उत्तर प्रदेश्/बिहार विरुद्ध महाराष्ट्र : पुन्हा एक राजकारण

Submitted by Jhuluuk on 16 February, 2008 - 00:00

मायबोलीकर मित्रहो,
कोणत्याही राजकिय पक्षाशी मी बांधिल नाही किंवा कोणाचेही मी समर्थन करत नाही. सध्या मुंबापुरीत घडत असलेल्या (सोमवारी पुण्यापर्यंत पोचलेल्या) या ज्वलंत विषयावर निकोप चर्चा व्हावी, काही विधायक मार्ग निघावेत ही सदिच्छा!

रविवार आणि सोमवारी घड्लेल्या गोष्टींचा थोडक्यात आढावा हा असा:
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये परप्रांतियांना मारहाण केली. यामध्ये प्रामुख्याने टॅक्सी चालक आणि ठेलेवाले-विक्रेते यांचा समावेश. ठाणे येथील चित्रपटगृहात भोजपुरी चित्रपट चालु असताना जाळपोळ.
समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग, जया बच्चन यांची याबद्दलची व्यक्तव्ये. लालु प्रसाद यांचे मत. या सगळ्यांवर राज ठाकरे यांची प्रत्युतरे.
बच्चनच्या बंगल्यावर कथित बाटली हमला.
स. पा. च्या कार्यकर्त्यांनी कलकत्ता, अलाहबाद, लखनौ येथे केलेला निषेध.

अधिक तपशिल कुठल्याही पेपर किंवा न्युज चॅनेल वर मिळतीलच. महत्त्वाचे वाटणारे संदर्भ जरुर मांडावेत.

प्रश्ण असा राहतो कि, मुंबई कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा? जरी कोणाचे मत मुंबई फक्त मुंबईकरांची असे असले तर हे दर्शवण्याची पद्धत कशी असावी?
या गोष्टींचा राजकिय पार्ट्या कसा फायदा करुन घेतील?
मुंबईमधील जनसामान्यांचे काही कल्याण हे साधु शकतात का?
आणि तुम्हाला असे वाटते का की हे सर्व १९७२ १९७३ सालात घडलेल्या मराठी विरुद्ध साउथ इंडियन सारखेच घडत आहे?

-झुळूक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपल्या राज्यात परत गेलेल्या बिहारींच्या जागा मराठी माणसांनी भरल्यात कां? बिहारी कामगारांविना नाशिक/ पुण्यामधील उद्योगधंदे जबर आर्थिक अडचणित आले होते असे मागे याच बा फ वर कोणी म्हटले होते. आता सध्या परिस्थीती कशी आहे?

आता सध्या परिस्थिती अशी आहे की ते लोक परत आलेत आणि उद्योगधंदे सुरळीत चालू झालेत....
पण पुर्वी जी त्यांची अरेरावी चालायची ती थोडी कमी झालिये... आता ते लोक थोडे बिचकुन असतात.... पुर्वीसारखी झुन्डशाही सोडुन आता ते स्थानिक लोकात थोडे मिसळुन रहायचा प्रयत्न करतायत!
म्हणजे हे मला माझ्या एका उद्योजक मित्राकडुन कळलेले स्टेटस आहे... इतर ठिकाणचे माहित नाही!

आज मी मराठी वर्तमानपत्रात वाचले की राजस्थान सरकारने राज्यातल्या सर्व महाराष्ट्रियांची यादी तयार केली आहे, नि त्यांना धमकी दिली आहे की इथून काही ठराविक वेळात आपले तोंड काळे करा, नाहीतर जबरदस्तीने हाकलून देऊ!
राजला काय वाटले तो एकटाच राडा करू शकतो? सगळेच करतात, नि त्यांना त्यांच्या राज्यातून एकसंघ पाठिंबा मिळतो. महाराष्ट्रात राजला विरोधच जास्त!

Maharashtra1.jpg

अहो झक्की काय वाटेल त्या अफवा पसरवू नका

नाही मी पण वाचले असे.

