उत्तर प्रदेश्/बिहार विरुद्ध महाराष्ट्र : पुन्हा एक राजकारण

Submitted by Jhuluuk on 16 February, 2008 - 00:00

मायबोलीकर मित्रहो,
कोणत्याही राजकिय पक्षाशी मी बांधिल नाही किंवा कोणाचेही मी समर्थन करत नाही. सध्या मुंबापुरीत घडत असलेल्या (सोमवारी पुण्यापर्यंत पोचलेल्या) या ज्वलंत विषयावर निकोप चर्चा व्हावी, काही विधायक मार्ग निघावेत ही सदिच्छा!

रविवार आणि सोमवारी घड्लेल्या गोष्टींचा थोडक्यात आढावा हा असा:
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये परप्रांतियांना मारहाण केली. यामध्ये प्रामुख्याने टॅक्सी चालक आणि ठेलेवाले-विक्रेते यांचा समावेश. ठाणे येथील चित्रपटगृहात भोजपुरी चित्रपट चालु असताना जाळपोळ.
समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग, जया बच्चन यांची याबद्दलची व्यक्तव्ये. लालु प्रसाद यांचे मत. या सगळ्यांवर राज ठाकरे यांची प्रत्युतरे.
बच्चनच्या बंगल्यावर कथित बाटली हमला.
स. पा. च्या कार्यकर्त्यांनी कलकत्ता, अलाहबाद, लखनौ येथे केलेला निषेध.

अधिक तपशिल कुठल्याही पेपर किंवा न्युज चॅनेल वर मिळतीलच. महत्त्वाचे वाटणारे संदर्भ जरुर मांडावेत.

प्रश्ण असा राहतो कि, मुंबई कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा? जरी कोणाचे मत मुंबई फक्त मुंबईकरांची असे असले तर हे दर्शवण्याची पद्धत कशी असावी?
या गोष्टींचा राजकिय पार्ट्या कसा फायदा करुन घेतील?
मुंबईमधील जनसामान्यांचे काही कल्याण हे साधु शकतात का?
आणि तुम्हाला असे वाटते का की हे सर्व १९७२ १९७३ सालात घडलेल्या मराठी विरुद्ध साउथ इंडियन सारखेच घडत आहे?

-झुळूक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>त्याचा फक्त निषेध एकदा?<<

तटस्थ लोक असले काही करत नाहीत.
ते फक्त तटस्थ असल्याचे डिस्क्लेमर देतात Proud

हाथरस मध्ये सीबीआय रिपोर्ट मध्ये रेप व मर्डर आले म्हणे

योगीजींनि पुढे काय केले ?

महाराष्ट्र साधू हत्येवर योगीजी रोज फडफडत होते

आता काय ?

--- मोदी आणि योगीच फॅसिस्ट--.>>>>>>>>ते लिजन ऑफ मेरिट का देतात म्हणे ?>>>> The Legion of Merit is given to American troops as well as political leaders of foreign countries. अमेरीकेचे मावळते अध्यक्ष ट्रम्प यानी मोदी, जपानचे शिन्झो आबे व ऑस्ट्रेलियाचे स्कॉट मॉरिसन या तिघाना त्यान्च्या नेत्रुत्वाबद्दल अमेरिकेचे prestigious Legion of Merit मेडल दिले आहे. आपल्या पन्तप्रधानाना हे मेडल मिळाल्याचा अभिमान असावा ही माफक अपेक्षा. धन्यवाद.

{धूळ ज्यांच्या नाकातोंडात गेली आहे त्यांना रोज ठसका येत असतो.}
किती मिलिग्राम धूळ काढली?
सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं सर्जिकल स्ट्राइक करायचा तिथे कार्पेट बॉंबिंग केलं.

..घरात उंदीर झाले ते बाहेर काढायला घराला आग लावली?

ट्रंप ने मोदीला पुरस्कार देणं म्हणजे - "उष्ट्राणांच गृहे लग्नं | गर्दभः मंत्रपाठकः || परस्परे प्रशस्तंती | अहो रुपं अहो ध्वनी : ||" या प्रकारातलं आहे..!!

बाकी सद्द्य स्थितीत उंटाच्या घरी कारकिर्दीचा मर्तिकोत्सव सुरु आहे.. अन गाढवाच्या घरी इज्जतीचे वाभाडे काढणारे आंदोलन...! दोघांच्या खोट्या प्रतिभेला उतरती कळा लागली आहे त्यामुळे दोघांनी एकमेकांना काय काय दिले-घेतले याला काहीच महत्त्व नाही.

>>आपल्या पन्तप्रधानाना हे मेडल मिळाल्याचा अभिमान असावा ही माफक अपेक्षा.<<

भलत्याच अपेक्षा Wink
तेही सर्जिकल स्ट्राईकवेळी इम्रान खानचे गोडवे गाणाऱ्यांकडून Proud

बुडाला आग लागलेले उंदीर सैरावैरा पळत आहेत, दिसेल त्याला चावत आहेत.

कोणाला मोदी आवडोत/ न आवडोत , पण 'छप्पर फाडके भगवान देता है' म्हणजे काय तर मोदी.

