ओल्ड मंक लार्ज .... ऑन द रॉक्स - क्रमशः - भाग ५

Submitted by बेफ़िकीर on 24 September, 2010 - 03:00

कॉलेज सुरू होऊन पंधरा दिवस झाले आणि रूम नंबर २१४ मधील चारही मने एकमेकांमधे मिसळून एक पाचवाच रंग तयार होऊ लागला. रोज निदान अर्धी बाटली तरी संपायला लागली. आता आत्मानंदच्या कानावर ओल्ड मंक, नंबर वन व्हिस्की, ओ.सी., ब्ल्यु रिबॅन्ड वगैरे नावे पडू लागली. तो अजूनही लांब बसून सर्वांकडे टक लावून बघत बसायचा आणि मनातल्या मनात जप करायचा. सगळ्यांचे पिणे झाले की हातातल्या भांड्यातील पाणी सगळ्या खोलीत शिंपडायचा अन मगच झोपायचा. कित्येकदा त्याची थट्टा करण्यासाठी मग वनदास पुन्हा त्याने शिंपडलेल्या पाण्यावरून बाटलीतले काही थेंब शिंपडायचा. दारू अशी शिंपडल्यामुळे मग दिल्या वनदासला एक फटका लावायचा. मग तिघेही हसत हसत झोपायचे.

आत्मानंद प्रत्येक लेक्चरला मात्र बसायचा. अगदी सिन्सियरली बसायचा. त्याच्या वह्या भरू लागल्या होत्या. अक्षर मोत्याच्या दाण्यांसारखे होते. स्पेलिंग मिसटेक नाही, खाडाखोड नाही. प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर गणेशाची व स्वामी समर्थांची प्रार्थनेची एक एक ओळ! सुबक प्रकरण होते सगळे! त्याला खोलीचा एक कोपरा मिळाला होता. त्या कोपर्‍यात त्याच्या दोन बॅगा आणि सर्व किरकोळ सामान, कपडे वगैरे असायचे. अभ्यास नसेल तेव्हा तो नामस्मरण करत बसायचा. पण लक्ष सगळं या तिघांकडे ठेवायचा. लक्ष ठेवण्याची तीन प्रमुख कारणे होती. एक म्हणजे दिल्या कधीही कुणालाही फटका लावायचा. तो आपल्याला बसू नये असे आत्मानंदला प्रामाणिकपणे वाटायचे. दुसरे म्हणजे स्त्री या विषयावर काही अद्भुत चर्चा व्हायची अन त्यातून मन सुखवायचे. आणि तिसरे म्हणजे पिऊन ते तिघे गोंधळ घालायला सुरुवात करायचे. या गोंधळात काहीही व्हायचे. आपली कोणतीही वस्तू त्यात नष्ट होऊ नये अशी इच्छेने आत्मानंद सगळे झोपेपर्यंत जागाच राहायचा.

आत्मानंद ठोंबरे! आजवर अत्यंत सुरक्षित वातावरणात व धार्मिक संस्कारात वाढलेल्या या मुलावर त्याच्या आजी आजोबांच्या जुन्या वळणाचा फार प्रभाव होता. त्यामुळे आपले बोलणे चालणे हे इतर समवयीन मुलांसारखे नाही आहे हे त्याच्या लक्षातच यायचे नाही. तो प्रॉपर चतुर्थी वगैरे करायचा. मंगळवार करायचा. आणि हे तिघे त्याची थट्टा करत करत त्याच्यासमोर अपेयपान आणि अभक्ष्यभक्षण करायचे. पण अंगात दम नसल्यामुळे तो बिचारा सहन करायचा ते! पण त्याच्या आता लक्षात यायला लागले होते. तिघे जरी व्यसनी असले तरीही तिघांचेही आत्मानंदवर खूप प्रेम बसलेले होते. आणि त्यामुळे आता त्याचेही त्या तिघांवर प्रेम बसलेले होते.

आजही तिघांना रात्री साडे आठलाच पूर्ण चढलेली होती आणि आत्मानंद त्याच्या पलंगावर बसून रोखून प्रत्येकाकडे पाहात होता. आत्मानंदच्या मसाजमुळे दिल्या आठ दिवसांपुर्वीच टुणटुणीत झाल्यामुळे आता शिर्के वचकून होता. पण दिल्या भाकड नव्हता. कुठेतरी बेसावध असताना शिर्केला तुडवायचा ही अशोकची कल्पना त्याने साफ फेटाळून लावलेली होती. त्याच्या मते समोरासमोर आव्हान देऊन सर्वांसमक्ष तो शिर्केला धडा शिकवणार होता. पण तो विषय आता चर्चेत फारसा येत नव्हता. कारण दिल्याने सांगून टाकले होते की शिर्केचे जे करायचे ते तो एकटाच करणार आहे. त्या गोष्टीचा बाकीच्यांशी संबंध नाही.

आजच्या चर्चेचा... खरे तर आज'ही' पिण्याचे कारण ठरणारा विषय फार वेगळा होता.

दीपा बोरगे नावाची वर्गातील एक गोरी पान मुलगी वनदासला फारच आवडलेली होती व ती त्याच्याकडे पाहाते हे त्याचे आज ठाम मत झाले होते. आणि त्यावरूनच गदारोळ चाललेला होता.

अशोक - तिने नेमकं कसं पाहिलं तुझ्याकडे??

वनदास - म्हणजे ... काय झालं ते मी सांगतो...मी चाललो होतो ना क्लासमधून बाहेर.. तेव्हा ती आत येत होती... ती अन ती उर्मिला.. दोघीही... एकदम समोरासमोर आल्यावर मी तरी काय करणार रे?? मी एकदम बघायलाच लागलो तिच्याकडे...

