उत्तर प्रदेश्/बिहार विरुद्ध महाराष्ट्र : पुन्हा एक राजकारण

Submitted by Jhuluuk on 16 February, 2008 - 00:00

मायबोलीकर मित्रहो,
कोणत्याही राजकिय पक्षाशी मी बांधिल नाही किंवा कोणाचेही मी समर्थन करत नाही. सध्या मुंबापुरीत घडत असलेल्या (सोमवारी पुण्यापर्यंत पोचलेल्या) या ज्वलंत विषयावर निकोप चर्चा व्हावी, काही विधायक मार्ग निघावेत ही सदिच्छा!

रविवार आणि सोमवारी घड्लेल्या गोष्टींचा थोडक्यात आढावा हा असा:
मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये परप्रांतियांना मारहाण केली. यामध्ये प्रामुख्याने टॅक्सी चालक आणि ठेलेवाले-विक्रेते यांचा समावेश. ठाणे येथील चित्रपटगृहात भोजपुरी चित्रपट चालु असताना जाळपोळ.
समाजवादी पार्टीचे नेते अमर सिंग, जया बच्चन यांची याबद्दलची व्यक्तव्ये. लालु प्रसाद यांचे मत. या सगळ्यांवर राज ठाकरे यांची प्रत्युतरे.
बच्चनच्या बंगल्यावर कथित बाटली हमला.
स. पा. च्या कार्यकर्त्यांनी कलकत्ता, अलाहबाद, लखनौ येथे केलेला निषेध.

अधिक तपशिल कुठल्याही पेपर किंवा न्युज चॅनेल वर मिळतीलच. महत्त्वाचे वाटणारे संदर्भ जरुर मांडावेत.

प्रश्ण असा राहतो कि, मुंबई कोणाची? हे ठरवण्याचा अधिकार कुणाचा? जरी कोणाचे मत मुंबई फक्त मुंबईकरांची असे असले तर हे दर्शवण्याची पद्धत कशी असावी?
या गोष्टींचा राजकिय पार्ट्या कसा फायदा करुन घेतील?
मुंबईमधील जनसामान्यांचे काही कल्याण हे साधु शकतात का?
आणि तुम्हाला असे वाटते का की हे सर्व १९७२ १९७३ सालात घडलेल्या मराठी विरुद्ध साउथ इंडियन सारखेच घडत आहे?

-झुळूक

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शिवतिर्थावरील काल झालेल्या राज यांच्या भाषणाचा सारांश.

'राज'भाष्य

० महापालिका, नगरपालिका, रेशनिंग आणि आरटीओ ऑफिसर यांना नम्रपणे हात जोडून विनंती करतो, छोट्याशा चिरीमिरीसाठी लाचार होऊ नका. महाराष्ट्राचे भविष्य खराब करू नका ते तुमच्या हातात आहे.
० इथे गुजराती राहतात. पण गुजराती नेते भाषणासाठी येत नाहीत. तामिळी राहतात पण कधी करुणानिधी, जयललिता आल्या नाहीत. मग यांचे नेतेच कशाला इथे येतात?
० यूपी बिहारवाल्या भय्यांना बिचारे भय्या म्हणू नका. तुम्हांला इथे राहायचे असेल तर मराठी संस्कृती जपूनच राहावे लागेल.
० मध्यंतरी झालेल्या आंदोलनात अनेकांना जेलमध्ये जावे लागले, त्याचा मला अभिमान आहे.
० हे सारे कशासाठी तर 'मराठियांचे गोमटे' म्हणजे भले करण्यासाठी चालले आहे.
० मराठी अस्मितेसाठी लढण्यास चळवळीत या.
० मराठी माणसावर अन्याय झाल्याचे दिसल्यास आदेशाची वाट पाहू नका. अन्याय झाल्याचे समजल्यावर तुमचे रक्त उसळले पाहिजे.
० प्रबोधनकार म्हणायचे अन्याय दिसेल तेथे तुमची लाथ बसली पाहिजे. मीपण तेच म्हणतो, मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्यांवरही तुमची लाथ बसली पाहिजे!
जय हिन्द!
जय महाराष्ट्र!

• उत्तर प्रदेश तो झांकी है , महाराष्ट्र अभी बाकी है ', अशा घोषणा देणा-या भैय्यांची औकात काय ? अडीच हजार मैलावरून येऊन इथे दादागिरीची भाषा करायची नाय... राहायला देतो हेच उपकार समजा.. अबू आझमी , तू २० हजार माणसं आणच , जाताना फक्त ४० हजार पाय जातील. तुमची मस्ती अशीच सुरू राहिली तर शिवाच्या महाराष्ट्राला तिसरा डोळा उघडावा लागेल .

• भुसभुशीत जमिनीतच घुशी होतात. त्यामुळे मराठी माणूस ज्या दिवशी दक्षिणेतल्या माणसाइतका कडवट होईल, आपल्या भाषेबद्दल अभिमान बाळगेल, तेव्हाच त्याचं अस्तित्व टिकू शकेल. असेल हरी तर देईल खाटल्यावरी, असा विचार सोडून द्या. तुम्हाला किती वेळा पेटवायचं. १९२२ साली प्रबोधनकारांनी हेच लिहिलं होतं, ६६ साली बाळासाहेबांनी तेच केलं, आत्ताही हे सगळं मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी चाललं आहे. शिवरायांनी मालोजी घोरपडे यांना पत्र लिहून मराठी सैन्यात सामील होण्यास सांगितलं होतं. मराठीयांचे गोमटे घडवायचे आहे.