घ्या मंदार! उगाच वाट्टेल ते लिहायला मी इथे कशाला येऊ, तिकडे एक बा. फ. आहे तिथे जातो मी.
असो. आता राजचे लक्ष चिनी लोकांकडे वळले आहे म्हणे! ते म्हणतील आम्ही चिनी नाही भारतीयच आहोत. आसाम किंवा तिकडच्या देशातून आलो आहोत!!
माझ्या मित्राची सून चिनी आहे. ते जेंव्हा तिला घेऊन दक्षिणेतील एका मंदिरात गेले तेंव्हा तिथल्या पुजार्‍यांनी तिला प्रवेश नाकारला, की ती चिनी आहे. तेंव्हा तिने सांगितले की मी नेपाळी हिंदूच आहे!

ती शिवसेना हिंदुस्थान ही बोगस आहे असे स्पष्टिकरण आले होते त्याची पण लिंक द्या. मला जमत नाही आहे.

ही घ्या सकाळमधील बातमी-

राजस्थानात मराठी माणसाच्या केसालाही धक्का लागणार नाही - शिवसेना

मुंबई, ता. १८ - राजस्थानात जोपर्यंत शिवसेनेचे अस्तित्व आहे, तोपर्यंत येथील एकाही मराठी माणसाच्या केसालाही धक्का लागणार नाही, असे आश्‍वासन शिवसेनेचे राजस्थान संपर्कप्रमुख राजेश रूपावत यांनी दिले.
राजस्थानातून मराठी माणसांची हकालपट्टी करण्याचा दावा करणारी शिवसेना हिंदुस्थान ही संघटना बोगस असून शिवसेनेचा त्यांच्याशी काडीमात्र संबंध नसल्याचेही रूपावत यांनी स्पष्ट केले.

पूर्वी शिवसेनेत असलेल्या, परंतु कालांतराने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी हकालपट्टी केलेल्या काही नतद्रष्ट लोकांनी हा उद्योग केला आहे. त्या संघटनेचे राजस्थानात कुठलेही राजकीय वा सामाजिक अस्तित्व नाही. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी हा खोडसाळपणा केल्याचेही रूपावत यांनी सांगितले.

तरीही शिवसेना हिंदुस्थान या संघटनेने राजस्थानातील मराठी माणसांच्या विरोधात कुठलीही भूमिका घेतली तर शिवसेना त्यांना आपला हिसका निश्‍चित दाखवील, असा इशाराही रूपावत यांनी दिला आहे. शिवसेनेचे राजस्थान राज्यप्रमुख शेखर व्यास यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे.

मग सकाळच्या बातमीदारांनी बातमी देण्यापूर्वी चौकशी का केली नाही? काहीहि कुठेहि ऐकले की लगेच छापून टाकायचे असे करायला सकाळ आता खेडेगावातल्या वर्तमानपत्रासारखा झाला आहे का? त्यात बातमी असते, दोन तोंडाचे वासरू जन्मले, गणपती दूध प्यायला वगैरे!

त्या संघटनेचे राजस्थानात कुठलेही राजकीय वा सामाजिक अस्तित्व नाही. केवळ प्रसिद्धीच्या हव्यासापोटी त्यांनी हा खोडसाळपणा केल्याचेही रूपावत यांनी सांगितले.
--- अगदीच समर्पक/ योग्य विश्लेषण.

मग सकाळच्या बातमीदारांनी बातमी देण्यापूर्वी चौकशी का केली नाही?
अहो बातमी बरोबर आहे पण 'शिवसेना हिंदुस्तान' नावाच्या संघटनेने इशारा दिला आहे ती संघटना आणि बाळासाहेबांची 'शिवसेना' वेगवेगळ्या आहेत हे तुमच्या लक्षात आल नाही याचच आश्चर्य वाटत. आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमुल काँग्रेस या सर्वांमधे 'काँग्रेस' आहे पण हे पक्ष वेगवेगळे आहेत्.घाईगडबडीत वाचल्याने असे होउ शकते. शांततेने वाचा.

आज ती संघटना बोगस निघाली;पण मुद्द मात्र तोच आहे...
उद्या जर कोणी आपल्याला दुसर्या राज्यातुन हकलुन लावले किंवा त्रास दिला तर राज ठाकरे येणार का?