दिल्या - हेच... अश्क्या मी हेच तुला म्हणतोय मगाचपासून...

अशोक - थांब ना... हां ... बोल रे..

वनदास - तर तिने जायचं की नाही निघून पुढे??

अशोक - सरळ आहे...

वनदास - तर ती उर्मिला गेली पुढे.....

अशोक - अन ही??

वनदास - अरे तिथेच... असे... हे बघ हे असे डोळे मिसळून पाहात राहिली...

दिल्या - फेकतंय सालं...

अशोक - किती वेळ...

वनदास - आता किती वेळ... असेल दोन अडीच सेकंद... मी काय मोजणार आहे का??

अशोक - नाही पण दोन अडीच सेकंद ट्रॅफिक जॅम म्हणजे फार झालं वन्या...

दिल्या - अरे कसलं ट्रॅफीक जॅम? हा फेकतोय अन तू ऐकतोयस...

अशोक - तिने काय घातलंवतं??

दिल्या - त्याचा काय संबंधय??

वनदास - ड्रेसरे.. चक्क ड्रेस घालून बघत होती माझ्याकडे...

दिल्या - म्हणजे काय? तू दिसल्यावर काय कपडे बदलून येऊन बघायचं का तुझ्याकडे...

वनदास - अश्क्या... हा नाही त्या गोष्टीत अश्लील बोलतो हां... आधीच सांगतोय..

अशोक - ए दिल्या.. तू गप पी ना... इथे गंभीर बोलणी चाललीयत अन तुझं काय हे मधेमधे..??

दिल्या - अरे हा वाटेत उभा होता.. सरकत नव्हता म्हणून ती पाहात होती...

वनदास - हे बघा.. हे बघा... च्यायला एखाद्याचं चांगलं होतंय ते बघवत नाही यांना...

अशोक - घाल रे यात एक लार्ज....

वनदास - तर तुला सांगतो...काय लेका तिचे डोळे आहेत...

अशोक - नेमके कसे आहेत...??

वनदास - म्हणजे असं एखादं खोल तळं असतं ना??

अशोक - तळं??

वनदास - हां.. म्हणजे असं... असं एकदम खोल खोलच गेल्यासारखं वाटतं तिच्या डोळ्यात पाहिलं की

अशोक - किती ??

वनदास - खूपच रे... तसं मांडता नाही येणार शब्दात....

अशोक - पण... म्हणजे ... भावना काय होत्या डोळ्यातल्या??

दिल्या - हा कोण छपरी आला मधेच समोर...

वनदास - अश्क्या हा नाठ लावणारे माझ्या निष्पाप प्रेमाला....

दिल्याने 'निष्पाप' हा शब्द ऐकून भिंतीवर एक मुष्टीप्रहार केला व हासला.

अशोक - तू मला सांग रे... हां... भावना काय होत्या डोळ्यांत..??

वनदास - जणू काही याच नजरानजरीच्या खेळाची मी कित्ती कित्ती जन्म वाट पाहात होते...

अशोक - वन्या... मला चढते हे ठीक आहे... पण एवढी नाय चढत...

वनदास - विश्वास नाही ना?? तुझाही विश्वास नाही ना??

अशोक - लेका पहिल्या नजरेत तुला एवढं कळलं होय??

वनदास - अरे... मी कविता केलीय कविता तिच्यावर....

'कविता' हा शब्द ऐकल्यावर मात्र दिल्याने एक सण्णकन वाजवली वन्याच्या पाठीत...

दिल्या - असले फालतू प्रकार मला या रूमवर चालायचे नाहीत... कविता बिविता...

वनदास - दिल्या.. तुला प्रेमातल्या भावना नाही कळणार... अरे कविता स्फुरते अशी...

'कविता स्फुरते' हे दोन शब्द वनदासने म्यानातून तलवार किंवा प्यान्टीतून बेल्ट ओढून काढावा तशी हालचाल करत उच्चारले.

अशोक - ऐकव..

वनदास - खरंच..??

अशोकने फर्माईश करणे व वन्याने खिशातून कागद काढणे या अपराधांसाठी दोघांनाही दिल्याकडून एक एक अस्सल शिवी भेट मिळाली.

आत्मानंद - यांना कविता पठण करूदेत... मनुष्याचे सर्वात सुंदर व्यक्तीकरण म्हणजे कविता...

आता मगाचपेक्षा जहरी शिवी आत्मानंदला मिळाली. दिल्याला घाबरून वन्या कविता बाहेर काढत नव्हता खिशातून!

अशोक - तू वाच रे कविता...

वनदास - अरे हे मारतं ना पण??

अशोक - ए दिल्या... च्यायला दादागिरी करू नको हां...

आता दिल्यालाही उत्सुकता वाटू लागली होती की आपल्या रूममधे चक्क एकाने कविता केली?? कशी आहे ती कविता??

दिल्या - मला जर आवडली नाही ना? तीन दिवस दारूला स्पर्श करू देणार नाय तुला..

वनदास - आवडेल आवडेल...

अशोक - अरे वाच ना...

वनदास - हां! ऐका...

दीपा माझी राणी...
.... आज तुला पाहिलं वर्गाच्या दारात... आणि....
मी... मलाच हरवून बसलो बघ... ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...

दिल्या - चक्षू म्हणजे काय??

अशोक - डोळे डोळे...

दिल्या - च्यायला डोळे गुलाबी असतात का??

वनदास - अरे प्रेमात पडलेल्या युवतींचे डोळे गुलाबी दिसतात... ऐकवू का पुढचं??