• राज्यघटना लिहिणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे महाराष्ट्राचे होते. त्यामुळे आम्हाला कुणी राज्यघटना शिकवण्याचा शहाणपणा करू नये. राहायला देतो हेच उपकार समजा. इथे जे काय मतभेद आहेत, ते आमचं आम्ही बघून घेऊ, असंही त्यांनी सुनावलं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी १९५५ साली लिहिलेल्या एका पुस्तकातील उताराच त्यांनी वाचून दाखवला. उत्तर भारताचं वर्चस्व राष्ट्रीय ऐक्याला घातक असल्याचं मत बाबासाहेबांनी त्यावेळी नोंदवलं होतं, मग मी आत्ता काय चुकीचं बोललो ? बाबासाहेबांनी त्यात उत्तरप्रदेशाचे भविष्यात वर्चस्व निर्माण झाले तर प्रक्षोभ उसळल्यावाचून राहणार नाही, असा इशारा दिला होता. हिंदी ही केवळ एका मताच्या फरकाने राष्ट्रभाषा ठरली, असाही दाखला त्यांनी या गंथातून दिला.

• इथे राहायचे असेल तर प्रत्येकाला मराठी शिकावीच लागेल.

• मराठी चित्रपट-नाटक अवश्य पाहा. मराठी साहित्य वाचा.

• टॅक्सीत बसताना मराठीतच बोला. एखादा टॅक्सीवाला मराठी बोलत नसेल, ऐकत नसेल ते मला येऊन सांगा.

• सगळीकडे "भैया हातपाय पसरी' अशी अवस्था होती. त्यामुळे राज ठाकरे काल जे शिवतीर्थावर बोलले ते अगदी "सही रे सही' होते. आता "ए भाऊ डोके नको खाऊ' असे धमकावण्याची वेळ आली आहे. ....

मराठी बाणा आणि मराठी दणका कुणी तरी द्यायलाच हवा होता; तो राज ठाकरे यांनी दिला हे योग्यच झाले... अशा एक नाही तर अनेक प्रतिक्रिया आज उमटल्या.

• ' राज ठाकरे अंगार है, बाकी सब भंगार है...'

या वरील लेखावरील माझी मते वाचा-

**तुम्ही तुमच्या लेखात आंबेडकर्,अत्रे यांचे वारसदार दिवाळखोर निघाले म्हटले आहे.आंबेडकरांचे राहु द्या पण अत्र्यांचे वारसदार म्हणजे आजचे पत्रकार('मर्‍हाटा'काढल्यामुळे अत्र्यांनाही पत्रकार म्हणायला हरकत नसावी) तर नंबर एकचे दिवाळखोर आहेत.एव्हढेच नव्हे तर 'पत्रकार धर्म' विसरुन राजकीय कंपुबाजीत सगळे धन्यता मानत आहेत. राजु परुळेकरही त्यातलेच.'१९९० पासुन बाळासाहेबांनी महाराष्ट्र धर्माला नख लावायला सुरुवात केली' म्हणतात्.मग तुम्ही १८ वर्ष मुग गिळून का बसला होता???राज ठाकर्‍यांनी सेना सोडण्यापुर्वी(सोडल्यानंतरही) तुम्ही अनेकदा सेनाप्रमुखांवर स्तुतीसुमने उधळली होती.तेंव्हा कुठे गेला होता तुमचा 'महाराष्ट्र धर्म'??अत्र्यांनी त्यांच्या वृत्तपत्रातुन सतत मराठीचा मुद्दा धगधगत ठेवला.पण राजु परुळेकर मायावाती,मोदी व इतर अनेकविध विषयांवर आपली मते मांडत होते. अरे मराठीची इतकी वाईट परिस्थिती असताना तुम्हाला ती पुढे आणण्यासाठी आंदोलनाची गरजच का पडते??आंदोलन नव्हते तेंव्हा तुम्ही का लोकांना या विषयावर जागरुक केले नाही???तुमच्याकडे बंदुकिपेक्षाही घातक लेखणी नावाचे अस्त्र होते ते तुम्ही म्यानात ठेवुन 'चिल्लर' गोष्टींवर स्वतःचा स्तंभ भरवत होता.कधी राजकारण तर कधी काय. सगळ नॉन सेंस.मायमराठी भरडली जात असताना तुम्ही स्वतः त्याबद्दल लिहुन जनजागृती केली असती त्याला काही अर्थ होता.**

पुर्ण लेख वाचा-
http://gandharvablog.blogspot.com/

अथवा माझे 'रंगिबेरंगी' पान.

राजु परुळेकर हे मनसे च्या जन्मा पुर्वी दैनिक सामना मध्ये स्तंभ चालवायचे. आज ज्या पद्धतीने त्यांनी राजची तळी उचलुन धरली आहे ती पाहता त्यात त्यांचा नक्कीच स्वार्थ असण्याची शक्यता आहे.

बरोबर आहे सतिशजी.
राजकीय नेते आपल्या स्वतःच्या मुद्द्यावर फारकत घेतात हे फारच कॉमन आहे पण पत्रकारही तसे करतात आणि वर आपण निष्पक्ष्,वैचारीक आहोत असे दाखवतात याचे आश्चर्य वाटते

कदाचित कालानुसार त्यांच्या विचारात बद्ल झाला असेल....

पण खरच काही प्रमाणात तथ्य आहे त्यांच्या आत्ताच्या या लिखाणात्....

(भविष्यातील सांगु शकत नाही!)

किमान सध्या मराठी अस्मितेचा मुद्या ला पाठिंबा तरी आहे.....इतर हिंदी, काही मराठी पत्रकार आणि मिडिया सारखे दिल्ली ची मुजोरी तरी करत नाहीत ना ?

इथे आपल्या घरातच मतभेद आणि भांडणे त्यातुन प्रतेकाची पाय खेचा खेची... मग आपण सगळे एक होउन मराठी कशी वाचवणार! आज विसु छ्ट पुजा करतील मग थोड्या दिवसांनी बिहारी शाळा पण चालु करतील....

