माबो गटग - निळू दामल्यांशी 'लवासा' बद्दल चर्चा

Submitted by शैलजा on 19 November, 2010 - 08:26

लवासा पुस्तकावरुन जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये, एक मायबोलीकर परेश लिमये, ह्यांनी खुद्द निळू दामल्यांशी लवासासंबंधित चर्चा आयोजित करण्याची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली होती. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०१० ह्या दिवशी, निळू दामल्यांशी ह्या विषयासंबंधित चर्चेची संधी आपल्याला मिळत आहे. वेळ साधारण सकाळी ११:०० ते २:३० दुपार.

निळू दामले ह्यांच्याबरोबर ग्रंथालीचे धनंजय गांगल व मौजेचे संजय भागवत हे देखील उपस्थित असतील.

ज्या मायबोलीकरांना ह्या गटगला जमायची इच्छा आहे, त्यांनी ह्या बाफवर बुधवार, २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत कळवावे. हे गटग पुण्यात होईल. सभासद संख्या अपुरी असल्यास गटग रद्द करण्यात येईल.

माणशी रुपये २००/- खर्च - सभागृहाचे भाडे व जेवण ह्यासकट -अपेक्षित आहे, असे परेश लिमये ह्यांनी कळवले आहे.

गटगचे ठिकाण : 'बैठक' बॅंक्वेट हॉल, हॉटेल रणजित, भांडारकर रोड. हे हॉटेल भांडारकर रस्त्यावर कॉसमॉस बॅंक आहे त्याजवळ आहे.
गटगची तारीख व वेळ: २८ नोव्हेंबर २०१०, सकाळी ११:०० ते २:३० दुपार.
सकाळी ११ पर्यंत सगळ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

'पवित्रा' म्हणायचय का तुला (दुसरा) नी ? Proud

रच्याकने , 'विपर्यास' अडकुन राहिलायसं दिसतय अजुन दातांत. Wink दिल पे मत ले यार ! असले काही पवित्रे बिवित्रे नसतात माझ्याकडे.

लवासा हे स्वतंत्र भारतातले पहिलेच मानवनिर्मित हिल स्टेशन होणार अशी जाहिरात केली गेली. मग इंग्रज काळात जे हिल स्टेशन बनवले तिथेही पर्यावरणाचा असाच र्‍हास केला गेला होता का? ह्याचा काही जमाखर्च उपलब्ध आहे का?

असे लेख लिहुन जनजागृती चांगली होते, पण मेडिया ला दुसरे खाद्य मिळाले कि विषय मागे पडतोच. पुढे काही होत नाही. सामान्य लोकांना इतर दैनंदीन कामे खुप असल्याने, मेडियातुन प्रकरण गायब झाले कि मेमरीतुन हि गायब होते. सत्ताधारी अन सत्ताकांक्षी असे दोन्ही गट लव्हासात एकत्र असल्याने, राजकीय दृष्ट्या हा विषय 'गौण' आहे.

लवासा ला दोन कारणांनी विरोध होतो. १) पर्यावरणाबद्द्ल प्रेम २) शरद पवारांबद्दल द्वेष. पवारांना विरोध करणारे राजकीयदृष्ट्या संपतात, हे लक्षात घेता, कुणी ह्यावर फार कठोर कारवाई करणे शक्य नाही.

पुर्ण उल्हासनगर 'नियमित' केले जाउ शकते. अर्धे ठाणे 'नियमीत' केले जाते, तर लवासा किस झाड कि पत्ती!

शैलजा, (व ईतर):
माझा लेख ईथे अपलोड केला आहे.
http://www.maayboli.com/node/21490

सकाळपासून तीन वेळ केला तरी अपलोड होताना बहुदा काहीतरी तांत्रिक अडचण होती. त्यामुळे थोडा ऊशीर झाला.
असो.
(जमल्यास लेखाची प्रत व प्रश्ण निळू दामले यांना सुपूर्द केलीत तर बरे होईल. चर्चेआधी केली तरी चालेल.)
आभारी.
योग

>>जमल्यास लेखाची प्रत व प्रश्ण निळू दामले यांना सुपूर्द केलीत तर बरे होईल >>माझ्याकडे प्रिंटर नाही, तेह्वा मी आज किंवा उद्या प्रिंट घेऊ शकणार नाही. कोणाला शक्य असल्यास घेऊन यावे.

ठीक आहे. किमान लेखात ऊपस्थित केलेले प्रश्ण आणि त्यामागची पार्श्वभूमी नोंदवून विचारलेत तर बरे होईल.
कुणालाच प्रिंट काढणे जमले नाही तर मी निळू दामले यांना थेट ईमेल ने लेखाची प्रत पाठवतो.
परेश, तुम्ही दामलेंना याबबात आगाऊ सूचना/विनंती केलीत तर खूप बरे होईल.

जरुर योग, तुमचे मुद्दे व प्रश्न, तुमच्या नावासकट नक्की विचारेन. काल लेख आला असता वा इमेलने पाठवला असतात तर मी प्रिंट घेऊन जाऊ शकले असते.

