विविध­ दैनिकात/ मासिकात मायबोलीकरांचे साहित्य

Submitted by आशूडी on 27 December, 2010 - 23:07
साजिर्‍याची 'गावशीव' ही कथा, त्याचसोबत चिनूक्सचा "किनारा तुला पामराला" हा 'चाकोरीबाहेर' सदरातील लेख, श्रध्दाची 'सती' ही कथा आणि चमन ची 'मेघाची गोष्ट' हे 'माहेर' जानेवारी २०११ अंकामध्ये प्रसिध्द झाले आहेत. 'माहेर'च्या फेब्रुवारी अंकात पूनमची 'तुझ्या नसानसांत मी' आशूडीची 'गणित' या कथा प्रसिद्ध झाल्या आहेत. तसेच 'चाकोरीबाहेर' या सदरात चिनूक्सचे 'फक्त इच्छा हवी' आणि 'अन्नब्रम्ह' सदरात मिनोतीचे 'नेत्र निवावेत, क्षुधा शमावी' हे लिखाण प्रसिद्ध झालं आहे. सर्वांचे खूप खूप अभिनंदन! मायबोलीकरांच्या नवीन वर्षाची सुरुवात धडाक्यात झाली!!
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चौघांचे अभिनंदन!

साजिर्‍याच्या 'गावशीव' ने रडवले होते वाचली तेव्हा.

चमनची मेघाची गोष्ट चार वेळा वाचलेली आवडली म्हणून. वाचताना लहानपणीचे क्रश आठवले होते. Happy

सती व किनारा तुला पामराला ह्या नाही वाचल्या.
ह्या सर्वांच्या लिंका इथे परत दिल्या तर आणखी छान.

चौघांचे अभिनंदन .......... Happy

आणि हा बाफ सुरू केल्याबद्दल जुमाचे सुद्धा अभिनंदन ................. Happy

मनःपूर्वक अभिनंदन साजिरा, चिनूक्स, श्रद्धा आणि चमन. Happy
हा अंक मिळवून वाचायलाच हवा. आपल्याला मायबोलीवर आवडलेल्या कथा /लेख असे एखाद्या मासिकामध्ये वाचायला मिळाले तर खूप आनंद होतो.

पौर्णिमाला मोदक!!
अतिशय मस्त बातमी..
व आशू मस्त बाफ..
मी परवाच विचार करत होते, पूर्वीसारखा शुभेच्छांचा बाफ नाही इथे..

Pages