उद्या जर कोणी आपल्याला दुसर्या राज्यातुन हकलुन लावले किंवा त्रास दिला तर राज ठाकरे येणार का?
येणार नाही.कारण राजनी आधीच स्पष्ट केलय की २ कोटी महाराष्ट्राबाहेर रहाणार्‍या मराठीजनांसाठी मनसे काहीही करणार नाही.त्यांच्यापेक्षा महाराष्ट्रातल्या मराठी माणसाच्या हिताची राजला जास्त चिंता आहे.

उद्या जर कोणी आपल्याला दुसर्या राज्यातुन हकलुन लावले किंवा त्रास दिला तर राज ठाकरे येणार का?
--- उद्या जर राज चेन्नै ला आला तर शहरातील किती मराठी लोकं त्यांच्या भाषणाला जातील ? त्याबाजुला काही शक्यता आहे का एखादा आमदार (पण मनसेचा) तामीळनाडू विधानसभेत निवडुन येण्याची? राजला वाटत असावं नाही, मग कशाला त्याने काळजी करायची. महाराष्ट्राबाहेर गेलेले मराठी आणि बाहेरच्या राज्यातुन महाराष्ट्रात आलेले अ-मराठी यांच्या विचार-प्रणालीत फरक आहे.
भाजप-सेना-- हिन्दू; मुलायम-ललवा यादव - मुस्लीम; मायावतींचा बसपा/ सपा - दलित, मुस्लीम; CPI/CPIM - बेकारी/ गरिबी...; काँग्रेस- धर्मनिरपेक्ष (खिचडी) या सर्वांचा मतांवर डोळा आहे. अशी काय भुमिका राजने घेणे अपेक्षीत होते जेणेकरुन त्यांना त्यांचे हवे असलेले स्थान जंतेच्या मनात (!) निर्माण करता येईल? हा सर्व खटाटोप जंतेच्या ह्रदयात कायमचे स्थान मिळावे म्हणुन आहे. पर्यावरणाची निगा, जनतेची विजेची खरी गरज, निवारा असले किचकट विषय घेणे म्हणजे राजकीय आत्महत्या ठरली असती. मग आता बघा बरे हे मराठीचे राज यांनी लावलेले रोपटे किती छान फळले आहे.

पर्यावरणाची निगा, जनतेची विजेची खरी गरज, निवारा हे प्रश्न कुठे ना कुठे तरी या महानगरीत बेकायदेशीररित्या रहाणार्‍या, फुटपाथपासुन, उड्डाणपुलाखालच्या जागा आणि भुयारी मार्ग व्यापणार्‍या, छोट्या टेकड्या, डोंगरांवर अतिक्रमण करणार्‍या झोपड्या बांधणार्‍या, आकडे टाकुन वीज घेणार्‍या, जिथे-तिथे महानगरपालिकेचे नळ तोडुन पाणी पळवणार्‍या आणि इथला रोजगार बळकावुन वर मुळच्या इथल्या सामान्य माणसावर गुरकावणार्‍या मुजोर परप्रांतियांमुळेच आहेत (निदान मुंबईपुरते तरी, बाकीच्या महाराष्ट्राचे नंतर बोलू) असे नाही का वाटत तुम्हाला? (आता त्यात काही मुंबैबाहेरुन पोटापाण्यासाठी मुंबैत गेलेले मराठी लोक पण असतात पण तरीही बहुंशी युपी-बिहारवालेच जास्त दिसतील )

जरा विचार करा ह्या भैया-बिहार्‍यांपैकी किती लोक महापालिकेचा म्हणा किंवा इतर कुठला म्हणा कर देत असतील म्हणजे यांच्यापासुन महापालिकेला उत्पन्न शुन्य आणि यंत्रणेवर ताण किती?

आपण सर्वसामान्य नोकरदार सगळे कर भरणार आणि याचा किती हिस्सा या बेकायदा रहिवाशांना पोसण्यात खर्च होत असेल याचा हिशोब करा.

कोणी म्हणेल (म्हणजे म्हणतातच ) की भारतीय नागरिकांना भारतात कुठेही जाउन रहाण्याचा अधिकार आहे... अहो र्‍हावा ना पण तिथल्या व्यवस्थेला ताण न देता सामान्य नागरिकासारखे र्‍हावा पण तितकी अक्कल या भैय्या-बिहार्‍यांना असती तर त्यांना इकडे यायची गरज कशाला पडली असती?

