माबो गटग - निळू दामल्यांशी 'लवासा' बद्दल चर्चा

Submitted by शैलजा on 19 November, 2010 - 08:26

लवासा पुस्तकावरुन जी चर्चा झाली होती त्या चर्चेमध्ये, एक मायबोलीकर परेश लिमये, ह्यांनी खुद्द निळू दामल्यांशी लवासासंबंधित चर्चा आयोजित करण्याची जबाबदारी घ्यायची तयारी दाखवली होती. त्याप्रमाणे २८ नोव्हेंबर २०१० ह्या दिवशी, निळू दामल्यांशी ह्या विषयासंबंधित चर्चेची संधी आपल्याला मिळत आहे. वेळ साधारण सकाळी ११:०० ते २:३० दुपार.

निळू दामले ह्यांच्याबरोबर ग्रंथालीचे धनंजय गांगल व मौजेचे संजय भागवत हे देखील उपस्थित असतील.

ज्या मायबोलीकरांना ह्या गटगला जमायची इच्छा आहे, त्यांनी ह्या बाफवर बुधवार, २४ नोव्हेंबर २०१० पर्यंत कळवावे. हे गटग पुण्यात होईल. सभासद संख्या अपुरी असल्यास गटग रद्द करण्यात येईल.

माणशी रुपये २००/- खर्च - सभागृहाचे भाडे व जेवण ह्यासकट -अपेक्षित आहे, असे परेश लिमये ह्यांनी कळवले आहे.

गटगचे ठिकाण : 'बैठक' बॅंक्वेट हॉल, हॉटेल रणजित, भांडारकर रोड. हे हॉटेल भांडारकर रस्त्यावर कॉसमॉस बॅंक आहे त्याजवळ आहे.
गटगची तारीख व वेळ: २८ नोव्हेंबर २०१०, सकाळी ११:०० ते २:३० दुपार.
सकाळी ११ पर्यंत सगळ्यांनी उपस्थित रहावे ही विनंती. Happy

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हल्ली केंद्रिय पर्यावरण खातं फारच सजग झालं आहे का? दर २-३ दिवसांनंतर कोणत्या ना कोणत्या प्रकल्पाला नोटीस दिल्याची बातमी वाचण्यात येत आहे. (त्या नोटीशींचं पुढे काय होतं कोण जाणे? )

रविवारच्या कार्यक्रमाला मी येऊ इच्छितो. माझे नाव नोंदवून घ्यावे. वर्गणी कोठे द्यावयाची याची कल्पना द्यावी.
या कार्यक्रमाला वर्गणी भरून, पण केवळ श्रोत्याच्या भूमिकेत माझा एक मित्र येऊ इच्छितो. हा मित्र मायबोलीचा सदस्य नाही. असे चालेल का? आपली परवानगी असेल तर त्याच्याशी पुढील बोलणे करून मी येथे कळवेन.
विलंब झाला आहे याची कल्पना आहे. त्यामुळे परवानगी नाकारली तरी त्याविषयी वावगे वाटणार नाही.

हो, येऊ शकता. नाव नोंदवलेले आहे. वर्गणी तिथेच भरावयाची. चर्चेत सहभाग अपेक्षित.
आपला मित्रही येऊ शकतो. परवानगी वगैरे असे काही नाही. Happy

श्रावण मोडक, वर्गणी कार्यक्रमाच्या वेळीच द्यायची आहे. आणि तुमचे मित्र फक्त श्रोत्याच्या भुमिकेत का ? तेही बोलले तरी काहीच हरकत नसावी कोणाची. मायबोलीच्या माध्यमातुन लवासा पुस्तकावर चर्चा करताना ह्या गप्पांची कल्पना पुढे आली असली तरी मायबोलीकर असण्याचे बंधन आहे असे नव्हे.

मोडक , नोटिसच्या छायांकित प्रतीबद्दल धन्यवाद. आजच्या पूणे मिररच्या पहिल्या आणि सातव्या पानावर यावर बरीच माहिती आली आहे. लिंक वरती दिलेलीच आहे.

धन्यवाद. तो माबो सदस्य नसल्याने, आणि एवीतेवी मीही चर्चेत न उतरता ती छानपैकी ऐकावी अशा मताचा असल्याने, आम्ही दोघेही या निष्कर्षाला आलो. त्याच्याशी बोलतो. मग पाहू.
व्यक्तीशः मला ही चर्चा ऐकण्यात खूप रस आहे. कारण इथंच झालेली चर्चा मूळ लेखनासह मला खूप भावलेली आहे.

