Submitted by डॉ अशोक on 25 September, 2010 - 05:12
देव: आहे की नाही?
मरणाच्या दाराशी जावून
परतलेला पेशंट
ऐकून, पाहून
देव आहे असंच वाटतं
सासरच्यानी जाळलेली विवाहिता
पुराव्या अभावी सुटलेले सासरचे
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं
मुलाच निरागस हसू
आजारात हरपतं
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं
मरणान्तीक प्रसव वेदना सोसून
तान्हूल्याला पाजणारी माय
ऐकून, बघून
देव आहे असच वाटतं
ग्राहक मंचात
डॉक्टर- पेशंट आमने सामने
ऐकून, पाहून
देव नाही असच वाटतं
चरक, सुश्रुत
पाश्चर, नायतींगेल
ऐकून, पाहून
देव आहे असच वाटतं
--अशोक
गुलमोहर:
शेअर करा
विश्वास असल्यास विश्वास
विश्वास असल्यास
विश्वास ठेवल्यास
ऐकून, पाहून
देव आहे असच वाटतं !
विश्वास असल्यास देव आहे असच
विश्वास असल्यास
देव आहे असच वाटतं
विश्वास नसल्यास
देव नाही असच वाटतं
अंगाला आला ताप देवा म्हणे तू
अंगाला आला ताप देवा म्हणे
तू माझा बाप !
अंगाचा गेला ताप
देवा म्हणे मी तुझ्या बापाचा बाप !!
काहितरी काव्यात्मक द्या हो
काहितरी काव्यात्मक द्या हो रोजच काय हे पेशंट आणि डॉक्टर
तुम्ही देव पहीला का हो? आसेल
तुम्ही देव पहीला का हो? आसेल तर मला मेल करा-sp9423139213@gmail.com
हल्लीच " रमेश देव " , "
हल्लीच " रमेश देव " , " अजिंक्य देव " एका सिनेमात दिसले होते .
धन्यवाद मित्र हो! @ विनीगा या
धन्यवाद मित्र हो!
@ विनीगा
या आधीची कविता मी एक आठवड्या पूर्वी दिली आणि तरी ही तुमची कॉमेंट की "रोजच काय हे पेशंट आणि डॉक्टर.." नॉट फेअर बाय एनी स्ट्यांडर्ड !