अशोक - बिनधास्त!

वनदास - दीपा माझी राणी.... आज तुला....

दिल्या - अबे पुढे चल ना?? तिथेच अडकतंय ग्रामोफोन सारखं..

वनदास - ऐका...

ते तुझे बदामी... गुलाबी... स्वप्नील चक्षू...
त्यातील ती आळसटलेली छटा... एक अखंड इंतजार... टिळकांनी सांगीतलेल्या मार्गावर समाजाला न्यायची...एक दुर्दम्य इच्छा....

हे ऐकून दिल्याने लाथ घातली वनदासला..!

वनदास - क... आता काय झालं??

दिल्या - टिळक कुठे आले इथे??

अशोक - दिल्या तू मारतोस फार हां पण याला...

दिल्या - आधी मला सांग तिच्या डोळ्यांवर कविता केली त्यात टिळकांचा संबंध काय??

वनदास - दिल्या... ही आपल्या समाजाची दारूण शोकांतिका आहे....

दिल्या - कसली??

वनदास - साहित्यात जोवर थोरांचे उल्लेख होत नाहीत तोवर त्या साहित्याची नोंद घेतली जात नाही...

दिल्या - म्हणून टिळक??

वनदास - टिळकांचा उल्लेख रिप्लेसेबल आहे..

दिल्या - म्हणजे काय??

वनदास - टिळकांऐवजी कोणतेही थोर नाव चालेल..

दिल्या - लय ब्येक्कार मार खाणारेस तू....

अशोक - ए ऐकव रे...

वनदास - ऐका...

तू जागी होताच.... पहाट सुगंधी होते... कोकिळा मधूर कूजन करतात...
... मला तर वाटतं... तू सारखी जागीच होत राहावंस...
ती तुझी अंगडाई... दवाला ज्यापासून नशा मिळते...
ते तुझे ओठ... ज्यांच्यापासून मॅक्डोवेल नंबर वन व्हिस्की कैफ चोरते...
ते तुझे कोमल हात... जे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात ... आ SSSSSSSSSSS

ए... आपण नाय वाचणार... च्यायला.. कविता करायची अन मार खायचा होय???

दिल्या - अश्क्या... तूच सांग... टिळक, कोकिळा, व्हिस्की अन स्वातंत्र्य यांचा काही संबंधय का??

आता अशोक गदगदून हसू लागला. वनदासला राग आलेला होताच.

वनदास - एक मारतं, एक तिथे शिवायचं नसल्यागत लांब बसतं अन एक कविता ऐकून हसतं...तिच्यायला होस्टेल आहे का इस्पीतळ??

अशोक - वन्या... तू काही म्हण लेका... पण.. टिळक कोकिळा व्हिस्की अन स्वातंत्र्यलढा हे काय एकत्र बसत नाय राव...

वनदास - मला वाटलंच होतं.. खेचतायत माझी... भर.. लार्ज भर...

दिल्या - हात लावायचा नाय दारूला आता तीन दिवस....

वनदास - हा घोर अन्याय आहे...

दिल्या - हाच न्याय आहे.. कविता ऐकवतो काय???

दिल्याने कवितेचा कागद हातात घेऊन त्याचा बोळा करून फेकला. आत्मानंदने तो घाईघाईत उचलला अन नीट सरळ करून घडी घालून खिशात ठेवला. तिकडे कुणाचे लक्षच नव्हते.

पण उदार मनाने वन्याला दारू प्यायची परवानगी मात्र दिली दिल्याने!

आत्मानंद - तुमच्या वाचास्वातंत्र्यावर गदा आली असे वाटत नाही का तुम्हाला??

वनदास - आली ना राव... गदाच काय.. भाले आले.. तोफा आल्या..

अशोक अजून हसतच होता.

दिल्या - पुन्हा या रूममधे कवितेतला 'क' काढायचा नाय..

आत्मानंद - त्यांचं पुढे काय झालं??

वनदास - कुणाचं?

आत्मानंद - दीपाताईंचं???

दीपाला 'ताई' लावलेलं पाहून आता दिल्याही हसायला लागला. भिंतीवर दोन बुक्या बसल्या. एवढंच काय वनदासही हासला!

अशोक - वहिनी म्हण लेका वहिनी...

आत्मानंद - छे छे! विवाहापुर्वी असे संबोधन एखाद्या युवतीच्या नाहक बेअब्रूस कारणीभूत ठरेल..

अशोक - ह्याचं बोलणं एकदा टेप करून ठेवायचंय राव मला...

आत्मानंद - मी स्वतःच करून देईन... टेप रेकॉर्डर आणू परवडेल तेव्हा..

अशोक - वन्या.. पण खरंच... पुढे काय झालं रे?

वनदास - अरे ती बेंचवर बसल्यावर मी दाराबाहेर दोन मिनीटे थांबलो ना?? त्या दोन मिनिटांमधेही आमची तीन वेळा नजरानजर झाली...

अशोक - दिल्या.. हे गंभीर आहे हां??

वनदास - तुला सांगतो... इतकी मधाळ बघते रे...

अशोक - लेका उद्या यावर बसलं पाहिजे...

आत्मानंद - मग आज कशावर बसला आहात??

अशोक - तुम्ही मधे अडथळे आणू नका...

वनदास - मला तर काही सुचतच नाय राव... काय करू रे आता दिल्या? पुढची स्टेप काय??

दिल्या - मार खाणे...

वनदास - याला विचारण्यात काय अर्थच नाय...

अशोक - मला वाटतं तू बोल एकदा तिच्याशी...

वनदास - काय बोलू??

