विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन सर्वांचे !
माहेर मधले आलेले लेख त्या त्या माबोकरांनी इथे टाकले तर प्रताधिकाराचा भंग होईल का? भारताबाहेर असलेल्यांना वाचायला मिळेल.

माहेरचा मे महिन्याच्या अंकात 'कसे खुलती हे दक्षिणरंग'- अश्विनी खाडिलकर, 'वळीव आलंय बया वळीव'- हणमंत शिंदे आणि 'चाकोरीबाहेर- जबाबदारी पेलताना अनघा दिगंत असतात'- चिन्मय दामले असे लेखन दिसले.
संबंधित मायबोलीकरांचे अभिनंदन!

धन्यवाद Happy

याच अंकात पौर्णिमा यांची 'होम मिनिस्टर' ही कथा, मानुषी यांचा 'साडी : आदी ते इति' हा लेख, संकल्पचा 'खुलभर दुधाची कहाणी - वीकिपीडिया - मुक्त ज्ञानकोश' हा लेख, तसंच संघमित्रा यांची 'चिट्ठी' ही कथा आहे. अंकाचं मुखपृष्ठ कल्पेश गोसावी याने केलं आहे.

वा वा अभिनंदन सगळ्यांचे !!!!

संघमित्राची चिठ्ठी म्हणजे दिवाळी अंकातली ना ? दोन मैत्रिणींची गोष्ट ? मस्त होती ती एकदम !!!

अभिनंदन सगळ्यांच Happy प्राची वार्षीक वर्गणी भरुन घरपोच अंक मिळेल बहुतेक तुला. त्यांच्या ब्लॉगवर का कुठे तरी वाचल्यासारखं वाटतय.

माहेरच्या जूनच्या अंकात चिन्मय दामले (चिनूक्स) यांचा 'चाकोरीबाहेर - सिनेमातला `छायालेखक' महेश आणि भूषण कटककर(बेफिकीर) यांचा 'गझल अशी भेटते' हे लेख प्रसिद्ध झाले आहेत. अभिनंदन.

आपले मायबोलीकर श्री. प्रदिप वैद्य (vaidyaa) यांच्या 'काही तीव्र..काही मंद्र' काव्यसंग्रहाचे काल श्री. सचिने खेडेकर यांच्या हस्ते प्रकाशन झाले. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. Happy आजच्या म.टा. आणि पुणे मिरर मधे याचे वृत्त छापून आलेले आहे. Happy

याबद्दल सविस्तर त्यांनी लिहावच हि विनंती.

Pages