उत्तर प्रदेश्/बिहार विरुद्ध महाराष्ट्र : पुन्हा एक राजकारण

Submitted by Jhuluuk on 16 February, 2008 - 00:00

मायबोलीकर मित्रहो,
कोणत्याही राजकिय पक्षाशी मी बांधिल नाही किंवा कोणाचेही मी समर्थन करत नाही. सध्या मुंबापुरीत घडत असलेल्या (सोमवारी पुण्यापर्यंत पोचलेल्या) या ज्वलंत विषयावर निकोप चर्चा व्हावी, काही विधायक मार्ग निघावेत ही सदिच्छा!

रविवार आणि सोमवारी घड्लेल्या गोष्टींचा थोडक्यात आढावा हा असा:
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये परप्रांतियांना मारहाण केली. यामध्ये प्रामुख्याने टॅक्सी चालक आणि ठेलेवाले-विक्रेते यांचा समावेश. ठाणे येथील चित्रपटगृहात भोजपुरी चित्रपट चालु असताना जाळपोळ.
समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग, जया बच्चन यांची याबद्दलची व्यक्तव्ये. लालु प्रसाद यांचे मत. या सगळ्यांवर राज ठाकरे यांची प्रत्युतरे.
बच्चनच्या बंगल्यावर कथित बाटली हमला.
स. पा. च्या कार्यकर्त्यांनी कलकत्ता, अलाहबाद, लखनौ येथे केलेला निषेध.

अधिक तपशिल कुठल्याही पेपर किंवा न्युज चॅनेल वर मिळतीलच. महत्त्वाचे वाटणारे संदर्भ जरुर मांडावेत.

प्रश्ण असा राहतो कि, मुंबई कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा? जरी कोणाचे मत मुंबई फक्त मुंबईकरांची असे असले तर हे दर्शवण्याची पद्धत कशी असावी?
या गोष्टींचा राजकिय पार्ट्या कसा फायदा करुन घेतील?
मुंबईमधील जनसामान्यांचे काही कल्याण हे साधु शकतात का?
आणि तुम्हाला असे वाटते का की हे सर्व १९७२ १९७३ सालात घडलेल्या मराठी विरुद्ध साउथ इंडियन सारखेच घडत आहे?

-झुळूक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

टोणगा :).

पण ती चौथी ओळ "नाठाळांचे काठी, हाणू माथा" अशी असेल ना? तुकारामांच्या अभंगात तिसर्‍या ओळीचे यमक चौथ्या ओळीच्या मधल्या एखाद्या शब्दाशी जुळते असे (मला नेहमी) वाटते.

ते वचन तुकारामा.न्चेच आहे.... रामदास रामाचे दास होते. तुकाराम विष्णुदास होते....

भले तरी देऊ \ कासेची लंगोटी \
नाठाळाचे माथी \हाणू काठी... \\

असे त्याचे व्याकरण आहे... हा अभ.न्ग आहे... ६/६/६/४ अशी अक्षरे आहेत. दुसर्‍या व तिसर्‍या ओळीचे यमक जुळते.

टोणगा ते कंसातले डोक्यावरुन गेले. बहुतेक नॉर्थ पोलावर. मला उगीच अमिताभच्या माय नेम ईज ची आठवन झाली.

टोणगे महाषयांनी तु का रामा यांच्यावर प्रसिद्ध अशा पुस्तकाचा (मला ते ईशिहारा असावे असे वाटते) संदर्भ दिला आहे, उगाच लोकांना संशयाला जागा नको वचन कोणाचे म्हणुन).

परवा बेस्ट बस मधे धुडगुस घालणार्‍या राज नामक युवकाचा दुर्देवी अंत झाला. घटना वाईटच घडली. पण त्या निमीत्ताने सर्व बिहारचे नाकर्ते नेते मंडळी एकत्रीत पणे या प्रकरणावर (महाराष्ट्र, पोलीस, कायदा व्यवस्था) तोंडसुख घ्यायला मोकळी. फार कमी वेळ असतो अशा नाजुक प्रसंगी निर्णय घेतांना. जर त्याने ४-८ प्रवाश्यांना मारले असते तर? नितिशकुमारांना २४ तासाच्या वेळेनंतर त्याला हातावर मारायला हवे होते असे वाटते. मग फक्त अंगठ्यावरच का नाही मारले हा प्रश्न पण येतो?