आज कितीतरी मराठी लोक बंगरुळात आहेत, कितीतरी मराठी लोक वेगवेगळ्या देशात स्थायिक झालेले आहेत आणि आपण आपले मराठीपण/भारतीयत्व तिथे ही जपतो, सणवार साजरे करतो पण त्या नावाखाली शक्तीप्रदर्शने नाही करत. तिथले सर्व कायदे पाळुन सुसंस्कॄतपणे जगतो.

उद्या करुन बघा एखाद्या मेट्रोमध्ये हुल्लडपणा, लगेच तिथले कॉप सरळ करतील तुम्हाला... पण इथे मुंबईत काय चालू आहे.... प्लॅटफॉर्म असो नाहीतर लोकलचा डबा हे भैया-बिहारी सरळसरळ आपल्याला "घाटी" म्हणुन हिणवणार आणि शांतताप्रिय मराठी माणुस (कश्याला यांच्या तोंडी लागा म्हणुन ) हे सगळ ऐकुन घेणार.

का म्हणुन?

मान्य आहे हे सगळे मुद्दे पेटवण्यात राजचा राजकीय स्वार्थ असेल... असु दे ना!... आपल काय जातय.... जर त्या निमित्ताने ही सगळी घाण धुतली जाणार असेल तर कशाला विरोध?
बाकीचे पक्ष तरी असे काय फार विधायक काम करतायत?

आणि हा प्रश्न फक्त मुंबईचा नाहिये... हळुहळु आपल पुणं पण त्याच वाटेला लागलय.

परत एकदा मान्य की सामान्य मराठी माणसापुढे इतर अनेक गंभीर प्रश्न आहेत... पण हा परप्रांतियांचा प्रश्न पण तितकाच गंभीर आहे आणि हा सोडवला तर बाकीचे अनेक प्रश्न सोडवण्यात थोडा का होइना हातभार लागू शकतो.

आणि अजुन एक, ही पोस्ट म्हणजे फक्त माझ्यासारख्या सामान्य मराठी माणसाला आपल्या राज्याबद्दल, आपल्या गावाबद्दल वाटणारी कळकळ आहे... कुणाचाही मुद्दा खोडुन काढायचा किंवा वाद घालायचा हेतू नाही.
Don't take it personally! (सांगितलेल बरं असत नाहीतर परत गैरसमज Happy )

स्वरूप .. अगदी कबुल... पण त्यांना हकलून लावणे हाच उपाय आहे का? जेव्हा हे बाहेरचे लोक येतात अगदी रिकाम्या हताने येतात. थोड्याच अवधीत एक झोपडं उभारतात. तेव्हा कुणी ही लक्ष देत नाही. उलटपक्षी त्यांना सगळ्या सोई पुरवीण्यात येतात.( वीज्,पाणी ई.) कारण काय तर ते मत आपल्या पारड्यात पडावे. आणि मग त्या झोपडपट्ट्यांना कायदेशीर मान्यता द्यायची. पुढे त्यातुनच दहशतवाद्यांना मदत करणारी माणसे निर्माण होतात. बिहारी लोकांपेक्षा बांगलादेशी घुसखोरांचा प्रश्न माझ्या मते जास्त गंभीर आहे. पण त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष का?

स्वरूप अगदी सहमत तुमच्या मुद्याशी....खरच पुणे ही बद्लतय परीस्थीती हाता बाहेर जाण्या आदी पावले उचलली पाहीजेत, अन जे पावले उचलत आहेत त्यांची पावले मजबुत केली पाहीजेत्....
नाहीतर हे सरकार ती पावले उखडुन टाकेल्....तडीपार करत आहेत मनसे कार्यकरत्यांना....मात्र या बाडगुळी व्रुती च्या परप्रांतीया ना हात पण लावत नाहीत्....अजब न्याय आहे....

हे एक पाहा. मराठी बोला व पैसे वाचवा Happy

बेकायदेशीर आहे का? कोणास ठाउक! पण आमच्या रेस्टॉ. मधे मराठी बोललात तर डिस्काउंट मिळेल असे जर कोणी ठरवले तर गैर काय आहे?