अशोक - मन मोकळं कर ना??

वनदास - एवढं सोपंय होय??

अशोक - त्यात काय? सांगायचं.. बरेच दिवस आपण एकमेकांकडे पाहतो आहोत... आज मला वाटले की आपल्याशी बोलावे.. खूप इच्छा आहे मनात बोलण्याची...

वनदास - दार वाजतंय... ए आत्म्या... दार उघड की????

रात्रीचे साडे दहा वाजलेले होते. आत्मानंदने दार उघडले. बाहेर शिपाई होता.

"आत्मानंद ठोंबरे???"

आत्मानंद - मीच....

शिपाई - फोन आहे...

आत्म्याला आलेला फोन हा त्या रूममधील या वर्षीचा पहिला फोन होता. सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. पाच मिनिटांनी आत्मानंद रूममधे आला... शांत होता...

अशोक - काय हो?? काही विशेष...

त्यानंतर आत्म्याने उच्चारलेले वाक्य ऐकून ताडकन सगळे उभे राहिले अन खोली आवरायला लागले...

"बाबा येतायत.. उद्या पहाटे चारला..."

गुलमोहर: 

बेफिकीरजी,
Lol Lol Lol Lol Lol Lol

वनदासने केलेली कविता.. खूप हसले...
पुढील भागांची आतुरतेने वाट पहात होते..एकदम २ भाग वाचायला मिळाले.. धन्यवाद. Happy

मस्त लिहीता तुम्ही.. You are a great writer... लिहीत रहा...
जे अनेक रसिक वाचक तुमच्या लेखनाची आतुरतेने वाट पाहतात.. त्यांचीच गणती लक्षात घेउन, तुम्ही असेच लिहीत रहावे ही विनंती!
पु. ले. शु.

त्यानंतर आत्म्याने उच्चारलेले वाक्य ऐकून ताडकन सगळे उभे राहिले अन खोली आवरायला लागले...

"बाबा येतायत.. उद्या पहाटे चारला..."
>>>>>>>> मुन्नाभाईमध्ये अगदी असाच सीन आहे.

मुन्नाभाईमधील सीन माझ्या कथेमधे जसाच्या तसा उतरला असल्यास क्षमस्व! तसा हेतू नव्हता, खरंच!

तरीही दिलगीर आहे.

-'बेफिकीर'!

तू लिहीरे.. बेफिकीर लिही, दिलगिरी वगैरे जरा जास्त होतय... नाहीतर तुझ नाव बेफिकीरी वरुन दिलगीरी ठेवाव लागेल Happy मस्त...

न्नाभाईमधील सीन माझ्या कथेमधे जसाच्या तसा उतरला असल्यास क्षमस्व! तसा हेतू नव्हता, खरंच!>>>>>>>>> Lol
अरे हा काय पुचाटपणा आहे? तुम्हाला वाटलं ते लिहीलं, कोणाला आवडलं, नाही आवडलं त्यांचा प्रश्न आहे, तुम्ही काय दिलगीर होत सुटला आहात.

इथे व ह्या कथेच्या इतर भागांवर आलेल्या प्रतिसादांबद्दलः

माबोवर येणार्‍या लेखनावर नेहेमीच बर्‍या-वाईट प्रतिक्रिया येतात. केवळ माबोवरच्याच लिखाणावर नाही तर विविध साहित्यकृतींवरदेखील येथील लोक लिहितात (हे तुम्ही जर 'मी वाचलेले पुस्तक' मधील पुस्तक परिक्षणाचे धागे बघितले तर लक्षात येईल). हे सर्व परिक्षणे लिहिणारे, प्रतिक्रिया देणारे कुठल्या आकसातून वा जळफळाटातून प्रतिक्रिया देत नाहीत. एक वाचक म्हणुन त्यांचा हा प्रतिसाद असतो. बेफिकीर ह्यांनी इथे बर्‍याच कलाकृती सादर केलेल्या आहेत. त्या कलाकृतींचा एक खास वाचकवर्ग निर्माण झालेला आहे आणि हे ह्या कलाकाराचे निश्चितच यश आहे. पण ह्याचा अर्थ असा नव्हे की त्यांच्या कलाकृती सर्वांना आवडतील वा सर्वजण त्या वाचतील. उदाहरणार्थ, मी ह्या प्रकारच्या कादंबर्‍या वाचणार नाही कारण तो माझा पिंड नाही. ह्या कादंबर्‍या आवडीने वाचणारे मी अथवा दुसरा कोणीतरी ज्या प्रकारच्या कादंबर्‍या/कथा वाचतो त्या वाचणार नाही. ह्यात उच्च-निच अभिरुची वगैरे नसून हे वेगवेगळे कलाप्रकार (जॉनर) आहेत असे म्हणु. काही लोकांना खरेच बेफिकीरांच्या काही कादंबर्‍या आवडल्या असतील पण काही कादंबर्‍या वा काही विशिष्ट भाग आवडले नसतील. 'श्री..एक बाप' ही कादंबरी अनेक लोकांना आवडली आहे पण त्यातल्याच अनेकांना त्यांच्या इतर कादंबर्‍या आवडल्या नाहीत. एखाद्याने इथे येउन हे लिखाण वाचून त्यावर जर त्याला/तिला वाटलेली भावना/प्रतिक्रिया दिली व ती प्रतिकूल असेल तर लगेच 'तुमच्यावर लोकं जळतात', केवळ हांजी/वावा/बहोत खूब प्रकारच्या प्रतिक्रिया अपेक्षित असणे (लेखक तसेच इतर वाचकवर्गाला) असे म्हणणे मूर्खपणाचे आहे. तसेच एकूण लेखक-वाचक संबंधांना मारक आहे.

