Submitted by तुंगा on 22 December, 2010 - 12:04
खोटारडा तू आहेस कान्हा
सदा ठकवितोसी आम्हा गोपीकांना !! धृ!!
सवंगड्यास घेऊनी घरामध्ये येतो
दही, दूध, लोणी खाऊन जातो
किती शोधू याला, कुठे सापडेना !! १ !!
यमुनेच्या पाण्या जाता अडवितो वाट
खडे मारूनी हा फोडीतसे माठ
काय सांगू बाई सासुसासर्यांना !! २ !!
स्नान करायासी गेलो यमुनेच्या डोही
कसा कोठोनि हा आला कळालेच नाही,
घेऊनिया वसने म्हणतो, जोडा करांना !! ३ !!
कुणा हसवितोसी, कुणा रडवितोसी,
कुणा तारीतोसी, कुणा मारीतोसी
हरी तुझी लीला, कुणाला कळेना !! ४ !!
तुंगा...
गुलमोहर:
शेअर करा
विषय छानच निवड्ला आहे.
विषय छानच निवड्ला आहे. परन्तु, किन्चित जुने वाटत आहेत शब्द. पुन्हा एक्दा प्रयत्न कराल काय? मला खात्री आहे , कि अजून सुन्दर होऊ शकेल ही अभिव्यक्ति.
हे विषय वाचताना कान्हा उभा रहात नहिये अजून्. अप्ल्यास दुख्वाय्चे हा हेतु नव्हे - नकळत तसे घडले असेल तर - मनः पुर्वक क्षमा.
निनाव, शब्द जुने वाटताहेत
निनाव, शब्द जुने वाटताहेत कारण ते जुनेच आहेत. हि कविता मला वाटते तुंगामावशींनी किमान ४० वर्षांपुर्वी लिहीलेली असावी. रच्याकने आज त्यांचे वय सत्तरीच्या पुढे आहे.
कवियीत्री चे सम्पुर्ण मान
कवियीत्री चे सम्पुर्ण मान राखून मी, मनः पासून क्षमा मागतो.