अतिशय भंपक मुलाखत.
शिवाय ही मुलाखत मराठीत झाली, असं लिहिलं आहे. पण ते साफ खोटं. शोभा डे यांचं मराठी अजिबात चांगलं नाही. दुसरं म्हणजे, शब्दशः भाषांतर केलं आहे, ते लगेच लक्षात येतं.

उदा. 'मी खात्री आहे' - I am sure या इंग्रजी वाक्याचं भाषांतर. Happy

चिनुक्स्,मुलाखत काल मुंबई मिररला आली होती ,ती बहुतेक राजसैनिकांनी भाषांतरीत करुन मटाला दिली असेल्.म्हणजे राजनी शोभा डे यांना इंग्रजीतुन मुलाखत दिलीय का???शोभा डे यांच मराठी खराब आहे???मग त्या सगळीकडे 'माझी मराठी,माझी मराठी' का उगाळत असतात??
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

मुलाखत भम्पक झाली हे मान्य. पण शोभा डे ना मराठी येत नसेल असे वाटत नाही. त्या महाराष्ट्रीयन आहेत. शोभा राजाध्यक्ष. गौतम राजाध्यक्षांच्या भगिनी. बाकी त्यांचे सर्वच लिखाण फालतू असते ....

---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

टोणगा,
त्यांचं आडनाव राजाध्यक्ष असण्याशी, त्यांच्या मराठीशी संबंध नाही. अतिशय इंग्रजाळलेलं मराठी त्या बोलतात.

चिन्या,
जर मुलाखत मराठीतून झाली असती, तर इतकं वाईट मराठी वाचावं लागलं नसतं. मराठी मुलाखतीचा इंग्रजी अनुवाद करून, परत भिकार मराठी भाषांतर हा प्रकार कोण करेल?
ही मुलाखत वाचली, तर आपोआप मूळ इंग्रजी वाक्यं लक्षात येतात.
असो. मुद्दा तो नाही.

११ कोटींच्या महाराष्ट्रात ९ कोटी मराठी माणसांना गृहित धरलं जातं आणि २ कोटी परप्रांतियांना चोंबाळलं जातं... हा काय प्रकार आहे ? माझ्या आंदोलनानंतर मराठी माणूस छाती बाहेर काढून चालायला लागलाय. त्यामुळे इतरांची ‘ फाटली ’ आहे.. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ‘ मटा डॉट कॉम ’ ला बिनधास्त , बेधडक मुलाखत देताना बोलत होते. आतापर्यंत फक्त टिझर्स आणि ट्रेलर्स पाहिलेत... पुढे बघा आणखी कसे धक्के देतो ते... असा खणखणीत इशाराही त्यांनी भय्यांना दिला.

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3575479.cms

‘ आपल्याकडे एक डीश फेमस आहे... बोनलेस चिकन नावाची... तशीच ‘ स्पाइनलेस पॉलिटिशियन ’ अशी एक नवी डिश सध्या भारतीय राजकारणात तयार झालेय.... त्यांना राजकीय धोरण नाही , समाजाशी काही देणंघेणं नाही... आपले राज्यकर्ते पपेट्स झालेत. म्हणूनच मुंबईतून मराठी माणूस हद्दपार करण्याची योजना त्यांच्या मनात येते... पण माझ्या हातात सत्ता आली तर मी या सगळ्यांना सूतासारखं सरळ करून दाखवेन ’, असा खणखणीत ‘ आवाज ’ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला आहे.
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3575782.cms

"स्पाइनलेस पॉलिटिशियन " Lol

मराठी झिंदाबाद.
त्यामुळे इतरांची ‘ फाटली ’ आहे..

ही 'वयात आलेली' मराठी. की त्याला 'टपोरी' म्हणयचे?

ट्रेलर्स, टीझर्स, बोनेलेस चिकन, स्पाईनलेस पोलिटिशियन्स, डिश.

ही नव्या शब्दांची भर पडून 'समृद्ध' झालेली मराठी!