टण्या आणि वैद्यबुवा मी सिंडीला काही म्हंटलच नाही आहे, तिने कुठे निगेटीव्ह प्रतिक्रिया दिली आहे? तिला साधर्म्य जाणवल ते तिने सांगितल. मला वाटल बेफिकीरी विनाकारण तिची प्रतिक्रिया नकारात्मक घेतो आहे. असो हा त्याचा विनम्र पणा आहे पण मी फक्त कोटी करत होतो Happy नथींग वयक्तीक Happy

बरं बरं सत्यजीआ, आलं लक्षात. मी तुमचं नाव काढलं आहे. बाकी माझ्यामते त्यांनी घेतलेला अर्थच बरोबर आहे (मलाही तोच वाटला) Proud आणि तो अर्थ असला तरी दिलगिरी वगैरे व्यक्त करणे हे मला विनोदी वाटलं येवढच.

@सत्यजित, मी लिहिलेल्या प्रतिसादाचा आणि तुमच्या प्रतिसादाचा संदर्भ नाही. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा तुमचा प्रतिसाद नव्हता.

ओल्ड मंक लार्जचा वाचकवर्ग पण लार्ज झालाय हे पाहून मस्त वाटतंय... Happy पूर्वी फक्त फॅन्स होते आता समिक्षकही आलेत हे बेफिकीरजींच्या ह्या कादंबरीचे यश आहे. अभिनंदन!!!!

हा सुद्धा भाग वाचून अक्षरशः पोट धरुन हसले. Rofl

ड्रिमगर्लच्या प्रतिसादाने पुन्हा एकदा हे प्रूव्ह झाले की बेफिकीरजींना कुठलीही कथा लिहिण्यासाठी प्रत्यक्ष त्या कथेतील वातावरणाचा अनुभव घ्यायची गरज नाही. त्यांच्या सुप्त मनात सिनेमा, वर्तमानपत्रातील घटना, आजूबाजूच्या लोकांमधल्या चर्चा अगदी व्यवस्थित जाग्या राहतात आणि लिहायला लागले की त्या अगदी रिलेव्हंटली जिवंत होतात...
ह्या कादंबरीला असलेल्या विनोदी झालरीमुळे मी ती प्रचंड एन्जॉय करतेय... आज पुन्हा म्हणतेय...लगे रहो बेफिकीर, हम तुम्हारे साथ हैं Happy Happy Happy

बेफिकिर, छान रंगतेय कादंबरी Happy
तुमची पहिली कादंबरी वाचल्यापासुन तुमचे लिखाण मी आवर्जून वाचतेच. अगदी पहिल्या कादंबरीच्या पहिल्या भागापासून तुमची फॅन झालेय Happy

बेफिकीरजी,
तुम्ही खुप छान लिहितात. मायबोलीवर आपले लेखन मला सर्वात जास्त आवडते.

लोकांच्या प्रतिक्रियांविषयी...
तुम्हाला त्या योग्य वाट्ल्या तर स्वीकारा नाहितर सोडुन द्या. Personally घेउ नका.
लोक जळतात असे प्रतिकियांवरुन मला अजिबात वाटत नाही. चार लोक (किंवा आपले ४ विद्यार्थी) एकत्र आले की वाद होणारच.

लोक जळतात असे प्रतिकियांवरुन मला अजिबात वाटत नाही. चार लोक (किंवा आपले ४ विद्यार्थी) एकत्र आले की वाद होणारच.>>> निलिमा, पूर्णपणे सहमत आहे. मी तर उलट असे म्हणेन, की अशी साधक-बाधक चर्चा घडलीच पाहिजे, त्यातूनच कुठल्याही कलाकृतीला पूर्णत्व लाभते.
जळणे बिळणे हे शब्दसुद्धा वाचवत नाहीत. कोणी जळत नाहीये इथे, हे तर नक्कीच...उगाच आपापसात दुही निर्माण करणारे बिनबुडाचे स्टेटमेन्ट्स कुणी करु नये ही नम्र विनंती.

@ मधुकर......................

निदान दुसर्यांच्या धाग्यावर तरी... आग लावणारे लिखाण करून नका.....

इथे कोणी कोणावर जळत नाहीये......

>>>
तुम्ही खरंच खुप छान लिहीता ...अगदी त्या लिखाणाची ओढ लागते.
डोळे आपोआप मायबोलीवर तुमच्या लिखाणाचा शोध घेतात.

आवडली!

-आनन्दा

हा भागही नेहमीप्रमाणे छान झाला आहे, पण एक तक्रार आहे, वाढत्या भागांच्या संख्येबरोबर; प्रत्येक भागाची लांबी कमी होत आहे, तेव्हा बेफिकीरजी प्रत्येक भागाची लांबी वाढवावी ही विनंती!

वरील चर्चा लक्षात घेता बेफिकीर याची जबाबदारी कैक पटीने वाढतेय.......आणि हे खरोखरच
कादंबरीचे यश अस म्हणण वावग ठरणार नाही...

ओल्ड मंक लार्जचा वाचकवर्ग पण लार्ज झालाय हे पाहून मस्त वाटतंय... पूर्वी फक्त फॅन्स होते आता समिक्षकही आलेत हे बेफिकीरजींच्या ह्या कादंबरीचे यश आहे. अभिनंदन!!!!...
.....सानी अनुमोदन....

सावरी

त्यानंतर आत्म्याने उच्चारलेले वाक्य ऐकून ताडकन सगळे उभे राहिले अन खोली आवरायला लागले...

