पुणे:अजय जीटीजी- १ नोव्हेंबर २०१०

Submitted by चिनूक्स on 22 October, 2010 - 00:46
ठिकाण/पत्ता: 
मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे

मंडळी,

६ तारखेला बरेच मायबोलीकर पुण्यात नसल्याने आपले वेबमास्तर श्री. अजय गल्लेवाले यांना भेटण्यासाठी आयोजित केलेल्या गटगची तारीख बदलावी, असा विचार सुरू आहे.

१ नोव्हेंबर, २०१०, म्हणजे येत्या सोमवारी, संध्याकाळी साडे सहा वाजता आपण भेटू.

स्थळ - मल्टिस्पाइस, घरकुल लॉन्सकडे जाणारा रस्ता, हार्वेस्ट क्लबासमोर, पुणे.

वेळ - संध्याकाळी साडे सहा

याशिवाय दिनांक १३ नोव्हेंबर रोजी, शनिवारी, दुपारी गटग आयोजित करता येईल का, याचाही विचार सुरू आहे. ६ तारखेला मुंबईचे मायबोलीकर येऊ शकत नाहीत, त्यांना १३ तारखेला येता येईल.

तरी कृपया आपले मत http://www.maayboli.com/node/20616 इथे कळवावे.

१ तारखेला संध्याकाळी आपण भेटत आहोच, ज्यांना त्या दिवशी शक्य नाही, त्यांनी १३ तारखेची त्यांची उपलब्धता कृपया लवकरात लवकर कळवावी. ६ तारखेलाच जर जास्तीत जास्त लोकांना येणं शक्य असेल तर तसंही कृपया कळवा, म्हणजे निर्णय घेता येईल.

धन्यवाद.

विषय: 
प्रांत/गाव: 
तारीख/वेळ: 
Monday, November 1, 2010 - 09:00 to 12:00
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नी, हरकत नाही म्हणून कामधंदे नाहीत असे नव्हते म्हणायचे मला. कामधंदे आटोपूनही हल्ली लोक हे सर्व सोशल-उत्सव आनंदाने करतात. मल्टी-टास्किंगचा जमाना आहे म्हंटल...

लोकहो, ६ला दिवाळीत बरेच जण गावाला जातात, घरी नातेवाईक, पाहुणे असतात, म्हणून बरेच माबोकर 'जमणार नाही' म्हणाले. शिवाय, ६ला मुंबईतही गटग आहे. वेमांना जास्तीतजास्त माबोकरांना भेटायचे आहे. म्हणून तारीख बदलली आहे. १३ला जमू शकेल अशा सर्वांनी हात वर करा, ईव्हन मुंबईकरांनी, म्हणजे अंदाज येईल लोकांचा.

१३ चे आत्ताच सांगणे जरा अवघड वाटते. वेबमास्तरांना भेटायची इच्छा तर आहेच, पण आत्ताच सांगणे कठीण. अंदाजपंचे हो.

मलाही याय्ची इच्छा आहे पण १३ तारखेला राजमाची मुलांबरोबर ट्रेक असल्याने जमणार नाही.
६ तारखेला मुंबईत दिवाळी गटग आहे.मुंबईत वेबमास्तर येणार आहेत का कधी ?

नी, खूप हौस आहे असे काहीकाही करायची पण मी ना पुण्यात ना मुंबई मग नुस्ता उत्साह असून काही साध्य होत नाही. म्हणून तर तुम्हाला म्हणत आहे एक गटग डिसेम्बर मधे ठेवा म्हणून. छान वाटेल सर्वांना माझ्याशी भेटून Happy

वेळ अतार्किक वाटली तरी वेबमास्तरांना कधी वेळ आहे, ते बघायला हवं. शिवाय २-७ या दिवसांमध्ये अनेक मायबोलीकरांना शक्य नाही.

म्हणून आपण १ तारखेला संध्याकाळी भेटत आहोत. एक तारखेला ज्यांना शक्य नाही ते मायबोलीकर १३ तारखेला वेबमास्तरांना भेटू शकतील.

वर २ तारीख दिसत असली तरी आपलं पहिलं गटग १ तारखेलाच आहे, याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.

वीरा, नक्कीचं वाटेल.. सर्व मला भेटतं आहेत ही कल्पनाचं मला मोहरुन टाकणारी वाटते. प्रेम आहे माझे सर्व मायबोलिकरांवर..

लोकहो,

ज्यांना १ तारखेला शक्य असेल, त्यांनी कृपया आपली उपस्थिती कळवावी.

आशू, चिंचोके, दीपाली,

तुम्ही १ तारखेला येणार की १३ ला? की दोन्ही दिवशी?

काहीतरी गडबड आहे. मी १३ नोव्हेंबरसाठी नाव द्यायला गेले तर ते १ नोव्हेंबरलाच आले. असो.

रैना ताई.. हा बाफ १ नोव्हेंबर साठीच आहे.. १३ साठी नाही. तेव्हा ज्या पामरांना १ तारखेच्या सोमवारी संध्याकाळी ६:३० ला जमणार आहे त्यांनीच इथे नाव नोंदणी करायची आहे... किंवा १३ तारखेला जमणार असेल तर तसे लिहायचे आहे.. जेणे करुन १३ तारखेचा बाफ तयार करता येईल..

वो मेरेकोभी मालूम नही है... कारण बहुतेक तशी सोयच नाहीये अजून..

थोडक्यात तू गटगला आली नाहीस की तुझी पण टांगारु जनतेत गणना होणार Happy

आरती,
वर लिहिल्याप्रमाणे १ तारीख नक्की आहेच. ज्यांना जमणार नाही त्यांच्यासाठी १३ तारीख आहे. किंवा दोन्ही दिवशी तुम्ही येऊ शकता. Happy
फक्त तुम्ही कोणत्या दिवशी येणार ते कृपया सांगा, म्हणजे तशी व्यवस्था करता येईल.

धन्स चिनूक्स Happy
(रच्याकने माझ्या भाच्याचे नाव चैतन्य असून मी त्याला चिनू म्हणते . त्यामुळे तुमचे नाव वाचताना मला नेहमी त्याची आठवण येते Happy )
मी एक तारखेला येईन. अन १३ चे थोडे नंतर सांगितले तर चालेल ? नंतर म्हणजे कधी सांगितले तर चालेल ?

Pages