दिखावा आहे तो. नविन महसूल मंत्र्यांना काही स्टंट पाहिजेच ना चर्चेत रहायला. अन जुन्या महसूलमंत्र्यांची पितळं उघडी करण्यातच हे नाट्य रंगणार

>>
माफ करा , नवीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे चर्चेर्त राहण्यासाठी स्टन्ट करणारे गृहस्थ नाहीत. भानगडी न करणे ह्या गुणावरच त्याना हे खाते मिळाले आहे. त्यामुळे हा शेरा अनुदार आहे असे माझे मत आहे. ही भूमिका घेऊन जर कोणी चर्चा करणार असेल तर चर्चेच्या हेतूबद्दल शंका घेण्यास वाव आहे.
दुसरे , अण्णा हजारे हे अत्यंत बेभरवशाचे आणि स्तुतीलोलुप गृहस्थ आहेत. हे तुम्ही त्यांच्या बरोबर काम केलेल्या व त्यातून बाहेर पडलेल्या कोणत्याही चळवळीतल्या लोकाना विचारा. सरकारी अधिकारी व पुढारी अण्णांच्या कोणत्याही आन्दोलनाला घाबरत नाहीत हे कृपया लक्षात घ्या. कारण त्यांचे आन्दोलन हे खरे एकमेकाना अडचणीत आणण्याच्या पुढार्‍यांतील टोळीयुद्धाचा एक भाग असते. व त्याचा शेवट कोठे , कधी , कोणत्या टर्म्सवर करायचे हे सगळे ठरलेले असते.

एखादे दिवशी त्यानीच लवासाशी माझी चर्चा झाली अन त्याने माझे समाधान झाले आहे असे पत्रक काढून सहकार्‍यांच्या तंगड्या त्यांच्याच गळ्यात अडकवल्या नाहीत म्हणजे मिळवली...

शैलजा आणि इतर , http://www.maayboli.com/node/21502 इथे थोडं लिहिलं आहे.
आत्ता खरंतर याबद्दल अभ्यासाला सुरवात केलीये. नंतर अजून लिहायचा प्रयत्न करेन.
चर्चेसाठी शुभेच्छा. Happy वृत्तांत नक्की लिहा.

>>योग, आपल्या लेखाची प्रत छापुन घेतली आहे.

धन्यवाद, परेश Happy
मी काल रात्री दामले यांना लेखाची pdf ईमेल केली होती, शैलजा ला cc केले. त्यांना लेख्/ईमेल मिळाली का एव्हडेच विचारणे.

आभारी.

चर्चेचा कार्यक्रम उत्तम झाला. हजर असलेल्या खालील सर्व मायबोलीकरांचे चर्चेत भाग घेतल्याबद्दल आभार. Happy

परेश
मेधा२००२
सूर्यकिरण
भुंगा
साजिरा
विवेक देसाई
श्रावण मोडक

परेशने अत्यंत उत्तम व्यवस्था केली होती. परेश, धन्यवाद. Happy वृत्तांत यथावकाश येईलच.
योग, तुम्ही निळू दामलेंना मेल पाठवून तुमचा लेख मेल केला आहे, व त्यांच्याकडून उत्तर आलेले आवडेल, हे त्यांच्यापाशी नमूद केलेले आहे. त्यांचे उत्तर आल्यास आमच्याशी शेअर करावेत ही विनंती. तुमचे, जीएस व अल्पनाचे मुद्देही, तुमच्या तुमच्या नावानिशी चर्चेत मांडले.

झकास!

परेश आणि शैलजा, तुमचे आभार आणि अभिनंदन. चर्चा रेकॉर्ड केली असेल तर मा.बो. वर "संवाद" सदरात देवू शकाल. अ‍ॅडमिन ना विनंती करून पहा.

अरे काय टायपायचा मक्ता मीच घेतलाय काय? Happy
बाकी हजर असलेल्यांनीही टायपा की, नुसतं आपलं "वृत्तांताची वाट बघतो आहे." हे असली खासदार छाप वाक्यं काय टाकताय? Light 1

खासदार छाप मलाही लागू होतं Uhoh असोत माझ्यापरीने मी टायपून ठेवतो. उद्या हापिसातून अपलोड करेल वृत्तांत. बाकी तो जेवणाच्या कार्यक्रमाची चर्चा तंतोतंत लिहिल. Proud

शैलजे, वरच्या लिश्टीत परेशच्या शेजारी बसलेला (महेश पवार कि कोण?) राहिला की.

आणि निळू दामलेंचे पण नाव राहिले की. Proud

साजिर्‍या, पवार मायबोलीकर नाहीत. हे पहा -"खालील सर्व मायबोलीकरांचे"
आणि निळू दामलेंचे पण नाव राहिले की - ते तरी कुठेत माबोकर? Proud

अप्पुनका चुका काढनेका कामच नै! Proud

अरे काय हे? लवासा पुन्हा पाडून नविन बांधायची वेळ आली (रमेश ईफेक्ट!) तरी अजून ईथे वृत्तांत नाही? Sad

योग, मी लिहित आहे पण मला वेळ लागेल. घरगुती कारणांमुळे आणि ऑफिसातही अतिशय व्यस्त आहे, पण प्रयत्न करते.

Pages