नर्सरी शिक्षण- अभ्यासक्रमाची उद्दिष्टे

Submitted by रैना on 5 October, 2010 - 04:36

मला खालील प्रश्नांबाबत कुतुहूल आहे. कृपया आपले मत मांडा

नर्सरी अभ्यासक्रमाची व्याप्ती आणि हेतू काय असतो ?
- अक्षरओळख ते अक्षरअट्टाहास (ओळख डोळ्यांना की कानांना. म्हणजेच मुलांना अक्षरे पाहून ओळखण्यावर भर की उच्चार/नाद यावर भर)
- शब्दओळख
- अक्षरे गिरवणे
- अंकपरिचय ते अंकाट्टाहास
- हात आणि मेंदु यांचा वापर- चित्र काढणे
- रंग ओ़ळखणे. चित्रात रंग भरणे
- दिशा (डावे उजवे हे या वयातील मुलांना कळणे अपेक्षित आहे का?)
- ऑड मॅन आउट (उद्या मी इथे एक वर्कशीट स्कॅन करुन टाकते. त्यात अशी उदाहरणं आहेत)
- Circle the friends of letter E
Odd - Tt - झाडाचे चित्र, आणखी काहीतरी, मंकी
दोन मुलं डावीकडे पाहून सायकल चालवतात , एक उजवीकडे पाहून...

वगैरे....
मुलांचे वय- २००७ साली (जानेवारी- डिसेंबर) मध्ये जन्मलेली मुलं.

गोष्टी, गाणी, गप्पा लिहीलेच नाही कारण ते शाळेत अंतर्भूत नाहीच.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्येष्ठ नागरिकांची मतं >> रैना , ऐकावे जनाचे, करावे मनाचे. मुलांचा अभ्यास, पुढच्या अ‍ॅडमिशन, करियर काउंसेलिंग या सगळ्यात ज्ये नांचा सहभाग कितीसा असणार ? फक्त सल्ले देण्यापुरता असलेल्या सहभागाला किति महत्व द्यायचं आपण ?

एच्चेच, मस्त पोस्ट. Happy

बाकी बाफ वाचून दडपणच आलं मला. सुदैवाने इथे मुलाच्या शिक्षकांची (आता तो सहावीत आहे) 'फिलॉसॉफी' कायम विषयाची गोडी लावण्याचीच दिसली.

उदा. आता सायन्स क्लासमधे त्यांना ग्रूप प्रोजेक्ट्स करायला देतात. पहिलं प्रोजेक्ट 'अमुक उंचीवरून अमुक वजन लावून सोडल्यास निदान पाच सेकंद हवेत राहील' असं पॅराशूट तयार करायचं होतं. त्याची टीचर म्हणाली की यात कोणी पास किंवा नापास होणार नाहीये, पण प्रयोग फसला, तर तो का फसला, त्यात काय सुधारणा करता येईल, ज्यांचं चांगलं झालं त्यांनी काय वेगळं केलं होतं, इत्यादींचा विचार करायची सवय / आवड त्यांना लागणं हा माझा उद्देश आहे. "After all that's what Science is all about - experimentation!" - हे तिचे शब्द.

अर्थात कॉलेज अ‍ॅडमिशन्स, त्यासाठीची तयारी यांचं टेन्शन घेणारे पालक इथेही दिसतात, नाही असं नाही.

एकूण मुलाला रॅटरेसमधे न ढकलण्याचं काम फक्त आणि फक्त पालकच करू शकतात असं मला प्रकर्षाने वाटतं. म्हणजे 'पुश' करायचंच नाही का, निकोप स्पर्धेमुळे जी प्रगती होते ती नाकारायची का? तर त्यातला बॅलन्स साधणंही पालक म्हणून आपलीच जबाबदारी असते. 'मी अमुकपेक्षा चांगले मार्क मिळवेन' यापेक्षा 'मी माझी क्षमता पणाला लावेन, तिथे हयगय करणार नाही. मग निकाल ही दुय्यम बाब' हे ठसवता आलं तर साधलं असं मला वाटतं. मला साधलंय असा दावा नाही, पण प्रयत्न नक्की याच दिशेने आहेत.