कुणाला रस असल्यास कळवा. जनआयोगाच्या अहवालाची पहिली प्रत माझ्याकडे पीडीएफ स्वरूपात आहे. माझ्याशी येथे संपर्क साधा - modak.shravan@gmail.com

मोडक, नुसतीच छानपैकी चर्चा ऐकण्यापेक्षा त्यात सहभागी झालात तर अधिक उत्तम. तुमच्याकडे आमच्यासारख्या सामान्य वाचकांपे़क्षा अधिक माहिती असल्यास ती चर्चेमध्ये देणे व त्या अनुषंगाने चर्चा पुढे जाणे उचित.

शैलजा, अधिक माहिती द्यायची झाली तर सामग्रीसहच यावे लागेल. ते थोडे अशक्य आहे. कारण लवासा प्रकरणाचा गुंता इतका आहे की, फक्त कायदे आणि त्यांचा भंग एवढाच मुद्दा ध्यानी घेतला तरी, किमान चार-पाच कायदे, त्यातील तरतुदी वगैरेचा मामला पहावाच लागेल. त्यापेक्षा आपण आत्ता जी आणि जशी चर्चा करतो आहे, तशीच ती होत राहू दे, असे माझे मत आहे. एरवी ही चर्चा उगाच अकॅडेमिक होत जाईल. त्यापेक्षा इथं आपण मंडळी विचारत असलेले प्रश्न अधिक नेमके आहेत.
तिथं परिस्थितीनुरूप काही भर टाकता आली तर पाहू...
एक वानगीदाखलचा प्रश्न -
लवासा हा इकोटुरिझ्मचा प्रकल्प आहे? की हा टाऊनशिपचा प्रकल्प आहे?
हा प्रश्न का? तर उत्तर सरळ साधं आहे - इकोटुरिझ्म असेल तर शहर वसवणे हेच मुळी चुकीचे आहे, कारण या शहरानेच पर्यावरणाची हानी होते. (आता यात गुंतलेले पर्यावरणीय कायदे वगैरे क्षणभर बाजूला ठेवू. मला याचाही अंदाज आहे की, आधुनिक तंत्राच्या जोरावर पर्यावरणाचे संरक्षण, झाडांचे पुनर्वसन वगैरे दामले खचितच मांडतील. प्रश्न एका झाडाचे पुनर्वसन विरुद्ध एका परिसंस्थेचा ऱ्हास आणि तिचे पुनर्वसन असा राहतोच). आणि शहर असेल तर खासगी क्षेत्रातून शहर वसवताना केंद्रीय पर्यावरण मंत्रायलयाच्या मंजुरीचे काय? अर्थात, हा माझा एका चर्चेअंती झालेला युक्तिवाद आहे. दामले काय बोलतात यावर ते ऐकायचे आहे!!!
हे इथं जाहीर लिहितोय, कारण या चर्चेत छुपं काहीही ठेवून जायचं नाहीये. Happy

सुनिती ताईंसोबत लवासा पाहून आल्यावर नीळू दामलेंशी चर्चा करायला आम्ही काही मित्र मंडळी गेलो होतो.
पण चर्चा भलतीच उच्च पट्टीत झाली. नुकतेच लव्हासाला जाऊन आल्यामूळे ताजी आकडेवारी आणि निरीक्षणे हातात होती त्यामूळे आमची डोकी जरा तापलेलीच होती. त्यामूळे असे घडले असावे. (आमची चर्चा जरा नैतीक/अनैतीक बाबींवर घसरलो होती) असो.

अहो, लवासात काही ठिकाणी या लोकांनी डोंगर पोखरले पण काही कारणांनी तिथे बांधकाम होऊ शकले नाही; तर यांनी तिथे चक्क हिरवा पेंट मारलाय...!!!! (फोटो आहेत त्याचे. जमल्यास इथे टाकतो)

मेधा ताई, सुनिती ताई आणि आम्ही मंडळींनी मिळून तिथे मोर्चादेखिल काढला होता.
सुनिती ताई पुण्यात असतील तर त्यांनाही बोलवा.

नुकतीच बातमी आहे की बांधकामास स्थगिती मिळाली आहे. ( IBN Lokmat news 7.30 pm)

उत्तम उपक्रम आहे हा. त्यासाठी शुभेच्छा ! चर्चा करा आणि इथे वृतांत टाका.

यांची वेबसाईट मात्र अतिशय उत्तम आहे बरं का..! जरूर पाहा. आणि जमल्यास ती अभ्यासून जा.

गटग ला उपस्थित असणार्‍यांना ब्येष्ट ऑफ लक Happy

सागर, तुम्ही पुण्यात असाल तर येऊ शकता. कृपया कळवा.
>>तर यांनी तिथे चक्क हिरवा पेंट मारलाय...!!!! (फोटो आहेत त्याचे. जमल्यास इथे टाकतो>>>> तसे असेल तर जरुर टाका. हे विश्वास बसण्यापलिकडे आहे.