ते बघा भयै कसे एकजुट आहेत म्हणुनच त्यांचे नेते इथे मरायला येतात्.... असेच भयांचे प्रमाण वाढले तर भविष्यात ते त्यांचे नेतेच इथुन निवडुन देतील.... मग बसावे लागेल बिहारी भजने म्हणत महाराष्ट्रातील देवळात.

चिन्मय !
योग्य शब्दात तुम्ही मांडणी केली आहे सगळ्या मुद्द्यांची.
हल्ली शिवसेनाद्वेषाची काविळ सरसकट सगळ्यांनाच झाली आहे असे एकंदरीत लक्षात येते.
राजु परुळेकर यांचे लिखाण मला कायम आवडत आले.पण अचानक त्यांनी अश्या प्रकारे कोलांटिउडी मारण्याचे प्रयोजन काय ?हे कळत नाही.
सेनाप्रमुखांवर ताशेरे ओढणार्‍यांच्या पंक्तित त्यांनी स्वतला सामिल करुन घेतल्याचे बघुन खरच वाईट वाटले.
राज ठाकरे यांनी मराठीच्या संदर्भात जे आंदोलन सध्या छेडले आहे त्याचे समर्थन करण्याच्या नादात सेनेवर आगपाखड करण्याचे काय कारण हे समजत नाही?आपल्या निष्ठांचे प्रदर्शन मांडण्याचा तर हा प्रयत्न नसावा?पण तशी गरज राजु परुळेकरांसारख्या प्रथितयश लेखकास व विचारवंतास का पडावी?आपण जो "राजकीय कंपुबा़जी "हा शब्दप्रयोग वापरलात तो अतिशय यथार्थ आहे.
सेनाप्रमुखांनी हिंदुत्वाचा पुरस्कार करताना "हिंदुत्व हेच राष्टियत्व" हा नारा दिला.परुळेकरांनी त्या हिंदुत्वावर देखिल आक्षेप घेतला आहे याचा अर्थ पर्यायाने परुळेकरांना सावरकरांचे हिंदुत्व देखिल मान्य नाही असाच होतो.
महाराष्ट्राचे दुर्दैव असे की सध्याच्या वृत्तपत्रांमधे व प्रसारमाध्यमांमधे मराठी आणि महाराष्ट्राचे हित यासंदर्भात आवाज उठवणारे कुणी नाही. आणि जे एक सामना हे वृत्तपत्र आहे त्याला देखिल सेनेचे मुखपत्र म्हणून हिणवले जाते.
या क्षणी मी बाळासाहेबांनी सामना मधे लिहिलेल्या विवादित व प्रसिद्ध लेखांचे संकलन असलेले व संजय राऊत यांच्या द्वारे संकलित केलेले "ठाकरी "हे पुस्तक वाचत आहे.मुंबई बाँबस्फोटांनंतर बाळासाहेबांनी लिहिलेले लेख वाचुन ते किती अंतकरणापासुन लिहिले असावेत याची प्रचिती येते. मुंबईत झालेल्या दंगलींमधे हिंदु केवळ आणि केवळ सेनेमुळे आणि बाळासाहेबांमुळेच वाचले हे सत्य कुणि कितिहि नाकारले तरी बदलु शकत नाहि.मी स्वत १९८५च्या भिवंडि दंगलीचा अनुभव घेतला आहे. या अखंड भारतात जर कुणी मर्द नेता असेल तर तो फक्त आणि फक्त बाळासाहेबच आहेत .
राजु परुळेकरांनी आजपर्यत सेनेची कास धरली होती आता बहुदा ते मनसेचे समर्थक आहेत्.पण आजपर्यंत राजने देखिल सेनेच्या धोरणांवर टिका केली असेल पण बाळासाहेबांबद्दल अनुद्गार काढले नाहीत्.राज व बाळासाहेब यांचे नाते अगम्य आहे.त्यात कुठल्याही प्रकारे विष कालवण्याचा प्रयत्न स्वतला पत्रकार म्हणवणार्‍यांनी करु नये इतकीच नम्र विंनती. पुन्हा या सेना मनसे यांचे मनोमिलन व्हावे ही तमाम मराठी बांधवांची प्रामाणिक इच्छा आहे.
जय हिंद !
जय महाराष्ट्र!

धन्यवाद जय महाराष्ट्र.

त्रिश्,तुम्ही माझे रंगिबेरंगी पान वाचा. त्यात लिहिलेल्या लेखात सर्व मुद्दे लिहिलेले आहेत(बहुतेक जय महाराष्ट्र सोडल्यास मायबोलीवर तो कोणीच वाचलेला नाहीये). ३ महिन्यापुर्वी बाळासाहेबांनी सहिष्णुता नेहरुंकडून शिकायला हवी होती म्हणनारे राजु परुळेकर आता नेहरूंवर तुटुन पडत आहेत आणि राज ठाकरेंनी मांडलेल्या असहिष्णु भुमिकेला पाठींबा करत आहेत. ३ महिन्यात इतका वैचारीक फरक कसा होईल्???४ महिन्यापुर्वी बाळासाहेबांनी मुंबईतील बिल्डर्सना 'नविन बांधल्या जाणार्‍या टॉवर्समधे ५०% जागा मराठी माणसाला द्याव्यात' असा दम भरला होता तेंव्हा राजु परुळेकरांनी त्याला विरोध केला होता!!!

इथे मुद्दा राज ठाकरेंचे आंदोलन बरोबर का चुक हा नाहीये.