"बाबा येतायत.. उद्या पहाटे चारला..." हेच होतं अगदी होस्टेलला

धन्य धन्य बेफिकीरजी तुम्ही ..........सर्वात आवडलेला पंच "घंट्याची प्रार्थना?......घंटा नसली तरी चालेल तुम्ही टाळ्या वाजवा Rofl

Rofl Rofl Rofl

व्वा!!! व्वा!!! सह्ह्ह्ह्ही!!! ३ भाग एकदम वाचले....खुप खुप खुप खुप खुप मज्जा आली!!!!!!!

चर्चा वाचून काही मते स्पष्टपणे मांडावेसे वाटली.

१. सिंडरेला यांनी आजवर कोणताही इतर प्रतिसाद न देता (कुठे दिलेला असल्यास असेलही, पण नियमीत तर प्रतिसाद नसतो) एकदम 'एखादा भाग मुन्नाभाईप्रमाणे' झालेला आहे असे लिहीताना आणखीन एखादे वाक्य अ‍ॅड करायला हवे होते की 'असे म्हणण्यात त्यांना मी कॉपी करतो आहे असे वाटत आहे किंवा नाही'! मागे कुणीतरी 'खडूस' नावाच्या सदस्याने ओल्ड मंकवर 'तरुण तुर्क'चा प्रभाव आहे असे म्हंटले होते. अशी विधाने करण्यासाठी आवर्जुन वेळ काढणार्‍या सदस्यांना एखादे वाक्य 'तुम्ही कॉपी करता असे म्हणायचे नव्हते' असे लिहावेसे वाटू नये हे जरा विचित्र आहे. त्यातून हेतूबद्दल शंका येते. अशावेळेस 'मी दिलगीर आहे' असे म्हंटलेले चांगले!

२. टण्या - लेखक वाचक संबंध वगैरे जरा बाजूला ठेवुयात! हेवेदावे, जळफळाट या गोष्टी नसतात असेही नाही. आपण ही (व कदाचित एस.एस.एस. ही) कादंबरी अतिशय फालतू आहे असे म्हणालात (शालेयही म्हणाला होतात) त्या दोन्ही वेळेला मी 'मताचा आदर आहे किंवा दिलगीर आहे किंवा आवर्जून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद' एवढेच म्हणालो होतो. मी माझ्या लिखाणाला वाचणार्‍याच्या मताचा आदर केला होता. आपण 'आपल्याला उद्देशून नसलेल्या व कुणीतरी कुणालातरी उद्देशून मांडलेल्या मतावर' पुन्हा प्रतिसाद देऊन लेखक वाचक संबंध वगैरेबाबत चिंता व्यक्त केलीत. ते संबंध चांगले राहावेत ही आपली जबाबदारी आहे असे मला वाटत नाही. लोक आपापले बघून घेतील याची खात्री आहे. एखाद्याच्या कलाकृती सर्वांना आवडणार नाहीत हे सगळ्यांनाच समजू शकते. तेही व तेवढेच विशेषकरून लिहिण्याचे प्रयोजन काय असू शकेल याबाबत संदेह आहे. कविता ही माझी पॅशन आहे. एखाद्याची कविता आवडली नाही तर मी कितीही अप्रिय होण्याची शक्यता असली तरीही तेथे जाऊन तसा प्रतिसाद देतो, याचे कारण कविता व गद्य यांच्या आशय सामावण्याच्या व सांभाळण्याच्या स्वरुपातच मूलभूत फरक आहेत. मात्र इतर कोणत्याही लेखनावर किंवा गप्पांच्या पानावर जाऊन मी दुसर्‍याच्या लेखनाबाबत नकारात्मक मत मांडत नाही हे आपण तपासू शकता. आपण आजवर जे दोन, तीन प्रतिसाद दिलेत ते सर्व नकारात्मक असूनही मला आपल्याबाबत आदर होता. पण माझा एकही शेर, एकाही कवितेतील ओळ, एकाही कादंबरीतील एकही वाक्य, यातले काहीच न आवडण्यासारखे असेल यावर निदान माझा विश्वास नाही. यामुळे आता मला आपल्या प्रतिसादाच्या हेतूची सुयोग्य शंका येणे रास्त आहे.

३. वैद्यबुवा - मी पुचाट नाही. मी काय आहे हे सांगण्यातही अर्थ नाही. आपण मन लावून जे लेखन करतो त्याला जर एखाद्याने जाहीरपणे 'हे त्या ह्याच्यासारखं आहे' एवढाच प्रतिसाद दिला तर दिलगिरी व्यक्त करणे ही फक्त नम्रता आहे. या ज्या कोण सिंडरेला आहेत त्यांच्या एकाही लेखनावर मी आजवर कधीही जाऊन प्रतिसाद दिलेला नाही. आम्ही एकमेकांना ओळखत नाही. त्यामुळे कोणताही आकस असणे शक्य नाही. असे असतानाही 'हा सीन मुन्नाभाईसारखा आहे' हे म्हणताना त्यांनी एक वाक्य अधिक लिहायला हरकत नव्हती की 'बेफिकिर ओरिजिनल लिहीत असतील असेही वाटतेच' वगैरे! मी जर म्हणालो की तुम्ही गणपत पाटीलसारखे दिसता तर हेही म्हणायला पाहिजे की 'तरीही तुम्ही ओरिजिनलही दिसता'! नाही का? (मी असे म्हणत नाहीये, कारण तुम्हाला पाहिलेले नाही व तशी इच्छाही नाही.)