एक मतप्रवाह असाही असतो की 'उद्या मुलंच म्हणतील, की तुम्ही मला तेव्हाच का शिस्त लावली नाही? थोडं पुश केलं असतंत तर मी आज यशस्वी झालो असतो!'. तर ही शक्यता (मुलांनी दोष / दूषणं देण्याची) कुठल्याही मार्गात असतेच. शिवाय मुळात बाहेरच्या स्पर्धेपेक्षा मुलाचा कल, त्याची क्षमता पाहणं यातून तुम्ही त्याच्याशी संवादाच्या कक्षा वाढवत असताच. त्यामुळे पुढे त्याने दूषणं द्यायची शक्यता याच मार्गात कमी, नाही का?

विषय नर्सरीचा आहे, त्यामानाने मी बरीच जनरल फिलॉसॉफी झाडली आहे बहुधा. पण आपली दिशा निश्चित असली तर लहान सहान प्रश्न सोपे होतात असं वाटलं म्हणून हे सगळं लिहिलं.

“They’re 4 years old, and their parents are getting them ‘Stuart Little,’ ” said Dara La Porte, the manager of the children’s department at the Politics and Prose bookstore in Washington. “I see children pick up picture books, and then the parents say, ‘You can do better than this, you can do more than this.’ It’s a terrible pressure parents are feeling — that somehow, I shouldn’t let my child have this picture book because she won’t get into Harvard.”

इथल्या लेखातून Sad किती मोठ्या आनंदाला मुकताहेत ही मुलं!

http://www.nytimes.com/2010/10/08/us/08picture.html?src=me&ref=homepage

मेधा खूपच छान आहे हा लेख अगदी eye-opener Happy रैना , माझ्या मुलाला जरी gk असलं तरी प्रेशर नसतं अभ्यासाचं मला वाटतं नामांकित शाळेतच आपल्या मुलाने शिकावे म्हणून रात्र रात्र फॉर्मसाठी रांगा लावून बसण्यापेक्षा घराच्या जवळ नुकतीच सुरू झालेल्या शाळा ब-या कारण नवीन असताना quality improve करण्या करता ते जास्त प्रयत्न करतात त्यात आपल्या मुलाना चांगले प्रोत्साहन मिळते स्वानुभवावरून सांगते. मी सोलापूरला ज्या शाळेत शिकले ती आधी फक्त ७ वी पर्यंतच होती नंतर पुण्याच्या ज्ञानप्रबोधिनीने चालवायला घेतली अणि आमची १० वीची २ री बॅच बाहेर पडली .अशा grow करणा-या शाळा established शाळांपेक्षा खूपच flexible असतात अर्थात प्रत्येकाचे अनुभव वेगळे असू शकतात. मी माझा सांगितला.

आत्ताच शाळेत एक मीटींग बोलावली होती.. शिक्षण महामंडळाने आठवीपर्यंतच्या सर्व परिक्षा रद्द केल्या आहेत- त्यावरून इथे बराच गदारोळ झाला होता. आता त्यांनी पॅटर्न दिलेला आहे. परिक्षा रद्द म्हणजे शिक्षक नीट शिकवणार नाहीत, मुलं बेजबाबदार होतील असे मुळीच नाहीये.. गुणांकनात खूप स्वागतार्ह बदल केले आहेत आणि मुख्य म्हणजे हे सर्व शाळांमध्ये कम्पल्सरी केलेले आहे. सर्व पालकांनी ह्याचे उस्फूर्त स्वागत केले. मी डिटेल्स टाकते थोड्या वेळाने.

फक्त सल्ले देण्यापुरता असलेल्या सहभागाला किति महत्व द्यायचं आपण ?>>
एकूण मुलाला रॅटरेसमधे न ढकलण्याचं काम फक्त आणि फक्त पालकच करू शकतात >> मेधा व स्वाती दोन्ही वाक्यांना जबरदस्त अनुमोदन. १० - १६ वर्शाच्या मुलांच्या साठीच्या बाफ वर पण या ना प्लीज. करीअर गायडन्स वर तुमची मते उपयुक्त ठरतील.