लवकरच 'कसे काय चाललय्' ला 'हाऊ डू यू डू' हे हि शब्द भाषेत येतील नि ती आणखी 'समृद्ध' होईल. पण कुणि चुकून जरी 'कैसे हो?' म्हंटले तर त्यांची 'फाडून' ठेवीन! भारतीय भाषा मराठीत घुसडतो म्हणजे काय? आम्ही फक्त इंग्रजी बोलू एकवेळ, पण भारतीय भाषा? छे:!

आम्ही 'मराठी'!

त्यांना राजकीय धोरण नाही , समाजाशी काही देणंघेणं नाही...
---- पुर्णतः सहमत.

माझ्या आंदोलनानंतर मराठी माणूस छाती बाहेर काढून चालायला लागलाय. त्यामुळे इतरांची ‘ फाटली ’ आहे..
---- छाती बाहेर काढून चालणे म्हणजे काय? राज साहेबांचे जगभरातल्या मराठींवर प्रेम आहे, की फक्त महाराष्ट्रात रहाणार्‍या मराठींवरच प्रेम आहे? महाराष्ट्रा बाहेर रहाणार्‍यांची (ते पण कोटीच्या घरात आहेत) फाटल्यावर काय होणार? त्यांची राजला पर्वा नसावी, त्यांनी त्यांचे पाहुन घ्यावे, पण मग ते असणारा काम-धंदा सोडून आले तर मनसे त्यांचे उदर-भरण करणार कां? महाराष्ट्रातून बाहेरच्या राज्यात पैसा MO पाठवला जातो (असे मध्यंतरी भाष्य झाले) पण मग बाहेरच्या राज्यांतून महाराष्ट्रात एक दमडीही येत नाही कां? एक चालेले (आलेला पैसा), दुसरे नाही (गेलेला पैसा) चालणार असे कसे काय?

झक्कींनी वर खड्यांसारखे बाजुला काढलेल्या शब्दांचे राजसाहेबांच्या (हे त्यांच्या तोंडी आहे तर?) मराठी भाषेत स्वागतच असेल. अशाच नव-नवीन शब्दांतून भाषेचा विकास होत असावा असा त्यांचा समज असावा...

नुकताच टाटांचा एक फार मोठा प्रकल्प महाराष्ट्राने गमावला (आणि त्यामुळे निर्माण होणार्‍या संधीमुळे किमान १०,००० लोकांचा भावी काळातील रोजगार बुडाला), त्यामुळे इतर अनेक पुरक उद्योगांना पण वाव मिळाला असता हे वेगळे. पुण्यात त्यांचा फार मोठा उद्योग असतांना देखील आपण या बाबतीत हरलो ही नामुष्कीची गोष्ट आहे. आपण कां हरलो ? उद्योगांना पायाभूत सुविधा उपलब्द करण्यावर भर कां दिला जात नाही ? या गोष्टींची चिकीत्सा कधी करणार? मुख्यतः स्पर्धेत उतरण्यालायक सुविधा पुरवण्याची महाराष्ट्राची क्षमता आहे हा विश्वासही आपण उद्योजकांत निर्माण करु शकत नाही?

कदाचित् टाटा चा विचार असेल की स्वस्त बिहारी, भय्ये लोक घ्यावेत. पण महाराष्ट्रात तसे केले तर राज राडा करून आपला धंदा बुडवेल! त्यापेक्षा गुजरात बरे, त्यांना जरा अक्कल आहे!
वास्तविक महाराष्ट्रियनांचीच चूक आहे. कुणि सांगितले त्यांना हिंदीतून बोलायला. ते कायम मराठीत बोलले असते तर झक मारत सगळे मराठी शिकले असते, मराठी संस्कृति शिकले असते. मी १९५० मधे पुण्यात असताना सर्व जण शुद्ध मराठी बोलत. अगदी सरदारजी नि भैय्ये सुद्धा. आता मराठी लोकांनीच मराठी बोलणे बंद केले. कसले राडे न् काय! ज्यांना आपल्या भाषेचा संस्कृतीचा अभिमान नाही त्यांनी कशाला उगाच दुसर्‍यांच्या नावे खडे फोडावे? फालतू राज. त्याला स्वतःला सुद्धा धड मराठी बोलता येत नाही, इंग्रजीची कुबडी घेतल्याशिवाय!

Pages