विश्वचषक क्रिकेट - २०११

Submitted by Adm on 25 December, 2010 - 23:41

भारत, श्रीलंका आणि बांग्लादेशात होणार्‍या २०११ सालच्या क्रिकेट वर्ल्डकप स्पर्धेबद्दलच्या चर्चेसाठी हा धागा.

टाईमटेबलची एक जबरी लिंक आहे :
http://www.cricbuzz.com/cricket-schedule/series/228/icc-world-cup-2011

तिकिटे :
http://www.icccwc2011.kyazoonga.com/tickets/index/
http://www.2011cricketworldcuptickets.net/


सुचना : ह्या बाफवर कृपया वर्ल्डकप मधले सामने, स्कोर, खेळाडूंच्या "खेळाबद्दलची" आपली मते आणि आपले अंदाज ह्याबद्दलच चर्चा करावी... मॅच फिक्सींग, कुठल्या कुठल्या शहरातल्या/ परिसरातल्या पोपटांचे अंदाज आणि त्याबद्दलचे असंबध्द पोस्ट्स, भारत-अमेरीका / इंग्लंड चांगलं का वाईट / भारताली लोकं चांगली का वाईट अश्या विषयासंबंधीची चर्चा कृपया वेगळे बाफ काढून करावी.

सर्व क्रिकेट प्रेमींना विनंती : आपला रसभंग करून विकृत आनंद मिळवण्यासाठी वर उल्लेखलेल्या विषयांवरचे पोस्ट्स येतीलच. पण त्याचा पूर्ण अनुल्लेख करावा आणि विषयासंबंधी चर्चा सुरु ठेवावी. धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसं बोल्लात भाऊ! Happy

सही आहे! टाईट आहे बॉलिंग एकदम, फिल्डींग सुद्धा! बने रहो पठ्ठो!

अरे आउट ! म्हणजे विकेट फेकायचा संदेशच होता वाटते! लागोपाठ दोन कैच दिले अमलाने

गणू, तुम्हाला काय अघोरी आनंद मिळत असेल तो असो, पण तुमच्या मुर्ख बडबडीची आम्हाला गरज नाहीये....बालीशपणा थांबवा आता...गम्मत कधीतरी बरी वाटते...

भाऊ, विनायक, मास्तूरे... ग्णू आणि कंपनी (ह्यात झक्कींची विषयाला सोडून असलेली पोस्ट्स पण आली)कडे पूर्ण दुर्लक्ष करा ही विनंती... अजिबात रिप्लाय, उल्लेखच करू नका.. असामी म्हणाला तसं उगाच जास्त पानं होतात ह्या बाफवर पण ह्यांच्या नादी लागण्यापेक्षा ती एजर्नी पानं स्क्रोल करण्यात घातली तर परवडेल..

विनायक बालीशपणा थांबवा आता! गम्म्त कधीतरि बरि वाटते! तुमच्या मुर्ख आणी गाढव बडबडीची आम्हाला गरज नाहीये! दाउद सारख्या अतिरेक्याचे जेथे पैसे लागले आंणी जो सर्व भारतीयांना त्यावर नाचवतो आहे त्या मैचेस चे मला कौतुक सांगण्याची हिम्मतहि करु नका! तुमचा शहाणपणा तुमच्यापाशी ठेवा. तुमच्या सारख्या देशद्रोह्याची इथे काहिहि गरज नाहिये! Angry

ह्या डि विलीयर्स ला जास्त घातक व्हायच्या आधीच बकरा बनवायला हवा! मध्येच ओकेजनल फ्लाईट दिली तर फटका बसायची भिती आहे पण मस्त कॅच देइल तो विलीयर्स.

बाबो!!!!! फुल्ल अ‍ॅक्शन!!!

कॅलीस!!!! शब्बास पठ्ह्ठो!!

कॅलिस आउट...भारताविरुध्द् दोन्ही वर्ल्डकपमध्ये (९९,२०११) कॅलिस रन-आउट झाला आहे, ५० च्या वर रन्स मारुन.