चिन्मय तुमचे मुद्दे वाचले.... काही सहमत काही असहमत. पण तुमच्या अभ्यासाला मानले मनाला विचार करायला लावणारे लिखाण!
खरे म्हणजे सध्याची गरज कुणाला समजत नाही आहे जो तो भाडंतो आहे स्वताचे मतदार मिळवण्या साठी......मराठी च्या मुद्द्या वर खरे म्हणजे सर्व पक्षांनी, पत्रकारांनी, मराठी जनतेने एकत्र येउन विचार करायला हवा. बिहारी भयै आणि त्यांचे नेते यांची मुबंइतील दादागिरी आणि अतीक्रमणे, घुसखोरी कठोर पणे थांबवायला हवीत. भविष्यात ती घातक आहेत!

md1_0.jpgmd3_0.jpgmd2.jpg

चिन्या, स्वतःच्या धर्मा साठी आवाज उठावणार्‍यांना तुम्ही असहिष्णु (Narrow-minded about cherished opinions) कसे म्हणु शकता ? म्हणजे तुमच्या मते आपण गांधीगिरीने आपल्या धर्मावरील आणि प्रदेषावरील अतीक्रमणे सहन करायाची का !!! मन मोकळी ठेउन स्वताचे घरदार लुटू द्यायचे...का?

तुशार्, तुम्हाला कुठले मुद्दे पटले नाहित ते सांगा मी अजुन समजावु शकतो

त्रिश्,सहिष्णुतेबद्दल तुम्ही राजु परुळेकरांचा मुळ लेख वाचलेला नसल्याने तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते समजले नसावे. राजुनी ३ महीन्यापुर्वी एका लेखात नेहरुंचा उदो-उदो केला होता(आताच्या लेखात त्याच नेहरुंना ते शिव्याशाप देतात). आणि बाळासाहेबांनी महाराष्ट्रात असहिष्णुता आणली म्हणुन बाळासाहेबांना सहिष्णुतेचे धडे दिले होते. म्हणजे बाळासाहेबांनी गांधीगिरी करावी असे थोडक्यात राजु परुळेकरांनी लिहिले होते. माझ म्हणन हे आहे की बाळासाहेबांना असहिष्णु म्हणानारे राजु परुळेकर राज ठाकरेंना का विरोध करत नाहीत???हे असे डबल स्टँडर्ड्स का???

ज्या कोणी हा हिंदि न्युज चानल वर बंदी घाला हा मजकुर लिहिला त्या मराठी च्या पुरस्कर्त्यांना "वृत्तवाहिन्या" हा मराठी शब्द आठवला नसेल?????????

का आठवायचा प्रयत्न केलाच नाही?

हिंदी नको म्हणून ईंग्रजी चालेल हे काय नवीन????????

अभिजीत,मराठी प्रेमापेक्षा भैय्या द्वेश जास्त आहे त्यामुळे हे होणारच

पुणे, ता. २५ -
'मराठी माणसा कडवट हो!'- राज

" या या , आमच्या घरात या ! आम्ही जातो बाहेर... हा आमचा हॉल , हे बेडरूम आणि हे किचन... राहा इथे आनंदानं.... महाराष्ट्राचं हे औदार्यच आपल्या अंगाशी येतंय... २० लाख उत्तर प्रदेशी आणि बिहारी भय्ये राज्यात आलेत. हिंदी बोलून ते आपल्यावर दादागिरी करताहेत... अशावेळी आपली भाषा , आपली माणसं याबाबत मराठी माणसानंही कडवट व्हायला हवं ",

आपण निवडून दिलेले लोक पिचलेल्या कण्याचे
पिचलेल्या पाठीच्या माणसांना आपण निवडून देतो आणि दिल्लीत जाऊन ते अभिमान , स्वाभिमान सगळं विसरतात... बाकीच्या राज्यातील नेते भाषेबद्दल , माणसांबद्दल कडवट असतात , खुर्चीचाही विचार करत नाहीत. म्हणूनच ते टिकून आहेत... महाराष्ट्र टिकवायचा असेल तर आपल्यालाही कडवट व्हावं लागेल . देश एकसंध राहावा , असं आम्हालाही वाटतं , पण तुम्हीच आमचा विश्वासघात करता...

लायब्ररीतून पुस्तकं गायब
भाषावार प्रांतरचनेसंबंधी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मांडलेले विचार दलित बांधवांपर्यंत पोहोचू नयेत आणि आपली राजकीय पोळी भाजली जावी , म्हणून ते पुस्तकच लायब्ररीतून गायब करण्यात आलं , असा आरोप राज यांनी केला. प्रकाश आंबेडकर यांच्या वडिलांनीच त्या पुस्तकाचं प्रकाशन केलं होतं आणि आता प्रकाशराव त्यातलं भाषांतर चुकीचं असल्याचं सांगतायत. मी हवा तेवढा संदर्भ घेतल्याचं म्हणतायत. मग काय पूर्ण पुस्तक वाचून दाखवायचं का सभेत ?, अशी खिल्लीही त्यांनी उडवली.


राज ठाकरे यांना कोणी मानत नाही, असे प्रफुल्ल पटेल म्हणतात.
दिल्लीच्या पार्ट्यांमधून वेळ मिळाला, तर ते मतदारसंघात येतात. मतदारसंघात फिरल्यावर त्यांना वस्तुस्थिती समजेल. पटेल महाराष्ट्रात फिरलेच नाहीत , तर त्यांना राज ठाकरेबद्दल कसं कळणार ?, असा खोचक सवाल त्यांनी केला...

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील विद्यार्थ्यांचा पुणे व पिंपरी- चिंचवडमध्ये हैदोस चालू देणार नाही. अन्यथा त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले जाईल. येथील शिक्षणसंस्थासुद्धा मराठी विद्यार्थ्यांना बाजूला ठेवून परप्रांतीयांना प्रवेश कसे देतात,
तेच आता बघू,''

मराठी तरुण संघटना बांधतो, काम करत नाही, दांड्या मारतो, असे चित्र निर्माण करण्यात येते. हा कलंक पुसण्याची जबाबदारी मराठी तरुणांचीच आहे, असे आवाहन त्यांनी केले. मराठी भाषा टिकली पाहिजे, ही आपली जबाबदारी
आहे. यापुढे जेथे जाल, तेथे मराठीतूनच बोला. मीसुद्धा कोणत्याही वाहिनीवर फक्त मराठीतच बोलणार आहे, असे त्यांनी जाहीर केले.