ह्या सर्व नाकर्त्या नेत्यांनी स्वतःला प्रश्न विचारावा आपला बिहारी माणुस बाहेरचा रस्ता का धरतो ? त्याच्या या दुर्दशेचे कारण काय?

टोणगा ते कंसातले डोक्यावरुन गेले. बहुतेक नॉर्थ पोलावर. मला उगीच अमिताभच्या माय नेम ईज ची आठवन झाली.


ते आपले उपहासात्मक हो! वर महाराष्ट्रीय लोकानी त्या पद्य ओळीबद्दल जे अज्ञान दाखविले त्यावर आपले गम्मत म्हणून उपरोध. आपल्यापेक्षा परदेशी लोकाना आपल्याबद्दल जास्त माहिती असते म्हणून... काल्पनिक.
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

काही दिवसांन पुर्वी कोणी तरी रेल्वे भरतीतील आकडेवारी बद्दल विचारणा केली होती त्या बद्दल हा लेख कदाचीत अधीक माहीती देउ शकेल!

रेल्वे भरतीतील 'लालूगिरी'
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3670294.cms

हाथरस पुलिस ने गधे की लीद और एसिड का उपयोग कर स्थानीय ब्रांडों के नकली मसाले बनाने वाली एक फैक्ट्री का खुलासा किया है। हाथरस कोतवाली सदर इलाके के नवीपुर में चल रही मिलावटी मसाला बनाने की फैक्ट्री पर ज्वाइंट मजिस्ट्रेट ने एफडीए की टीम के साथ छापा मारा। यहां से भारी मात्रा में नकली मसाला बनाने का सामान भी बरामद किया गया।

https://www.jagran.com/uttar-pradesh/hathras-fake-spice-making-factory-i...

गाढवाची लीद वापरून मसाले बनवून विकणार्या योगी समर्थकास अटक

Proud

मसाल्यात लिदेची भेसळ
मग ह्यांच्या देशभक्तीत किती आणि कशाची भेसळ असेल !!

The Uttar Pradesh government today lost its case in the Supreme Court seeking tough charges against a doctor, Kafeel Khan, under the National Security Act (NSA) for a speech against the amended citizenship law. "Criminal cases will be decided on their own merits. You cannot use a preventive detention order in another case," Chief Justice of India SA Bobde said, confirming an Allahabad High Court order that had freed the doctor.

https://www.ndtv.com/video/news/news/kafeel-khan-case-up-loses-case-in-t...

एका व्यक्ती वरून देशभक्तीची अजुन उदाहरणे देता येऊ शकतात !

कच्ची केळी केमिकल मध्ये बुडवून दुसऱ्या दिवशी हातगाडी वर विकणार्यंची
आणि एकच पंचर झालेली असताना काच काढण्याच्या बहाण्याने tube ला अजुन बोळे पडणाऱ्याची देशभक्ती सर्वोत्तम असते का ?
Happy

हं

केळी केमिकल लावल्याशिवाय कशी पिकवणार ? कच्ची केळी लांब नाशिक , भुसावळ , कोल्हापुरात होतात , ती थोडी कच्चीच तोडावी लागतील
मग दादरच्या मार्कटात चार दिवसांनी येतील तर पिकतील
पिकलेलीच तोडली तर लगदा होईल

बिन केमिकलची पिकलेली केळी , गावातच शक्य आहे , शेल्फ लाईफ 1 दिवस , तितकाच प्रवास म्हणजे फारफार तर तालुका प्लेस

अब्यास वाढवा

पंचर काढत असताना बिडी फुंकायला जाऊ नये , नीट बघावे

त्याच प्रमाणे त्या भेसळ वाल्यांचे मसाले घेऊ नका !
बेडेकर मसाले आहेत की सगळ्यात बेस्ट , कशाला
यूपी वाल्यांच्या भानगडीत पडताय !
ओवेसी चे कार्यकर्ते बांगलादेशी ना खोट्या कागदपत्रांवर आधार कार्ड , pancard बनवून देताना सापडले होते , शोधायला गेलं तर अशा हजारो केस सापडतील मग सगळी कौम देशद्रोही आहे का ?