इथे येणारा प्रत्येक जण दिवसातून एकदातरी क्रिकइन्फो वाचत असेल >> १०० मधले ९० तरी

विड्थ आजाबात नको द्यायला पाहिजे!!!!! आता पर्यंत नाहीच दिलीये खरं तर.
फुल टॉस पण नको हे सांगायचं राहिले! Proud

>>>मृ, इथे येणारा प्रत्येक जण दिवसातून एकदातरी क्रिकइन्फो वाचत असेल

हो का? मला खरंच काही माहिती नाही रे टण्या. ज्ञान मिळालं आणि पाजळावसं वाटलं म्हणून सांगून टाकलं. Proud

बुवा, इल्लिगल साईट वरुन बघणं बंद केलंय, तेव्हा तुम्हीच आता फाईनर पॉईंट्स लिहा इथे...तशी क्रिक इंफो ची कॉमेंट्री फॉलो करतोच आहे...पण ते सुद्धा कधी कधी इंटरेस्टींग डिटेल्स मिस करतात....

"लकडी का तुकडाभी अगर गेंदको लग जाये तो रनौकी फसल निकल सकती है" - सौजन्य दुरदर्शन महान हिंदी कॉमेंट्री...

जहीर ला चोपला या ओव्हरला

मी त्या ९० मधे आहे. पण तरी एक लिहावेसे वाटते.
आत्तापर्यंत २९ धावात ८ बाद असे चार वेळा घडले आहे. ३ वेळा २९ पेक्षा कमी धावात ८ बाद असे झाले आहे. झिंबाब्वे ने हेच फक्त १७ धावात करून दाखवले होते.

२९ मधे ९ बाद हा आपला विक्रमच आहे. कमीत कमी धावात जास्त बाद होण्याचा मान हवा असेल तर १६ मधे ९ हा विक्रम करायला पाहिजे. तसे टेस्ट क्रिकेटमधे ३२ मधे सर्व बाद असेहि भारताने करून दाखवले आहे तेंव्हा एक चौकार कमी मारला तर तो विक्रमहि मोडला जाईल.

जास्तीत जास्त शतके, जास्तीत जास्त धावा वगैरे विक्रम भारताच्या नावावरच आहेत. पण वरील विक्रमहि भारताने केले तर खर्‍या अर्थाने मागून, पुढून, वरून, खालून कुठुनहि पाहिले तरी क्रिकेट मधे भारताला पर्याय नाही.
सुनो गौरसे दुनियाँवालो........

Happy

विनायक, चांगलं केलस बाबा! डोक्याला झंझट नको! Happy

डुमिनीचा सिक्स चक्क मिस टाईम्ड होता, बॅटीच्या मधोमध लागला पण नाही तरी मस्त गेला सरळ. लैच हाणला ह्या ओवर ला!.

डी विलीयर्स!!!!! गेला!!!
जबरी मॅच. मगाशी हरभजनच्या आधीच्या स्पेल ला मस्त डि विलीयर्स शी संभाषण करत होता हरभजन. अगदी जवळ जाऊन १-२ घटका बोलला! Proud
जबरी फ्लॅट शॉट होता विलीयर्स चा, अगदी खाली जमिनीच्या जवळ पकडला क्याच कोहली नी! ग्रेट जॉब!

मी त्या ९० मधे आहे>> व्वा झक्की, तुमचा डेटाबेस कोणता मग? एव्हढी माहिती कुठुन आणताय?

आयची कटकट! जबरी फ्लॅट सिक्स!!!! ह्या ड्यु प्लेसी लाच काढा लै पक्की बॅट धरतोय. क्याच नक्की देणार!!!

आ ऊ ट!!!!!!!!!!! स्टंपिंग!!!!!! डुमिनी!!!
आधी हातातून सुटला धोनीच्या, परत उचलून मग स्टंपिंग! अफाट फास्ट आहे धोनी!!! मगाचा कॅलीसचा रन आऊट पण अफलातून!!! अब जीत सकते है!!!

धोनी नक्की काय म्हणून संघात आहे...
ना धड तो बॅटींग करत..विकेटकिपींगचीही बोंब...
आत्ता ड्युमिनीला आउट करताना जे काही तडफडला ते पाहून कीव आली....

Pages