ज्या माणसाला गुजरात चा मुमं असताना एक देश व्हिसा नाकारतो, कारण काही विशेष धर्माचे लोक्स आणि पुरोगामी तसा अर्ज करतात.
2014 ला पंप्र झाल्यावर त्याच्याच देशाचे 65.खासदार अमेरिकेला 'याला अमेरिकेत येऊ देऊ नका' असा अर्ज करतात.
हा माणूस रितसर निवडणूक जिंकून आला आहे.
अशामाणसाला हा पुरस्कार मिळाला... अभिनंदन

Proud

ध्वनी देवतेच्या कृपेने नरडे वाजवून तिचेच मंदिर बांधायला विरोध करणे

लगेगी आग तो आएंगे घर कई जद में, यहां पे सिर्फ हमारा मकान थोड़ी है'.>>>>>>>>
ढोंगी गैंग् चा महागृ इकडे आहे होय Happy

इतर भाषिकांबद्दल इतका द्वेष का ?
माझा एक मित्र गुजराती आहे. पण त्याच्या घरी गेल्या कित्येक पिढ्या फक्त मराठी बोलली जाते. तो उत्तम मराठी बोलतो, लिहीतो.
असे खूप जण आहेत. एरव्ही त्या भाषेची आठवण सुद्धा नसते. पण एकदम असं वातावरण झालं की चिंता वाटते. दु:खही वाटतं. शेवटी रूटस तर नाकारता येत नाहीत. ते त्यागून जे लोक स्वतःला इथल्या संस्कृतीशी एकरूप करतात त्यांना कसं वाटत असेल ?

शिवसेना उत्तर प्रदेश पंचायत निवडणुका लढवणार; काँग्रेसकडे मागणार मदतीचा ‘हात’
---

या पेंग्विन्सना महाराष्ट्रात निवडणुका जिंकता येत नाहीत आणि नेहमीप्रमाणे डिपॉझीट जप्त व्हायला इतर ठिकाणी निवडणुका लढवतायत. या पेंग्विनचा बाप आयुष्यभर ज्या कॉंग्रेस विरुद्ध लढला व कॉंग्रेसला उठताबसता शिव्या घातल्या त्याच खांग्रेसकडे आज पेंग्विन मदत मागतोय.

राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि माजी मंत्री श्याम रजक यांनी हा दावा केला आहे. संयुक्त जनता दलाचे १७ आमदार आपल्या संपर्कात आहेत आणि लवकरच राजदमध्ये प्रवेश करण्यास इच्छुक असल्याचा दावा रजक यांनी केला आहे. “जदयूचे आमदार भाजपाच्या कार्यशैलीमुळे नाराज आहे. त्यामुळे बिहारमधील नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएचं सरकार पाय उतार करण्याच्या तयारीत आहेत. भाजपामुळे नाराज असल्यानेच हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास इच्छुक आहेत. पण त्यांना तुर्तास त्यांना थांबण्यात आलं आहे,” असं रजक यांनी म्हटलं आहे.

“जदयूचे हे १७ आमदार राजदमध्ये येण्यास तयार आहेत. त्यांना आताच पक्षात घेतले, तर पक्षांतर बंदी कायद्यानुसार त्यांचं सदस्यत्व रद्द होऊन आमदारकी धोक्यात येऊ शकते. पक्षांतर कायद्याप्रमाणे २५ ते २६ आमदार एकाच वेळी जदयूतून बाहेर पडून राजदमध्ये आले, तर त्यांचं सदस्यत्व कायम राहिल,” असंही रजक म्हणाले. काही दिवसांपूर्वी भाजपाने एनडीएतील घटक पक्ष असलेल्या आणि बिहारमध्ये सत्तेत असलेल्या जदयूचे सहा आमदार फोडले. त्यामुळे जदयूमधून नाराजीचा सूर उमटताना दिसत आहे. नितीश कुमार यांनीही ही नाराजी व्यक्त केली आहे. या घटनेमुळेच १७ आमदार नाराज असल्याचा दावा रजक यांनी केला आहे.

https://www.loksatta.com/desh-videsh-news/17-jdu-mla-wants-topple-bihar-...

Submitted by BLACKCAT on 31 December, 2020 - 12:55

तुम्ही ज्या जाती धर्मात जन्मलात आणि वाढलात त्याला रोज शिव्या घालता.

तुमच्या एन आर सी आणि मंदिरमध्ये तुम्हाला भारत किंवा हिंदू समाजाची चिंता नाही
फक्त व्होट ब्यांक हवी आहे

एकच सापडली केस कारण एका माणसानं तक्रार केली .
NRC केलं की अशा ब-याच सापडतील कोणी तक्रार करायची वाट पहावी लागणार नाही

चिंता कशाला करायची..आजिबात करू नका चिंता

शाळा, कॉलेज , भाडेकरू , व्यवसाय , पासपोर्ट , लग्न , निवडणूक

अशाच माध्यमातून अशा केसेस आपोआप पकडल्या जातील

घुसखोर शोधून पुन्हा पाठवण्याचे प्रमाण काँग्रेस काळातच जास्त आहे , डेटा शोधून पहा

https://www.hindustantimes.com/india-news/upa-deported-over-80-000-bangl...

40 40 वर्ष वाट कशाला पहायची ...
Happy Happy किती कंफ्युजन , एकीकडे म्हणायचं घुसखोरी झाली दुसरीकडे कायदा आणू नका म्हणून रडारड करायची

घुसखोर शोधणे हे कायमचे काम आहे, कारण आपल्या सीमा बंदिस्त होऊ शकत नाहीत , वर व पश्चिमेला डोंगर आहेत , आणि पूर्वेला नद्या आहेत

जसे मच्छर अगरबत्ती लावतो , आठवड्याला धूर सोडतो , अधून मधून शुगर चेक करतो , तसे सततचे काम आहे

कधीतरी गावच पेटवून गाजावाजा करणे हा उपाय नव्हे

Pages