विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!! Happy

अरे वा! सर्वांचं अभिनंदन!

जुन्या मायबोलीवरच्या शुभेच्छा 'बीबी'ची कमतरता खरेतर इथे जाणवतच होती आशू. Happy

साजिरा,चिनूक्स्,श्रद्धा,चमन..... आपले अभिनंदन.
आशूडी,आपले ह्या बातमीबद्दल आभार.... Happy

माहेर चा अंक घ्यावा लागणार...

हार्दिक अभिनंदन चमन, श्र, साजिरा, चिनूक्स! Happy
आभासी जालावरून साहित्य 'प्रिन्ट'मध्ये येणं ही खूप मोठी अचिव्हमेन्ट आहे! शुभेच्छा! लिहीत रहा!

अरे वा हार्दिक अभिनंदन! आता मिळवून वाचलाच पाहिजे. आशुडी, तुलाही धन्स - चांगला धागा सुरू केल्याबद्दल.

अरे वाह वाह वाह... इथे लिंक दे की आशू डी.
आणि साजिरा, कंसा आणि श्रद्धे अभिनंदन त्रिवार अभिनंदन.

Pages