४. मित्रांनो, मी आजवर कोणत्याच प्रतिसादाला उद्देशून कधीही वाद घातलेला नाही (एक्सेप्ट गझल आणि अपवादाने एखादी कविता, माझी अथवा इतरांची) पण हे येथले काही प्रतिसाद पाहून वैताग येतो व डोकेदुखी होते. मात्र मी आपला लिहीत राहणार आहे. काहीही प्रतिसाद द्या / देऊ नका!

धन्यवाद!

जे मुळात नाही तिथे अशी लाथ मारतो मी
की 'नको तिथे' लागल्यापरी नाचतात सारे

-'बेफिकीर'!

बेफिकिर, तुमची पहिली कादंबरी वाचून त्यावर आवडली असा प्रतिसाद मी दिला होता. पण तुम्ही इतक्या वेगाने कादंबर्‍या आणि इतर साहित्य प्रकार प्रकाशित करता. शिवाय तुमचा फॅनक्लब इतका मोठा आहे की ती प्रतिक्रिया तुमच्या नक्कीच लक्षात राहिली नसणार. शिवाय मी ह्या कादंबरीतला फक्त तो शेवटचा पॅरा वाचलाय स्क्रोल डाउन करताना. म्हणून त्यावर प्रतिसाद दिला.

आणि अतिशय महत्वाचे, प्रतिसाद देताना मी वाचक म्हणून देते. मी काय लिहिले नाही किंवा नाही, त्यावर तुम्ही काय प्रतिसाद दिला किंवा नाही ह्याचा त्याच्याशी काही संबंध नसतो. असो.

अहो, परत घोळ केलात ना? आता तुम्ही दिलेलच उदाहरण घेऊ.
समजा तुम्ही येऊन मला म्हणालात की मी गणपत पाटील सारखा दिसतो. हे तुम्ही मला अख्खा न बघता म्हणालात... म्हणजे.... फक्त एकदा कुठे तरी ओझरतं पाहिलत, तरीही तुम्हाला हा शहाणपणा करायची बुद्दी सुचली (असं आपलं समजा). आता मी काय तुम्हाला " अहो, मी जर तुम्हाला गणपत पाटिल सारखा दिसतो त्या बद्दल मी अगदी मनापासुन दिलगीर आहे"??? असं म्हणायचं का? Lol कैत्तरी चक्रमपणा...
आपण ओरिजिनली कोण आहोत हे मला जास्त माहीत की तुम्हाला?

आम्ही एकमेकांना ओळखत नाही. त्यामुळे कोणताही आकस असणे शक्य नाही. असे असतानाही 'हा सीन मुन्नाभाईसारखा आहे' हे म्हणताना त्यांनी एक वाक्य अधिक लिहायला हरकत नव्हती की 'बेफिकिर ओरिजिनल लिहीत असतील असेही वाटतेच' वगैरे! >>>>>>>> हा तर सरवात मोठा विनोद आहे!!
आकस नसताना लोकं येऊन असं अगदी नेहमी गुळगुळीतच बोलतात असं वाटतं की काय तुम्हाला? बाकी, बेफिकीर ओरिजिनल लिहीतात (नेहमीच) असं सगळ्याच वाचकांना वाटतच हे कशावरुन? की असं गृहित धरुनच चालता तुम्ही?
बाकी, सिंड्रेला ह्यांनी का लिहीलं, कशाला लिहीलं ह्याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही.

जे मुळात नाही तिथे अशी लाथ मारतो मी
की 'नको तिथे' लागल्यापरी नाचतात सारे>>>>>>>>>>>

जुळिवलत ना यमक परत!
हशीवलत ना मला..... परत! Lol

बेफिकीर,

खर तर आज नवीन भागाच्या प्रतिक्षेत आले होते पण...तुम्ही आजदेखिल नवीन भाग पोस्ट केला नाही...
असो लवकरच तुम्ही तो पोस्ट कराल याची खात्री आहे....

तुम्च्या केलेल्या विधानाबद्दलः

पण हे येथले काही प्रतिसाद पाहून वैताग येतो व डोकेदुखी होते.....प्लिज अस काहिही होउ देउ नका....त्यामुळे आम्हा वाचक वर्गाला एक प्रकारची काळजी वाटते...

मात्र मी आपला लिहीत राहणार आहे.....तुमची हीच भुमिका अपेक्षित आहे....
फक्त नी फक्त लिहीत रहा.....

सावरी

>>>आपण ही (व कदाचित एस.एस.एस. ही) कादंबरी अतिशय फालतू आहे असे म्हणालात (शालेयही म्हणाला होतात)>>>
बेफिकीर, माझ्या आठवणीनुसार मी आपल्या सोलापूर.. ह्या कादंबरीवर खालीलप्रमाणे प्रतिसाद दिला होता..
ज्या वेगाने तुम्ही कादंबरी पूर्ण केलीत ते खरेच कौतुकास्पद आहे.. मी सर्व भाग वाचले नाहीत, ४-५ भागापर्यंत वाचले.. ह्यात अर्थात तुमच्या लिखाणापेक्षा माझ्या आवडीचा प्रभाव जास्त.. मला खटकलेल्या काही गोष्टी:
१. संवाद लिहिताना आई-, मीना- अश्या पद्धतीने संवाद लिहिणे फार बाळबोध पद्धत आहे असे मला वाटते. पात्रांमधील संवाद हे आपोआप वाचकाला कळले पाहिजेत, ते अमूक अमूक म्हणाला असे लिहिणे थोडे शालेय होते.
२. मीना हे पात्र (वा इतर पात्रे) ह्यांच्या डोक्यातले विचार तुम्ही बरेच उलगडून लिहिले पण त्यात अनेकदा विरोधाभास वाटला.. पहिल्या एक-दोन भागात मीनाच्या डोक्यातले विचार, तिची कृती ही तिथल्याच एक-दोन आधीच्या परिच्छेदात असलेल्या उल्लेखाच्या उलट होती.
अर्थात रहस्यकथा/थरारकथा ह्या प्रकारच्या फॉर्ममध्ये हे खपून जाते.. पण म्हणुन तसेच लिहावे असे नाही.. असो..