आम्ही सभेसाठी परवानगी मागितली तर मिळत नाही. पण नोव्हेंबरमधल्या छटपूजेसाठी लालूनं आत्तापासून बुकिंग केलंय...
त्याला मुख्यमंत्र्यांनीही लगेच परवानगी दिली... मीही सहभागी होईन म्हणे ! ... अरे , छटपूजा बिहारी करतात , मग विलासराव तिकडे काय करणार ? आणि हा लालू , मी येतोय म्हणे ! अरे येच तू... विमानतळाच्या बाहेर कसा येतो , तेच बघतो मी ! केंद्रीय मंत्री झाले म्हणजे काय आभाळातून पडले का ? उगाच वेडीवाकडी आव्हानं द्यायचा प्रयत्न करू नका , असा ठाकरी इशारा राज यांनी दिला आणि श्रोत्यांची मनं जिंकली. विलासरावांबद्दल मी चांगलं बोललो होतो , ते उगाच वाकड्यात शिरले.. राज ठाकरेची ताकद किती म्हणे ! ... विलासराव तुम्ही पोलिस बाजूला ठेवा आणि आपण आमने-सामने ताकद अजमावूनच बघू

रामदास कदम यांची टीका

- म. टा. वृत्तसेवा, कोल्हापूर

राज्य सरकारचा कारभार मराठीतूनच चालला पाहिजे असा कायदा होऊन तो दोनदा गॅझेटमध्ये नोंदविला गेला. तरीही त्याची अद्याप अंमलबजावणी होऊ शकली नाही, याबद्दल विरोधी पक्षनेते रामदास कदम यांनी शुक्रवारी राज्य सरकारवर टीका केली. महाराष्ट्रातील मराठीचे भवितव्य या विषयावर ते बोलत होते.

कर्नाटकात कन्नड, केरळात मल्याळी बोलली आणि वापरली जाते. तर महाराष्ट्रात मराठीच्याच बाबतीत असे का घडावे, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. या उदासीनतेला काँग्रेस सरकारच जबाबदार आहे...

केरळात तामिळ बोलली आणि वापरली जाते.--------------अहो मल्याळी म्हणा.

चु.भु. दया. घ्या. मटा वरुन तसेच इथे छापले... अत्ता सुधारले आहे. धन्यावाद मंदार.

अहो पण हे सगळे करायचे म्हणता, पण मराठीतूनच बोलणे फारच डिफिकल्ट आहे हो. बरेचसे वर्ड इंग्लिश मधेच कन्व्हिनिअंट पडतात बोलायला. शिवाय इतरांना अंडरस्टँड तर व्हायला पाहिजे ना?

आपण असे संकुचित मनाचे नाही हो. अतिथीदेवो व्हा असे आम्ही आमच्या डॅडींच्या डॅडींकडून शिकलो.
नि ऑल ऑफ ईंडीया एकच नाही का? वि आर ऑल इंडियन्स, नो?
नि आता ग्लोबल इकॉनॉमी मधे इंग्लिश इज अ मस्ट नो?

शिवाय बॉलिवूडमधून एव्हढा पैसा मिळतो तो मिळणे बंद होईल ना! अभिताभ, एसारके, अमिरखान मराठी डायलॉग कसे म्हणतील? नि हिंदी सिनेमा? शिवाय मराठी चॅनेलवरचे शोज एव्हढे इंटरेस्टिंग नसतात, रॉक ऑन ला मराठीत काय म्हणणार, नि चक दे ला?
छ्या:, उगीच काहीतरी बोलते पब्लिक!

खरतर या प्रश्णावर उगाच चर्चा आणि वादविवाद करत बसण्यापेक्षा एकनएक मराठी माणसाने निक्षुन सांगितले पाहिजे कि मराठी माणसाच्या बाजुने उभा राहिल त्याच पक्षाला मत देइन..... मग विलासरावच काय कुठलाच पक्ष युपी-बिहार्‍यांच्या बाजुने बोलायला धजावणार नाही!.... कारण या लोकांना फक्त मतांचीच भाषा कळते.
बस एक निवडणुक झाडुन सगळ्या मराठी लोकांनी मराठीच्या मुद्द्यावर मतदान केले पाहिजे.... सगळे नेते ताळ्यावर येतील... जो (मराठी) मुख्यमंत्री केवळ मतांसाठी छटपुजेचे समर्थन करतो त्याला इतकी सारी मराठी मत गमावण परवडणार नाही...... गरज फक्त आहे ती सारे भेदाभेद विसरुन एकत्र येण्याची आणि आपले अस्तित्व दाखवुन देण्याची....

कुठल्याही एका(च) झेंड्याखाली एकत्र व्हा .... आणि आपल्या महाराष्ट्राला वाचवा!

|| हरि ओम ||
झकि तुअम्चेह खरय " कुळकर्न्यान्चे कार्टे के जी मधे गेल्याचे त्यान्चे डैड मला बोलतात तेव्हा हे फैड मला मैड करते असे मी कुठेतरि वाचलय.

पन खरे सान्गु मी झाडुन सर्व साउथ वाल्या बरोबर बोलले आहे त्या ना हिन्दि येत नाहि. का तर त्यना ति शालेत शिकवलि जात नाहि. का तर त्याना ति मान्य नाहि कारन ति भारतिय भाशा नाहि. जबरदस्तिने हिन्दि हि राश्त्रभाशा केलि गेलि. असो

पन या सर्वना आपल्या मात्रुभाशेत बोलल्याने काहिच त्रास झाला नाहि मग माराठि माणुस का कचरतो ? भाशा टिकवणे आणि वाधवणे आप्ल्या माराठी लेकरान्च्या हातिच आहे. मराठितुन बोलने कठिन नाहि. कारन जन्माला आलात तेव्हा मम्मि न म्हनता आइ असेच मम्हटले होते. आथवते का ? एन्ग्रजि शिकावी लागते. पन मायमराठि येतेच . कठिन काहि नाहिये फक्त स्वदेश स्वाभिमान आनि स्व राश्ट्राभिमान अन्गि बाणवा सर्व सोपे वाटु लागेल. एन्ग्रजि ज्ञान) भाशा असल्याने शिकाच पन मराठिचि हेळ्सान्ड का? एन्ग्रजि वाघिणिचे दुध प्यायलात आता जरा मराठि मातेचे ( भाशेचे ) दुध प्या आनि त्या दुधाचे कर्झ अदा करा.