आज पीटीए. शाळेत अभ्यास नसून नाचाची तयारी, खेळ व इतर गंमत चालू होती. मुले कॉमिक्स वगैरे
वाचत होती. ते सर्व बघूनच मला इतके मस्त वाट्ले. आता आठ दिवस सुट्टी

रैना, मला असे म्हणायचे होते की लहान मुलांची पण शिकण्याची कॅपॅसिटी जबरदस्त असते. खास करुन तोंडी आणि भाषेसंबंधीत. पुढील वाक्य मला सिद्ध करता नाही येणार, पण जर त्या वयात परिक्षा लादल्या तर त्या परिक्षांकरताच ते शिकणे होते. मेंदुत वेगळे पॅटर्न्स बनतात, व ते शिक्षण पुढच्या शिक्षणाचा पाया बनण्याऐवजी एकाच स्तरावर राहतं.

आणि मुल शिकु शकतात म्हणुन आपल्याला हवे ते (किंवा त्यांना नंतर लागेल असे आपल्याला वाटते ते) त्यांना शिकवायलाच हवे असे नाही. त्यांच्या खेळण्याच्या वयात

शिक्षण क्षेत्रातील व्यक्तिंना भेटुन सल्ला घेतल्यास मदत होऊ शकेल. खालील दुव्यावर एकदोन नावे आहेत. काही मदत होते का ते पहा.
http://bcpt.org.in/webadmin/publications/pubimages/project-ecce.pdf

मी पुर्ण बाफ वाचला नाही त्यामुळे यावर कोणी आधी बोलले असायची शक्यता आहे: ताराबाई मोडकांच्या शिशुविहारच्या तत्वावर चालणार्या शाळा आसपास आहेत का पहा. चांगल्या असायची शक्यता आहे.

उत्तम चर्चा चालू आहे. माझे थोडेसे विषयानंतर इथली सर्व मंडळी साधारण पाने २८ ते ४० च्या दरम्यान आहेत. जवळपास सगळ्यांचीच मुले इंग्रजी माध्यमात आहेत. मला माझ्या मुलाला मराठी माध्यमात घालायचे होते पण आमच्या बायकोचा पूर्ण विरोध कारण आजूबाजूचे इंग्रजी मध्ये आहेत. आणि आता तर अह्मीच लंडनला आहोत. त्यामुळे तर मराठीचा प्रश्नच येत नाही. पण घरात मराठी असल्याने उत्तम बोलतो. पण गोची शाळेत होते कारण सगळीच गोरी मुले आहेत एक फक्त श्रीलंकन आहे त्यामुळे बिचारा कोमेजून गेला होता पहिले ४ महिने. अर्थात हा मुलाचा स्वभाव पण असतो कारण माझ्या एका मुलाचा मुलगा दुसरीपर्यंत रामान्बागेत होता आणि आता इकडे आला पण ४ महिन्यात चांगला सेट झाला. आता १ वर्षानंतर उत्तम मराठी आणि इंग्रजी बोलतो. पण इकडे एक पहिले शाळे मध्ये अजिबात शिक्षा नाही कि प्रेशर नाही. काय वाटेल तो गोंधळ घाला. कधी कधी हे अति होते असे मला वाटते. थोड्या का होएईना पण प्रमाणात शिक्षा हे हवीच. पण तरीही चांगला रुळला आहे. अजून इंग्रजी बोलत नाही पण शाळेत जायला कटकट तरी करत नाही आता. उलट कधी कधी शाळेत जायचे म्हणून रडतो. पण मला आपला त्रासाच होतो कारण त्याला कधीच आपल्यासारखे मराठी येणार नाही. अर्थात घरात बोलले तर येते पण माझ्या पाहण्यात जी पुण्यातली मंडळी आहेत आजूबाजूची ती मुले बोलतात पण मराठीचा जीव्हाळला अजिबात नाहीये. त्यामुळे अजून ४०-५० वर्षात भाषा खरोखर मरण पंथाला लागेल.

अजून एक अनुभव कोणीतरी वर लिहिले कि मराठी मध्ये घालणारे इंग्रजी मध्ये घालताना बघितले कि गम्मत वाटते. माझा स्वतःचा अनुभव असा आहे एकदाचा कि आमचा दिवटा फक्त मराठीच बोलतो आणि त्याचे आईकुने बाकीच्या पण पोरांनी १-२ शब्द मराठी उचलले म्हणून आह्माला चक्क लोकांना टाळले कारण त्यांच्या मुलांचे इंग्रजी खराब होएईल. वर हि मंडळी जेंव आह्मी पहिल्यांदा भेटलो तेंव शाळेची माहिती वगैरे दिली आणि वर हेही सांगून झाले कि इकडे शाळेत सांगतात मराठीच बोला घरी मुलांना दोन्ही भाषा येऊ द्यात वगैरे. ( हे खरे आहे ) पण जेंव वेळ येईल तेंव इंग्रजी मध्ये बोलण्यातच धन्यता मानतात.