(ह्यातला क्र १ चा विचार आपण केल्याचे अजूनही जाणवत नाही.)
ते चार-पाच भाग वाचल्यानंतर तुमची प्रत्येक कादंबरी मी पहिला भाग नजरेखालून घालून पुढे वाचली नाही. वर लिहिल्याप्रमाणे, मी न वाचण्याचे कारण हे माझी स्वतःची आवड-निवड आहे. राहिला गझलांचा प्रश्न, तर गझल काही माझा फार आवडता प्रकार नव्हे. आपल्या ज्या काही थोड्याफार गझला वाचल्या आहेत त्यातला एखादा एखादा शेर आवडला होता. संपूर्ण गझल म्हणुन त्या मला अतिसामान्य वाटल्या. अर्थात पुन्हा माझी आवड व आपले लेखन हे non-overlapping sets आहेत.

लेखक-वाचक संबंध ह्या मला अपेक्षित असलेल्या संज्ञेचा आपण घेतलेला अर्थ फारच वेगळा आहे. इथे मला लेखक व वाचक ह्यांचे व्यक्ति म्हणुन परस्परसंबंध अपेक्षित नसून लेखकाची कलाकृती व तिचा असलेला वाचकाशी संदर्भ असे अपेक्षित होते.

मी इथे पहिला प्रतिसाद दिला तो माझी ओल्ड मंक ह्या ब्रँडबरोबर असलेला अनेक घटना/आठवणींचा समुच्चय खूप मोठा असल्याने 'ओल्ड मंक..' हे शीर्षक बघून माझी उत्सुकता चाळवली गेली म्हणुन.

दुसरा प्रतिसाद मी दिला होता तो इथे ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्याबद्दल होता. त्यात मला जे म्हणायचे आहे ते स्पष्टपणे म्हटलेले आहे. ते तुम्ही पुन्हा वाचू शकता.

आपले शेवटचे वाक्य मला फार महत्वाचे वाटले. >> पण माझा एकही शेर, एकाही कवितेतील ओळ, एकाही कादंबरीतील एकही वाक्य, यातले काहीच न आवडण्यासारखे असेल यावर निदान माझा विश्वास नाही. >>>>
तुमचा आत्मविश्वास जबरदस्त आहे. गझलेबद्दल मी वर लिहिलेलेच आहे. आपल्या कादंबर्‍यांपैकी मी जे काही वाचले आहे त्यातले मला काहीच वाचनीय वाटले नाही. त्यात माझी आवड व निकष ह्या गोष्टी प्राथमिक कारणे आहेत. बाबा कदम, आशा बगे अश्या व इतर अनेकांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर चकचकीत रंगात स्त्री-पुरुषाच्या चेहर्‍याचे चित्र असलेल्या कादंबर्‍या मला हातातसुद्धा धरवत नाहीत. अनेक लेखकांचे संपूर्ण लिखाण मला अजिबात आवडत नाही, अनेक लेखकांचे सर्वच्या सर्व लिखाण मला मनापासून आवडते, माझ्या काही अत्यंत प्रिय कादंबर्‍यांच्या लेखकांच्या इतर काही कादंबर्‍या मला तद्दन फालतू वाटल्या. ह्याचा अर्थ माझे त्या लेखकांशी काही वैयक्तिक आकस आहेत असा नाही. आजवर मी कुठल्याच लेखकाला वैयक्तिक रित्या ओळखत नाही. माझा संबंध फक्त त्या लेखकाच्या कलाकृतीशी असतो, व्यक्तिशी नाही. जशी कविता तुमची पॅशन आहे तसे लघुकथा व कादंबरी हे माझे आवडते साहित्यप्रकार आहेत (वाचक म्हणुन, मी लेखक नाहिये). त्याबद्दल मला जे काही आवडते/नावडते वा नावडण्या इतपत दखलपात्र असते त्यावर 'मी वाचलेले पुस्तका' इथे वा त्याच ग्रूपमध्ये वेगळा धागा उघडून मी (व इतर अनेकजण) सविस्तर लिहितो.
>>> यामुळे आता मला आपल्या प्रतिसादाच्या हेतूची सुयोग्य शंका येणे रास्त आहे. >>>
तुम्हाला इथली लोकं काय लघुनियतकालिके चालवणार्‍या चळवलीतली पुस्तके उचलून धरणारी वा पाडणारी तरुण पोरं/पोरी वाटले का? की अमूक एकाची तळी उचलल्याने व दाबल्याने साहित्य सहवासमध्ये फ्लॅट मिळणार आहेत? मला वा इतर कुणाला तुम्ही लिहिलेल्या कादंबर्‍यातली एकही कादंबरी न आवडण्यामागे कसली डोंबलाची शंका येतेय तुम्हाला. तुम्ही जे लिहिताय ते काय क्लासिक आहे होय की गाजवलं तर कोसला होईल आणि दाबलं तर सात सक्कं त्रेचाळीस. कायच्चा काय काहितरी.

हा हा हा हा! मला काय समजले नाहीत राव हे प्रतिसाद! असो!

एवढासाच जन्म आहे पण....
काय एकेक चालले आहे...

-'बेफिकीर'!

Pages