माझी सर्व मराठि जनाना हिच विनन्ति ओफिस, कोलेज, अशा ठिकानि ठिक आहे पन घरी, मित्रमैत्रिनिन्मधे तरि मराठि ला मान द्या. कोणि आपल्या मरठि ला हिन लेखु लागले तर ऐकुन न घेता बाणेदारपणे उत्तर द्या. जसे सावरकरानि दिले होते. बाशा टिकलि तर तुम्हि आम्हि टिकु.

आदित्य हे नाव एन्ग्रजि मधे पन अदित्य च लिहता ना? का बदलले जाते? नाहि ना? म्हनजेच कठिन काहि नाहि? केल्याने होत आहे रे आधि केलेचि पाहिजे. मी ते केले मह्नुन मला बोलन्याचा नैतिक अधिकार आहे असे मला वाटते. क्रुपया याला गर्व म्हणु नये.

आदित्य हे नाव एन्ग्रजि मधे पन अदित्य च लिहता ना? का बदलले जाते

अर्थातच. नावे बदलली जातातच! विक्रमचे व्हिकी, सुधीरचे सिड, प्रतिभा चे पॅट!
मराठी लोकच मराठी धड बोलत नाहीत. इंग्रजी शिकायचे म्हणजे मराठी शिकायचे नाही असे कुठे आहे? एकच भाषा शिकता येते असे आहे का? माणसाचे टाळके आहे का किडा मुंगीचे?
माझ्या मते आमच्या पिढीत (१९५० ते १९७०) इंग्रजी बोलण्याचे प्रमाण फार जास्त होते. आपण इंग्रजी बोलतो म्हणजे आपण कुणि शिकलेले,सुसंस्कृत, उच्च वर्गातले आहोत, असा समज होता. अर्थात् आम्ही मराठीत इंग्रजी अशी भेळ मिसळ क्वचितच करत असू. सगळेच इंग्रजी नाहीतर सगळेच मराठी! शिवाय आम्ही शाळेत, महाविद्यालयात भरपूर मराठी शिकलो. आजकालच्या लोकांसारखे 'पावणे सात म्हणजे काय?' 'Oh, 6:45!' अशी अवस्था नव्हती, नि नाही.
परवा मराठी सारेगमप वर ती संचालिका म्हणाली 'Decision करणे इतके difficult आहे'! का ग बये? तुला निर्णय नि कठिण हे साधे शब्दसुद्धा माहित नाहीत का? नशीब गाणी तरी मराठीच म्हणतात, नाहीतर काही बालके आपली 'ट्विंक्कल ट्विंक्कल लिट्टिल श्टार' म्हणायला लागतील, किंवा हिंदी सिनेमातल्या सारखे मराठी गाण्यात सुद्धा 'will u come, will u come and give sugar kiss?' असे गाणे करतील!

वास्तविक आता सर्व जगात सगळेजण हिंडून आले आहेत. विशेषतः अमेरिकेत येऊन गेल्यावर तरी लक्षात यायला पाहिजे होते की गोरा रंग नि इंग्रजी भाषा म्हणजे बहुधा महामूर्ख माणूस! तेंव्हा इंग्रजी बोलायचे तर केवळ दुसरा उपाय नाही म्हणून, असे व्हायला पाहिजे!

मला अगदी फार इच्छा होते आहे की सान होजेच्या मराठी साहित्य संमेलनात जाऊन बघावे यातले किती मराठी लेखक, कवि इंग्रजीची कुबडी घेऊन चालतात! खरे तर या लोकांना मराठी भाषेचे प्रेम असेल तर आजकाल जे इंग्रजी शब्द मराठीत वारंवार वापरल्या जातात, त्यांना सार्थ मराठी प्रतिशब्द शोधून ते शब्द साहित्यात, रोजच्या बोलण्यात वापरून सर्वांपर्यंत पोचवावेत!

जाउ द्या हो झक्की काका.. नाहीतरी उणीपुरी साडे तीन वर्ष शिल्लक राहिली आहेत.. २०१२ सालाच्या अंताला (म्हणजे बरोबर ३१ डिसे. २०१२ रात्री ११:५९:५९) सगळं नष्टच होणार आहे.. ते उट्युबवर नाही का बघितलं तुम्ही काळाची तरंगलहर २०१२ मध्ये आकुंचित होवून शेवटी शून्यावर येउन धडकेल.. कसलं मराठी मराठी घेवून बसलाय... Lol

शेवटी काय, अहो, आमच्या उपनिषदांमध्ये केव्हड्या हजार वर्षांपूर्वीच सांगितले होते की शून्यात शून्य मिसळा नाहितर शून्यातून शून्य वगळा, शेवटी शून्यच उरते Happy
(झक्की, एक विनंती आहे.. तुम्हाला तो श्लोक नक्कीच आठवत असेल.. इथे टाकणार काय.. मला काही केल्या आठवत नाहिये.. बहुतेक मुंडकोपनिषदात आहे.. )