असो भलतेच विषयांतर. मी आपली माझी व्यथा मंडळी.

एकूण मुलाला रॅटरेसमधे न ढकलण्याचं काम फक्त आणि फक्त पालकच करू शकतात असं मला प्रकर्षाने वाटतं. म्हणजे 'पुश' करायचंच नाही का, निकोप स्पर्धेमुळे जी प्रगती होते ती नाकारायची का? तर त्यातला बॅलन्स साधणंही पालक म्हणून आपलीच जबाबदारी असते. 'मी अमुकपेक्षा चांगले मार्क मिळवेन' यापेक्षा 'मी माझी क्षमता पणाला लावेन, तिथे हयगय करणार नाही. मग निकाल ही दुय्यम बाब' हे ठसवता आलं तर साधलं >>>>> १०० % अनुमोदन.
एक स्वानुभव माझ मुलगा साडे पाच वर्षाचा आहे , सध्या k२ त आहे, आणी या वर्षी पासुन शाळेत assessment सुरु झलिये. मुलाचे पेपर्स जेव्हा मिळाले तेव्हा ते पाहुन मी खुश होते कि चला , खूप गोन्धळ न घालता चान्गला सोडवलाय पेपर, पण नंतर जेव्हा इतर मुलांचे पैकी च्या पैकी मार्क्स ऐकले तेव्हा वाइट वाट्ले, आणी अगदी typical विचार मनात आला की बाकीच्या मुलांना पुर्ण मार्क्स मिळू शकतात तर ह्याला का नाही, पण लगेच मनाला बजावले कि आपण अथर्व किती progress करतोय याचा जास्त विचार केला पाहीजे , उगाच दुसर्या मुलांशी compare केल्याने आपण तो ज्या कौतुकाला पात्र आहे ते देखील करणार नाही.
आणि गम्म्त अशी कि या वयातल्या मुलांना त्यांना किती मार्क्स पड्लेत याच्याशी काहीच देणे घेणे नसते, हे सगळं फक्त पालकांपुरतं असते.

धन्यवाद स्वाती२, मेधा, स्वाती, आशिष.
स्वप्ना- हो खरे आहे. छोट्या शाळा बर्‍या पडतात. Happy
पूनम- लिही लिही तपशीलवार. चांगले वाटते आहे.

त्याची टीचर म्हणाली की यात कोणी पास किंवा नापास होणार नाहीये, पण प्रयोग फसला, तर तो का फसला, त्यात काय सुधारणा करता येईल, ज्यांचं चांगलं झालं त्यांनी काय वेगळं केलं होतं, इत्यादींचा विचार करायची सवय / आवड त्यांना लागणं हा माझा उद्देश आहे.>>>>>> मी सध्या शिकवीत असलेल्या आयबी सिलॅबसमधे हाच विचार आम्ही पार ११-१२ पर्यंत वापरतो, आणि हे केवळ सायन्स क्लब/ हॉबीपर्यंत मर्यादित नसून ,प्रयोगातल्या चुका कळणे आणि त्या कमी करण्याचे उपाय सांगणे याला वेगळे मार्क असतात जे फायनल मार्कशिटवरही येतात.

माझी मुलगी सध्या पाउणे दोन वर्ष्याची आहे. पुढच्या वर्षी शाळेत टाकताना ह्या धाग्याचा मस्त उपयोग होइल.
शाळे मधे बहुभाषिक मुले आहे तर संवाद होत नाही अस नसावे. आम्ही सध्या म्हैसुर मधे रहतो. लहान मुले भाषा पटकन शिकतात हा माझा स्वःतचा अनुभव. घरी मराठी, बाहेर कानडी, आमचा ग्रुप हिन्दी आणी माझ्या काही मैत्रीणी तामिळ. माझी लेक मराठी सगळ बोलते. come , go , run ,stop, water सारखे काही शब्द ईंग्शिश मधे तर काही कानडी, हिन्दी ,तामिळ पण येतात. डॉ. द. वी. सरदेसाई च माझ्या कडे पुस्तक आहे त्यात लिहिल आहे कि मुले (वय ३-६) भाषा चटकन शिकतात.

