!!!!!

    " चेहरर्‍यावर जाऊ नको...>>>>, झू मधल्या पिंजर्‍यात....>>>> , पूर्णवेळ माणूस असल्याचे qualification....>>>>,,,,
    फारेंड, हसून हसून खुर्चीवरुन पडायची वेळ आली. आणि ह्या सगळ्यात cherry on the top म्हणजे, " धनी माझा मातुर देवा वाघावानी असू दे". simply great!
    shraddha, " भलतीकडे वाघ झाला म्हणजे????????? >>>>>>>>>>>>>>.
    सही.................

    Pages