पंचर काढत असताना बिडी फुंकायला जाऊ नये , नीट बघावे >>>>
आम्ही बिडी फुंकायला ?
मग तुम्ही मिश्री लावायला जात असता का?

ते आदित्य योगिनाथ, सॉरी सॉरी, योगी आदित्यनाथ युपीत फिल्म सिटी काढणार आहेत म्हणे. ह्यांचा भेसळीचा धंदा पाहता त्यातही गरिबांचा शाहरुख, गरिबान्चा अमिताभ अशीच नकली नटमन्डळी घेऊन फिल्म्स बनतील काय?? Happy

>>मसाल्यात लिदेची भेसळ
मग ह्यांच्या देशभक्तीत किती आणि कशाची भेसळ असेल !!

छे छे....हे काय भलतंच. भारतमाताकी जय म्हटलं की खरे देशभक्त. भारतात लोकशाहीची वाट लागलेय म्हटलं की देशद्रोही. नोटाबंदीचा निर्णय धडाडीचा म्हटलं की अस्सल बावनखणी देशभक्त. त्याने अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडलं म्हटलं की देशद्रोही. केंद्र सरकारची वाहवा केली की सर्टिफाईड देशभक्त. सरकारच्या विरोधात बोललं की देशद्रोह होतो म्हणे. कोण रे म्हणतंय की सरकारवर टीका करायचा हक्क घटनेने दिलाय. कुठली घटना? मोदी म्हणाले सूर्य पश्चिमेला उगवतो तर उगवतो तो पश्चिमेला. जे पूर्वेला उगवतो म्हणतात ते देशद्रोही.

ते कोणीतरी आहेत महाराष्ट्र सरकार मधे सामिल काही लिहिलं त्यांच्याबद्दल की त्यांचे लोकं मारतात...
आणि दुसरे अजून एक त्यांच्याबद्दल काही लिहिलं की अटक करतात....
तरीही काहीही म्हणा मोदी आणि योगीच फॅसिस्ट..

गरीबांचा भेसळयुक्त सिनेमाला घाबरायचं कशाला महाराष्ट्राच्या ग्रेट राज्यसरकारनं....नसेल दर्जा तर नाही बघणार लोकं.
आत्ताही ग्रेट बॉलिवूड काय करते तर पंजाबी सिनेमे काढते...त चालूच राहतील.

योगी त्यांच्या मातृभाषेत सिनेमे काढणार म्हणताहेत, महाराष्ट्र सरकारनं (कुठल्याही पार्टीचं असो) मराठी/ मालवणी/ कोकणी/ व-हाडी सिनेमे कसे पुढे येतील ते बघावं.

तो अमिताभ युपीचाच आहे, इतके वर्ष मुंबईत राहून , पैसा कमावून तो आणि त्याचं कुटुंब छटाकभर मराठी सुद्धा बोलत नाही. जिकडे पैसा मिळेल तिकडे जातील लोकं

ते कोणीतरी आहेत महाराष्ट्र सरकार मधे सामिल काही लिहिलं त्यांच्याबद्दल की त्यांचे लोकं मारतात...
आणि दुसरे अजून एक त्यांच्याबद्दल काही लिहिलं की अटक करतात....

या दोन घटनांचे समर्थन इथे कुणी केले आहे काय ?
आता हे यू पी चे लव्ह जिहाद कायद्याचे खूळ देशभर पसरत आहे. यू पी मध्ये लव्ह जिहाद कायद्यात नाहक डांबून ठेवलेल्या मुलीचे मिस्कॅरेज झाले ही बातमी देऊन भाजप समर्थकांना थोडेसे गिल्ट देण्याचा माझा प्रयत्न मात्र सपशेल फसला. त्यांना आनंदच झालेला दिसतो.

नोटाबंदीचा निर्णय धडाडीचा म्हटलं की अस्सल बावनखणी देशभक्त.

