मायबोली बाईक ट्रेक

Submitted by विनय भिडे on 5 January, 2011 - 03:45
ठिकाण/पत्ता: 
दापोली

५ ला सकाळी लवकर निघायच.दापोली ,पुण्याची लोकं ताम्हिणी घाटातून माणगाव ला भेटतील.
तिथून आजंरले, मुरुड कर्दे बीच ,सुवर्णदुर्ग, हर्णे दिपगृह ,गोवा किल्ला.दापोलीत मुक्काम.
६ ला दाभोळ जेट्टी, चंडीका देवी, कोळेश्वर मंदीर , केळशी मार्गे मंडणगड , बाणकोट किल्ला ,दिघे जेट्टीवरुन मुरुड जंजिरा, आक्षीत मुक्काम
७ ला आक्षी माघी गणपती उत्सव करुन परत मुक्कामी घरी...
यात अजुन काही आपल्याला अ‍ॅडपण करता येइल.
जाताना आठवणीने मायबोलीचा झेंडा घेउन जाउ...
बाईकची नोंद इथेच करतो म्हणजे सगळ्यांना कळेल..

मुंबई :- बाईक १ ) विनय भिडे
२ ) जिप्सी
३ ) जिप्सीचा मित्र
४ ) गिरीविहार
५ ) तोषा

पुणे :- बाईक १ ) मल्ली
२ ) सुकी
३ ) सुकी अजुन एक
४ )सम्या

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
शुक्रवार, February 4, 2011 - 18:00 to Monday, February 7, 2011 - 08:00
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लले, माझी पण बाईक आहे.
ती अजुन अ‍ॅड केली तर असं म्हणावं लागेल......
१० बाईक्स और आदमी (सिर्फ) ९ ... बहुतही नाइन्साफी है Happy

सगल्यांका शूभेच्छा दितंय! डिट्ट्टेल माहितीसाठी 'साद सागराची' - 'दापोली' हे बुकमार्क पब्ली. चे ४०/- किंमतीचे पुस्तक बरोबर ठेवा. अंतरे, माहिती, पे.पंप, निवास वगैरे सगळी माहिती त्यांत आहे. पुन्हा एकदा शुभेच्च्छा.

किर्‍या.. Rofl

लली घरबसल्या फार ईंटरेस्टत्ये बाट्रे मधे. सुपारी घेतल्येस की काय ग वृत्तांताची.

राज्याची बाइक सोडा. स्वतः आला तरी मिळवली. एक नं टांगारु आहे तो.

आठ जण आणि दहा बाईक्स...आवरा....

बाकी, मी आत्ताच कोल्हापूर रेंज बाईकवरून पूर्ण केली. त्यात आलेला अनुभव म्हणजे सामान (सॅक) जास्त असेल तर शक्यतो डबलसीट जाऊ नका. कारण दोघांच्या दोन सॅक घेऊन बसायला जाम अडचण होते. त्यामुळे पेट्रोल थोडे जास्त जाईल पण प्रत्येकाने एकेक बाईक असेच ठेवा. प्रत्येकी दोन ऑक्टोपस घेऊन मागच्या सीटवर सॅक व्यवस्थित बांधून ठेवली की काही अडचण येत नाही. वेस्ट पाऊच बरोबर बाळगायचा त्यात लायसेन्स, गाडीची कागदपत्रे, पीयूसी, सुट्टे पैसे, थोडी औषधे आणि नकाशा असे ठेवायचे म्हणजे प्रत्येक वेळी सॅक उघडावी लागत नाही.
रायडींग ग्लोव्हज असतील तर त्याचा खूप फायदा होतो. (स्वानुभवाचे बोल आहेत).
ज्यांच्या कोणाच्या गाडीला डीस्क ब्रेक असतील त्यांनी निघण्यापूर्वीच ब्रेक ऑफीशियल सर्विस स्टेशन किंवा नेहमीच्या मॅकेनीककडून व्यवस्थित चेक करून घ्यावेत. कारण त्याला फ्ल्युईड मेकॅनिझम असते आणि आडरस्त्यावर माहीतगार माणूस मिळेल याची खात्री नाही.
कोकणात जाणार असल्याने शक्यतो शूज घेऊन जाऊच नका. फ्लोटर्स बेस्ट. वाटल्यास मोजे घालून त्यावर फ्लोटर्स चढवावेत.
वाटेत सगळीकडे थोडे थोडे पेट्रोल भरण्यापेक्षा पहिल्यांदाच टाकी फुल्ल करून घ्यावी. एकदम जास्त पैसे गेल्यासारखे वाटेल पण वाटेत सगळ्या ठिकाणी पेट्रोल भरण्यात तेवढेच जातात आणि कमी-जास्त भेसळ असलेले पेट्रोल असेल तर इंजिनची वाट लागते ती वेगळीच. शक्यतोवर रिझर्ववर गाडी चालवूच नये.
सकाळी गाड्या सुरू करताना डायरेक्ट ऑटो स्टार्ट न करता किक मारून सुरू करावी आणि लगेच रेज करून चालवायला न घेता किमान एक-दोन मिनिटे तशीच सुरू ठेवावी. याने बॅटरीतर वाचतेच पण इंजिन व्यवस्थित सुरू झाल्यामुळे दिवसभरच्या प्रवासात काही त्रास होत नाही.

all the best guys!!!
सर्व बाइक्स, त्यांच्या दुप्पट टायरी, तेवढेच हेडलॅम्प्स आणि सर्व बाईकर्स यांना शुभेच्छा... Happy

बाईक ट्रेक मोहीम फत्ते.

पुणे - मुळशी - ताम्हिणी- माणगाव - कोरबा - म्हसाळा- हरीहरेश्वर-जंगलजेट्टीमार्गे(बोटीने) रत्नागिरी परीसर - केळशी-आंजर्ले- कड्याचा गणपती- श्रीवर्धन - दिवेआगार- दिघी- जंजिरा ( बोटीने) - पुन्हा दिवेआगार- गणेश जंयतीला सुवर्ण गणेशाचं दर्शन घेऊन १:१५ ला पुण्यात.

धम्माल ट्रेक.

Pages