माशी / भिशी / फाशी / मिशी / कळशी

Submitted by वर्षा_म on 11 November, 2010 - 07:51

आमची प्रेरणा
http://www.maayboli.com/node/20756

============

माशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
नाक आणि हात या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत लढण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी चपळ माशी!

============

भिशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
पाकिट आणि मैत्रिणींमधला
ती एक दुवा !
पाकिट रिकामे करण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी टाइमपास भिशी!

============

फाशी

आयुष्यभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या मरणाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
जन्म आणि मरण यातला
ती एक दुवा !
माझा विचारही आता
आपण सोडुन घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी फाशी!

============

मिशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
पिरगळायला असते माझ्या पाशी!
मग या मानाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
नाक आणि ओठ या मधील
ती एक दुवा !
तीला धरुन पिरगळण्याचा
आनंद मी नेहमीच घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती तुझी लांब लांब मिशी!

============

कळशी

दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या कंबरेवरच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
तहान आणि तृप्ती या मधील
ती एक दुवा !
तीच्या सोबत रहाण्याचा
आनंद आपणही घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी नाजुक कळशी!

गुलमोहर: 

Biggrin

मंदार Lol

वर्षे,
इकडची लिंक तिकडे आणि
तिकडचा झब्बू इकडे
असेच सगळे चहूकडे
विखरु देत

उशीची झाली माशी
भिशीला झाली फाशी
आता तरी मला जरा देशी
घेऊ देत Biggrin

वर्षे तुला ही मिशी आहे? ऐतेन Proud
हा माझा झब्बु
दिवसभर साथीला नसताना कोणी
ही राणी असते माझ्या पाशी!
मग या दिवसाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
गाल आणि हाताच्या लढाईत
हात तीचा च हवा !
तीच्या सोबत लडण्याचा
दुख मीच सोसावा !
ती कोण माझी सखी?
घरी रोज करते माझी काशी! (ओळखा पाहु कोण) Proud

वर्षे Lol

दिवसभर बसलेले नसताना कोणी
तीची खुण मात्र असते माझ्या पाशी!
मग या मानाच्या राणीची
साथ सोडु तरी मी कशी !
घर आणि ऑफिस यांच्या मधील
ती एक दुवा !
तिला घेऊन पळवण्याचा
आनंद मी नेहमीच घ्यावा !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी कार मित्सुबिशी! Proud

वर्षे (टवळे) Proud
फाशी सोडून बाकी सगळं बर्‍यापैकी जमलंय...
आता मूळ कविता वाचते.. Lol
(आमचं म्हणजे वराती मागून घोडे :हहगलो:)

Proud

दिवसभर काम करेनात का कोणी
ती मात्र असते सदैव पडीक माबोअंगणी!
मग या टीपी राणी ची
खोडी न काढु तरी मी कशी !
हास्य आणि टीपी यांच्या मधील
ती एक दुवा !
तिची फिरकी मी नेहमीच घ्यावी !
ती कोण माझी सखी
अ ह ती माझी मैत्रिण वर्षी! Lol

Pages