विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गा.पै.,

आपल्याला फक्त दरमहा अकौंट्स वाले टॅक्स कापून घेतात एवढेच माहीत असते. इतर अनेक बाबी आहेत जेथे टॅक्स डिडक्शन होते. या महिन्याचा व्यापारी मित्र पान ५१ वाचून बघा. म्हणजे किती गहन प्रश्न आहे ते समजेल. Happy

'साहित्य संस्कृती'तर्फे प्रकाशित होणार्‍या "अनाहत" या ई-मासिकाच्या मे महिन्याच्या अंकात बागेश्री देशमुख, तन्वीर सिद्दीकी, रणजित पराडकर, निलेश पंडित, भारतीताई या मायबोलीकरांच्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. क्रांतिताईंनी संपादन केले असून प्रसंजित घोष आणि मयुर कुलकर्णी यांचे अनुक्रमे सुरेख मुखपृष्ठ छायाचित्र व मुखपृष्ठ आहे.

अभिनंदन!

माहेरचा अन्नपूर्णा विशेषांक वाचला.
ह्याही वेळी मायबोलीकर छा गये है !

जागूचा सागरी 'सुका'मेवा नेहमीप्रमाणे भारी आहे. मी वासामुळे सुकट कधी खाल्लं नाहीये. आता खाऊन पहावं का असा विचार करतोय !
सौ.ऋयाम म्हणजे इंद्रायणीचा 'इचिबान जपान' मस्त आहे !! मागे हितगुज दिवाळीअंकात सायुरी की कोणाचा तरी जपानी खाण्यावरचा लेख होता त्याची आठवण झाली.
काशीच्या मुलाचा म्हणजे आर्चीस काशीकरचा 'मी शेफ होतोय' लेख मस्त आहे. त्याचे हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजमधले अनुभव मस्त लिहिले आहेत.
'ऑझी टकर' हा ऑस्ट्रेलियन खाद्यपदार्थांवरचा लेख वाचून विचार करत होतो की लेखिका लाजो का? त्यातला 'विकांत' हा शब्द वाचून आता खात्रीच वाटते आहे की ही लाजोच ! Happy हा शब्द माहेरच्या मुशोतून कसा काय सुटला काय माहित!
'मधल्या वेळेतलं चटकमटक' लिहिणार्‍या सुलेखा म्हणजे आपल्या मावळ फेम सुलेखाच का?
स्नेहाचा (अनीशा) 'खरंखुरं कोल्हापुरी' हाही लेख आहे. त्यातल्या पदार्थांची जंत्री इंटरेस्टींग आहे (मला लगेच त्याक्षणी पुपो खाव्याशा वाटल्या!) पण मला तो लेख म्हणून आवडला आहे की नाही हे ठरवता येत नाहीये! फार आवेशात लिहिल्यासारखा वाटला.
पाककृती स्पर्धेच्या निकालातलं जजेसचं मनोगत गेल्यावर्षीप्रमाणेच ह्याही वर्षी आवडलं/पटलं नाही.
उदरभरण नोहे, आईच्या हातची चव, नारळाचे पदार्थ, ह्याला जेवण ऐसे नाव हे लेख आवडले.

ह्यावर्षी दिनेशनी काही लिहिलं नाही का?

एकंदरीत अंक वाचनीय आहे, खूप रेसिपीज आहेत. लेखन छापून आलेल्या सर्व मायबोलीकरांचे अभिनंदन !
अजून रंगीत पानं असती तर मजा आली असती.

ह्या बाफाची काही मागची पाने चाळली. अन्नपूर्ण विशेषांकाबद्दलची ही माझी सलग चौथ्या वर्षीची पोस्ट आहे.. Proud

माहेरचा मार्च महिन्याचा अंक मिळाला. त्यात नंदिनीची कथा आली आहे. त्याबद्दल तिचे अभिनंदन. Happy
कथा मस्त आहे, आवडली.

Pages