  • मला अगदी फार इच्छा होते आहे की सान होजेच्या मराठी साहित्य संमेलनात जाऊन बघावे यातले किती मराठी लेखक, कवि इंग्रजीची कुबडी घेऊन चालतात!
  • ---- मराठी प्रथम विश्व संमेलनाचा काही भाग इंग्रजी भाषेत सादर केला जाणार आहे कारण काही अमेरिकन (आता मराठी की अ-मराठी हे समजायला मार्ग नाही) साहित्तिक आमंत्रित असतील असे एक सल्लागार समितीचे एक सदस्य म्हणतात.
  • http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/articleshow/3311839.cms
  • वर झक्कीं, भुमिका यांच्या पोस्टला अनुमोदन. वर्तमान पत्र वाचतांना देखील आता मराठी शब्द गळायला लागली आहेत. अतिरेकी पणा नका करु पण सहजगत्या जे शब्द उपलब्द आहेत, वापरात आहेत त्यांना तर मारु नका.
  • जाउ द्या हो झक्की काका.. नाहीतरी उणीपुरी साडे तीन वर्ष शिल्लक राहिली आहेत.. २०१२ सालाच्या अंताला (म्हणजे बरोबर ३१ डिसे. २०१२ रात्री ११:५९:५९) सगळं नष्टच होणार आहे..
  • --- असे काहीही होणार नाही. मी हे जग बुडु देणार नाही, फक्त तुम्ही माझ्यावर (सांगण्यावर) विश्वास ठेवा. जग बुडालेच तर मी पुन्हा कधिही मायबोलीवर येणार नाही, आपला आजच्या तारखेला हा शब्द आहे. Lol
  • || हरि ओम ||
    Happy

    वा वा मजा येतेय वाचायला. २०१२ सालाच्या अंताला (म्हणजे बरोबर ३१ डिसे. २०१२ रात्री ११:५९:५९) सगळं नष्टच होणार आहे.. असे मी म्हणत नाहिये. काहि ग्रुहितके तेरेन्स मकेन ने मान्डली आहेत त्यावर विचार मन्थन सुरु केलेय इतकच. आपण सर्व हे शक्य नाहि, ह्या: असे काहि बाहि होत नाहि असे म्हणत राहतो. पण काहि जणे आपले आक्खे आयुश्य त्यावर सन्शोधन करुन एखदे ग्रुहितक मान्डतात त्याला नाहि हे शक्य नाहि अस्से म्हणताना आप्ले काय ग्रुहितक आहे हे हि कळाले तर बरे म्हणुन २०१२ साल चे बी बी सुरु केला ना.

    असो तर नुकतिच बातमि वाचलि कि बजरन्ग दल ची ५००० मराठी युवक जम्मु काश्मिर मधे अतिरेक्याना त्यन्च्याच भाशेत धडा शिकवायाला निघालि आहेत. माझी त्यना विनम्र अभिवादन. आजचा काळ अहिन्सेचा नसुन " एकाने दगड मारला तर त्याला विटेने बदडुन काढुन देशाचे रक्षन करन्याचा आहे."

    मला वाटते उत्तर प्रदेश च्या नेत्यानि नेहमिच महाराष्त्रावर अन्याय केलाय. कारण महात्मा गान्धी ला मारणारा माथेफिरु मराठि होता त्यामुळेच कौग्रेजि नेत्यानी मराठि मन्ड्लीना कायम उपेक्शित ठेवले. ( मी पन्डित गोड्से ना कधिच माथेफिरु म्हणनार नाहि. कारन आमचे राष्ट्रदैवत स्वा. सावरकर हे देखिल त्याना पन्डितच म्हणत असत.)

    म्हणुनच आता इतिहासाचि पुनराव्रुत्ति होणार हे अटळ आहे. जसे मोगलान्चा बिमोड मराठ्यानि केला ( सुरुवातहि त्यानि केलि) तसाच आता या हिरव्या मोगलन्च्या अवलादिला भारताची सहिष्णुता सम्पलि कि आक्रमकपणा काय आहे हे दाखवलेच पाहिजे.

    हाय, झॅक.....
    खरे तर तुम्ही केव्हाच 'सुरू' व्हायला हवे होते.
    टण्या ते शून्याशी संबंधीत नसून पूर्णाशी संबंधीत आहे.

    ओम पूर्णम अदह
    पूर्णम इदम...
    पूर्णात पूर्णम उदच्यते....
    पूर्णस्य पूर्णमादाय
    पूर्णम एव अवशिष्यते...

    इशोपनिषद.
    ---------हितगुज दॅट इ़ज....
    पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
    गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

    पु.ल. च्या विचार प्रधान लेखातुन काही सांराश...
    http://www.puladeshpande.net/spd.php