खूप चांगली चर्चा चालू आहे.

माझी लेक सध्या अडीच वर्षाची आहे. ती सर्वांमध्ये मिसळते. अनोळखी व्यक्तींशी जाऊन धीटपणे बोलते. इतर मुलांबरोबर छान खेळते. रंग, आकार ओळखता येतात. अंक आणि बाराखडी म्हणता येते. इंग्रजी अल्फाबेट्स आणि काही कविता म्हणते. मराठी बालगीते आणि कविता उत्तम म्हणते. सलग संदर्भ जोडून गोष्ट सांगते. दिसलेल्या गोष्टीचे वर्णन नीट करते. सलग सांगितलेल्या दोनतीन सूचना कळतात, लक्षात राहातात आणि अंमलातही आणता येतात. ( उदा: खेळण्यांच्या रूममध्ये जाऊन लाइट लावून बेडजवळच्या टेबलावर ठेवलेला कंगवा आणि क्रीम घेउन ये. येताना लाईट बंद कर. ) हे एकदा सांगून करते.
वासाने पदार्थ, वस्तू ओळखता येतात. चवींची नावं सांगता येतात. कोरडे पदार्थ स्वतः खाते. न सांडता ग्लास मधून स्वतः पाणी पिते. स्वरज्ञान अचाट आहे. ( १०० एक गाणी सुरुवातीच्या संगितावरून ओळखते )
माझ्या मते तिच्या वयाची सगळी कामं तिला करता येतात. प्रगती समाधानकारक आहे. पूर्वपाथमिक शाळांच्या अभ्यासक्रमाची उद्दिष्टे हीच असावीत.
इथे फक्त डच शाळा आहेत. त्याही खूप दूर. मी मार्चात भारतात कायमची परत येतेय. शिवाय मध्येच एक वारी आहेच. या कारणाने जेमतेम दोन महिन्यांसाठी डच शाळेत घालणे मला योग्य वाटले नाही म्हणून मी तिला अजून शाळेत घातले नाही. घरी मात्र अनौपचारिक पद्धतीने शिकवत असते.
भारतात जाऊ तेव्हा ती ३ वर्षाची होईल. तेव्हा घराच्या जवळ असलेल्या नव्यानेच सुरू झालेल्या मराठी माध्यमाच्या शाळेत तिला घालणार आहोत.
माझ्या मते मुलाला शिकण्यातला आनंद समजला की कोणते माध्यम, कोणते बोर्ड याने काहीही फरक पडत नाही. शिक्षणाने स्वत:ची वाट निवडायला मदत व्हावी. विवेक यावा. हा विवेक मुलात आला आहे याची खात्री झाली की पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे.

>>माझ्या मते मुलाला शिकण्यातला आनंद समजला की कोणते माध्यम, कोणते बोर्ड याने काहीही फरक पडत नाही. शिक्षणाने स्वत:ची वाट निवडायला मदत व्हावी. विवेक यावा. हा विवेक मुलात आला आहे याची खात्री झाली की पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे. >>
किती छान लिहिलयस मितान Happy

माझ्या मते मुलाला शिकण्यातला आनंद समजला की कोणते माध्यम, कोणते बोर्ड याने काहीही फरक पडत नाही. शिक्षणाने स्वत:ची वाट निवडायला मदत व्हावी. विवेक यावा. हा विवेक मुलात आला आहे याची खात्री झाली की पालकांनी मुलांवर विश्वास ठेवावा. त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे रहावे.<< अगदी अगदी मितान खूप आवडले तुझे विचार असं काही वाचलं की समाधान मिळतं की अजूनही मुलांचा विचारकरणारे पालक आहेत .

रैना, खूप उपयुक्त आणि डोक्याला खाद्य देणारी लिंक दिली आहेस. नक्कीच उपयोग होईल.

