देव: आहे की नाही?

Submitted by डॉ अशोक on 25 September, 2010 - 05:12

देव: आहे की नाही?

मरणाच्या दाराशी जावून
परतलेला पेशंट
ऐकून, पाहून
देव आहे असंच वाटतं

सासरच्यानी जाळलेली विवाहिता
पुराव्या अभावी सुटलेले सासरचे
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मुलाच निरागस हसू
आजारात हरपतं
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

मरणान्तीक प्रसव वेदना सोसून
तान्हूल्याला पाजणारी माय
ऐकून, बघून
देव आहे असच वाटतं

ग्राहक मंचात
डॉक्टर- पेशंट आमने सामने
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं

चरक, सुश्रुत
पाश्चर, नायतींगेल
ऐकून, पाहून
देव आहे असच वाटतं

--अशोक

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

धन्यवाद मित्र हो!
@ विनीगा
या आधीची कविता मी एक आठवड्या पूर्वी दिली आणि तरी ही तुमची कॉमेंट की "रोजच काय हे पेशंट आणि डॉक्टर.." नॉट फेअर बाय एनी स्ट्यांडर्ड !