पुणे:अजय जीटीजी- १ नोव्हेंबर २०१०

Submitted by चिनूक्स on 22 October, 2010 - 00:46
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे

मंडळी,

६ तारखेला बरेच मायबोलीकर पुण्यात नसल्याने आपले वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी आयोजित केलेल्या गटगची तारीख बदलावी, असा विचार सुरू आहे.

१ नोव्हेंबर, २०१०, म्हणजे येत्या सोमवारी, संध्याकाळी साडे सहा वाजता आपण भेटू.

स्थळ - मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे.

वेळ - संध्याकाळी साडे सहा

याशिवाय दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, शनिवारी, दुपारी गटग आयोजित करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. ६ तारखेला मुंबईचे मायबोलीकर येऊ शकत नाहीत, त्यांना १३ तारखेला येता येईल.

तरी कृपया आपले मत http://www.maayboli.com/node/20616 इथे कळवावे.

१ तारखेला संध्याकाळी आपण भेटत आहोच, ज्यांना त्या दिवशी शक्य नाही, त्यांनी १३ तारखेची त्यांची उपलब्धता कृपया लवकरात लवकर कळवावी. ६ तारखेलाच जर जास्तीत जास्त लोकांना येणं शक्य असेल तर तसंही कृपया कळवा, म्हणजे निर्णय घेता येईल.

धन्यवाद.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, November 1, 2010 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१ नोव्हेबर रोजी कम्पनीचेच जीटीजी ठरवले गेल्याने मला त्यादिवशी जमणार नाहि, वरील नोन्द रद्द करता येत नाही म्हणून ही पोस्ट! Happy

चिनुक्स, अजय - माझ्या लेकाची स्कुटर स्लिप झल्याने अन तो दवाखान्यात असल्याने मी या गटग ला येउ शकत नाही, आयत्यावेळेस कळवत आहे त्याबद्दल क्षमस्व .

@limbutimbu आणि ज्याना स्वतःची नोंदणी रद्द करायचे असेल त्यांच्यासाठी,

तुम्हाला वर (तुम्ही जिथे नाव नोंदवले तिथे) " तुमच्या नावनोंदणीत बदल करा/रद्द करा" अशी लिंक दिसते आहे का? त्यावर टिचकी मारून तुम्ही नावनोंदणीत बदल करू शकता किंवा रद्द करू शकता.

मास्तर, मी त्या लिन्क वर टिचकी मारुन बघितली होती, आत्ताही बरेचदा मारलि पण काहीच होत नाहीये, फक्त स्क्रिनवर पेज स्टार्ट पॉईण्ट पासुन येते

मला जामच भेटायचं आहे पण आम्ही पड्लो दूर इथे. तुमच्या नावे एक बिर्यानी पॅक करून आणिन.
अजयराव, चिनुक्स हार्दिक शुभेच्छा.

@limbutimbu
तुम्ही नाव दिल्यावर तुम्हाला एक confirmation email आली असेल त्यातही नाव काढून टाकण्याची लिंक आहे त्यावर तुम्हाला टीचकी मारता येते आहे का?
नवीन सुविधा असल्याने काही अडचणी राहून गेल्या असतील त्या काढायचा प्रयत्न करतो आहे.

@Webmaster
येस्सऽऽर, त्या मेल मधे दिलेल्या लिन्क वरुन जमले Happy धन्यवाद
[आणि मला शन्का होती की धाग्याचे नाव बदलले म्हणून अडचण होईल की काय, पण तसेही झाले नाहीये]

मंडळी लक्षात आहे ना?
आज, म्हणजे १ नोव्हेंबर, २०१० रोजी मायबोलीचे 'वेबमास्टर' श्री. अजय गल्लेवाले आपल्याला भेटणार आहेत. सर्वांनी नक्की या. Happy
स्थळ - मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे.
वेळ - संध्याकाळी साडे सहा.

खूप गप्पा, खाणे, हास्यविनोद यांसह काल संध्याकाळी अजय जीटीजी उत्साहात संपन्न झाले. Happy
या जीटीजीला स्वतः वेबमास्टर-अजय, चिनूक्स, जीएस, साजिरा, आशूडी, अरूण, देवा, टण्या, दक्षिणा, कांदापोहे, रा१, बेफिकीर, काशी, अरभाट, हिमस्कूल यांची उपस्थिती लाभली.

आशूडीने लिहिलेला वृत्तांत- http://www.maayboli.com/node/20948

Pages