खोटारडा तू...

Submitted by तुंगा on 22 December, 2010 - 12:04

खोटारडा तू आहेस कान्हा
सदा ठकवितोसी आम्हा गोपीकांना !! धृ!!

सवंगड्यास घेऊनी घरामध्ये येतो
दही, दूध, लोणी खाऊन जातो
किती शोधू याला, कुठे सापडेना !! १ !!

यमुनेच्या पाण्या जाता अडवितो वाट
खडे मारूनी हा फोडीतसे माठ
काय सांगू बाई सासुसासर्‍यांना !! २ !!

स्नान करायासी गेलो यमुनेच्या डोही
कसा कोठोनि हा आला कळालेच नाही,
घेऊनिया वसने म्हणतो, जोडा करांना !! ३ !!

कुणा हसवितोसी, कुणा रडवितोसी,
कुणा तारीतोसी, कुणा मारीतोसी
हरी तुझी लीला, कुणाला कळेना !! ४ !!

तुंगा...

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

विषय छानच निवड्ला आहे. परन्तु, किन्चित जुने वाटत आहेत शब्द. पुन्हा एक्दा प्रयत्न कराल काय? मला खात्री आहे , कि अजून सुन्दर होऊ शकेल ही अभिव्यक्ति.
हे विषय वाचताना कान्हा उभा रहात नहिये अजून्. अप्ल्यास दुख्वाय्चे हा हेतु नव्हे - नकळत तसे घडले असेल तर - मनः पुर्वक क्षमा.

निनाव, शब्द जुने वाटताहेत कारण ते जुनेच आहेत. हि कविता मला वाटते तुंगामावशींनी किमान ४० वर्षांपुर्वी लिहीलेली असावी. रच्याकने आज त्यांचे वय सत्तरीच्या पुढे आहे. Happy