सागर.. तुमचेही स्वागत आहे ह्या गटगला. पुण्यात असलात गटगला उपस्थित राहू शकाल का?
तसेच तुम्ही जमवलेली आकडेवारी व निरिक्षणे घेऊन याल का?

मी सध्या पुण्यात नाहीये Sad
नाहीतर नक्कीच आलो असतो...

सुनिती ताई पुण्यात असतील तर त्यांना नक्की बोलवा.
त्यांचा नंबर इथे देऊ की मेल करू ?

आणि फोटोची Facebook वरील link इथे दिली तर माबोकरांना फोटो दिसेल का? ( की स्वतंत्रपणे इथे फोटो अपलोड करावे लागतील? )

अख्या डोंगराला हिरवा पेंट .... Rofl

सागर, सुनिती ताईंचा नंबर द्या . किंवा त्यांना तिथे उपस्थित रहायला जमले तर फारच उत्तम.

परेश अख्ख्या डोंगराला पेंट दिलाय असं तर म्हटल्याचं दिसत नाहीये. काही भागाला असं म्हटलंय. फोटो बघितल्यावर कळेलच की.

नी, वर श्रावण मोडकनी त्यासंदर्भातिल नोटिशीची लिंक दिली आहे. आजच्या पेपरात बातमी आहेच.

लव्हासा कॉन्ट्रोवर्सीचे आणखी काही मुद्दे.
http://www.24dunia.com/english-news/search/lavasa-controversy.html

Oxford's Lavasaa Tamaasha.
http://www.btinternet.com/~akme/Stimes16.html


The hills are alive with the sound of controversy.

http://www.business-standard.com/india/news/the-hillsalivethe-soundcontr...

Lavasa Corp wins libel against London Times.

http://www.business-standard.com/india/news/maha-govt-probing-%5Cirregul...

लवासा का सच - दिलीप ख़ान
http://dakhalkiduniya.blogspot.com/2010/11/blog-post_14.html

'लव्हासा'ची काही बेस्ट प्रकाशचित्रे..

http://fiveprime.org/flickr_hvmnd.cgi?method=GET&page=1&photo_number=50&...

सगळ्या लिंक्स गुगल सर्च वरून मिळवल्या आहेत. Happy

सुनिती ताईंशी नुकतच बोलणं झालं. त्या उद्या एका पूर्वनियोजित कार्यक्रमासाठी रोहा ( जिल्हा रायगड ) येथे जाणार आहेत त्यामूळे त्या गटग ला येऊ शकणार नाहीत.

पण आज संध्याकाळी 5.30 ला 'राष्ट्रसेवादल, सिंहगड रस्ता ( दांडेकर पूलाजवळ) लवासा आंदोलनाशी संबंधित एक सभा आहे.

या सभेला अण्णा हजारे, मेधा पाटकर आणि सुनिती सु.र. यांच्यासह लवासाशी संबंधित अनेक आंदोलनकर्ते उपस्थित असणार आहेत.

लवासाच्या बाबतीत नुकत्याच घडलेल्या घटना आणि स्थगितीचा निर्णय यावर तिथे चर्चा होणार आहे.
उद्याच्या गटगला जे जाणार आहेत त्यांनी शक्य असल्यास याही कार्यक्रमाला जावे. बरीच माहिती आणि आकडेवारी मिळू शकेल.

सागर, केलेल्या मदतीबद्दल धन्यवाद. - फोटो इथे अपलोड करु शकलात तर पहा, म्हणजे तुम्ही काय म्हणत आहात त्याची कल्पना येऊ शकते.

परेश, अख्ख्या डोंगराला असं कुठेच म्हटलेलं दिसलं नाही मला. उगा शब्दांचे विपर्यास कशाला करायचे? लिखाणाचा विपर्यास करुन अर्थ काढलाय म्हणणारे तुम्हीच का? Happy आपला मुद्दा पटवण्यासाठी समोरच्याची वा त्याच्या म्हणण्याची टिंगल वा टिंगलीवजा थट्टा कशाला करायची?

मी ते लिहिणार्‍याची टिंगल केलीच नाहिये ? मला तर चक्क गंमत वाटली 'डोंगराला रंग ' वगैरे कल्पनेची. अख्या काय नी थोड्याश्या काय, एकुण अतर्क्यच आहे ना ? ह्यात मला कुठलाही मुद्दा पटवायचा वगैरे नाहिये.

बघा केलात ना परत तुम्ही पण विपर्यास !! Wink Proud

आज लवासा प्रकल्प थांबवा असं सांगितलं गेलंय. बांधकाम जमीनदोस्त करावं लागेल असंही म्हटलंय...

निवडणुकांची तयारी करा.. पृथ्वीराज चौहान (चव्हाण) यांची मांड बसण्यापूर्वीच घोडं उधळलं..

Pages