नमस्कार,
माझा मुलगा वे २ वर्ष, ११ महीने, नर्सरी. त्याला खालिल् प्रमाणे syllabus
१. अल्फाबेट्स A-Z म्हणणे, A-O ओळखणे जसे A For apple, B for Ball etc.
२. प्राणी (domestic & wild), फुले, भाज्या, रंग, वाहने ओळखणे.
३. चांगल्या सवयी like good morning, good evening, may I go to toilet, may I drink water?
४. बॉडी पार्ट्स ओळखणे/उपयोग like what do u do with ur eyes? I see with my eyes.
५. स्वत:विषयी माहिती like what is ur name, fathers name, mothers name, teachers name, school name?, where do u live?, how old r u?
६. 1-10 नंबर्स म्हणणे,
७. गाणी (nursary Rhymes) जी प्रत्येक महिन्यासाठी ठरवलेली आहेत पूर्ण वर्षकारिता आणि घरी प्रिंट आउट दिला आहे पालकाकरिता.
८. राइटिंग ऑफ लाइन्स ( | , /, \ , C आणि उलटा C)

हे सर्व मागच्या ४ महिन्या चा syllabus (June to Sept) दिवाळी नंतर काय घेणार हे माहीत नाही. पण square book आहे म्हणजे नंबर राइटिंग असावे! वरिल सर्व syllabus वर परि़क्षा १५ दिवस. रोज २ topics. शेवट्च्या दिवशी writing of lines.

ह्यापैकि माझ्या मुलाला रंग सोडुन सर्व ओळखता येत. writing of lines करेल याची खात्री नाही.
पण घरी सर्व lines तो मला लिहुन दाखवतो! ह्या आधि घेतलेल्या परि़क्षेत फक्त | , /, \ काढली ती पण वेडिवाकडी कारण bore झाला! हिहिहि....चांगल्या सवयी ,बॉडी पार्ट्स ओळखणे , स्वत:विषयी माहिती हे सांगेल याची पण खात्री नाही. पण ह्यासाठी त्याला ज़बरदस्ती करायची नाही हे पहिल्यापासून ठरवले आहे.

ह्या सर्व निबंधाचा कोणालातरी उपयोग होइल अशी आशा आहे. असो इथे थाम्बते.

मेघना.

सॉरी, मला लिहायला बराच उशिर झाला. तरीही हे थोडंसं- शिक्षण मंत्रालयाने ह्यावर्षी 'आठवीपर्यंत परिक्षा नाही' हे डिक्लेअर केलं. त्याऐवजी आता पहिली-आठवी ह्या विद्यार्थ्यांसाठी 'मूल्यमापन पद्धती' राबवली जाणार आहे.

आता विद्यार्थ्यांचं रोजच्या रोज मूल्यमापन होणार आहे- प्रत्येक विद्यार्थ्याचं. अगदी व्यक्तिगत स्वच्छता, स्वच्छ गणवेश, नीटनेटकेपणा यापासून वह्या कशा आहेत, इतर मुलांबरोबर वर्तन कसं आहे, शिक्षकांशी वर्तन कसं आहे, विषयाची समज किती आहे, अचानक विचारलेल्या प्रश्नावर कशी आणि काय उत्तरे देतो- सगळंच गृहित धरलं जाणार आहे. शिकवलेले धडे, त्यावरची प्रश्नोत्तरे, तयारी, ’सर्प्राईज टेस्ट’ घेतली, तर त्यात मिळणारे मार्क- प्रत्येक गोष्ट काटेकोरपणे तपासणे हे आता शिक्षकांचे काम असणार आहे. थोडक्यात, विद्यार्थ्याला केवळ पुस्तकात न अडकवता, त्याचं संपूर्ण व्यक्तीमत्त्वाकडे शिक्षक आता जातीने लक्ष देतील. विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास होतोय की नाही हे आता ते बघणार आहेत. त्यांनी ते कसे बघायचे आहे, ह्यासाठी सर्व शिक्षकांना व्यवस्थित ’ट्रेनिन्ग’ द्यायची व्यवस्था शिक्षण मंडळाने केलेली आहे. उन्हाळ्याची सुट्टी, दिवाळीची सुट्टी ह्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा विद्यार्थी मजेत असतील, तेव्हा शिक्षक मात्र त्यांच्या मूल्यमापन पद्धती शिकण्याच्या पद्धती शिकत असणार आहेत. नवीन पद्धतीमध्ये ’नंबर’ ह्या प्रकाराला संपूर्णपणे फाटा दिलेला आहे. त्यामुळे ’हा बघ पहिला आला, त्याला अमूक टक्के मिळाले, तो बघ, तुला इतकेच? गाढव कुठला’ असे कमी मार्क मिळवणार्‍या मुलांसाठी असलेले खच्चीकरण करण्याचे प्रकार बंद करण्याचा मंडळाचा प्रयत्न असणार आहे. आता फक्त ’ग्रेड्ज’ असणार आहेत- ए ग्रेड सर्वात वर, ते डी२ ही सर्वात खालची ग्रेड. जी मुलं बी ग्रेडच्या खाली आहेत, त्यांचा स्पेशल रिपोर्ट तयार करून ती त्या विषयात का कमी आहेत, त्याबद्दल काय करता येईल हे त्यांच्या पालकांबरोबर चर्चा करून त्यावर उपाय शोधून काढणे आता शिक्षकांचे कर्तव्य असणार आहे. त्या मुलांची उत्तरोत्तर काय प्रगती होत आहे, हेही मंडळाला कळवणे बंधनकारक आहे. प्रगती होत नसेल, तर मुलांचे अजून काऊन्सेलिंग करता येईल का ह्याबद्दलही शिक्षकांचे मत विचारात घेतले जाणार आहे.

