न्यु जर्सी ए.वे.ए.ठी. २०११

Submitted by अनिलभाई on 30 November, 2010 - 16:41

२०११ ए.वे.ए.ठि. च्या चर्चेसाठी....

८ जानेवारी २०१० रोजी चांद पॅलेस.
http://www.maayboli.com/node/22124

हिवाळी ए.वे.ए.ठी. नांव नोंदणी खालील ठिकाणी करा.
http://www.maayboli.com/node/21943

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त २४???

हे पहा...

१. घरी पाहुणे येणार आहेत
२. मुलांचा काही कार्यक्रम (गेम / बर्थडे पार्टी / क्लास) आधीच ठरलेला आहे
३. ए.वे.ए.ठि.ची जागा माझ्या घरापासून लांब आहे
४. ज्या कार्यक्रमाच्या निमित्ताने ए.वे.ए.ठि. होणार त्यांचं तिकीट फार महाग आहे
5. मला कोणी आमंत्रण दिलं नाही
६. मला आमंत्रण दिलं
७. मला लाडू करता येत नाहीत
८. मला लाडू खायची परवानगी नाही
९. मला लाडू आवडत नाहीत
१०. मी देवळाबिवळात जात नाही
११. छ्या! बागेत कसलं भेटायचं!!
१२. त्या दिवशी स्नो आहे म्हणे
१३. त्या दिवशी पाऊस आहे म्हणे
१४. माझ्याकडे मायबोली टीशर्ट नाही
१५. माझ्याकडचा मायबोली टीशर्ट मला घालवत नाही
(१६. भाईंच्या दाढीची भिती वाटते बुवा!.. आता दाढी नाही तेव्हा) १६. भाईंच्या मिशीची भिती वाटते बुवा!
१७. झक्का उथळ आणि पांचट बोलतात
१८. सगळेच उथळ आणि पांचट बोलतात
१९. ऍडमिन येणार असतील तर मी येईन
२०. अमुकतमुक येणार असतील तर मी येईन
२१. अमुकतमुक येणार नसतील तरच मी येईन
२२. अपेंडिक्स, टॉन्सिल्स काढण्याचं ऑपरेशन आणि (एंडो, एक्झो का स्टेथो)स्कोपी त्याच दिवशी आहे.
२३ (अ). मराठी लिहिता येतं पण वाचता येत नाही
२३ (ब). मराठी बोलता येतं पण समजत नाही
२३ (क). वरील दोन्ही
२४. त्या दरम्यान मी मज्जा करायला जाणार आहे.
२५. नवरा/सासु/सासरा/आई/वडील्/बहीण/भाऊ/नणंद/दिर परगावी जाणार आहे.
२६. त्या(च) दिवशी महत्वाचे रिलीज आहे/ऑफिसमधे काम आहे.

ह्या शिवाय आणखी काही असेल तर लिवा. Happy

Angry झाल्या का सुरु तुमच्या गटगच्या गप्पा परत? ते अगोदरच्या एवेठेएठी वृतांत अजुन वाचायचे आहेत आणि ह्यांच झाल सुरु. Uhoh ~D~D
झक्की ,इकडे टेक्सासला या तुम्ही.

सायो, हो. Proud अटलांटाचं येका मेंब्राकडून आमंत्रण आहे.

सिंडे, तू मला सरप्राइज गेस्ट म्हणून नेशील का? Proud

बाराएवेएठीस आले नाही तर :
१५
१७
२३(ब)
ही कारणं सांगेन.

अटलांटाचा कोण मेंब्र ते ही आलं लक्षात. Happy

मैत्रेयीला यायचं नसेल तर १० वं कारण सांगायला आवडेल असं वाटतं Proud

हे हिवाळी गटग नेहमीप्रमाणे साऊथ जर्सीत मैत्रेयीच्या कम्युनिटीतल्या भाड्याच्या हॉलमध्ये संपन्न होईल.

कारण क्रमांक ३, ५, ८, १२, १३ व १४ या कारणांमुळे मी येऊ शकत नाही.

सीमा, आमंत्रणाबद्दल धन्यवाद. टेक्सास फार मोठे राज्य आहे. असे म्हणतात की एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत जायला एक दिवसाहून जास्त वेळ लागतो. म्हणजे 'जिथे सागरा धरणी मिळते' तसे शेकडो मैलात कुठे तरी भेटायचे असे ठरवल्यासारखे होईल.

ह्यूस्टन ला जाणे जमू शकेल कदाचित्!

झक्की, माझ्या न येण्याच्या कारणातल्या क्रमांक १५ मुळे माझ्याकडे तुमच्या कारण क्रमांक १४ चं उत्तर आहे. तुम्हाला पीच रंग आवडतो का? (पीच रंगाबद्दलच्या अधिक माहितीसाठी अटलांटावासियांना भेटा अगर लिहा.)

उ. उ. उ. पां. चा प्रयोग करणार असाल तर एक मायबोली टोपी देखिल भेट म्हणून मिळेल. Proud

मला पीच खायला आवडते. पीच असा रंग असतो? म्हणजे पांढरा टी शर्ट घालून पीच खाल्ल्यास कदाचित जो रंग शर्टाला येईल तो पीच का?

हो. शर्टावर किती सांडवता त्यावर अवलंबून आहे.

बरं, काळ्या रंगाचा मायबोली टीशर्ट चालेल का? टोपी मॅचिंग आहे.

हिवाळी गटग अंजलीकडे होणार आहे ना, तिने मागेच नाही का सांगीतले. की हे गटग केपीसाठी आणि अंजलीकडचे गटग वेगळे आहे.

मंडळी ७ ची तारीख मिळाली आहे त्यामुळे मी ७ पासुन ११ डिसेंबरपर्यंत कधीही न्युयॉर्कात हजर होईन. त्यांनंतर कधीही ठरवा गटग. Happy

व्हिसा मिळाला. Happy आता ग्राहकराजाने तारीख सांगीतली की येणार. १८ ला आलो नाही तर अवघड दिसतय. मग एकदम जानेवारीच उजाडेल.

माझी कारणं २,३,४,५ Proud
यंदा वेबकॅम लावा आणि रात्री भेटा. मग मी वर्च्युअली सहभाग घेउ शकेन. Wink

Pages