    संकुचित प्रांतीयतेचे धोके !
    ... जिथं एक देश म्हणून मानला तिथं काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत कुणीही कुणालाही परका नाही. शेवटी परका म्हणजे तरी कोण? माझ्या घरात येऊन माझ्या सुखदु:खांशी, आशा-आकांक्षांशी जो निगिडत होत नाही तो! इंग्रज भारतीयांच्या सुख-दु:खांशी समरस होऊ शकत नव्हता म्हणून परका! कानडी प्रांतात राहणारा पंजाबी किंवा महाराष्ट्रात राहणारा मल्याळी किंवा ओरिसात राहणारा मराठी आणि बंगालात राहणारा गुजराथी हे त्या त्या प्रांतातल्या लोकांच्या प्रेमाला पात्र होण्यासाठी, त्यांच्या जीवनाशी समरस होण्याची, त्यांची भाषा, त्यांचे उत्सव, त्यांची आदराची स्थानं ह्मांच्याशी एकरुप होण्याची एवढीशीसुद्धा इच्छा न बाळगता केवळ स्वार्थ साधला जातो म्हणूनच तिथं येताहेत आणि येताना आपल्या जोडीला आपलेच सगेसोयरे घेऊन, इथल्यांना व्यापारउदीम, नाेकरीधंदा ह्मांत प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहताहेत, असं त्या त्या लोकांना वाटलं, तर कटुता वाढीला लागल्याखेरीज कशी राहील? माणूस रागावतो तो आपल्या हक्काच्या जागेवर. मग तो भावनेचा हक्कही चालेल. कुणाचं तरी आक्रमण, कुणाचा तरी 'ट्रेसपास' होतोय असं वाटलं की माणूस रागावतो. मग त्या रागावण्याला सार्वजनिक स्वरुप येतं. कुठलीही गोष्ट अति झाली म्हणजेच ती विषासारखी होते. लोकशाहीनं प्रांतीयतेविषयी पाळण्याच्या पथ्यांत, केवळ प्रांताविषयी दुराभिमान वाढीला लावणं हे जसं विषासारखं असेल, तसंच दुसऱ्या प्रांतातील लोकांवर अतिक्रमण केल्याची भावना त्यांना निर्माण होईल अशा स्वार्थी हेतूनं वागणं हेही तितकंच अन्यायाचं आहे. शेवटी पथ्य म्हणजे तरी काय? कुठल्याही गोष्टीत संयमानं वागणं. प्रांतीयता म्हणजे विष किंवा कीड मुळीच नाही. आपल्या प्रांतीय भाषा साहित्याच्या दृष्टीनं समृद्ध आहेत. त्यांची उपेक्षा होऊन चालणार नाही. देशाच्या नकाशावर रेघा ओढून विभागण्या करा म्हणणाऱ्यांना माणसं फक्त नकाशाच्याच हद्दीत वावरणारे नकाशाइतकेच निर्जीव ठिपके आहेत, असं वाटत असावं! माणसाचा पिंड अनेक संस्कारांनी फुलला आहे. समान संस्कारांच्या माणसांची माणसांना ओढ आहे. त्यांतून ज्ञानाची आणि कलांची जोपासना होऊन जीवन सुंदर होतं. प्रांत म्हणजे काही रेव्हेन्यू खात्यातल्या अधिकाऱ्यांच्या सोईसाठी केलेल तुकडे नव्हेत! आपल्या देशातल्या लोकांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली ती योजना आहे. खेड्यांतल्या एका कोपऱ्यात राहणाऱ्याला आपल्या राज्यकर्त्या अधिकाऱ्यांशी धिटाईनं मातृभाषेत बोलून व्यवहार करता यावा, जी भाषा त्यानं कधी ऐकली नाही, तिच्यातून शिक्षण घेण्याची सक्ती करुन त्याला कायम अडाणी ठेवण्याच्या परिस्थितीतून त्याची मुक्तता व्हावी, यासाठी भाषावार प्रांत आवश्यक आहेत. पण एका प्रांतातून दुसऱ्या प्रांतात नोकरीधंद्यासाठी जाणाऱ्या लोकांनी आपण अन्य प्रांतीयांच्या अंत:करणावर, डोक्यावर आणि मुख्य म्हणजे पोटावर स्वत:च्या प्रांतीय अहंकारामुळं आणि स्वार्थानं आक्रमण करणार नाही, हे पथ्य पाळणं ही सर्वात आवश्यक गोष्ट आहे. शेवटी दुसऱ्याची वेदना काय आहे, तो कां ओरडतो आहे, चळवळ करतो हे समजून घेणं आणि आपल्या वागणुकीतून त्याला दु:ख होतं आहे हे कळल्यावर आपली वागणूक बदलणं, हाच माणसामाणसांनी एकत्र येण्यासाठी शक्य असलेला एकमेव मार्ग आहे.

    या जगात सगळयांना नीट जगायला मिळावं, यासाठी पाळायचं हेच ते एकमेव पथ्य! स्वार्थी माणसं ते पाळत नाहीत आणि समाजाला खिळखिळं करतात! सुरुवातीला मी म्हणालो त्याप्रामाणं परस्परविरोधी प्रवृत्तींनी भरलेल्या या माणुस नामक वल्लीनं हा विरोध कमी कसा होईल, याचा विचार आणि आचार केला, तेव्हाच तो सुखानं जगू शकला आहे. देश आणि प्रांत यांत परस्परविरोध नसून हे परस्परपूरक आहेत, ह्मा भावनेनं आपण सुदृढ होऊ. नाही तर पोट संपावर गेलं आणि हातापायांच्या काड्या झाल्याची इसापाची प्रसदि्ध कथा आहेच की! हे प्रांतदेखील राष्ट्रपुरुषाचे अवयवच आहेत. सगळे समझोत्यानं हालचाल करतील, तर सुख आहे. नाही तर पक्षाघात व्हायचा! तसा होऊ नये म्हणून तर लोकशाहीच्या पथ्य-कुपथ्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि जातीयता, प्रांतीयता ह्मांचे धोके कुठले कुठले आहेत, याचा विचार नेत्यांनी आणि जनतेनं दोघांनीही केला पाहिजे!

    http://www.puladeshpande.net/spd.php

    नुकतेच जया भादुरीने एका जाहीर कार्यक्रमात राज ठाकरेला टोमणा मारण्याकरता "हम तो युपीवाले है. हम तो हिंदीमें बोलेंगे" असे म्हटले आणि त्यातून बरेच काही घडले. बच्चन काम करत असणार्‍या सिनेमांची पोस्टरे फाडली. एका सिनेमाचा प्रिमियर रद्द केला गेला वगैरे.
    काही गरज होती का हे ओढवून घ्यायची? त्यात अजून ढोंगीपणा म्हणजे अभिषेक बच्चन मुलाखती, अन्य सोहळे ह्यात हटकून इंग्रजी हाणतो. जणू काही तो हॉलिवूड मधला नटच आहे.

    महाराष्ट्रात राहून मराठीची टिंगल, कुचेष्टा केली तर ती सहज खपवून घेतली जाणार नाही एवढे तरी लोकांना कळले तरी खूप.
    ही एक बातमी ज्यात अमिताभने माफी मागितली आहे.
    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/3468309.cms

    Pages