ह्यावर अजून विस्ताराने मी ब्लॉगवर लिहीले आहे (रिक्षा ;)), पण हा crux of the matter आहे.

हा बाफ 'नर्सरी शिक्षणा'चा आहे आणि मी पहिली-आठवी ह्याबद्दल लिहीले आहे, ह्याबद्दल कल्पना आहे. पण एक चांगली योजना आहे, ती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचावी, हा हेतू. खूपच ऑफ-ट्रॅक आहे असं कोणी म्हणालं, तर काढून टाकेन.

अजून एक- हे सर्व फक्त महाराष्ट्र बोर्ड असलेल्या शाळांनाच लागू आहे, कारण सीबीएससी आणि आयसीएससीचे सिलॅबस आणि धोरणं ही ते ते बोर्ड ठरवतात.

पौर्णिमा, डिटेल लिहिलेस हे छान केलेस.

सगळेच बदल स्वागतार्ह आहेत. आवडलेत.

जाता जाता, ग्रेड्स बद्दल मी आधीही लिहिले होते . माझ्या लेकाच्या शाळेत पेपर तपासुन देतांना त्यावर फक्त ग्रेड्स दिलेल्या होत्या पण रिपोर्ट कार्डवर मात्र टक्केवारीही दिलेली आहे. त्यामुळे " त्याला इतके , तुला इतकेच कसे -गाढव कुठला" हे बोलण्याची संधी अजुनही सीबीएसइ बोर्डाने (किंवा इथल्या शाळेने) पालकांच्या हातात राहु दिलेली आहे. भारतातही असेच आहे का?

ग्रेड्स असल्या तरी भारतीय पालकांची ( including me) माझ्या मुलाला ए तर समोरच्याच्या मुलाला कुठली ग्रेड मिळाली आहे याची जिज्ञासा वाटणे संपणार नाही. आणि याचा पुरावा म्हणजे दिवसभर सगळ्या आया एकमेकांना फोन करुन ग्रेड्स विचारत होत्या.

अरे वा, खरंच स्वागतार्ह आहेत हे बदल. यांची व्यवस्थित अंमलबजावणी झाली तर 'हसत खेळत शिक्षण' हे ब्रीद खरे ठरेल Happy

चांगले बदल आहेत.

>>ग्रेड्स असल्या तरी भारतीय पालकांची ( including me) माझ्या मुलाला ए तर समोरच्याच्या मुलाला कुठली ग्रेड मिळाली आहे याची जिज्ञासा वाटणे संपणार नाही. <<
प्रिंसेस भारतातल्याच काय मुलाच्या भवितव्याबद्दल काळजी वाटत असणार्‍या तमाम आईबापांबद्दल असं म्हणता येईल ना? कदाचित काही सन्माननीय अपवाद वगळता. Happy

मी लिहिते आहे तो या बाफ चा विषय नाही पण लिहिल्यावाचून रहावत नाही. पूनमने लिहिलेले सगळे पेपरवर गोजिरवाणे दिसतेय. शहरातल्या शाळांना समोर ठेवुन निर्णय घेतला आहे असे खुप जाणवतेय.