बावनकशी म्हणायचंय का तुम्हाला???
बावनखणी शब्द ऐकल्यासारखा वाटला पण अर्थ कळला नाही म्हणून गुगल केलं. तर भलताच अर्थ आहे(मी घाशीराम नाटकात ऐकला असणारे!).

ते कोणीतरी आहेत महाराष्ट्र सरकार मधे सामिल काही लिहिलं त्यांच्याबद्दल की त्यांचे लोकं मारतात...
आणि दुसरे अजून एक त्यांच्याबद्दल काही लिहिलं की अटक करतात....
तरीही काहीही म्हणा मोदी आणि योगीच फॅसिस्ट......>>>>>>>>
तुमचं आपले काही तरीच वेगळं असत !
त्या दोन्ही घटनांचे इथे कोणी समर्थन केलंय का ?
त्या पेक्षा लव जिहाद प्रश्न महत्त्वाचा आहे बरं .....
एका व्यक्ती ने बनविलेल्या बनावट मसाल्या वरून योगी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांची देशभक्ती बद्दल विचारणा करणाऱ्याला येथील सभ्य विद्वान , बघा बर कसे मुक समर्थन देत असतात !
तुम्हाला ते जमतच नाही !

स्वातंत्र्य लढ्यात 'आमची शाखा कुठेही नाही' तरीही आमचे येथे देशभक्ती शिकवली जाईल अन प्रमाणपत्र मिळेल.

ज्यांची वर्तमानात गोची झालेली असती आणि भविष्याचा पत्ता नसतो बहुतांशी असेच लोक जास्त करुन इतिहासात रमताना आढळतात!

कंगना काहीतरी बोलली सेनेने लगेच तिरमीरित तिचा बंगला पाडला
अर्णव बोलला तर त्याला आत टाकले
सेनेला कॉर्नर केले की ते चुका करतात याचाच फायदा घेण्यासाठी योगींकडून खेळलेला डाव असावा.... बॉलीवूड म्हणजे वडापावची गाडी नाही की उचलून नेवून दुसरीकडे लावली हे न कळण्याइतके भाजपावाले खुळे नाहीयेत पण नुसते योगी मुंबईत आले म्हंटल्यावर सगळ्या वाचाळ नेत्यांनी उथळ प्रतिक्रिया त्वरेने दिल्या.... अनुल्लेखाने मारता येण्यासारख्या गोष्टी सेना उगीचच अंगावर घेते आणि त्यांचे इतर दोन सहकारी मात्र मजा बघत बसतात!

गोची तर भुतकाळाने करुन ठेवली आहे लब्बाडांची... श्री-रामाच्या पायावर डोके ठेवावे की परशुरामाच्या पायावर आदळून घ्यावे याचा पेच अजुनही सुटला नाही.. Biggrin

Biggrin

ब्लोअर मारून धूळ साफ केल्यावर घर पडतं का? पडलंच तर ते किती तकलादू असणार याची खात्री पटते.

चलनात बदल केल्यामुळे अर्थव्यवस्था ढासळली हे विधान वाचलं की मला अशा तकलादू घरांचीच आठवण येते.

हे म्हणजे घर ज्या कॉलमवर उभे आहे ते कॉलम बदलले म्हणुन घर कसे पडेल असं बाळबोधपणे विचारण्यासारखंच वाटलं..!

एकेश्वरवादी थोडेच आहोत, नरसिंह , परशुराम, राम कृष्ण , बुद्ध, कलकी ..सगळे विष्णूचे अवतार , सगळे पूजनीय.

इतकंच काय अद्वैत फिलॉसॉफी आहे, स्वतः देवत्ववाला पोहोचण्याची मुभा सुद्धा आहे

हो आणि परदेशात शेतक-यांनी आंदोलन करताना गांधींचा पुतळा असा खराब/ मोडतोड नव्हता करायला पाहिजे.

यूपीतला लव्ह जिहाद कायदा जाउ दे.. तुमच्या मते फॅशिस्ट आहेत ते.

पण पुरोगामी, लोकशाही महाराष्ट्र सरकारातले लोकं मारतात, अटक करतात नुसतं त्यांच्याबद्दल काही लिहिलं तर ...त्याचा फक्त निषेध एकदा? ...

Pages