माझी आई गेले कित्येक वर्षे आमच्या घराजवळ रहाणार्‍या आणि जवळच्या खेड्यातल्या शाळेत जाणार्‍या मुलांच्या विनामूल्य शिकवण्या घेते. या मुलांपुढे अक्षरश: डोकेफोड करावी लागते. त्यांना शाळेत शिकवलेले काहीही कळत नाही. घरी आईवडीलांना अक्षरओळखदेखील बरेचदा नसते. शिक्षकांना सगळ्या पोरांना शिकवून येतेय कि नाही हे पहाण्याइतका वेळ नसतो. निवडणूकीची कामे, जनगणना अशी सगळी सरकारी कामे हे शिक्षक करतात ते देखील ९९% वेळा शाळेच्या वेळात. त्यावेळी २-३ कधी कधी ४ वर्ग एकत्र करून शिक्षक शिकवण्याचे काम करतात.
या सगळ्या मुलांच्या घरची आर्थिक परिस्थिती कधी कधी इतकी खराब असते की शाळेचा ड्रेसदेखील यांना परवडत नाही. आईवडील दोघेही कष्टकरी त्यांना मुलांचे दात-नखे स्वच्छ आहेत का हे पहायला सवड असत नाही. पाण्याची टंचाई असलेल्या गावांमधे २ तांब्ये पाणी जरी या मुलांना अंघोळीला मिळाले तरी खूप. पुस्तके, पाट्या, पेन्सिली, पेन, वह्या, हे परवडत नाही.

हे सगळे इतके प्रतिकूल असताना शिक्षक कोणत्या आधारावर या मुलांना पुढच्या वर्गात जाऊ देणार आहेत? मी स्वतःदेखील भारतात असताना या मुलांना शिकवत होते, काय परिस्थिती आहे हे स्वतः पाहिलेले आहे. सकाळी परीक्षा न घेण्याचा निर्णय मला मम्मीने सांगितला आणि पुढे तिच्याकडे सध्या शिकणार्‍या तिसरी-चौथीच्या मुलांची शैक्षणीक परिस्थिती सांगितली.

मला दरवेळेसच हा एक प्रश्न पडतोय. सध्या खूप टोकाटोकाच्या ग्रामीण आणि आदिवासी भागातून फिरतेय म्हणून अजूनच प्रकर्षाने प्रश्न जाणवतो.
मिनोतीचं म्हणणं पटलं पण पूनमने सांगितलेलं मॉड्यूल पण चुकीचं वाटलं नाही.
आपण कितीही नाकारलं तरी अशिक्षित वा सुशिक्षित आईबाप, आर्थिक स्तर, शहर वा गाव, कुठले शहर इत्यादी अनेक बाबतीत ही विषमता मोठी आहे, दरी प्रचंड आहे आणि वाढतेय. त्याबद्दल कसं नि काय करायचं हा मुद्दा इथे नको चर्चूया. असो.
मुद्दा असा की
१. असं एखादं शैक्षणिक धोरण जे सगळ्या स्तरावरच्या मुलांसाठी योग्य असेल असं तयार करणं शक्य आहे का? हे मुश्कील वाटतं. आणि एक असंही वाटतं (कदाचित स्वार्थीही!) की सर्वच बाबतीत कमतरता असलेल्या मुलांसाठीचे नॉर्म्स सर्वच बाबतीत सगळं असलेल्या मुलांनाही लावायचे म्हणले तर इच्छा, शक्यता सगळं असूनही त्यांना फरपटावे लागेल जसं वरच्या धोरणाने underprivilaged मुलं फरपटली जाऊ शकतात.

२. वेगवेगळ्या स्तरासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मूल्यमापनाची/ शिक्षणाची पद्धत निवडल्यास ते बरे की वाईट?
याने विषमतेची दरी कधी सांधली जाण्याची शक्यताच बुजवली जाऊ शकते ना?

ही वरची माझी बनवलेली मतं नाहीत. loud thinking आहे असं समजा.

Pages